Home Blog Page 374

Talathi Bharti 2023 : तलाठी भरती रजिस्ट्रेशन्सला लवकरच सुरु होणार; ‘ही’ कागदपत्रे ठेवा तयार

Talathi Bharti 2023 (3)

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सरकारकडून नुकतीच तलाठी (Talathi Bharti 2023) पदाच्या तब्बल 4122 जागांवर मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. राज्याच्या विविध शहरांमधील शेकडो जागांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. आता या भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या भरतीसाठी रजिस्ट्रेशन लवकरच सुरु होणार आहेत. त्यामुळे उमेदवारांनी स्वतःजवळ कोणते कागदपत्रं ठेवणं आवश्यक आहेत हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

पद – विविध जिल्ह्यांतील तलाठी (Talathi)

एकूण पद संख्या – 4122 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

  1. उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी आणि ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  2. उमेदवारांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे.
  3. तसंच राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्व अटी आणि शर्थी उमेदवारांनी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

वय मर्यादा – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय हे 18 ते 38 दरम्यान असणं आवश्यक आहे. SC/ST/PWD/OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी शिथिलता देण्यात येणार आहे.

मिळणारे वेतन – रु.5,200/- ते 20,200/-रुपये दरमहा

ही कागदपत्रे ठेवा तयार – (Talathi Bharti 2023)

  1. शाळा सोडल्याचा दाखला (10 वी, 12 वी, पदवी ) अधिवास प्रमाणपत्र (Domacile Certificate)
  2. 10 वीची मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र (Nationality Certificate)
  3. 12 वीची मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट जातीचा दाखला (Caste Certificate)
  4. पदवी प्रमाणपत्र (Degree Certificate) नॉन क्रिमिलियर (Non Creamy Layer Certificate)
  5. पोस्ट ग्रॅज्युएशन प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate)
  6. इतर शैक्षणिक कागदपत्रे (NSS,NCC, etc) EWS प्रमाणपत्र (आवश्यकतेनुसार)

इतर आवश्यक कागदपत्रे (आवश्यकतेनुसार) –

  1. अपंग प्रमाणपत्र (Disability Certificate)
  2. माजी सैनिक प्रमाणपत्र
  3. खेळाडू प्रमाणपत्र (Sport Certificate)
  4. प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र (Talathi Bharti 2023)
  5. आत्महत्याग्रस्त शेतकरी पाल्य प्रमाणपत्र

कोणत्या विभागात किती पदे –

  1. नाशिक – 1035
  2. औरंगाबाद – 874
  3. कोकण – 731 (Talathi Bharti 2023)
  4. नागपूर – 580
  5. अमरावती – 183
  6. पुणे – 746

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Success Story : IAS हिमांशू गुप्ता यांची संघर्षमय कहाणी, चहा विकण्यापासून ते IAS होण्यापर्यंतचा प्रवास वाचाच

UPSC Success Story IAS Himanshu Gupta

करिअरनामा ऑनलाईन । अनेकांना त्यांची स्वप्ने सोडून द्यावी लागतात (UPSC Success Story) कारण ती पूर्ण करण्याचा विशेषाधिकार त्यांच्याकडे नसतो. पण या माणसाने आपल्या मेहनतीने आपल्याला जे हवे होते ते मिळवले आणि शेवटी ते साध्य करूनच दाखवले.

आम्ही बोलत आहोत IAS अधिकारी हिमांशू गुप्ता, जे मूळचे उत्तराखंडमधील सितारगंज जिल्ह्यातील आहेत. IAS हिमांशू गुप्ता युवा वर्गासाठी एक प्रेरणा आहेत. शैक्षणिक सुविधांच्या कमतरतेमुळे अनेकांना परीक्षेची तयारीही करता येत नाही. पण हिमांशु यांनी गरिबी आणि अनेक अडचणींचा सामना करून यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत.

