Home Blog Page 424

Government Jobs : 10 वी उत्तीर्णांची मेगाभरती!! कर्मचारी निवड आयोग तब्बल 24,369 पदे भरणार

Government Jobs

करिअरनामा ऑनलाईन। तुम्ही केवळ 10 वी उत्तीर्ण आहात आणि सरकारी नोकरीच्या (Government Jobs) शोधात आहात तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कर्मचारी निवड आयोगाने तब्बल 24,369 जागांसाठी भरतीची घोषणा केली आहे. या भरतीच्या माध्यमातून GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पद भरले जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे.

संस्था – कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission)

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2022

भरले जाणारे पद –  GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)

पद संख्या – 24,369 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही

भरती प्रकार – सरकारी

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Government Jobs)

GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) –  उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

मिळणारे वेतन –

GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) – 18,000/- ते 69,100/- दरमहा

वय मर्यादा –

कमीत कमी – 18 वर्षे
जास्तीत जास्त – 23 वर्षे

अर्ज फी –
Open/OBC/EWS – 100/- Rs.

SC/ST- फि नाही
PWD/ Female – फि नाही

फीस पे माध्यम – ऑनलाइन

पात्रता

पुरुष
महिला

असा करा अर्ज –

सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.

जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.

किंवा कर्मचारी निवड आयोग च्या अधिकृत वेबसाईट ssc.nic.in ला भेट द्या.

अर्ज करण्याची शेवटची दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ आहे. (Government Jobs)

खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.

अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.

अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.

अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स – 

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाइट – ssc.nic.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Police Bharti 2022 : तयारीला लागा!! पोलीस भरती प्रक्रिया 3 नोव्हेंबरपासून

Police Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्रामध्ये बहुप्रतिक्षीत पोलिस भरती प्रक्रिया तीन नोव्हेंबर (Police Bharti 2022) पासून सुरू होत आहे. त्याबाबतचे परिपत्रक पोलिस महासंचालक यांनी प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार फक्त पोलिस शिपाई पदांसाठीची ही भरती प्रक्रिया 14,956 जागांसाठी असणार आहे, असे नमूद करण्यात आले आहे. राज्य राखीव पोलिस दल व पोलिस वाहन चालक यांची स्वतंत्र भरती प्रक्रिया त्याचवेळी सुरू होणार आहे. त्यामुळे जागांमध्ये काही बदल होऊ शकतो. पोलिस शिपाई पदासाठी ऑनलाइन फॉर्म भरण्याची प्रक्रिया 3 नोव्हेंबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंत असेल. अधिक माहितीसाठी उमेदवाराने www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.

अशी असेल निवड प्रक्रिया – (Police Bharti 2022)

पोलिस शिपाई पदासाठी होणाऱ्या या भरती प्रक्रियेमध्ये प्रथम 50 गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेतली जाणार आहे व त्यानंतर 100 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. ही लेखी परीक्षा मुंबई वगळता इतर सर्व जिल्ह्यातील पोलिस घटकांची एकाच दिवशी आयोजित केली जाणार (Police Bharti 2022) आहे. शारीरीक चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार 1:10 प्रमाणात 100 गुणांच्या लेखी परीक्षेसाठी पात्र असणार आहेत. लेखी परीक्षेतसुद्धा किमान 40 टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे. अशा प्रकारे उमेदवारांची अंतिम निवड शारीरीक चाचणी व लेखी परीक्षा अशा एकूण 150 गुणांमधून केली जाणार आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

DRDO Recruitment 2022 : 10 वी ते पदवीधारकांना DRDO मध्ये ‘या’ पदावर नोकरीची संधी; काय आहे पात्रता?

DRDO Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। Defence Research and Development Organisation (DRDO Recruitment 2022) अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर, स्टेनोग्राफर, प्रशासकीय सहाय्यक, स्टोअर असिस्टंट, सुरक्षा सहाय्यक, वाहन ऑपरेटर, फायर इंजिन ड्रायव्हर आणि फायरमन अशा पदांच्या 1061 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेद्वारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 डिसेंबर 2022 आहे.

