Police Bharti 2024 : कधी सुरु होणार पोलिस भरती? जाणून घ्या भरती प्रक्रियेविषयी….

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात तब्बल 17 हजार 441 जागांसाठी (Police Bharti 2024) पोलीस भरती होणार आहे. वित्त विभागाने ही रिक्त पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. पोलीस शिपाई पदासाठी ही भरती होत आहे. गेल्या वर्षी पोलीस भरती न झाल्याने तरुण उमेदवार चिंतेत होते. मात्र यंदा 17 हजार 441 जागांसाठी भरती प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. ही पोलीस भरती कधी होणार? फॉर्म कुठे आणि कसा भरायचा? या भरतीसाठी तयारी कशी करायची? याबाबत आम्ही इथे माहिती देत आहोत.

पोलीस भरती कधी होणार? (Police Bharti 2024)
जेव्हा पोलीस किंवा अन्य कोणत्याही खात्यातील पदाधिकारी निवृत्त होतात तेव्हा त्या ठिकाणी नवीन लोकांची नियुक्ती केली जाते. पण ही भरती दरवर्षी केलीच जाईल, असं नाही. पण सद्यपरिस्थितीत पोलीस भरती रखडलेलीच पाहायला मिळत आहे. मात्र यंदा राज्य सरकारने 17 हजार 441 जागांच्या भरतीसाठी मान्यता दिली आहे. पण या परीक्षेचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालं नाही. जेव्हा वेळापत्रक येईल तेव्हा ही भरती प्रक्रिया सुरु होईल. भरती प्रक्रियेत आधी लेखी परीक्षा आणि नंत मैदानी परीक्षा होते.

भरती प्रक्रियेविषयी….
भरतीसाठी अर्ज करताना तुम्हाला काही अटींची पूर्तता करावी लागते. उमेदवारांना शैक्षणिक गुणपत्रिका, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, ओळख पुरावा, ना हरकत प्रमाणपत्र, छायाचित्र अशी कागदपत्रे सादर करावी लागतात. पेपरमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर काही कालावधी आखून दिला जातो या कालावधीतच अर्ज भरावा लागतो. त्यानंतर पुढील भरती प्रक्रिया सुरु होते.
सरकारकडून भरतीची घोषणा झाली की, पोलीस भरतीच्या प्रक्रियेला सरुवात होते. याबाबत वृत्तपत्रांमध्ये जाहीरात प्रसिद्ध केली जते. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा (Police Bharti 2024) लागतो. अर्जाची छानणी झाल्यानंतर आधी शारीरिक चाचणी होते आणि त्यानंतर लेखी परीक्षा घेतली जाते. यामध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध होते. त्यानंतर पात्र उमेदवारांना महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण केंद्रावर प्रशिक्षण दिलं जातं आणि नंतर पात्र उमेदवारांची राज्याच्या पोलिस दलात पोलिस पदावर नियुक्ती होते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com