UPSC Success Story IAS Himanshu Gupta
वडिलांसोबत विकला चहा (UPSC Success Story)

उत्तराखंडमध्ये जन्मलेला हिमांशू गुप्ता आपल्या वडिलांसोबत चहाच्या गाडीवर चहा विकायचे. आपल्या मुलाला चांगल्या सुविधा देऊ शकतील इतकी त्यांच्या (UPSC Success Story) वडिलांची कमाई नव्हती. दरम्यानच्या काळात हिमांशूने जेव्हा  निरक्षर लोकांना हाताच्या बोटावर आकडेमोड करताना पाहिले तेव्हा अशा व्यक्तींचे आयुष्य बदलण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

UPSC Success Story IAS Himanshu Gupta
अभ्यासासाठी रोजचा 70 किलोमीटरचा प्रवास

“शिक्षणासाठी मी दररोज शाळेत जायचो आणि शाळेतून घरी आल्यावर वडिलांसोबत चहाच्या टपरीवर काम करायचो. माझी शाळा घरापासून 35 कि. मी. दूर होती. त्यामुळे शाळेत जाताना आणि येताना एकूण 70 कि. मी. चा प्रवास करावा लागत असे;” असे हिमांशू यांनी (UPSC Success Story) एका मुलाखतीदरम्यान सांगितले.

चायवाला म्हणून हिणवलं 

“मी शाळेत जाण्यापूर्वी चहाच्या टपरीवर वडिलांना कामात मदत करत असे.  आम्ही व्हॅनने शाळेत जायचो, त्यामुळे जेव्हा जेव्हा व्हॅन माझ्या चहाच्या टपरीजवळून जात असे तेव्हा मी लपून बसायचो. कारण शाळेतील मुलांनी एकदा  मला पाहिलं. त्यानंतर सगळे माझी चेष्टा करू (UPSC Success Story) लागले. तेव्हा मला सगळे ‘चायवाला’ म्हणून चिडवत होते. या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून मी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले आणि वेळ मिळेल तेव्हा माझ्या वडिलांना कामात मदत केली. आमचे घर चालवण्यासाठी आम्ही दिवसाला 400 रुपये कमावयचो;” असेही हिमांशू यांनी सांगितले.

UPSC Success Story IAS Himanshu Gupta
ट्यूशन घेऊन कॉलेजची फी भरली

एकेकाळी आयएएस अधिकारी हिमांशू गुप्ता यांना इंग्रजी शिक्षणासाठी दररोज 70 कि. मी. चा प्रवास करावा लागत होता. शालेय शिक्षण पूर्ण (UPSC Success Story) केल्यानंतर हिमांशू यांनी दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि ट्यूशन घेऊन आणि ब्लॉग लिहून त्यांची फी भरली; असेही हिमांशू यांनी सांगितले.

UPSC Success Story IAS Himanshu Gupta

कॉलेजचा टॉपर विद्यार्थी

त्यांनी पर्यावरण शास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आणि आपल्या बॅचमध्ये टॉप केले. हिमांशु यांच्याकडे परदेशात PHD करण्याचा पर्याय होता पण त्यांनी भारतात राहून सिव्हिल (UPSC Success Story) सर्व्हिसेसचा अभ्यास करणे पसंत केले. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी हिमांशू एका सरकारी कॉलेजमध्ये रिसर्च स्कॉलर म्हणून रुजू झाले. यामाध्यमातून त्यांना केवळ स्टायपेंड मिळण्यास मदत झाली नाही तर नागरी सेवेच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी शैक्षणिक वातावरण देखील मिळाले.