संस्था – Defence Research and Development Organisation (DRDO)

पद संख्या – 1061 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

अर्ज प्रक्रिया सुरु – 07 नोव्हेंबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 डिसेंबर 2022

भरली जाणारी पदे – (DRDO Recruitment 2022)

ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर (JTO) – 33 पदे
स्टेनोग्राफर ग्रेड – I (इंग्रजी टायपिंग) – 215 पदे
स्टेनोग्राफर ग्रेड – II (इंग्रजी टायपिंग) – 123 पदे
एडमिन असिस्टंट ‘A’ (इंग्रजी टायपिंग) – 250 पदे
एडमिन असिस्टंट ‘A’ (हिंदी टायपिंग) – 12 पदे
स्टोअर असिस्टंट ‘A’ (इंग्रजी टायपिंग) – 134 पदे
स्टोअर असिस्टंट ‘A’ (हिंदी टायपिंग) – 04 पदे
सिक्युरिटी असिस्टंट ‘A’ – 41 पदे
व्हेईकल ऑपरेटर ‘A’ – 145 पदे
फायर इंजिन ड्राइव्हर ‘A’ – 18 पदे
फायरमन – 86 पदे

आववश्यक शैक्षणिक पात्रता –

ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर : हिंदी/ इंग्रजी पदव्युत्तर पदवी किंवा हिंदी/ इंग्रजी पदवी + हिंदी/ इंग्रजी ट्रांसलेशन डिप्लोमा/ 02 वर्षे अनुभव.

स्टेनोग्राफर ग्रेड : I (इंग्रजी टायपिंग): कोणत्याही शाखेतील पदवी + कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 100 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 40 मिनिटे (इंग्रजी).

स्टेनोग्राफर ग्रेड – II (इंग्रजी टायपिंग): 12 वी उत्तीर्ण + कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी).

एडमिन असिस्टंट ‘A’ (इंग्रजी टायपिंग): 12 वी उत्तीर्ण + संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि.

एडमिन असिस्टंट ‘A’ (हिंदी टायपिंग): 12 वी उत्तीर्ण + संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

स्टोअर असिस्टंट ‘A’ (इंग्रजी टायपिंग): 12 वी उत्तीर्ण + संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. (DRDO Recruitment 2022)

स्टोअर असिस्टंट ‘A’ (हिंदी टायपिंग): 12 वी उत्तीर्ण + संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

सिक्युरिटी असिस्टंट ‘A’: 12 वी उत्तीर्ण.

व्हेईकल ऑपरेटर ‘A’: 10 वी उत्तीर्ण + दोन किंवा तीनचाकी वाहनचालक परवाना + हलके व अवजड वाहनचालक परवाना + 03 वर्षे अनुभव.

फायर इंजिन ड्राइव्हर ‘A’: 10 वी उत्तीर्ण + दोन किंवा तीन चाकी वाहन चालक परवाना + हलके व अवजड वाहन चालक परवाना.

फायरमन: 10 वी उत्तीर्ण.

वय मर्यादा –

खुला – 18 ते 27/ 30 वर्षे.
ओबीसी – 03 वर्षे सूट.
मागासवर्गीय – 05 वर्षे सूट.

अर्ज फी- 

खुला/ ओबीसी/ EWS – 100/- रुपये.
मागासवर्गीय/ महिला/ PWD – फी नाही.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – drdo.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : कोणत्या देशात एकही न्यूज चॅनेल नाही?

GK Updates

करिअरनामा ऑनलाईन। देशात दरवर्षी होणाऱ्या नागरी सेवा परीक्षेस लाखो (GK Updates) उमेदवार बसतात. त्यापैकी काही प्री आणि मेन्स परीक्षेत पास होऊन इंटरव्हिव पर्यंत पोहोचतात. इंटरव्हिव्ह सर्वात कठीण राउंडपैकी एक आहे. यामध्ये अनेक वेळा पॅनेलचे सदस्य काही अवघड आणि विषयबाह्य प्रश्न विचारतात. हे प्रश्न तसे अवघड नसले तरी घाम फोडणारे असतात. तुम्हीही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर इंटरव्हिवला विचारलेले हे प्रश्न नक्की लक्षात ठेवा.

प्रश्न – जगातला असा कोणता प्राणी आहे, ज्याला 32 मेंदू आहेत, त्याचं नाव सांगू सांगाल का ?

