Police Bharti 2022 : राज्यातील पोलीस भरती पुन्हा रखडली; काय आहे कारण?

करिअरनामा ऑनलाईन। राज्य सरकारने 2 दिवसांपूर्वीच जाहीर केलेली पोलीस भरती (Police Bharti 2022) तात्पुरत्या काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. ३ नोव्हेंबर पासून या भरती प्रक्रियेला सुरुवात होणार होती मात्र काही प्रशासकीय कारणास्तव ती तूर्त स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांचा हिरमोड झाला आहे.

आज पोलिस महासंचालक कार्यालयाकडून एक पत्रक जारी करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये भरती प्रक्रिया प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलल्याचं सांगण्यात आलेलं आहे. पुढील आदेश येईपर्यंत प्रशासकीय कारणास्तव ही भरती प्रक्रिया स्थगित करण्यात येत आहे. सदरची जाहिरात देण्याबाबतचा दिनांक यथावकाश देण्यात येईल असं पत्रात म्हंटल आहे.

दरम्यान, राज्य सरकारने २ दिवसांपूर्वीच १४ हजार 956 पोलीस शिपाई पदांची भरती (Police Bharti 2022) जाहीर केली होती. याअंतर्गत मुंबई – 6740, ठाणे शहर – 521, पुणे शहर – 720, पिंपरी चिंचवड – 216, मिरा भाईंदर – 986, नागपूर शहर – 308, नवी मुंबई – 204, अमरावती शहर – 20, सोलापूर शहर- 98, लोहमार्ग मुंबई – 620, ठाणे ग्रामीण – 68, रायगड -272, पालघर – 211, सिंधूदुर्ग – 99, रत्नागिरी – 131, नाशिक ग्रामीण – 454, अहमदनगर – 129, धुळे – 42, कोल्हापूर – 24, पुणे ग्रामीण – 579, सातारा – 145, सोलापूर ग्रामीण – 26, औरंगाबाद ग्रामीण- 39, नांदेड – 155, परभणी – 75, हिंगोली – 21, नागपूर ग्रामीण – 132, भंडारा – 61, चंद्रपूर – 194, वर्धा – 90, गडचिरोली – 348, गोंदिया – 172, अमरावती ग्रामीण – 156, अकोला – 327, बुलढाणा – 51, यवतमाळ – 244 पोलिसांची भरती केली जाणार आहे.

दरम्यान, कालच राज्याच्या पोलिस मुख्यालयातून (Police Bharti 2022) प्रवर्गनिहाय आरक्षण जाहीर केले होते. त्यानुसार अनुसूचित जाती – 1811, अनुसूचित जमाती – 1350, विमुक्त जाती (अ) – 426, भटक्या जमाती (ब) – 374, भटक्या जमाती (क) -473, भटक्या जमाती (ड) – 292, विमुक्त मागास प्रवर्ग – 292, इतर मागास वर्ग – 2926, इडब्लूएस – 1544, खुला – 5468 जागा भरण्यात येतील. मात्र आता ही भरती प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com