UPSC Success Story IAS Himanshu Gupta
सलग तीन वेळा दिली UPSC

हिमांशू गुप्ता यांनी UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेसाठी सलग तीनवेळा प्रयत्न केला. पहिल्याच प्रयत्नात ते सिव्हिल सर्व्हिसेससाठी पात्र ठरले पण त्यांची फक्त IRTS साठी निवड झाली. तरीही त्यांनी तयारी सुरू ठेवली आणि 2019 च्या यूपीएससी परीक्षेत ते IPS झाले. शेवटच्या (UPSC Success Story) प्रयत्नात ते UPSC सिव्हिल सर्व्हिसेससाठी हजर झाले आणि संपूर्ण भारतातून 304 रॅंक मिळवत त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेत IAS अधिकारी म्हणून निवड झाली. हिमांशु मेहनत आणि ध्येयापासून विचलित न होण्याची वृत्ती सर्वांना प्रेरणा देणारी आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Education : फक्त एका क्लीकवर सर्व माहिती तुमच्या हाती, नाशिक मुक्त विद्यापीठाचं ‘YCMOU E Suvidha’ ऍप लॉंच

Education (5)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची (Education) बातमी आहे. नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने नवीन संकल्पना राबवली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांच्या सोयीचा विचार करून एकाच व्यासपीठावर विद्यापीठाच्या सर्वच सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विद्यापीठाने ‘YCMOU E Suvidha’ नावाचं ऍप्लिकेशन सुरु केले आहे.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने पाच लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी तसेच कामकाजामध्ये गती  येण्यासाठी हे ऍप सुरु केलं आहे.  नाशिकपासून शेकडो कि. मी. अंतरावर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना या ऍपचा जास्तीत उपयोग होण्याची अपेक्षा आहे. जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र (Education) विद्यापीठाने सुरू केलेल्या ई सुविधा ऍपच्या धर्तीवर हे ऍप सुरु करण्यात आले आहे. हे ऍप प्ले स्टोअर वर उपलब्ध असून यातून विद्यार्थ्यांना प्रवेशापासून  सर्व विविध सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे आता थेट विद्यापीठ किंवा विभागीय उपकेंद्राशी संपर्क साधण्याची आता आवश्यकता राहणार नाही. हे ऍप 15 हजार विद्यार्थ्यांनी आतापर्यंत डाउनलोड केलं आहे.

दरम्यान गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेले हे ऍप जवळपास 5 MB चे असून सध्या पाच लाख विद्यार्थ्यांनी विद्यापीठात प्रवेश घेतला आहे. यापैकी सुमारे 15 हजार विद्यार्थी त्याचा वापर करत आहेत. लवकरच इतरही विद्यार्थ्यांनाच्या मोबाईल मध्ये हे ॲप्लिकेशन (Education) डाऊनलोड झालेले दिसून येईल आणि बहुतांशी सर्व विद्यार्थ्यांद्वारे त्याचा वापर करण्यासाठी विद्यापीठ विद्यापीठाकडून विशेष उपक्रम हाती घेतला जाईल. हे मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करून वापरावे असे आवाहनही विद्यापीठामार्फत करण्यात आले आहे.

ऍपमधील सुविधा (Education)

या ऍप मध्ये वेबसाईटवर उपलब्ध असलेली PDF स्वरूपातील पुस्तके या द्वारे लिंकवर दिसतील. ॲपद्वारे प्रवेश अर्ज भरण्याची सुविधा. प्रवेशानंतरच्या सेवांसाठी पर्याय. कॅलेंडरच्या माध्यमातून वर्षभरातील नियोजनाची माहिती प्रश्नपत्रिका डाऊनलोड करणे. आपली प्रोफाइल (Education) पाहण्याची सुविधा. पेपरची माहिती मिळवण्याचा उत्तर पत्रिकेची फोटो कॉपी बघणे सुलभ होणार असून परीक्षेचे वेळापत्रक प्राप्त पर्याय देखील ऍप्लिकेशनमध्ये देण्यात आला आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

LIC Recruitment 2023 :  LIC ची या वर्षातील सर्वात मोठी भरती!! तब्बल 9394 पदे भरणार; तुम्ही आहात का पात्र?

LIC Recruitment 2023 (2)

करिअरनामा ऑनलाईन । जीवन विमा महामंडळ, मुंबई येथे अप्रेन्टिस (LIC Recruitment 2023) विकास अधिकारी पदाच्या 9394 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2023 आहे.