उत्तर – पृथ्वीवरील प्रत्येक प्राण्याला एकच मेंदू असतो, परंतु असा एक प्राणी आहे ज्याकडे 32 मेंदू (Brain) आहेत. तुम्ही कधी जोंक (Leech) पाहिला आहे किंवा कुठं ऐकलं आहे का ? जोंक हा एकमेव प्राणी आहे ज्याला 32 मेंदू आहेत.

प्रश्न – जगात असा एक देश आहे जिथे एकही न्यूज चॅनल नाही, त्याचे नाव सांगाल का ?

उत्तर – भारतासह अनेक देशांमध्ये न्यूज चॅनेल्सची संख्या (GK Updates) खूप आहे, परंतु जगात अजूनही एक असा देश आहे जिथे एकही न्यूज चॅनल नाही. त्या न्यूज देशाचं नाव आहे ग्रीस. ग्रीस असा देश आहे ज्यात एकही न्यूज चॅनल नाही.

प्रश्न – असा कोणता जीव आहे, तिने आपल्या मुलांना जन्म देताच मरण पावते ?

उत्तर – विंचू हा एक असा जीव आहे जो मुलांना जन्म दिल्यानंतर मरण पावते ?

प्रश्‍न – गाय ही आपली माता आहे, पण इतर देशाची राष्ट्रीय प्राणी आहे, त्या देशाचे नाव सांगू शकाल का ?

उत्तर- भारताव्यतिरिक्त नेपाळ हे देखील हिंदू राष्ट्र आहे. येथे गाय पवित्र मानली जाते. नेपाळचा राष्ट्रीय प्राणी गाय आहे.

प्रश्न – जगातला असा कोणता एकमेव देश आहे, ज्या देशाच्या नोटांवर ‘गणपती’चा फोटो छापला आहे ?

उत्तर – (GK Updates)

आता आपण विचार करू की, भारताशिवाय इतर असं कुठे घडू शकतं, पण भारताच्या नोटांवर तर असं नाही, तर असा देश आहे इंडोनेशिया (Indonesia) एक असा देश आहे जिथे गणपतीला शिक्षण, विज्ञान आणि कलांची देवता मानलं जातं. तेथे 20 हजारांच्या नोटेवर गणेशजींचा फोटो छापण्यात आला आहे. या देशात 87% मुस्लीम संख्या असून हिंदू केवळ 3% आहेत.

प्रश्न – पाकिस्तान मधील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती कोण आहे?
उत्तर – शाहिद खान

प्रश्न – असा कोणता जीव आहे ज्याचे (GK Updates) हृदय त्याच्या डोक्यात असते?
उत्तर – झिंगा

प्रश्न – जगातील सर्वात मोठी मस्जिद कोणती आहे?
उत्तर – अलमलिविया (इराक)

प्रश्न – काळा गुलाब कोणत्या देशात आढळतो?
उत्तर – तुर्की देश

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Tech Jobs : नोकरी शोधताय? 5G मुळे नशीब उजळणार; पहा कसं?

Tech Jobs

करिअरनामा ऑनलाईन। रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिलायन्स जिओने नुकतीच (Tech Jobs) राजस्थानमध्ये 5G नेटवर्क वर आधारित वाय-फाय सेवा सुरु केली. रिलायन्स जिओचे संचालक आकाश अंबानी यांनी नाथद्वारा 5G सेवा सुरु केली. टेलिकॉम क्षेत्रातील या कंपनीने दिल्ली, मुंबई, कोलकत्ता आणि वाराणसी या शहरातही 5G सेवेचा शुभारंभ केलेला आहे.

अशा निर्माण होणार संधी (Tech Jobs)

तुम्हाला प्रश्न पडला असेल, की 5G मुळे मुलं अजून मोबाईल आणि लॅपटॉपला घट्ट चिटकून बसतील; तर हा अंदाज एकदम चुकीचा आहे. कारण केवळ मनोरंजनासाठीच 5Gचा वापर होणार नाही.

5G मुळे देशात रोजगाराची नवी दालने उघडणार आहेत. कुशल तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे. या सेवेमुळे अनेक क्षेत्रात क्रांती येणार आहे. तंत्रज्ञान आले म्हणून नोकऱ्या (Tech Jobs) जाणार नसून अनेक नवीन क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची गरज पडणार आहे.

