Teachers Strike : ऐन परीक्षेच्या तोंडावर शिक्षक गेले संपावर, विद्यार्थ्यांना सोसावे लागणार नुकसान

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांनी (Teachers Strike) जुनी पेन्शन योजना सुरू करण्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या बेमुदत संपामध्ये शिक्षकही सहभागी झाले आहेत. परिणामी 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षेवर संपाचे सावट आहे. त्यातच आज, मंगळवारपासून शाळांचे वर्ग भरणार नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे अन्य वर्गांच्या विद्यार्थ्यांनाही परीक्षा तोंडावर आल्या असताना अभ्यासाचे नुकसान सोसावे लागत आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन योजनेसाठी बेमुदत संपात सहभाग नोंदविला आहे. परिणामी आज, मंगळवारपासून सर्व शैक्षणिक कामकाज ठप्प (Teachers Strike) होणार आहे. त्यातच बारावी आणि दहावीच्या बोर्डाच्या परीक्षाही सुरू आहेत. काही संघटनांनी बोर्डाच्या परीक्षांवर हजेरी लावून त्या सुरळीत पार पाडण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद संपात सहभागी होणार आहे.

मात्र विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी केवळ बोर्डाच्या परीक्षांचे पर्यवेक्षण केले जाईल, असे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे मुंबई कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी सांगितले. मात्र परीक्षांबाबत अद्याप अनेक संघटनांची भूमिका संभ्रमाची आहे. काही संघटना संपावर ठाम असून परीक्षांवरही (Teachers Strike) बहिष्काराच्या विचारात आहेत. याबाबत संघटनांची मंगळवारी बैठक होणार असून त्यात निर्णय घेतला जाणार आहे, असे पदाधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे अद्यापही परीक्षांवर टांगती तलवार आहे. त्यातच शिक्षकांकडून दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर पूर्णपणे बहिष्कार टाकण्यात येणार आहे. त्यामुळे निकालाला विलंब होण्याची भीती आहे.

दरम्यान, परीक्षांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचा (Teachers Strike) दावा शिक्षण मंडळाने केला आहे. परीक्षा सुरळीत पार पडतील, असे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com