Success Story : कधी टेम्पो चालवला.. भिकाऱ्यांसोबत रस्त्यावरही झोपले; IPS होवून प्रियसीला दिलेलं वचन पूर्ण केलं

करिअरनामा ऑनलाईन । मनोज कुमार शर्मा यांना भेटा… ज्यांनी IPS अधिकारी (Success Story) बनण्याचे त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्व अडचणींचा सामना केला. मध्य प्रदेशातील मुरैना येथील रहिवासी असलेल्या मनोज यांना यशाच्या मार्गावर अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. ते 12वीच्या परिक्षेत नापास झाले तरीही त्यांनी आपल्या क्षमतेवरील विश्वास कधीही गमावला नाही. परिस्थितीशी झुंज देत असताना मनोज यांनी ग्वाल्हेरमध्ये टेम्पो ड्रायव्हर म्हणून काम केले. रस्त्यावर भिकाऱ्यांबरोबर झोपले. हे करत असतानाच त्यांनी UPSC परीक्षेची तयारी केली. त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट होती; तरीही त्यांनी ध्येयाचा पाठलाग सोडला नाही.

अभ्यासात अजिबात रस नव्हता
IPS किंवा IAS म्हंटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतं ते म्हणजे अतिशय हुशार, अभ्यासू व्यक्ती. आज आपण अशा एका IPSची गोष्ट ऐकणार आहोत ज्यांना अभ्यासात अजिबात रस नव्हता. पण पहिल्यापासूनच सगळेच अभ्यासू असतात असं नाही. यापैकीच एक आहेत आयपीएस मनोज कुमार.

4वेळा दिली परीक्षा (Success Story)
यश अपयशाचा सामना करत असताना खचून न जाता मनोज यांनी यूपीएससीची चार वेळा परीक्षा दिली. पहिल्या तीन प्रयत्नात त्यांना निराशेचा सामना करावा लागला, पण चौथ्या प्रयत्नात त्यांनी विजय मिळवला. त्यांनी संपूर्ण भारतात 121वी रॅंक मिळवली. ते मुंबई पोलिसांमध्ये अतिरिक्त आयुक्त म्हणून काम करत आहेत. मनोज कुमार शर्मा यांच्या सशक्त व्यक्तिमत्त्वामुळे त्यांना इतरांकडून ‘सिंघम’ आणि ‘सिम्बा’ हे टोपणनाव मिळाले आहे.

गरीब कुटुंबात जन्म; 12 वीत नापास 
बारावी नापास होण्यापासून ते आर्थिक अडचणींशी झगडत एक यशस्वी आयपीएस अधिकारी होण्यापर्यंतचा मनोज यांचा  प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. ते मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांचा जन्म अत्यंत गरीब कुटुंबात झाला आहे. ते नववी आणि दहावीत तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले तर बारावी बोर्डाच्या परीक्षेत ते हिंदी विषय वगळता इतर सर्व विषयांत नापास झाले होते. पण आयुष्यातील एका घटनेने त्याचे जग बदलून टाकले.

प्रियसीला दिलेलं वचन पूर्ण केलं
मनोज कुमार शर्मा 12वीत असताना एका मुलीच्या प्रेमात पडले होते. मात्र बारावीत नापास झाल्यामुळे ते त्या मुलीला प्रपोज करु शकले नाहीत. खूप विचार केल्यानंतर त्यांनी (Success Story) त्या मुलीला प्रपोज केले आणि ती तयारही झाली. प्रेयसीला प्रपोज करताना ते म्हणाले की तू हो म्हणालीस तर मी सुधारीन. त्यांनी तिला वचन दिलं की, “मी एकदिवस मोठा माणूस होऊन दाखवीन.” यांनतर त्यांनी आपल्या मैत्रिणीशी लग्नही केलं. ज्यांचं नाव आहे श्रद्धा जोशी. यूपीएससीची तयारी करत असताना श्रद्धाने मनोज यांना खूप साथ दिली. श्रद्धा देखील या परीक्षेची तयारी करत होत्या. त्या सध्या IRS अधिकारी आहेत.

वेळप्रसंगी टेम्पोही चालवला ()
मनोज कुमार शर्मा यांना आयपीएस होण्यासाठी प्रत्येक वळणावर खूप संघर्ष करावा लागला. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांनी टेम्पो चालकाचे कामही केले आहे. अनेक रात्री ते भिकाऱ्यांसोबत झोपले आहेत. दिल्लीतील ग्रंथालयातही त्यांनी काम केले आहे. हाग्रंथालयात नोकरी करत असताना त्यांनी गॉर्की आणि अब्राहम लिंकनपासून मुक्तिबोधापर्यंत अनेक प्रसिद्ध लेखकांची पुस्तके आणि व्यक्तिमत्त्वे वाचली. त्यानंतर त्यांना जीवनाचा अर्थ आणि उद्देश समजला.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com