देशात 5G सेवेमुळे मोबाईलमध्ये इंटरनेटचा झंझावात येईल. सोबत नोकऱ्यांचा पाऊसही पडेल. सुरुवातीच्या टप्प्यातच देशात जवळपास 80 हजार जणांना थेट नोकऱ्या मिळतील असा दावा करण्यात येत आहे.

टेलिकॉम सेक्टरमध्ये थेट नोकरीसोबतच अप्रत्यक्ष रोजगारही मिळतील. मोबाईल टॉवर, मोबाईल हँडसेट्स, नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर, 5G सिक्योरिटी, सायबर सिक्योरिटी यासह इतर क्षेत्रात भरपूर संधी उपलब्ध होतील.

सरकारच्या अंदाजानुसार, 5G मुळे देशात नोकरीच्या (Tech Jobs) भरपूर संधी उपलब्ध होतील. टेलिकॉम कंपन्या पुढील 2 ते 3 वर्षांत जवळपास 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात 80 हजार नागरिकांना थेट रोजगार प्राप्त होईल.

ग्लोबल जॉब वेबसाइट इन्डीड (Indeed) च्या दाव्यानुसार, टेलिकॉम सेक्टरमध्ये गेल्या वर्षभरात नोकऱ्यांमध्ये 33 टक्के वृद्धी झाली आहे. 5G मुळे 2040 पर्यंत 450 अरब डॉलरची उलाढाल होण्याची शक्यता आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Recession : Meta करणार नोकर कपात; कर्मचारी संकटात; काय आहे कारण?

Recession

करिअरनामा ऑनलाईन। मेटा कंपनीमध्ये काम करणाऱ्या नोकरदारांसाठी वाईट (Recession) बातमी आहे. या कर्मचाऱ्यांसाठी पुढचे काही महिने खूप कठीण असू शकतात. त्याचं कारण म्हणजे टेक क्षेत्रातील ही दिग्गज कंपनी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार असल्याचं कळतंय. कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, अशातच आता मेटाच्या कर्मचाऱ्यांवरही टांगती तलवार आहे. मेटाने कर्मचाऱ्यांना त्यांची नोकरी टिकवून ठेवण्यासाठी दुप्पट मेहनत करण्यास सांगितलं आहे. कंपनीत या पुढे नोकरी करायची असेल, तर 200 टक्के काम करावं लागेल, असं कर्मचाऱ्यांना सांगण्यात आलंय. जे कर्मचारी काम करू शकत नाहीत, त्यांना कंपनी नोकरीवरून कमी करू शकते असंही कंपीने स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात TV9 हिंदीने वृत्त दिले आहे.

… अन्यथा राजिनामा द्या 

इनसाइडरशी झालेल्या एका संभाषणात मेटा कर्मचाऱ्याने CEO मार्क झुकरबर्ग यांच्या मेसेजबद्दल सांगितलं. मार्क झुकरबर्गचा मेसेज अतिशय स्पष्ट होता. ‘स्वत:ला सिद्ध करण्यासाठी (Recession) तुमच्याकडे तीन महिने आहेत. तुम्ही 200 टक्के प्रयत्न करा किंवा तुम्हाला हे सर्व आवडत नसेल तर राजीनामा द्या,’ असं त्यांनी सांगितलं. दरम्यान, मेटा स्टॉकच्या किमती सातत्याने घसरत असताना कर्मचाऱ्यांना दुप्पट मेहनत करण्यास सांगितलं जातंय. शिवाय कंपनीला मेटाव्हर्सच्या क्षेत्रात स्वतःला सिद्ध करण्यात अडचणी येत आहेत.

झुकरबर्ग यांचा वाढता दबाव (Recession)

झुकरबर्ग यांच्याकडून कर्मचाऱ्यांवर मेहनत करण्यासाठी दबाव टाकला जात आहे. त्याच वेळी, मेटाने आपल्या टीम्स आणि मॅनेजरदेखील बदलले आहेत. एका मॅनेजरच्या म्हणण्यानुसार, सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्याच्या नोकऱ्याही सुरक्षित नाहीत. एका कर्मचाऱ्याने आरोप केला, “झुकरबर्गनी म्हटलंय की ते बॅकअप प्लॅन घेऊन येत आहे आणि मीही तेच करत आहे.”

