Home Blog Page 423

Education : NGOने मनावर घेतलं अन् मोडकळीस आलेल्या शाळेला मिळालं नवजीवन

Education

करिअरनामा ऑनलाईन। काही तरुण व्यावसायिक आणि उद्योजकांनी केलेल्या (Education) प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील एका सरकारी शाळेचं रूप पालटलं आहे. मोडकळीस आलेल्या या शाळेत आता अनेक आधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. हिंगणा तालुक्यातील सुकाळी गावात नागपूर जिल्हा परिषदेतर्फे चालवल्या जाणार्‍या प्राथमिक शाळेची स्थिती अतिशय वाईट होती. दोन स्वयंसेवी संस्थांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मदत करून शाळा सुस्थितीत आणली आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्यानं दिली.

अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, सुकाळी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत, एकूण तीन गावांतील 200 विद्यार्थी पहिली ते पाचवी या इयत्तांमध्ये शिक्षण घेतात. पाच इयत्तांसाठी या शाळेत फक्त दोन वर्गखोल्या होत्या. शिवाय शाळेतील शौचालयदेखील बंद पडलेल्या स्थितीत (Education) होतं. नागपूर राउंड टेबल-83 (NRT-83) आणि ब्रिज द गॅप फाउंडेशन या दोन संस्थांना शाळेच्या दुरावस्थेची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी शाळेला शक्य तितक्या सर्वोत्तम पायाभूत आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला.

नागपूर राउंड टेबल-83 (NRT-83) आणि ब्रिज द गॅप फाउंडेशन या दोन स्वयंसेवी संस्थांनी जानेवारी 2022 मध्ये सुकाळी शाळेमध्ये कामाला सुरुवात केली. त्यांनी आधुनिक सुविधांचा वापर करून शाळा नव्याने बांधण्याचा निर्णय घेतला. सर्व कायदेशीर औपचारिकता पूर्ण करून एका महिन्याच्या आत बांधकाम सुरू केलं. यातील पहिला टप्पा पूर्ण झाला असून, 9 ऑक्टोबर रोजी शाळेच्या नवीन इमारतीचं उदघाटन झालं.

“फक्त एक बंद पडलेलं शौचालय आणि दोनच वर्गखोल्या असलेल्या शाळेचा कायापालट करणं हे आमचं काम होते,” असं NRT-83 चे अध्यक्ष अभय अग्रवाल यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं.

“पहिल्या टप्प्यात, आम्ही तळमजल्यावर तीन वर्गखोल्या बांधल्या. त्यामध्ये बसण्यासाठी डेस्कची सोय करण्यात आली आहे. त्यापैकी एका वर्गात संगणक प्रयोगशाळा बनवण्यात आली असून त्यात प्रोजेक्टरही आहे. शाळेच्या आवारात आता मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे आहेत,” अशी माहिती अग्रवाल यांनी दिली.

अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंदाजे 40 लाख (Education) रुपये खर्चून शाळेचं आत्तापर्यंतच बांधकाम झालं आहे. कॉर्पोरेट फंडिंग आणि वैयक्तिक देणग्यांद्वारे पैसे गोळा करण्यात आले. NRT-83नं अनेक नाविन्यपूर्ण माध्यमांचा वापर करून निधी गोळा केला. फंडरेझर्स, मोठ्या कंपन्यांकडून CSR देणगी, नागपूर आणि देशभरातील वैयक्तिक देणगीदार यांच्या माध्यमातून पैसे गोळा झाले. प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात अतिरिक्त वर्गखोल्या आणि संगणक प्रयोगशाळा बांधण्याची योजना आहे.

“शाळेला वर्गखोल्या आणि सुविधा हेच हवं आहे. आम्ही त्यासाठी आणखी अनुदान आणि निधी मिळविण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यानुसार इतर कामांचा पाठपुरावा करू. आम्ही पायाभूत सुविधा आणि सहायक सेवा पुरवणार आहोत,” असं अग्रवाल म्हणाले.

दरम्यान, ब्रिज द गॅप फाउंडेशन ही स्वयंसेवी संस्था गावात पूर्व प्राथमिक ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान, गणित आणि इंग्लिंश स्पिकिंगचे क्लास चालवते, अशी माहिती (Education) सुकाळी गावचे सरपंच दिनेश डेंगरे यांनी दिली. ते म्हणाले, “दोन्ही संस्थांनी मिळून गावात चांगल्या पायाभूत सुविधांसह एक सुंदर शाळा बांधली आहे. केवळ आमच्या गावातीलच नाही तर आजूबाजूच्या गावांतील गावकरीही शाळेच्या कायापालटामुळे आनंदी आहेत.”

