Career : व्हिडिओ जॉकी कसं व्हायचं? जाणून घ्या कमी वेळात पैसा, नाव आणि प्रसिद्धी मिळवून देणाऱ्या क्षेत्राविषयी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। व्हिडिओ जॉकी हे करिअर म्हणून झपाट्याने वाढलेले (Career) क्षेत्र आहे. एक VJ (Video Jockey) लोकांना म्युझिक व्हिडिओबद्दल माहिती देतो आणि त्याच्याशी संबंधित शो होस्ट देखील करतो. आपल्याकडे tv येण्याआधी पासून रेडिओ आहेत आणि सर्वत्रच ते लोकप्रिय देखील झाले आहेत, याच रेडिओच्या माध्यमातून कार्यक्रम होस्ट करणारे जसे रेडिओ जॉकी म्हणजेच RJ असतात तसाच सध्याच्या जगात झपाट्याने करियर म्हणून उदयास आलेला एन्टरटेन्मेंट संबंधीच्या क्षेत्रातील एक पर्याय म्हणजे व्हिडिओ जॉकी म्हणजे VJ होय .

सध्या टीव्हीवर आलेल्या वेगवेगळया म्यूसिक चॅनल्समुळे, व्हिडिओ जॉकी बनणे हा एक उत्तम करिअर पर्याय बनतो आहे. व्हिडिओ जॉकी कमी वेळात पैसा, नाव आणि प्रसिद्धी मिळवू शकतो. व्हीजेचे (Career) मुख्य काम टेलिव्हिजनवरील बहुतेक म्युसिक व्हिडिओ आणि गाण्यांबद्दलची संबंधित शो होस्ट करणे असा असतो.

व्हिडिओ जॉकी म्हणजे नेमकं काय? (Career)

व्हिडिओ जॉकी करिअर म्हणून झपाट्याने विकसित झाले आहेत. एक VJ लोकांना म्युझिक व्हिडिओबद्दल माहिती देतो आणि त्याच्याशी संबंधित शो होस्ट देखील करतो. पण जसजशी स्पर्धा वाढत जाते तसतशी सर्व संगीत चॅनेल्स लोकांना, विशेषत: तरुणांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारच्या टीव्ही शोमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. VJ साधारणपणे प्रेक्षक आणि संगीतकार किंवा संगीत व्हिडिओ यांच्यात दुवा म्हणून काम करतात. व्हिडिओ जॉकीची कमाई त्याच्या मेहनतीवर आणि शोच्या लोकप्रियतेवर अवलंबून असते.

कोण बनू शकतो व्हिडिओ जॉकी?

व्हिडिओ जॉकी बनण्यासाठी कोणत्याही विशेष शिक्षणाची किंवा कोणत्याही विशेष अभ्यासक्रमाची गरज नाही. व्हिडिओ जॉकी बनण्यासाठी चांगली देहबोली आणि आकर्षक (Career) आवाज असणे आवश्यक आहे. मात्र, या क्षेत्रात येण्यासाठी मास कम्युनिकेशन, व्हिज्युअल कम्युनिकेशनचा कोर्स करणं फायद्याचं ठरतं.

असे आहेत कोर्स

बीए इन जर्नलिज्म

एमए इन मीडिया कम्युनिकेशन अँड मॅनेजमेंट

मास्टर इन कम्युनिकेशन स्टडीज

मास्टर ऑफ आर्ट्स इन मास कम्युनिकेशन

डिप्लोमा इन कम्युनिकेशन अँड मीडिया डेवलपमेंट

डिप्लोमा इन फंडामेंटल अँड ऑडियो व्हिज्युअल एजुकेशन

या कला प्रसिध्द्धी देतील  

व्हिडिओ जॉकी बनण्यासाठी, एखाद्याला शो दरम्यान मजा मस्ती देखील करता आली पाहिजे, जेणेकरून शोसाठी प्रेक्षकांची आवड कायम राहील. खूप गंभीर राहून काम करण्याचे हे क्षेत्रच नाही. VJ कडे सगळ्या कॉमन भाषांवर व्यवस्थित पकड हवी आणि हजरजबाबी असणे गरजेचं (Career) आहे. तसेच संगीतप्रेमी असणे गरजेच आहे. VJ ने नेहमी गाण्यांचे नवीन ट्रेंड, नवीन व्हिडिओ, म्युझिकया गोष्टिही महत्वाच्या आहेत.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com