20 टक्के कर्मचारी कमी होतील?

कंपनीच्या अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेटामध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं जाणार आहे. याचा फटका अनेक कर्मचाऱ्यांना बसणार आहे. दुसऱ्या (Recession) तिमाहीच्या निकालांनुसार, मेटाच्या फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप या तीन कंपन्यांमध्ये जगभरात 83,500 कर्मचारी काम करत आहेत. मेटा कर्मचाऱ्याच्या मते, “पुढील वर्षी 20 टक्के कर्मचारी कमी होतील, अशी चर्चा आहे, पण हे कधी होईल ते माहीत नाही.”

इनसाइडरच्या रिपोर्टनुसार, मेटा प्रतिनिधीने 27 जुलै रोजी कंपनीच्या दुसऱ्या तिमाहीच्या कमाईच्या अहवालाबद्दल माहिती देताना झुकरबर्गच्या वक्तव्याविषयी माहिती दिली. झुकरबर्ग म्हणाले की, ‘मेटाने पुढील वर्षभरात कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याची योजना आखली आहे. अनेक टीम्स कमी केल्या जाणार आहेत, जेणेकरून आम्ही वर्कफोर्स इतर भागात ट्रान्सफर करू शकू,’ असा इशाराही झुकरबर्ग यांनी दिला होता.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Medical Education : महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षण मराठीतून!! राज्य सरकारचा निर्णय; ‘या’ शाखांचाही समावेश

Medical Education

करिअरनामा ऑनलाईन। वैद्यकीय अभ्यासक्रम हिंदीतून देण्याचा मध्य प्रदेश सरकारचा (Medical Education) निर्णय ताजा असताना आता महाराष्ट्रातही मराठीतून वैद्यकीय शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. याबाबतची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजान यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मराठी भाषेत वैद्यकीय शिक्षण घेणं सोप्प होणार आहे. 2023 या शैक्षणिक वर्षापासून ही सुविधा उपलब्ध असेल.

MBBSसह या शाखांचा अभ्यास मराठीतून

या निर्णयामुळे आता MBBSसह आयुर्वेद, होमिओपॅथी, दंतचिकित्सा, नर्सिंग, फिजिओथेरपी यांसारखे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना मराठीतून उपलब्ध करून दिले जाणार आहेत. 2023 च्या शैक्षणिक वर्षांपासून हे अभ्यासक्रम मराठीतून उपलब्ध होतील. विशेष म्हणजे मराठीतून वैद्यकीय शिक्षण घेणं बंधनकारक राहणार नाही, ते ऐच्छिक असेल.

“मध्य प्रदेशनंतर आता महाराष्ट्रात राज्य भाषेत म्हणजेच मराठी भाषेत वैद्यकीय शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न असून सर्वच पॅथी, एमबीबीएस पर्यंतचा अभ्यासक्रम हा मराठीत (Medical Education) देण्याचा आमचा प्रयत्न आहे;” असं महाजन यांनी यावेळी सांगितलं आहे. “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा इंग्रजी बाबतचा न्यूनगंड दूर व्हावा यासाठी हा निर्णय घेतला. याबाबत समित्या नेमल्या असून पुढील शैक्षणिक वर्षांपासून हा निर्णय लागू करण्याचा आमचा प्रयत्न आहे या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे;” असंही महाजन म्हणाले आहेत.

विद्यार्थ्यांना हवी ती भाषा निवडता येणार (Medical Education)

राज्य सरकारकडून नव्या शैक्षणिक वर्षापासून मराठी वैद्यकीय शिक्षणाची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा मार्ग काहीसा सोपा होणार आहे. पण वैद्यकीय शिक्षण मराठीत घेणे बंधनकारक नसेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार, हवी ती भाषा निवडण्याची मुभा असेल.

वैद्यकीय शिक्षण हिंदीतून देणारं मध्य प्रदेश पहिलं राज्य

भोपाळमध्ये वैद्यकीय शिक्षणाच्या हिंदी अभ्यासक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. अलिकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते वैद्यकीय शिक्षण हिंदीतून देण्यासाठी (Medical Education) मध्य प्रदेश सरकारची महत्त्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. हिंदी अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकाचे अनावरण शाह यांच्या हस्ते पार पडलं आहे.