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career : व्हिडिओ जॉकी कसं व्हायचं? जाणून घ्या कमी वेळात पैसा, नाव आणि प्रसिद्धी मिळवून देणाऱ्या क्षेत्राविषयी

Career

करिअरनामा ऑनलाईन। व्हिडिओ जॉकी हे करिअर म्हणून झपाट्याने वाढलेले (Career) क्षेत्र आहे. एक VJ (Video Jockey) लोकांना म्युझिक व्हिडिओबद्दल माहिती देतो आणि त्याच्याशी संबंधित शो होस्ट देखील करतो. आपल्याकडे tv येण्याआधी पासून रेडिओ आहेत आणि सर्वत्रच ते लोकप्रिय देखील झाले आहेत, याच रेडिओच्या माध्यमातून कार्यक्रम होस्ट करणारे जसे रेडिओ जॉकी म्हणजेच RJ असतात तसाच सध्याच्या जगात झपाट्याने करियर म्हणून उदयास आलेला एन्टरटेन्मेंट संबंधीच्या क्षेत्रातील एक पर्याय म्हणजे व्हिडिओ जॉकी म्हणजे VJ होय .

सध्या टीव्हीवर आलेल्या वेगवेगळया म्यूसिक चॅनल्समुळे, व्हिडिओ जॉकी बनणे हा एक उत्तम करिअर पर्याय बनतो आहे. व्हिडिओ जॉकी कमी वेळात पैसा, नाव आणि प्रसिद्धी मिळवू शकतो. व्हीजेचे (Career) मुख्य काम टेलिव्हिजनवरील बहुतेक म्युसिक व्हिडिओ आणि गाण्यांबद्दलची संबंधित शो होस्ट करणे असा असतो.

व्हिडिओ जॉकी म्हणजे नेमकं काय? (Career)

व्हिडिओ जॉकी करिअर म्हणून झपाट्याने विकसित झाले आहेत. एक VJ लोकांना म्युझिक व्हिडिओबद्दल माहिती देतो आणि त्याच्याशी संबंधित शो होस्ट देखील करतो. पण जसजशी स्पर्धा वाढत जाते तसतशी सर्व संगीत चॅनेल्स लोकांना, विशेषत: तरुणांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारच्या टीव्ही शोमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. VJ साधारणपणे प्रेक्षक आणि संगीतकार किंवा संगीत व्हिडिओ यांच्यात दुवा म्हणून काम करतात. व्हिडिओ जॉकीची कमाई त्याच्या मेहनतीवर आणि शोच्या लोकप्रियतेवर अवलंबून असते.

कोण बनू शकतो व्हिडिओ जॉकी?

व्हिडिओ जॉकी बनण्यासाठी कोणत्याही विशेष शिक्षणाची किंवा कोणत्याही विशेष अभ्यासक्रमाची गरज नाही. व्हिडिओ जॉकी बनण्यासाठी चांगली देहबोली आणि आकर्षक (Career) आवाज असणे आवश्यक आहे. मात्र, या क्षेत्रात येण्यासाठी मास कम्युनिकेशन, व्हिज्युअल कम्युनिकेशनचा कोर्स करणं फायद्याचं ठरतं.

असे आहेत कोर्स

बीए इन जर्नलिज्म

एमए इन मीडिया कम्युनिकेशन अँड मॅनेजमेंट

मास्टर इन कम्युनिकेशन स्टडीज

मास्टर ऑफ आर्ट्स इन मास कम्युनिकेशन

डिप्लोमा इन कम्युनिकेशन अँड मीडिया डेवलपमेंट

डिप्लोमा इन फंडामेंटल अँड ऑडियो व्हिज्युअल एजुकेशन

या कला प्रसिध्द्धी देतील  

व्हिडिओ जॉकी बनण्यासाठी, एखाद्याला शो दरम्यान मजा मस्ती देखील करता आली पाहिजे, जेणेकरून शोसाठी प्रेक्षकांची आवड कायम राहील. खूप गंभीर राहून काम करण्याचे हे क्षेत्रच नाही. VJ कडे सगळ्या कॉमन भाषांवर व्यवस्थित पकड हवी आणि हजरजबाबी असणे गरजेचं (Career) आहे. तसेच संगीतप्रेमी असणे गरजेच आहे. VJ ने नेहमी गाण्यांचे नवीन ट्रेंड, नवीन व्हिडिओ, म्युझिकया गोष्टिही महत्वाच्या आहेत.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Atomic Energy Recruitment : 10 वी ते ग्रॅज्युएट्सना अणु ऊर्जा विभाग अंतर्गत भरती सुरु; असा करा अर्ज

Atomic Energy Recruitment

करिअरनामा ऑनलाईन। अणु ऊर्जा विभाग अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी (Atomic Energy Recruitment) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ अनुवाद अधिकारी, सहायक सुरक्षा अधिकारी, सुरक्षा रक्षक पदांच्या एकूण 321 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2022 आहे.