संस्था – जीवन विमा महामंडळ

भरले जाणारे पद – अप्रेन्टिस विकास अधिकारी

पद संख्या – 9394 पदे  (महाराष्ट्र -1942 पदे)

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 फेब्रुवारी 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (LIC Recruitment 2023)

वय मर्यादा – 21 ते 30 वर्षे

अर्ज फी –
SC/ST/PwBD प्रवर्गासाठी – रु.100/-
इतर प्रवर्गासाठी – रु. 750/-

वय मर्यादा – (LIC Recruitment 2023)

LIC ADO Mumbai Vacancy 2023 –

  • पदाचे नाव – अप्रेन्टिस विकास अधिकारी
  • पद संख्या – 1942 पदे (LIC Recruitment 2023)

LIC ADO Zone Wise Vacancy  –

Central Zonal Office (Bhopal)  561 पदे
Eastern Zonal Office (Kolkata) 1049 पदे
East Central Zonal Office (Patna) 669 पदे
Northern Zonal Office (New Delhi) 1216 पदे (LIC Recruitment 2023)
North Central Zonal Office (Kanpur) 1033 पदे
Southern Zonal Office (Chennai) 1516 पदे
South Central Zonal Office (Hyderabad) 1408 पदे
Western Zonal Office (Mumbai) 1942 पदे
Total 9394

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

सहायक प्रशासकीय अधिकारी – Bachelor’s Degree in any discipline from a recognized Indian University/Institution. (LIC Recruitment 2023)

असा करा अर्ज –

वरील भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
इतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
उमेदवारणनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे. (LIC Recruitment 2023)
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख १० फेब्रुवारी २०२३ आहे.

निवड प्रक्रिया –

  1. Preliminary Examination
  2. Main Examination
  3. Interview
  4. Medical Examination

काही महत्वाच्या तारखा –

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – CLICK

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – licindia.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : ग्रॅज्युएट्ससाठी गोल्डन चान्स!! राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थेत ‘या’ पदावर भरती सुरु

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थेत (Job Notification) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध रिक्त पदांच्या एकूण 135 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2023 आहे.

संस्था – राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्था (National Institute of Rural Development & Panchayati Raj)

पद संख्या – 135 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 फेब्रुवारी 2023

भरली जाणारी पदे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Notification)

1. कंसल्टंट सिनियर प्रोग्राम मॅनेजमेंट कंसल्टंट – 01 पद
सामाजिक शास्त्राच्या कोणत्याही शाखेत पदव्युत्तर पदवी तसेच 10 वर्षे अनुभव आवश्यक.

2. प्रोजेक्ट ट्रेनिंग मॅनेजर – 01 पद
कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी तसेच 03 वर्षे अनुभव आवश्यक.

3. प्रोजेक्ट असोसिएट (रिसर्च & डॉक्युमेंटेशन) – 01 पद
सामाजिक शास्त्राच्या कोणत्याही शाखेत पदव्युत्तर पदवी तसेच 02 वर्षे अनुभव आवश्यक.

4. मल्टी टास्क सपोर्ट असिस्टंट – 01 पद (Job Notification)

कोणत्याही शाखेतील पदवी तसेच 01 वर्ष अनुभव आवश्यक.

5. स्टेज प्रोग्राम को-ऑर्डिनेटर – 06 पदे

सामाजिक शास्त्राच्या कोणत्याही शाखेत पदव्युत्तर पदवी तसेच 05 वर्षे अनुभव आवश्यक.

6. यंग फेलो – 125 पदे
सामाजिक शास्त्राच्या कोणत्याही शाखेत पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा तसेच 05 वर्षे अनुभव आवश्यक.

वय मर्यादा – 19 जानेवारी 2023 रोजी 35 ते 50 वर्षांपर्यंत [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी –

जनरल /ओबीसी 300/- [SC/ST/PWD: फी नाही]

मिळणारे वेतन –

35,000/- रुपये ते 1,20,000/- रुपये दरमहा (Job Notification)

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

काही महत्वाच्या लिंक्स – 

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.nirdpr.org.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

DOT Recruitment 2023 : इंजिनियर्ससाठी दूरसंचार विभागात ‘या’ पदावर भरती; असा करा अर्ज

DOT Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । दूरसंचार विभागमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी (DOT Recruitment 2023) आनंदाची बातमी आहे. या विभागात उपविभागीय अभियंता (Sub Divisional Engineer) पदाच्या 270 जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जरी करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर  ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2023 आहे.