राज्यातील सध्याची परिस्थिती

राज्यात सध्याच्या परिस्थितीला एमबीबीएसचे शिक्षण देणारी 62 महाविद्यालये आहेत. त्यात 10,045 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये सरकार आणि महापालिकेची 27, खासगी 20, अभिमत विद्यापीठ 12 तर केंद्र सरकारच्या अखत्यारीतील तीन वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश आहे.

इंग्रजी पुस्तके मराठीत उपलब्ध करून दिली जाणार

विशेष म्हणजे इंग्रजीतील पुस्तकांचे भाषांतर करताना कोणत्याही वैद्यकीय अभ्यासक्रमात फेरफार करण्यात येणार नाही. केवळ वैद्यकीय अभ्यासक्रमाची इंग्रजी पुस्तके मराठीत उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यासाठी तीन स्तरावरील वैद्यकीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये समिती याची पाहणी आणि मांडणी करणार आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NHM Recruitment 2022 : राष्ट्रीय आरोग्य अभियान उस्मानाबाद अंतर्गत ‘ही’ पदे रिक्त; लगेच करा APPLY

NHM Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत उस्मानाबाद येथे (NHM Recruitment 2022) विविध रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. या भरतीच्या माध्यमातून स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, STLS, सांख्यिकी सहाय्यक, दंत सहाय्यक, सीटी स्कॅन तंत्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी MBBS, भूलतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, फिजिशियन, प्रसूतीतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, सर्जन, ENT सर्जन, सुपर स्पेशालिस्ट कार्डिओलॉजिस्ट पदांच्या 68 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 नोव्हेंबर 2022 आहे.

संस्था – राष्ट्रीय आरोग्य अभियान, उस्मानाबाद

भरले जाणारे पद –

स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, STLS, सांख्यिकी सहाय्यक, दंत सहाय्यक, सीटी स्कॅन तंत्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी MBBS, भूलतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, फिजिशियन, प्रसूतीतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, सर्जन, ENT सर्जन, सुपर स्पेशालिस्ट कार्डिओलॉजिस्ट

पद संख्या – 68 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 नोव्हेंबर 2022

नोकरी करण्याचे ठिकाण – उस्मानाबाद

वय मर्यादा – (NHM Recruitment 2022)

18 वर्षे पूर्ण
खुला प्रवर्ग – 38 वर्षे
मागास प्रवर्ग -43 वर्षे

अर्ज फी –

खुला प्रवर्ग – Rs. 150/-

राखीव प्रवर्ग – Rs. 100/-

निवड प्रक्रिया – मुलाखत/ लेखी परीक्षा

अर्ज पाठविण्याचा पत्ता –

राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, खोली क्र. 218, दुसरा मजला , जिल्हा परिषद, उस्मानाबाद

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

स्टाफ नर्स/ स्टाफ नर्स – NUHM GNM / B.Sc.Nursing
वैद्यकीय अधिकारी – RBSK UG ((महिला) BAMS
वैद्यकीय अधिकारी – UG (आयुष) “आयुर्वेद” BAMS
मेडिकल ऑफिसर – यूजी (आयुष) “युनानी’ BUMS (NHM Recruitment 2022 )
वैद्यकीय अधिकारी – पीजी (आयुष) होमिओपॅथी- 1 PG in Homiopathy
STLS DMLT
सांख्यिकी सहाय्यक – Graduation in Statistics or Mathematics , MSCIT
दंत सहाय्यक – 12th pass with Dental Clinic Experience
सीटी स्कॅन तंत्रज्ञ – 10+2 with diploma in relevant field
वैद्यकीय अधिकारी – MBBS
भूलतज्ज्ञ – MD Anesthesia/ DA/ DNB
बालरोगतज्ञ – MD Paed/DCH/DNB
फिजिशियन – MD Medicine/DNB (NHM Recruitment 2022 )
प्रसूतीतज्ज्ञ – MD/MS Gyn/DGo/DNB
रेडिओलॉजिस्ट – MD Radiology / DMRD
सर्जन – MS General Surgery / DNB
ENT सर्जन – MS ENT / DORL / DNB
सुपर स्पेशालिस्ट कार्डिओलॉजिस्ट – DM Cardiology