संस्था – अणु ऊर्जा विभाग (Department of Atomic Energy)

भरली जाणारी पदे –

  1. कनिष्ठ अनुवाद अधिकारी 9 पदे
  2. सहायक सुरक्षा अधिकारी 38 पदे
  3. सुरक्षा रक्षक 274 पदे

अर्ज करण्याची पध्द्त – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 नोव्हेंबर 2022

पद संख्या – 321 पदे

वय मर्यादा –

कनिष्ठ अनुवाद अधिकारी – 18 ते 28 वर्षे

सहायक सुरक्षा अधिकारी – 18 ते 27 वर्षे

सुरक्षा रक्षक – 18 ते 27 वर्षे (Atomic Energy Recruitment)

अर्ज फी –

कनिष्ठ अनुवाद अधिकारी – रु. 200/-

सहायक सुरक्षा अधिकारी – रु. 200/-

सुरक्षा रक्षक – रु. 100/-

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  • कनिष्ठ अनुवाद अधिकारी –

Masters Degree of a recognized University in Hindi/English, with English/Hindi as a main subject at degree level
(OR)

Masters Degree of a recognized University in any subject with Hindi and English as main subjects at degree level

(OR)

Masters Degree of a recognized University in any subject with Hindi/English medium and English/Hindi as a main subject at degree level (Atomic Energy Recruitment)

(OR)

Masters Degree in Hindi /English or in any other subject with Hindi/English medium, with English/Hindi as a main subject or a medium of examination at degree level
(OR)

Bachelors Degree with Hindi and English

  • सहायक सुरक्षा अधिकारी –

Graduate from a recognized University

  • सुरक्षा रक्षक –

10th standard pass

मिळणारे वेतन –

कनिष्ठ अनुवाद अधिकारी Rs. 35,400/- दरमहा

सहायक सुरक्षा अधिकारी Rs. 35,400/- दरमहा

सुरक्षा रक्षक Rs. 18,000/- दरमहा

असा करा अर्ज –

सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

केवळ ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील, याची दक्षता घ्यावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2022 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ARI Pune Recruitment 2022 : आगरकर संशोधन संस्था, पुणे येथे ‘या’ पदावर भरती जाहीर; त्वरा करा

ARI Pune Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। आगरकर संशोधन संस्था, पुणे येथे विविध रिक्त पदांच्या (ARI Pune Recruitment 2022) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून तांत्रिक अधिकारी, तांत्रिक सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, अधिकारी, सहाय्यक पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2022 आहे.

संस्था – आगरकर संशोधन संस्था, पुणे (Aagarkar Research Institute, Pune)

भरली जाणारी पदे –

तांत्रिक अधिकारी

तांत्रिक सहाय्यक

प्रयोगशाळा सहाय्यक

अधिकारी

सहाय्यक

पद संख्या – 11 पदे

नोकरी  करण्याचे ठिकाण – पुणे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 नोव्हेंबर 2022

वय मर्यादा – (ARI Pune Recruitment 2022)

तांत्रिक अधिकारी C – 40 वर्षे

तांत्रिक सहाय्यक B – 30 वर्षे

तांत्रिक सहाय्यक A – 28 वर्षे

प्रयोगशाळा. सहाय्यक A – 25 वर्षे

अधिकारी-A – थेट भरतीसाठी 35 वर्षे आणि प्रतिनियुक्तीसाठी 56 वर्षे

सहाय्यक-A – 28 वर्षे

निवड प्रक्रिया – मुलाखती

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  • तांत्रिक अधिकारी –

C Essential: 1st Class B.Sc. (Microbiology) with 12 years experience in research OR 1st class M.Sc. (Microbiology) with 6 years experience in research.
Desirable: (i) Ph.D. in Microbiology (ii) Publications and/or patents in the field of Next Generation Sequencing, analysis of genomic, metagenomics and metatranscriptomic data, biohydrogen/biomethane production from ligmocellulosic crops.

  • तांत्रिक सहाय्यक –

B Essential: 1 st Class B.Sc. (Microbiology) with 3 years experience in research OR M.Sc. (Microbiology).
Desirable: Experience and / or publications in the following (i) anaerobic culturing of extremophiles (ii) microbial taxonomy (iii) Next Generation Sequencing and bioinfromatic analysis of pure cultures and complex communities (iv) metabolite profiling using GC / HPLC.

  • तांत्रिक सहाय्यक –

A Essential: 1 st Class B.Sc.(Microbiology) with one-year experience in research.
Desirable: i) M.Sc. in Microbiology ii) Experience in the field of a) Aerobic and anaerobic microbial culturing b) Metabolities profiling using GC/HPLC c) Anaerobic digestion lignocellulosic crops residues.