संस्था – दूरसंचार विभाग (Department of Telecommunications)

भरले जाणारे पद – उपविभागीय अभियंता / Sub Divisional Engineer

पद संख्या – 270 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 फेब्रुवारी 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (DOT Recruitment 2023)

1. किंवा इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन किंवा कॉम्प्युटर सायन्स किंवा टेलिकम्युनिकेशन्स किंवा माहिती तंत्रज्ञान किंवा इन्स्ट्रुमेंटेशन अंतर्भूत केले असणे आवश्यक आहे.

2. उमेदवाराकडे 08 वर्षे अनुभव असणे आवश्यक.

वय मर्यादा – 22 फेब्रुवारी 2023 रोजी 56 वर्षे (DOT Recruitment 2023)

परीक्षा फी – फी नाही (DOT Recruitment 2023)

मिळणारे वेतन – 47,600/- रुपये ते 1,51,000/- रुपये दरमहा

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता – ADG-1(A & HR), DGT HQ, Room No 212, 2nd floor, UIDAII building, Behind Kali Mandir, New Delhi -110001.

काही महत्वाच्या लिंक्स – (DOT Recruitment 2023)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.dot.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SSC Recruitment 2023 : 10 वी पास उमेदवारांची 11,409 जागांवर मेगाभरती!! कर्मचारी निवड आयोगमध्ये लगेच करा Apply

SSC Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । कर्मचारी निवड आयोग येथे रिक्त पदांच्या (SSC Recruitment 2023) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून  मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल), स्टाफ हवालदार (CBIC & CBN) पदांच्या तब्बल 11409 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी 2023 आहे.

संस्था – कर्मचारी निवड आयोग

भरले जाणारे पद –

  1. मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ – 10,880 पदे
  2. हवालदार (CBIC & CBN) – 529 पदे

पद संख्या – 11,409 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 फेब्रुवारी 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही

भरती प्रकार – सरकारी

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (SSC Recruitment 2023)

  1. मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ – उमेदवार १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
  2. हवालदार (CBIC & CBN) – उमेदवार १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक.

वय मर्यादा –
जास्तीत जास्त – ३० वर्ष

अर्ज फी –
Open/OBC/EWS – ₹१००/-

SC/ST – फि नाही

PWD/ Female – फि नाही

असा करा अर्ज –

  1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या. (SSC Recruitment 2023)
  3. किंवा कर्मचारी निवड आयोग च्या अधिकृत वेबसाईट ssc.nic.in ला भेट द्या.
  4. अर्ज करण्याची शेवटची दिनांक १७ फेब्रुवारी २०२३ आहे.
  5. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  6. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
  7. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Wipro Layoff : विप्रोच्या ‘या’ कठोर निर्णयाचा 800 फ्रेशर्सना फटका; थेट कामावरूनच काढले

Wipro Layoff

करिअरनामा ऑनलाईन । एका मीडिया रिपोर्टनुसार, देशातील टॉप (Wipro Layoff) पाच आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या विप्रोने अंतर्गत चाचणीनंतर खराब कामगिरीमुळे शेकडो फ्रेशर्सना कामावरून काढून टाकले आहे. या संदर्भात कंपनीने आपली भूमिका मांडली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार; कंपनीने सेट केलेल्या मानकांच्या अनुषंगाने प्रत्येक एंट्री-लेव्हल कर्मचार्‍याने त्यांच्या नियुक्त केलेल्या कार्यक्षेत्रात निपुण असण्याची अपेक्षा कंपनी करते.

