Education : NGOने मनावर घेतलं अन् मोडकळीस आलेल्या शाळेला मिळालं नवजीवन

करिअरनामा ऑनलाईन। काही तरुण व्यावसायिक आणि उद्योजकांनी केलेल्या (Education) प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील एका सरकारी शाळेचं रूप पालटलं आहे. मोडकळीस आलेल्या या शाळेत आता अनेक आधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. हिंगणा तालुक्यातील सुकाळी गावात नागपूर जिल्हा परिषदेतर्फे चालवल्या जाणार्‍या प्राथमिक शाळेची स्थिती अतिशय वाईट होती. दोन स्वयंसेवी संस्थांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मदत करून शाळा सुस्थितीत आणली आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्यानं दिली.

अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, सुकाळी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत, एकूण तीन गावांतील 200 विद्यार्थी पहिली ते पाचवी या इयत्तांमध्ये शिक्षण घेतात. पाच इयत्तांसाठी या शाळेत फक्त दोन वर्गखोल्या होत्या. शिवाय शाळेतील शौचालयदेखील बंद पडलेल्या स्थितीत (Education) होतं. नागपूर राउंड टेबल-83 (NRT-83) आणि ब्रिज द गॅप फाउंडेशन या दोन संस्थांना शाळेच्या दुरावस्थेची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी शाळेला शक्य तितक्या सर्वोत्तम पायाभूत आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला.

नागपूर राउंड टेबल-83 (NRT-83) आणि ब्रिज द गॅप फाउंडेशन या दोन स्वयंसेवी संस्थांनी जानेवारी 2022 मध्ये सुकाळी शाळेमध्ये कामाला सुरुवात केली. त्यांनी आधुनिक सुविधांचा वापर करून शाळा नव्याने बांधण्याचा निर्णय घेतला. सर्व कायदेशीर औपचारिकता पूर्ण करून एका महिन्याच्या आत बांधकाम सुरू केलं. यातील पहिला टप्पा पूर्ण झाला असून, 9 ऑक्टोबर रोजी शाळेच्या नवीन इमारतीचं उदघाटन झालं.

“फक्त एक बंद पडलेलं शौचालय आणि दोनच वर्गखोल्या असलेल्या शाळेचा कायापालट करणं हे आमचं काम होते,” असं NRT-83 चे अध्यक्ष अभय अग्रवाल यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं.

“पहिल्या टप्प्यात, आम्ही तळमजल्यावर तीन वर्गखोल्या बांधल्या. त्यामध्ये बसण्यासाठी डेस्कची सोय करण्यात आली आहे. त्यापैकी एका वर्गात संगणक प्रयोगशाळा बनवण्यात आली असून त्यात प्रोजेक्टरही आहे. शाळेच्या आवारात आता मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे आहेत,” अशी माहिती अग्रवाल यांनी दिली.

अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंदाजे 40 लाख (Education) रुपये खर्चून शाळेचं आत्तापर्यंतच बांधकाम झालं आहे. कॉर्पोरेट फंडिंग आणि वैयक्तिक देणग्यांद्वारे पैसे गोळा करण्यात आले. NRT-83नं अनेक नाविन्यपूर्ण माध्यमांचा वापर करून निधी गोळा केला. फंडरेझर्स, मोठ्या कंपन्यांकडून CSR देणगी, नागपूर आणि देशभरातील वैयक्तिक देणगीदार यांच्या माध्यमातून पैसे गोळा झाले. प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात अतिरिक्त वर्गखोल्या आणि संगणक प्रयोगशाळा बांधण्याची योजना आहे.

“शाळेला वर्गखोल्या आणि सुविधा हेच हवं आहे. आम्ही त्यासाठी आणखी अनुदान आणि निधी मिळविण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यानुसार इतर कामांचा पाठपुरावा करू. आम्ही पायाभूत सुविधा आणि सहायक सेवा पुरवणार आहोत,” असं अग्रवाल म्हणाले.

दरम्यान, ब्रिज द गॅप फाउंडेशन ही स्वयंसेवी संस्था गावात पूर्व प्राथमिक ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान, गणित आणि इंग्लिंश स्पिकिंगचे क्लास चालवते, अशी माहिती (Education) सुकाळी गावचे सरपंच दिनेश डेंगरे यांनी दिली. ते म्हणाले, “दोन्ही संस्थांनी मिळून गावात चांगल्या पायाभूत सुविधांसह एक सुंदर शाळा बांधली आहे. केवळ आमच्या गावातीलच नाही तर आजूबाजूच्या गावांतील गावकरीही शाळेच्या कायापालटामुळे आनंदी आहेत.”

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com