OR

Essential: 1 st Class Bachelor Degree in Electronics/ Instrumentation/Mechanical with one-year experience or Diploma in Engineering of (ARI Pune Recruitment 2022) three years duration or equivalent.

Desirable: i) Overall knowledge and experience in maintenance of scientific laboratory equipments, Electronics/ Micro Electronics/Electricals/Mechanical Instruments/Computer, IT/ Telecommunication equipments, Networking equipments, power supply/ generators, firefighting equipments, etc.

  • प्रयोगशाळा. सहाय्यक –

A Essential: SSC/10th Std. with 50% marks and ITI Certificate of 2 years duration or equivalent or SSC with 3 years experience or HSC with 2 years experience in the relevant field.
Desirable: B.Sc. in Life Science or equivalent subjects and one or two years of experience in handling laboratory animals as per the CPCSEA guidelines.

  • अधिकारी-

A A) For Direct Recruitment:
Essential:1. 1st Class or higher second-class Degree from a recognized University and a Diploma in Personnel or Financial or Material Management.
2. 8 years experience in a Central Govt. dept./autonomous body or public sector undertaking;
3. Knowledge of establishment, civil works, security and/or knowledge of indenting, accounting and purchase of stores and/or knowledge of budgeting, finance and accounts.
4. Experience in computer aided management.Desirable: Masters Degree/Law degree.B) For Deputation:
Essential: Office superintendent with 5 years regular service in the Pay Matrix Level 6 or 15 years combined regular service the Pay Matrix Level 4, 5 & 6.

  • सहाय्यक –

A Essential: Graduate from a recognized University OR equivalent OR Degree/Diploma in Computer Application/ Computer aided management. English typing speed on computer with 8000 key depression per hour o r Hindi with typing speed of 6000 key depressions.
Desirable: Two years relevant working experience.

असा करा अर्ज – 

  1. वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. पात्र उमेदवारांनी केवळ दिलेल्या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
  3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  4. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2022 आहे.
  6. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

निवड प्रक्रिया –

  1. वरील भरतीकरिता उमेदवारांची निवड कौशल्य चाचणी/ मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
  2. उमेदवार निवडताना पाळलेले निकष अंतिम असतील. अशा शॉर्टलिस्टिंग निकषांविरुद्ध कोणतेही अपील किंवा प्रतिनिधित्व स्वीकारले जाणार नाही. (ARI Pune Recruitment 2022)
  3. शॉर्टलिस्टेड SC/ST उमेदवारांना कौशल्य चाचणी/मुलाखतीसाठी बोलावण्यात आलेल्या मूळ तिकिटांच्या निर्मितीवर सर्वात कमी मार्गाने ट्रेनचे स्लीपर क्लासचे भाडे दिले जाईल.
  4. कौशल्य चाचणी/मुलाखतीच्या वेळी मूळ प्रमाणपत्र सादर न केल्याने उमेदवार अपात्र ठरेल.
  5. निवडलेल्या उमेदवाराला वैद्यकीय प्राधिकरणाद्वारे योग्य असल्याचे आढळून आल्यावर त्याला त्वरित या पदावर रुजू व्हावे लागेल.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाइट – www.aripune.org

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : विद्यार्थी आणि फ्रेशर्ससाठी ‘या’ IT कंपनीत जॉब्स; WFH करता येणार

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन। भारतातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी, इन्फोसिस, आता (Job Alert) जगभरात अनेक पदांसाठी लोक शोधत आहे. FY22 मध्ये 85,000 कर्मचार्‍यांच्या तुलनेत, IT जायंटने FY23 मध्ये 50,000 पेक्षा जास्त लोकांना नोकरी देण्याची योजना आखली आहे. इन्फोसिस येथे एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 3.14 लाख आहे. कंपनी खाली नमूद केलेल्या विविध कार्यक्रमांद्वारे सर्व प्रकारच्या व्यावसायिकांची नियुक्ती करत आहे. या सर्व जॉब ओपनिंग्ससाठी अर्ज करण्यासाठी कंपनीच्या ऑफिशिअल वेबसाईट https://www.infosys.com/careers.html  किंवा https://www.infosys.com/ ला भेट द्यावी लागेल.

काय आहे ग्लोबल ग्रॅज्युएट हायरिंग प्रोग्राम

ग्रॅज्युएट यूएस, EMEA, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या प्रादेशिक वेबसाइटला भेट देऊन या प्रत्येक ठिकाणी इन्फोसिसच्या उपस्थितीबद्दल अधिक जाणून घेऊ (Job Alert) शकतात. कंपनीने म्हटले आहे की भारतातील पदवीधर विविध भूमिकांमध्ये काम करण्याच्या संधीसाठी त्याच्या विशेष कार्यक्रमांमध्ये भाग घेऊ शकतात.

