SSC HSC Results 2023 : 10 वी-12 वीचा निकाल ‘या’ दिवशी; वाचा मोठी अपडेट

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावी (SSC HSC Results 2023) आणि बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. आता प्रतीक्षा आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या निकालाची. निकाल कधी लागणार याची उत्सुकता विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये दिसत आहे. दरम्यान विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे निकाल उशिरा लागणार का अशी चर्चा होती. मात्र राज्य शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, बारावीचा निकाल मे महिन्यात तर दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे.
बारावीचा निकाल 31 मे पूर्वी लागू शकतो तर दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. राज्य शिक्षण मंडळाने दहावीची परीक्षा (SSC HSC Results 2023) मार्च महिन्यात घेतली होती. 2 ते 25 मार्च या कालावधीत परीक्षा पूर्ण झाली होती. दहावीच्या परीक्षेला सुमारे 16 लाख विद्यार्थी बसले होते. तर बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च दरम्यान पार पडली होती. या परीक्षेला 14 लाख विद्यार्थी बसले होते.

राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितलं की, बोर्डाच्या परीक्षांचे निकाल तयार करण्याचं काम सुरू आहे. यातील बारावीचे निकाल 31 मे पूर्वी आणि दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.

संपाचा कोणताही परिणाम नाही (SSC HSC Results 2023)
राज्यातील शिक्षकांनी विविध मागण्यांसाठी उत्तर पत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे निकाल कधी लागणार? निकालावर याचा परिणाम होणार का? असे प्रश्न निर्माण झाले होते. याशिवाय जुन्या पेन्शनच्या मागणीसाठीही संप पुकारण्यात आला होता. यामुळे अनेक शैक्षणिक कामे झाली (SSC HSC Results 2023) नव्हती. पण या संपाचा परिणाम उत्तरपत्रिका तपासणीवर झालेला नाही. आता सीबीएसईने निकाल जाहीर केल्यानंतर राज्य मंडळाच्या 10वी-12वीच्या निकालाची चर्चा प्रतीक्षा होत आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com