मूल्यांकन प्रक्रियेमध्ये कर्मचार्‍यांना संस्थेची व्यावसायिक उद्दिष्टे आणि ग्राहकांच्या गरजा यांच्याशी संरेखित करण्यासाठी मूल्यांकन समाविष्ट आहे. आयटी कंपनीच्या या कठोर निर्णयामुळे 800 नवीन कर्मचाऱ्यांना फटका बसला आहे. चाचणी घेतल्यानंतर त्यांना कामावरून (Wipro Layoff) काढून टाकण्यात आले मात्र संख्या कमी असल्याचा कंपनीचा दावा आहे. चाचण्यांमध्ये खराब कामगिरी केल्यामुळे कंपनी सोडण्यास सांगितले गेलेल्या फ्रेशर्सची संख्या विप्रोने उघड केली नाही.

बिझनेस टुडेने कंपनीने काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना पाठवलेली टर्मिनेशन लेटर्स ऍक्सेस केली आहेत. कर्मचार्‍यांच्या प्रशिक्षणासाठी खर्च केलेले 75,000 रुपये देण्यास ते जबाबदार होते, परंतु कंपनीने ही रक्कम माफ केली असल्याचे पत्रात लिहलेल्या (Wipro Layoff) मजकुरावरून लक्षात येथे. या पत्रात असे म्हटले आहे; “आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की प्रशिक्षणाचा खर्च रु.75,000/- जो तुम्ही भरण्यास जबाबदार आहात, माफ केले जाईल.”

कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष (Wipro Layoff)

एका अहवालानुसार, कंपनीतून काढून टाकण्यात आलेल्या एका कर्मचाऱ्याने सांगितले की, “मला जानेवारी 2022 मध्ये ऑफर लेटर मिळाले होते, परंतु काही महिन्यांच्या विलंबानंतर त्यांनी मला कामावर घेतले आणि आता ते मला चाचणीच्या बहाण्याने काढून टाकत आहेत.” कंपनी गेल्या (Wipro Layoff) वर्षीच्या याच तिमाहीत रु. 2,969 कोटींच्या तुलनेत निव्वळ नफ्यात 2.8 टक्क्यांनी वाढ होऊन रु. 3,052.90 कोटी झाला आहे. स्थिर चलन अटींमध्ये (CC) IT सेवा महसुलात 11.5-12.0 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MPSC Recruitment 2023 : MPSC कडून वर्षातील सर्वात मोठ्या मेगाभरतीची घोषणा!! तब्बल 8169 पदांवर होणार भरती

MPSC Recruitment 2023 (2)

करिअरनामा ऑनलाईन । राज्याच्या सरकारी सेवेत दाखल होवू इच्छिणाऱ्या (MPSC Recruitment 2023) तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत पुढे उल्लेख केलेल्या संवर्गातील एकूण 8169 जागांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 25 जानेवारी 2023 पासून सुरु होणार आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र लोकसेवा आयोग

पद संख्या – 8169

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – २५ जानेवारी २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ फेब्रुवारी २०२३

भरली जाणारी पदे – (MPSC Recruitment 2023)

  1. सहायक कक्ष अधिकारी:- 78 पदे
  2. राज्यकर निरीक्षक :-159 पदे
  3. पोलीस उपनिरीक्षक:- 374 पदे
  4. दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक:-49 पदे (MPSC Recruitment 2023)
  5. दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क (गृह) :- 6 पदे
  6. तांत्रिक सहायक, गट-क (वित्त) :- 1 पदे
  7. कर सहाय्यक, गट-क (वित्त) :- 468 पदे
  8. लिपिक-टंकलेखक :- 7034 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

कर सहाय्यक, गट-क (वित्त)
उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे.

उमेदवराकडे  मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. कौशल्य असणे आवश्यक आहे.

लिपिक-टंकलेखक –

उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे. (MPSC Recruitment 2023)

उमेदवराकडे  मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. कौशल्य असणे आवश्यक आहे.

काही महत्वाच्या तारखा –

संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरीता मुख्य परीक्षा खालीलप्रमाणे आयोजित करण्यात येतील.