विद्यार्थ्यांना होणार इंटर्नशिपचा फायदा (Job Alert)

कंपनीने इंटर्न आणि विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्याबाबत सांगितले आहे की; “इनस्टेप, इन्फोसिसचा विद्यापीठांसाठीचा प्रमुख आंतरराष्ट्रीय इंटर्नशिप कार्यक्रम, व्यवस्थापन, तंत्रज्ञान आणि उदारमतवादी कला शाखेतील लोकांना आकर्षित करतो, ज्यामध्ये मशीन लर्निंगपासून मानवी पैलूंपर्यंतचे प्रकल्प आहेत.”

जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांमधील हुशार विद्यार्थ्यांसाठी, इन्फोसिसमधील इंटर्नशिप ही त्यांच्या अभ्यासाच्या एका टप्प्यापासून दुसऱ्या टप्प्यापर्यंतची पायरी आहे.

WFH/रिमोट जॉब्स

फर्मने या वेबसाइटवर आणि इतर रोजगार (Job Alert) पोर्टलवर विविध WFH/रिमोट जॉब ओपनिंग्स देखील ऑफर केल्या आहेत. कोईम्बतूर, नोएडा आणि विझाग सारख्या टियर-II ठिकाणी, इन्फोसिस चार नवीन कार्यालये बांधत आहे. त्यामुळे नोकऱ्यांचे प्रमाण वाढणार आहे.

‘या’ शहरांमध्ये रिक्रूटमेंट सुरु

कंपनी आता भारतातील अनुभवी तज्ञांकडून बेंगळुरू, हैदराबाद, भुवनेश्वर, चेन्नई, जयपूर आणि म्हैसूरसह इतर शहरांमध्ये विविध पदांसाठी अर्ज स्वीकारत आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Success Tips : यशस्वी होण्यासाठी ‘या’ उद्योगपतींच्या सोप्या टिप्स ठेवा लक्षात…

Success Tips

करिअरनामा ऑनलाईन। पैसा हा प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक (Success Tips) आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येकाची पैसे कमवण्यासाठी धडपड सुरु असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला जगातील 5 श्रीमंत लोकांचे मनी मंत्र सांगणार आहोत. हा मनी मंत्र आपल्या सर्वांना उपयोगी पडू शकतो.

1. एलोन मस्क :- जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्कचा मनी मंत्र म्हणजे कधीही हार न मानणे, कठोर परिश्रम करणे आणि उत्कटतेचे अनुसरण करणे. अंतराळात रॉकेट पाठवण्याचे मस्कचे पहिले दोन प्रयत्न अयशस्वी झाले. त्याच्याकडे लाँचचे आणखी पैसे शिल्लक होते, परंतु त्याने हार मानली नाही आणि तिसऱ्या प्रयत्नात तो यशस्वी झाला.

2. जेफ बेझोस :- अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस (Success Tips) यांनी गॅरेजमधून कंपनी सुरू केली. त्यांचा मनी मंत्र नावीन्यपूर्ण आहे ज्यापासून ते कधीही मागे हटत नाहीत. बेझोस नाविन्यपूर्ण असण्याचा परिणाम म्हणजे ते अॅमेझॉनला इथपर्यंत घेऊन जाऊ शकले. ज्या वेळी काही लोकांना त्याचा ABC माहीत होता अशा वेळी त्यांनी क्लाउड सेवेतही हात आजमावला.

3. बिल गेट्स :- बिल गेट्स स्वत:ला टेक्नोक्रॅट म्हणवून घेतात आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जग आणखी चांगले बनवता येऊ शकते, असा त्यांचा विश्वास आहे. गेट्स म्हणतात लवकरात लवकर कामाला सुरुवात करा. बिल गेट्स यांनी केवळ 13 वर्षांचे असताना संगणक प्रोग्रामिंग सुरू केले. 1986 मध्ये गेट्स अब्जाधीशांच्या यादीत सामील झाले.

4. मार्क झुकरबर्ग :- मार्क झुकेरबर्गचा मनी मंत्र हा त्याची जोखीम घेण्याची सवय आहे. जोखीम न घेण्याची सवय यशात अडथळा ठरते, असे झुकेरबर्गचे मत आहे. म्हणूनच वेगवान (Success Tips) जगात जोखीम घेणे महत्त्वाचे आहे. तुम्ही काय बोलता याची लोकांना पर्वा नसते, तुम्ही काय बिल्ड करता याची त्यांना काळजी असते.

