SSC HSC Board Results : 10वी 12वी निकालासंदर्भात मोठी अपडेट!! कधी जाहीर होणार निकाल?

करिअरनामा ऑनलाईन । 10वी आणि 12वी परीक्षेच्या निकलाविषयी (SSC HSC Board Results) महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या यंदाच्या हायस्कूल आणि इंटरमिजिएटचे निकाल लवकरच जाहीर होणार आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र बोर्डाचा निकाल पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र बोर्डाने या महितीला अधिकृत दुजोरा दिला नाही.
10वी आणि 12वीचा परिक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर, mahahsscboard.in किंवा mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थी त्यांचा निकाल पाहू शकतात. या अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे. निकाल तपासण्यासाठी, विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर, जन्मतारीख आणि प्रवेशपत्र, ओळखपत्र यांसारखे तपशील नोंद करावे लागतील.

12वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत पार पडली तर 10वीची परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च या कालावधीत पार पडली. 12वीच्या परीक्षेसाठी (SSC HSC Board Results) राज्यातून 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी 10वीची परीक्षा दिली होती.
कधी जाहीर होणार निकाल?
CBSE ने सध्या अधिकृत वेबसाइटची तारीख आणि वेळ जाहीर केलेली नाही. परंतु, मिळालेल्या माहितीनुसार बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. तर दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जूनच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच (SSC HSC Board Results) बारावीच्या उत्तरपत्रिका पडताळणीचे तसेच मॉडरेशनचे काम अंतिम टप्प्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे. मात्र या निकालासंदर्भात बोर्डाने या माहितीला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

इतके गुण मिळणे आवश्यक
महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी आणि बारावी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात एकूण 33% गुण मिळणे आवश्यक आहे. तुम्हाला कोणत्याही एका किंवा दोन विषयात तुमच्या किमान गुणांपेक्षा कमी गुण मिळाले, तर तुम्हाला कंपार्टमेंट परीक्षेत बसावे लागेल. दुसरीकडे, विद्यार्थ्यांना (SSC HSC Board Results) दोनपेक्षा जास्त विषयात कमी गुण मिळाल्यास नापास मानले जाईल. अशा विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार नाही.
2022 मध्ये, महाराष्ट्र बोर्डाचा 10वीचा निकाल 17 जून 2022 रोजी जाहीर झाला होता. तर 12 वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल 8 जून 2022 रोजी हीर झाला होता. निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच लिंक सक्रिय करण्यात आली. मात्र यंदा निकालाला उशीर होणार नाही. पुढील आठवड्यापर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com