मिळणारे वेतन –

स्टाफ नर्स/ स्टाफ नर्स NUHM – Rs.20,000/-
वैद्यकीय अधिकारी RBSK UG ((महिला) – Rs.28,000/-
वैद्यकीय अधिकारी UG (आयुष) “आयुर्वेद” – Rs.28,000/-
मेडिकल ऑफिसर यूजी (आयुष) “युनानी’ – Rs.28,000/-
वैद्यकीय अधिकारी पीजी (आयुष) होमिओपॅथी- 1 Rs.30,000/-
STLS – Rs.20,000/-
सांख्यिकी सहाय्यक – Rs.18,000/-
दंत सहाय्यक – Rs.15,800/-
सीटी स्कॅन तंत्रज्ञ – Rs.17,000/-
वैद्यकीय अधिकारी MBBS – Rs.60,000/-
भूलतज्ज्ञ – Rs.75,000/-
बालरोगतज्ञ – Rs.75,000/- (NHM Recruitment 2022)
फिजिशियन – Rs.75,000/-
प्रसूतीतज्ज्ञ – Rs.75,000/-
रेडिओलॉजिस्ट – Rs.75,000/-
सर्जन – Rs.75,000/-
ENT सर्जन – Rs.75,000/-
सुपर स्पेशालिस्ट कार्डिओलॉजिस्ट – Rs.1,25,000/-

असा करा अर्ज –

  1. सदर पदाकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. ऑफलाईन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरातीतून जाणे आवश्यक आहे.
  3. उमेदवारांनी वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर दिलेल्या वेळेच्या आत अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 नोव्हेंबर 2022 (5.00 वाजेपर्यंत) आहे.
  5. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

निवड प्रक्रिया –

  1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती/ लेखी परीक्षेद्वारे होणार आहे.
  2. मुलाखती/ लेखी परीक्षेला उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित राहावे. (NHM Recruitment 2022 )
  3. मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
  4. उमेदवाराने आवश्यक सर्व मूळ प्रमाणपत्रांसह मुलाखतीला उपस्थित रहावे.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – osmanabad.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Jobs Govt : 10 वी पासना भारतीय गुप्तचर विभागात ‘या’ पदावर नोकरीची संधी; काय आहे पात्रता?

Jobs Govt

करिअरनामा ऑनलाईन। भारतीय गुप्तचर विभागा अंतर्गत सुरक्षा (Jobs Govt) सहाय्यक/कार्यकारी (SA/Exe) आणि मल्टी-टास्किंग स्टाफ/जनरल (MTS/Gen) पदांच्या एकूण 1671 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2022 आहे.

संस्था – भारतीय गुप्तचर विभाग (Intelligence Bureau of India)

भरली जाणारी पदे – (Jobs Govt)

  1. सुरक्षा सहाय्यक/कार्यकारी (SA/Exe)
  2. मल्टी-टास्किंग स्टाफ/जनरल (MTS/Gen)

पद संख्या – 1671 पदे

वय मर्यादा –

सुरक्षा सहाय्यक/कार्यकारी (SA/Exe) – 27 वर्षे

मल्टी-टास्किंग स्टाफ/जनरल (MTS/Gen) – 18 ते 25 वर्षे

अर्ज फी – Rs.450/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख – 5 नोव्हेंबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 नोव्हेंबर 2022

निवड प्रक्रिया – मुलाखती

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  • सुरक्षा सहाय्यक/कार्यकारी (SA/Exe) Essential Qualifications:

(i) Matriculation (10th class pass) or equivalent from a recognized Board of Education, and

(ii)Possession of domicile certificate of that State against which candidate has applied.

(iii)Knowledge of any one of the local language/dialect mentionedin Table ‘A’ above against each SIB.

Desirable Qualifications:

Field experience in Intelligence work.

  • मल्टी-टास्किंग स्टाफ/जनरल (MTS/Gen) Essential Qualifications:

(i) Matriculation (10th class pass) or equivalent from a recognized Board of Education, and

(ii)Possession of domicile certificate of that State against which candidate has applied. (Jobs Govt)

(iii)Knowledge of any one of the local language/dialect mentionedin Table ‘A’ above against each SIB.

