Police Bharti 2023 : पोलीस भरती झालेल्या उमेदवारांचे ट्रेनिंग ‘या’ तारखेपासून; 8 हजार नव्या पोलिसांचा समावेश

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात सर्वत्र पोलिस भरती सुरु (Police Bharti 2023) आहे. सर्व जिल्ह्यांमधून 14 हजार 956 पोलिस शिपाई व चालक पदांची भरती होणार आहे. मुंबई वगळता उर्वरित सर्वच जिल्ह्यांमधील उमेदवारांची मैदानी व लेखी परीक्षा पार पडली आहे. पण, एकाचवेळी भरती होऊनही उमेदवारांना नेमणूक वेगवेगळ्या वर्षांत मिळणार आहे. त्यांचे प्रशिक्षण दोन टप्प्यात होणार आहे. येत्या 1 जुलैपासून 8 हजार उमेदवारांचे प्रशिक्षण सुरु होईल. पुढच्या टप्प्यात मुंबईतील 6 हजार 740 उमेदवारांचे प्रशिक्षण सुरु होईल.
गृह विभागात सद्य:स्थितीत 25 हजारांवर पदे रिक्त आहेत. आता त्यातील जवळपास 15 हजार पदे भरली जात आहेत. त्यातही पोलिस प्रशिक्षण केंद्रांची संख्या मर्यादित असल्याने दोन टप्प्यात उमेदवारांना प्रशिक्षण पूर्ण करावे लागणार आहे.

मुंबईतील 6 हजार 740 जागांसाठी तब्बल सात लाख उमेदवारांचे अर्ज आले आहेत. अजूनही मैदानी चाचणी संपलेली नाही. तत्पूर्वी, सर्वच जिल्ह्यातील उमेदवारांची मैदानी व लेखी परीक्षा संपली आहे. चालक पदांचा निकाल देखील जाहीर झाला असून आता काही दिवसांत शिपायांचाही निकाल (Police Bharti 2023) लागेल. त्यांचे प्रशिक्षण 1 जुलैपासून राज्यातील 10 प्रशिक्षण केंद्रांवर सुरु होईल. नऊ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या उमेदवार त्याठिकाणी जातील. तत्पूर्वी, पोलिस प्रशिक्षण केंद्रांची क्षमता साडेसहा हजारांवरून आठ हजारांपर्यंत वाढवली आहे. त्यात सोलापूर, नाशिकसह इतर पोलिस प्रशिक्षण केंद्रांचा समावेश आहे.
1 जुलैपासून सुरु होणार पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण
मुंबईतील पोलिस भरती होणाऱ्या उमेदवारांचे प्रशिक्षण दुसऱ्या टप्प्यात होईल. तत्पूर्वी, राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील उमेदवारांचे प्रशिक्षण 1 जुलैपासून सुरु करण्याचे (Police Bharti 2023) नियोजन आहे. राज्यातील दहा प्रशिक्षण केंद्रांमध्ये 8 हजार उमेदवार प्रशिक्षण पूर्ण करतील, अशी व्यवस्था केली आहे.

अनेक जिल्ह्यात महिला पोलिसांना करावी लागते अतिरिक्त ड्यूटी
कुटुंब आणि नोकरी, अशा दुहेरी भूमिकेतील महिला पोलिस अंमलदारांना आठ तासांची ड्यूटी करण्याचा निर्णय सव्वावर्षापूर्वी झाला. पण, अजूनही निम्म्यापेक्षा जास्त शहर-जिल्ह्यात हा नियम लागू झालेला नाही. त्याला प्रमुख अडथळा म्हणजे अपुरे मनुष्यबळ हेच आहे. राज्यातील बहुतेक (Police Bharti 2023) शहरांचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून लोकसंख्या देखील वाढली आहे. गुन्ह्यांची संख्या दरवर्षी सरासरी 9 ते 10 टक्क्यांनी वाढत आहे. तरीपण त्यांचे वर्षातील 365 पैकी 200 हून अधिक दिवस बंदोबस्तातच जातात. पोलिस दलातील रिक्तपदांमुळे कामाचा ताण वाढला आहे. धक्कादायक बाब म्हणजे सद्य:स्थितीत 30 टक्क्यांपेक्षा जास्त पोलिस अधिकारी, अंमलदारांना रक्तदाब, मधुमेहचा त्रास आहे. सध्या पोलिस दलात झालेल्या नवीन भरतीमुळे पोलिसांवरील कामाचा ताण कमी होईल; असा विश्वास आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com