Police Bharti 2022 : तयारीला लागा!! पोलीस भरती प्रक्रिया 3 नोव्हेंबरपासून

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्रामध्ये बहुप्रतिक्षीत पोलिस भरती प्रक्रिया तीन नोव्हेंबर (Police Bharti 2022) पासून सुरू होत आहे. त्याबाबतचे परिपत्रक पोलिस महासंचालक यांनी प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार फक्त पोलिस शिपाई पदांसाठीची ही भरती प्रक्रिया 14,956 जागांसाठी असणार आहे, असे नमूद करण्यात आले आहे. राज्य राखीव पोलिस दल व पोलिस वाहन चालक यांची स्वतंत्र भरती प्रक्रिया त्याचवेळी सुरू होणार आहे. त्यामुळे जागांमध्ये काही बदल होऊ शकतो. पोलिस शिपाई पदासाठी ऑनलाइन फॉर्म भरण्याची प्रक्रिया 3 नोव्हेंबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंत असेल. अधिक माहितीसाठी उमेदवाराने www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.

अशी असेल निवड प्रक्रिया – (Police Bharti 2022)

पोलिस शिपाई पदासाठी होणाऱ्या या भरती प्रक्रियेमध्ये प्रथम 50 गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेतली जाणार आहे व त्यानंतर 100 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. ही लेखी परीक्षा मुंबई वगळता इतर सर्व जिल्ह्यातील पोलिस घटकांची एकाच दिवशी आयोजित केली जाणार (Police Bharti 2022) आहे. शारीरीक चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार 1:10 प्रमाणात 100 गुणांच्या लेखी परीक्षेसाठी पात्र असणार आहेत. लेखी परीक्षेतसुद्धा किमान 40 टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे. अशा प्रकारे उमेदवारांची अंतिम निवड शारीरीक चाचणी व लेखी परीक्षा अशा एकूण 150 गुणांमधून केली जाणार आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com