मिळणारे वेतन –

  1. सुरक्षा सहाय्यक/कार्यकारी (SA/Exe) Level-3 (Rs. 21700-69100) in the pay matrix plus admissible Central Govt. allowances.
  2. मल्टी-टास्किंग स्टाफ/जनरल (MTS/Gen) Level-1 (Rs. 18000-56900) in the pay matrix plus admissible Central Govt. allowances.

असा करा अर्ज –

  1. वरील भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
  2. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  4. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. (Jobs Govt)
  5. अर्ज करण्याची तारीख 5 नोव्हेंबर 2022 या प्रमाणे राहील.
  6. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2022 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.mha.gov.in

अधिकृत वेबसाईट – www.ncs.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Big News : पोलीस भरतीवर शिक्कामोर्तब; लवकरच 14 हजार 956 पदे भरली जाणार 

Big News Police Bharati

करिअरनामा ऑनलाईन। राज्याच्या गृहखात्याची बैठक राज्याचे उपमुख्यमंत्री (Big News) आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत राज्यातील पोलीस भरतीबाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. 14 हजार 956 पदे पोलीस शिपाई पदांची असणार आहेत. तर राज्यातील सर्वात जास्त जागा ह्या मुंबई पोलिसांत भरल्या जाणार आहेत. 6 हजार 740 पदे मुंबई तर 720 पदे पुणे शहरात भरली जाणार आहेत.

1 नोव्हेंबरपासून भरती प्रक्रियेला गती मिळणार

राज्य पोलीस मुख्यालयाने 2021 मध्ये रिक्त झालेल्या पदांची आरक्षण निहाय यादी जाहीर केली आहे. रिक्त पदांमध्ये खुल्या प्रवर्गात 05 हजार 468 पदांचा समावेश आहे. एक (Big News) नोव्हेंबरपासून पोलीस भरतीच्या प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे. एक नोव्हेंबर रोजी जिल्हानिहाय जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. तशा सुचना पोलीस महासंचालकाकडून राज्यातील पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना देण्यात आल्या आहेत. 3 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत भरतीसाठी अर्ज स्विकारण्यात येणार आहेत.

या भरतीसाठी policerecruitment2022.mahait.org आणि WWW.mahapolice.gov.inया संकेतस्थळावर पोलीस भरतीसाठीची माहिती मिळणार आहे. दरम्यान अर्जदार एकाच विभागात एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करु शकत नाही. उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास, उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.

विभागनिहाय पदे (Big News)

मुंबई – 6740, ठाणे शहर – 521, पुणे शहर – 720, पिंपरी चिंचवड – 216, मिरा भाईंदर – 986, नागपूर शहर – 308, नवी मुंबई – 204, अमरावती शहर – 20, सोलापूर शहर- 98, लोहमार्ग मुंबई – 620, ठाणे ग्रामीण – 68, रायगड -272, पालघर – 211, सिंधूदुर्ग – 99, रत्नागिरी – 131, नाशिक ग्रामीण – 454, अहमदनगर – 129, धुळे – 42, कोल्हापूर – 24, पुणे ग्रामीण – 579, सातारा – 145, सोलापूर ग्रामीण – 26, औरंगाबाद ग्रामीण- 39, नांदेड – 155, परभणी – 75, हिंगोली – 21, नागपूर ग्रामीण – 132, भंडारा – 61, चंद्रपूर – 194, वर्धा – 90, गडचिरोली – 348, गोंदिया – 172, अमरावती ग्रामीण – 156, अकोला – 327, बुलढाणा – 51, यवतमाळ – 244

लोहमार्ग पुणे – 124, लोहमार्ग औरंगाबाद -154, एकूण – 14956

कोणत्या प्रवर्गाला किती जागा?

अनुसूचित जाती – 1811, अनुसूचित जमाती – 1350, विमुक्त जाती (अ) – 426, भटक्या जमाती (ब) (Big News) – 374, भटक्या जमाती (क) -473, भटक्या जमाती (ड) – 292, विमुक्त मागास प्रवर्ग – 292, इतर मागास वर्ग – 2926 इडब्लूएस – 1544, खुला – 5468 जागा, एकूण – 14956

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com