5. वॉरेन बुफे :- व्हॅल्यू गुंतवणूक हा जगातील आघाडीचे गुंतवणूकदार वॉरन बफे यांचा मनी मंत्र आहे. म्हणजेच ज्यांचे फंडामेंटल्स चांगले आहेत आणि शेअर्सची किंमत कमी आहे अशा कंपन्यांमध्ये ते दीर्घकाळ गुंतवणूक करतात. बफेचा असा विश्वास आहे की शेवटी तेच शेअर्स परतावा देतात ज्यांची गुणवत्ता चांगली असते. गुंतवणुकीच्या या शैलीमुळेच बफे इतके यशस्वी झाले आहेत.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Success Story : नोकरी गेली तरीही मानली नाही हार; आज आहे लाखोंमध्ये कमाई; असं काय केलं या महिलेनं

Success Story Jannese Torres

करिअरनामा ऑनलाईन। ही कथा आहे अमेरिकन इंजिनियर जेनिस टोरेसची. जिची 2013 मध्ये (Success Story) नोकरी गेली होती. तेव्हा तिची वार्षिक कमाई 66 लाख रुपये होती म्हणजेच दरमहा 5.5 लाख रुपये. 2013 मध्ये तिला मोठा धक्का बसला आणि टोरेसची नोकरी गेली. आता तीच्यासमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उभा होता. टोरेसने त्याच वेळी ठरवले की आपल्याला काही काम करावे लागेल जेणेकरुन उत्पन्नाचा स्त्रोत कायम राहील. नोकरी जावो वा राहो, पण स्वतःच्या दैनंदिन खर्चाचं टेन्शन राहणार नाही; या हेतूने वाटचाल सुरु होती.

नोकरी गेल्यानंतर अनेकांच्या जीवनावर परिणाम होतो. आता जगायचं कसं? असा प्रश्न त्यांना सतावतो. मात्र, अशावेळी काहीजण निराश होतात, तर काहीजण जगण्यासाठी नवा मार्ग शोधतात. या महिलेनं नोकरी गेल्यानंतर अशाच पद्धतीनं स्वतःच पोट भरण्यासाठी एक नवा मार्ग अवलंबून पाहिला, आणि आज ती महिन्याला लाखो रुपये कमवत आहे.

असा सापडला मार्ग (Success Story)

अवघ्या काही दिवसांमध्येच टोरेस यांना पैसे कमवण्याचा असा काही मार्ग सापडला की, ज्यामुळे त्यांना आता महिन्याला लाखो रुपये मिळतात. कारण नोकरीच्या काळात त्यांनी ‘डेलिश डी लाइट्स’ नावानं एक फूड ब्लॉग सुरू केला होता. पण तेव्हा हा ब्लॉग कमाईचं साधन नव्हे तर एक छंद होता. नोकरी गेल्यानंतर टोरेस यांनी या ब्लॉगकडे जास्त लक्ष देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्या रोज एक पोस्ट ब्लॉगवर अपलोड करत होत्या. यामध्ये त्यांनी सातत्य ठेवलं. CNBCच्या ‘Make it Happen’ कार्यक्रमात बोलताना टोरेस म्हणाल्या, “2015 पर्यंत हळूहळू हा फूड ब्लॉग इतका लोकप्रिय झाला की त्याची महिन्याला वाचक संख्या 15,000 पर्यंत पोहोचली. त्यानंतर मी ‘यो क्वेरो डिनेरो’ हे मनी पॉडकास्ट सुरू केलं. या पॉडकास्टद्वारे, मी माझा अनुभव शेअर करते आणि लोकांना पैसे कसे कमवायचे ते शिकवते.”

साईड बिझनेसमधून महिन्याला लाखोंची कमाई 

टोरेस यांनी ब्लॉग लिहायला सुरुवात केली, व यासोबतच त्या फ्रीलान्सर म्हणून विविध कामे करत गेल्या. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात भर पडत गेली. टोरेस सांगतात, ‘माझ्या सर्व (Success Story) कामांतून मिळणारं उत्पन्न एकत्र केल्यास ते दरमहा सरासरी 35,000 डॉलर म्हणजेच 28,96,549 रुपये आहे. यामध्ये मुख्य काम वगळता इतर कामांतून मिळणारं उत्पन्न हे 8,27,292 रुपये आहे.’ याचाच अर्थ टोरेस यांना त्यांच्या साईड बिझनेसमधून दर महिन्याला 8 लाखांहून अधिक उत्पन्न मिळतं.

नावडत्या कामावर फोकस करा 

टोरेस इतरांना सल्ला देताना सांगतात की, “एखाद्या कारणास्तव तुमची नोकरी गेली, तर तुम्ही साइड बिझनेस करा. आपणास आवडत नसलेल्या कामावर लक्ष केंद्रित करा. एखादं काम आवडत नाही, कारण त्या व्यक्तीला असं वाटतं, की त्याच्याकडे ते काम करण्याची क्षमता नाही. पण तुमच्यातील कमतरतेचा शोध घेऊन तुम्हाला न आवडणाऱ्या कामात पुढे जा.”

