करिअरनामा ऑनलाईन । सध्या महाराष्ट्र पोलीस दलात मोठी पोलीस भरती (Police Bharti 2023) सुरु आहे. या भरतीत 17 हजार 471 जागांसाठी 17 लाख 76 हजार 256 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. पोलीस भरतीसाठी उमेदवारांनी 12 वी पास असणे आवश्यक आहे. पण ही पात्रता असताना 41 टक्के उच्च शिक्षित उमेदवारांचे अर्ज आल्याचे छाणनीतून समोर आले आहे. यासह डॉक्टर, इंजनिअर, वकिल, एमएस्सी, बी-टेक अशा उच्च शिक्षित तरुणांना देखील पोलीस व्हायचं आहे. यामुळे देशातील वाढत्या बेरोजगारीची समस्या पुन्हा एकदा अधोरेखीत झाली आहे.
17 हजार 471 पदांसाठी 17 लाख 76 अर्ज दाखल (Police Bharti 2023)
5 मार्चपासून पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु झाली आहे. यासाठी 15 एप्रिलपर्यंत अर्ज मागवण्यात आले होते. या भरतीसाठी राज्यभरातून लाखो उमेदवारांचे अर्ज आले आहेत. 17 हजार 471 पदांसाठी तब्बल 17 लाख 76 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. अर्ज करणाऱ्यांमध्ये पदवीधर आणि पदव्युत्तपर्यंतचे शिक्षण घेतलेले अनेक उमेदवार आहेत. यामध्ये वकिल, इंजिनिअर, डॉक्टर, एमबीए,बी-टेक, बीबीएचे, एमएस्सी पर्यंत शिक्षण घेतलेलल्या उच्चशिक्षितांनाही पोलीस भरती व्हायचं आहे. अर्ज आलेल्या उमेदवारांपैकी उच्चशिक्षित उमेदवारांची संख्या तब्बल 41 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेले उच्च शिक्षित उमेदवार पाहता देशातील बेरोजगारीचे वास्तव्य समोर येते.
दरम्यान, अप्पर पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर राज्यात पोलीस भरती प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.
या पदांवर होणार भरती
देशात सर्वात मोठ्या पोलीस दलांपैकी एक महाराष्ट्र पोलीस दल समजले जाते. पोलीस दलात जाऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना विविध पातळीवर परीक्षा द्यावी लागणार आहे. यामध्ये लेखी चाचणी, शारीरिक (Police Bharti 2023) मोजमाप चाचणी, शारीरिक कार्यक्षमता चाचणी झाल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. त्यानंतर वैद्यकीय तपासणी होऊन पोलीस दलात सहभागी होता येणार आहे.
राज्यातील पोलीस दलात जेल वॉर्डन, सशस्त्र पोलीस कॉन्स्टेबल, बँड्समन आणि पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरसाठी 17 हजार 471 पदे भरण्यात येणार आहे. पोलीस भरतीसाठी बारावी उतीर्ण (Police Bharti 2023) उमेदवार अर्ज करु शकतात. या अर्जांची छननी झाल्यावर डॉक्टर, इंजिनिअर, वकिलांनी अर्ज केल्याचे समोर आले आहे. त्याला सरकारी नोकरीचे आकर्षण हे कारण असले तरी बेरोजगारीही हे सर्वात मोठे कारण यानिमित्ताने समोर आले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com