  1. महाराष्ट्र अराजपत्रित गट व सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२३ – ०२ सप्टेंबर २०२३
  2. महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२३  – ०९ सप्टेंबर २०२३

महत्वाची सूचना –

1. पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागांच्या सूचनेनुसार बदल/वाढ होण्याची शक्यता आहे.
2. पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल झाल्यास त्याचा समावेश मुख्य परीक्षेच्या अधिसूचनेमध्ये करण्यात येईल. तसेच याबाबतची घोषणा / सूचना वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
3. महिलांसाठी आरक्षित पदांकरिता दावा (MPSC Recruitment 2023) करणा-या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे अधिवासी (Domiciled) असल्याबाबत तसेच समाजाच्या उन्नत व प्रगत गटामध्ये मोडत नसल्याबाबत (नॉन क्रीमीलेअर) (अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळून) स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे.

4. विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (क) व भटक्या जमाती (ड) प्रवर्गासाठी आरक्षित असलेली पदे आंतरपरिवर्तनीय असून आरक्षित पदासाठी संबंधित प्रवर्गातील योग्य व पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास अद्ययावत शासन धोरणाप्रमाणे उपलब्ध प्रवर्गातील उमेदवाराचा विचार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल.

आवश्यक शारीरिक क्षमता –

पुरुष –
उंची – १६५ सें मी (MPSC Recruitment 2023)
छाती न फुगविता : ७९ सें मी
फुगविण्याची क्षमता किमान ५ सें मी

महिला – १५७ सें मी

वय मर्यादा – १ मे २०२३ रोजी

पोलीस उपनिरीक्षक पदासाठी : ३१ वर्ष
इतर सर्व पदांसाठी : ३८ वर्ष
[मागासवर्गीय & अनाथ: 05 वर्षे सूट]

परीक्षा फी –
अमागास – रु. 394/-
मागासवर्गीय- रु. 294/- (MPSC Recruitment 2023)

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : कोणत्या देशात माणसे माणसांना खातात?

GK Updates 19 jan

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना (GK Updates) कोणत्याही प्रकारच्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी सामान्य ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. उत्तम सामान्य ज्ञान तुम्हाला सरकारी परीक्षा किंवा इंटरव्ह्यू देताना मदत करते.

जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी एखाद्या ठिकाणी मुलाखत देण्यासाठी गेलात तर तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न सोप्पे असतात, पण अचानक समोर आलेल्या प्रश्नामुळे (GK Updates) उमेदवारांचा गोंधळ उडतो. ऐनवेळी तुमचा गोंधळ उडू नये यासाठी आज आपण सामान्य ज्ञान वाढवणारे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत.

प्रश्न : शरीराला सर्वात जास्त ऊर्जा पुरवण्याचे कार्ये कोणता घटक करतो?
उत्तर : साखर

प्रश्न : ‘सातपुडा’ पर्वतावर कोणते थंड हवेचे ठिकाण आहे?
उत्तर : चिखलदरा, पंचमडी

प्रश्न : अकोला जिल्ह्यामध्ये कोणता किल्ला आहे?
उत्तर : नरनाळा किल्ला

प्रश्न : (GK Updates) महाराष्ट्र भूषण पुरस्काराची राशी किती लाखाची असते?
उत्तर : १० लाख रुपये

प्रश्न : महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी तीन चतुर्थांश भागात कोणती मृदा आहे?
उत्तर : रेगूर मृदा

प्रश्न : दर दोन वर्षांनी राज्यसभेचे किती सभासद निवृत्त होतात?
उत्तर : १/३ सभासद (GK Updates)

प्रश्न : पुणे- सोलापूर या मार्गावर धावणारी रेल्वे कोणती आहे?
उत्तर : हुतात्मा एक्सप्रेस

प्रश्न : महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम केव्हा मंजूर झाला आहे?
उत्तर : १९६७ साली

प्रश्न : कोणत्या देशात माणसे माणसांना खातात?
उत्तर : कांगो देश (GK Updates)

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com