पैसे कमवण्याचे दोन मार्ग

टॉरेस यांनी सांगितलं की, “माझ्या ब्लॉगवर जाहिरातींचा ओघ वाढला, व माझी कमाई 100,000 डॉलर पर्यंत पोहोचली. या जाहिराती माझ्या ब्लॉगवर छापलेल्या डिस्प्ले जाहिरातींच्या स्वरूपात होत्या.” टोरेस यांच्या मते, पैसे कमवण्याचे सीपीसी आणि सीपीएम हे दोन मार्ग आहेत. सीपीसी म्हणजे ‘कॉस्ट पर क्लिक’ आणि सीपीएम म्हणजे ‘कॉस्ट पर मिलि आणि थाउजंड.”

त्या पुढे म्हणतात, “तुम्हाला तुमच्या मुख्य कामाशिवाय इतर कामातून मिळणारं उत्पन्न तेव्हाच सुरू होतं, जेव्हा तुम्ही फ्रीलान्स काम करता, किंवा अतिरिक्त पैसे मिळवण्यासाठी (Success Story) काही साइड बिझनेस करता. मी ब्लॉगसोबत विविध 10 कामं करण्यास सुरुवात केली होती. ज्यामध्ये पॉडकास्ट जाहिराती, मार्केटिंग, स्पीकिंग एंगेजमेंट, डिजिटल कोर्स डाउनलोड आणि ब्रँड भागीदारी यांचा समावेश होता.”

नोकरी गेल्यानंतर अनेकजण निराश होतात. पण नोकरी गेल्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीला सामोरे जात मार्ग शोधल्यास यश मिळते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे अमेरिकेतील या महिलेचा प्रवास आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Police Bharti 2022 : राज्यातील पोलीस भरती पुन्हा रखडली; काय आहे कारण?

Police Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन। राज्य सरकारने 2 दिवसांपूर्वीच जाहीर केलेली पोलीस भरती (Police Bharti 2022) तात्पुरत्या काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. ३ नोव्हेंबर पासून या भरती प्रक्रियेला सुरुवात होणार होती मात्र काही प्रशासकीय कारणास्तव ती तूर्त स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांचा हिरमोड झाला आहे.

आज पोलिस महासंचालक कार्यालयाकडून एक पत्रक जारी करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये भरती प्रक्रिया प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलल्याचं सांगण्यात आलेलं आहे. पुढील आदेश येईपर्यंत प्रशासकीय कारणास्तव ही भरती प्रक्रिया स्थगित करण्यात येत आहे. सदरची जाहिरात देण्याबाबतचा दिनांक यथावकाश देण्यात येईल असं पत्रात म्हंटल आहे.

दरम्यान, राज्य सरकारने २ दिवसांपूर्वीच १४ हजार 956 पोलीस शिपाई पदांची भरती (Police Bharti 2022) जाहीर केली होती. याअंतर्गत मुंबई – 6740, ठाणे शहर – 521, पुणे शहर – 720, पिंपरी चिंचवड – 216, मिरा भाईंदर – 986, नागपूर शहर – 308, नवी मुंबई – 204, अमरावती शहर – 20, सोलापूर शहर- 98, लोहमार्ग मुंबई – 620, ठाणे ग्रामीण – 68, रायगड -272, पालघर – 211, सिंधूदुर्ग – 99, रत्नागिरी – 131, नाशिक ग्रामीण – 454, अहमदनगर – 129, धुळे – 42, कोल्हापूर – 24, पुणे ग्रामीण – 579, सातारा – 145, सोलापूर ग्रामीण – 26, औरंगाबाद ग्रामीण- 39, नांदेड – 155, परभणी – 75, हिंगोली – 21, नागपूर ग्रामीण – 132, भंडारा – 61, चंद्रपूर – 194, वर्धा – 90, गडचिरोली – 348, गोंदिया – 172, अमरावती ग्रामीण – 156, अकोला – 327, बुलढाणा – 51, यवतमाळ – 244 पोलिसांची भरती केली जाणार आहे.

