Success Tips : यशस्वी होण्यासाठी ‘या’ उद्योगपतींच्या सोप्या टिप्स ठेवा लक्षात…

करिअरनामा ऑनलाईन। पैसा हा प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक (Success Tips) आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येकाची पैसे कमवण्यासाठी धडपड सुरु असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला जगातील 5 श्रीमंत लोकांचे मनी मंत्र सांगणार आहोत. हा मनी मंत्र आपल्या सर्वांना उपयोगी पडू शकतो.

1. एलोन मस्क :- जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्कचा मनी मंत्र म्हणजे कधीही हार न मानणे, कठोर परिश्रम करणे आणि उत्कटतेचे अनुसरण करणे. अंतराळात रॉकेट पाठवण्याचे मस्कचे पहिले दोन प्रयत्न अयशस्वी झाले. त्याच्याकडे लाँचचे आणखी पैसे शिल्लक होते, परंतु त्याने हार मानली नाही आणि तिसऱ्या प्रयत्नात तो यशस्वी झाला.

2. जेफ बेझोस :- अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस (Success Tips) यांनी गॅरेजमधून कंपनी सुरू केली. त्यांचा मनी मंत्र नावीन्यपूर्ण आहे ज्यापासून ते कधीही मागे हटत नाहीत. बेझोस नाविन्यपूर्ण असण्याचा परिणाम म्हणजे ते अॅमेझॉनला इथपर्यंत घेऊन जाऊ शकले. ज्या वेळी काही लोकांना त्याचा ABC माहीत होता अशा वेळी त्यांनी क्लाउड सेवेतही हात आजमावला.

3. बिल गेट्स :- बिल गेट्स स्वत:ला टेक्नोक्रॅट म्हणवून घेतात आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जग आणखी चांगले बनवता येऊ शकते, असा त्यांचा विश्वास आहे. गेट्स म्हणतात लवकरात लवकर कामाला सुरुवात करा. बिल गेट्स यांनी केवळ 13 वर्षांचे असताना संगणक प्रोग्रामिंग सुरू केले. 1986 मध्ये गेट्स अब्जाधीशांच्या यादीत सामील झाले.

4. मार्क झुकरबर्ग :- मार्क झुकेरबर्गचा मनी मंत्र हा त्याची जोखीम घेण्याची सवय आहे. जोखीम न घेण्याची सवय यशात अडथळा ठरते, असे झुकेरबर्गचे मत आहे. म्हणूनच वेगवान (Success Tips) जगात जोखीम घेणे महत्त्वाचे आहे. तुम्ही काय बोलता याची लोकांना पर्वा नसते, तुम्ही काय बिल्ड करता याची त्यांना काळजी असते.

5. वॉरेन बुफे :- व्हॅल्यू गुंतवणूक हा जगातील आघाडीचे गुंतवणूकदार वॉरन बफे यांचा मनी मंत्र आहे. म्हणजेच ज्यांचे फंडामेंटल्स चांगले आहेत आणि शेअर्सची किंमत कमी आहे अशा कंपन्यांमध्ये ते दीर्घकाळ गुंतवणूक करतात. बफेचा असा विश्वास आहे की शेवटी तेच शेअर्स परतावा देतात ज्यांची गुणवत्ता चांगली असते. गुंतवणुकीच्या या शैलीमुळेच बफे इतके यशस्वी झाले आहेत.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com