दरम्यान, कालच राज्याच्या पोलिस मुख्यालयातून (Police Bharti 2022) प्रवर्गनिहाय आरक्षण जाहीर केले होते. त्यानुसार अनुसूचित जाती – 1811, अनुसूचित जमाती – 1350, विमुक्त जाती (अ) – 426, भटक्या जमाती (ब) – 374, भटक्या जमाती (क) -473, भटक्या जमाती (ड) – 292, विमुक्त मागास प्रवर्ग – 292, इतर मागास वर्ग – 2926, इडब्लूएस – 1544, खुला – 5468 जागा भरण्यात येतील. मात्र आता ही भरती प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Education : PHD कोर्सेसला Online प्रवेश घेणं पडू शकतं महागात; UGC नं केलं सावध

Education

करिअरनामा ऑनलाईन। जर तुम्हीही एखाद्या एडटेक कंपन्यांद्वारे ऑफर केलेल्या (Education) ऑनलाइन पीएचडी कार्यक्रमांना प्रवेश घेणार असाल तर सावधान! ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) चेतावनी दिली आहे की ते आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने एडटेक कंपन्यांद्वारे ऑफर केलेल्या ऑनलाइन पीएचडी कार्यक्रमांना मान्यता देत नाहीत. यूजीसीने असेही म्हटले आहे की विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यासाठी, सर्व उच्च शिक्षण संस्थांनी यूजीसी मानदंड आणि त्यातील सुधारणांचे पालन केले पाहिजे.

वृत्तपत्रातील जाहिरातीमध्ये UGC ची नोटीस अशी आहे: “पीएचडी पदवी प्रदान करण्यासाठी मानके राखण्यासाठी, UGC ने UGC (एमफिल, पीएचडी पदवी पुरस्कारासाठी किमान मानके आणि प्रक्रिया) नियम, 2016 अधिसूचित (Education) केले आहेत. हे सर्व भारतीय उच्चांसाठी अनिवार्य आहे. शिक्षण संस्था (HEIs) UGC नियम आणि त्यातील सुधारणांनुसार पीएचडी पदवी प्रदान करतील.

AICTE UGC पुढे म्हणाले, “विद्यार्थी आणि सामान्य जनतेला सल्ला दिला जातो की परदेशी शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने EdTech कंपन्यांच्या ऑनलाइन पीएचडी कार्यक्रमांच्या जाहिरातींद्वारे दिशाभूल होऊ नये. अशा ऑनलाइन पीएचडी कार्यक्रमांना यूजीसीची मान्यता नाही. इच्छुक विद्यार्थी आणि मोठ्या प्रमाणावर जनतेला विनंती आहे की त्यांनी प्रवेश घेण्यापूर्वी UGC विनियम 2016 नुसार पीएचडी कार्यक्रमांची सत्यता पडताळून पाहावी.”

UGC ने मार्च 2022 मध्ये पीएचडी प्रोग्राम्ससाठी विद्यमान नियमांमध्ये बदल सुचवले होते. यूजीसी (एमफिल, पीएचडी पदवीसाठी किमान मानके आणि प्रक्रिया) ने सुचवले आहे की (Education) एकूण पीएचडी जागांपैकी 60 टक्के जागा यूजीसीसाठी पात्र विद्यार्थ्यांनी भरल्या जातील. नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट (NET) किंवा कनिष्ठ संशोधन फेलोशिप (JRF) आणि उर्वरित 40 टक्के प्रवेश परीक्षा विद्यापीठांद्वारे भरल्या जाणार आहेत.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MAHA RERA Recruitment : ग्रॅज्युएट्ससाठी राज्याच्या ‘या’ विभागात सरकारी नोकरीची संधी; लगेच करा E-Mail

MAHA Rera Recruitment

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (MAHA RERA Recruitment) येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वित्त सल्लागार, वरिष्ठ कायदेशीर सल्लागार, कायदेशीर सल्लागार, कनिष्ठ कायदेशीर सल्लागार या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या E-Mail ID वर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2022 आहे.

संस्था – महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (Maharashtra Real Estate Regulatory Authority)

भरली जाणारी पदे –

  1. वित्त सल्लागार (Finance Consultant)
  2. वरिष्ठ कायदेशीर सल्लागार (Senior Legal Consultant)
  3. कायदेशीर सल्लागार (Legal Consultant)
  4. कनिष्ठ कायदेशीर सल्लागार (Junior Legal Consultant)

पद संख्या – 21 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 नोव्हेंबर 2022

अर्ज करण्यासाठी E-Mail ID – [email protected]

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (MAHA RERA Recruitment)

  • वित्त सल्लागार (Finance Consultant) –

उमेदवारांनी MBA. Finance /CA पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

  • वरिष्ठ कायदेशीर सल्लागार (Senior Legal Consultant) –

उमेदवारांनी LLB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

  • कायदेशीर सल्लागार (Legal Consultant) –  (MAHA RERA Recruitment)

उमेदवारांनी LLB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

  • कनिष्ठ कायदेशीर सल्लागार (Junior Legal Consultant) –

उमेदवारांनी LLB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे –

Resume

शालेय आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाइट –  https://maharera.mahaonline.gov.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com