Home Blog Page 375

Education : आता शिक्षण विभागाचे होणार डिजिटायझेशन, फक्त एका क्लिकवर मिळणार संपूर्ण माहिती

Education

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील विविध जिल्ह्यांमधील शिक्षण विभागांकडून (Education) विविध कार्यप्रणाली, योजनांसाठी अनेक प्रकारचे सॉफ्टवेअर वापरात येत आहेत. त्यामुळे अनेकदा त्याची राज्य पातळीवर अंमलबजावणी करताना गोंधळ होत असल्याने राज्याच्या शिक्षण विभागाला डिजिटल लूक अर्थात डिजिटायझेशन करण्याचा निर्णय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी घेतला आहे. त्यासाठी सुमारे ३० कोटी रुपयांचा खर्च येणार असून त्याच्या निविदा प्रक्रिया येत्या महिनाभरात पूर्ण होण्याची शक्यता आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने राबविलेल्या योजना आणि त्यांच्या विविध कार्यक्रमांची अंमलबजावणी, त्यातील अडचणींचा आढावा मांढरे यांनी (Education) मंगळवारी घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, ‘माध्यमिक’च्या सुनंदा वाखारे उपस्थित होते.

या वर्षात होणार अंमलबजावणी (Education)

नव्या बदलाची माहिती सांगताना मांढरे म्हणाले, “आस्थापना, शाळा, डाएट, विनोबा अॅप, संच मान्यता, स्वमान्यता, सरल, यूडाएस अशा प्रकारचे 15 ते 16 तुकड्यांमध्ये विविध अॅप आहेत. शिक्षण विभागांमध्ये जेवढी डिजिटल माध्यमे वापरली जातात, त्याऐवजी आता एकच माध्यम वापरण्यात येणार आहे. त्याबाबतचे मोबाईल अॅपचे सॉफ्टवेअर विकसित करण्यात (Education) येणार आहे. येत्या आठवड्यात डिजिटायझेशनच्या निविदा प्रक्रिया सुरू करून येत्या महिन्याभरात ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून त्याची राज्यभरात अंमलबजावणी करण्याचा मानस आहे.”

शिक्षकांचा त्रास कमी होणार

यूडाएस आणि सरल या वेबपोर्टलमध्ये एकच माहिती विचारली जाते. त्यामध्ये शिक्षकांची माहिती भरावी लागते. मात्र, दोन्ही वेबपोर्टलवर एकाच शिक्षकाची दोनदा माहिती भरावी लागते. त्याच्या राज्यभरातून अनेक तक्रारी येत आहेत. पुन्हा एकदा कोणत्याही कारणास्तव माहिती (Education) विचारली तरी 25 प्रश्न पूर्वीचेच असतात. त्यामुळे एक कॉमन डेटा बँक असेल, तेथून ही माहिती वापरली जाईल. सरल अॅपमध्ये संच मान्यता करण्यासाठी विविध प्रक्रिया करावी लागते. यासाठी विविध क्लिष्ट प्रक्रिया हद्दपार होणार आहेत, असेही मांढरे यांनी स्पष्ट केले.

एकच Log in असणार

सरल, यूडाएस, शालार्थ आयडी, चांगले उपक्रम, चांगल्या उपक्रमांचे मूल्यांकन, टपाल ट्रॅकिंग, मिटिंग ऑनलाइन, मिनिट्स बनविणे, गुणवत्तेचे मूल्यांकन, शैक्षणिक उपक्रम, नासचे मूल्यांकन, डाएटचे नवे उपक्रम, अकाऊटिंग, निधी वितरण, निधी वितरणाचे मॉनिटरिंग (Education) यासारख्या विविध योजनांसह कार्यप्रणाली आता एकाच छताखाली येणार आहे. त्यामुळे एकच सॉफ्टवेअरमुळे एका क्लिकवर या सर्व गोष्टी सहज राज्यभरातील शाळा, शिक्षकांसह कर्मचाऱ्यांना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शिक्षण विभागाचे कामकाज आता एका अॅपमध्ये उपलब्ध होणार आहे. त्यासाठी एकच लॉग इन आणि एकच आयडी राहणार आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BMC Recruitment 2023 : 40 WPM टायपिंग येत असेल तर मुंबई महापालिकेत ‘ही’ नोकरी तुमच्यासाठी; लगेच करा Apply

BMC Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई येथे रिक्त पदांच्या (BMC Recruitment 2023) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ लघुलेखक-नि-वृत्तनिवेदक (इंग्रजी) आणि कनिष्ठ लघुलेखक-नि-वृत्तनिवेदक (मराठी) पदांच्या एकूण 27 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 फेब्रुवारी 2023 आहे.

संस्था – बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई

अर्ज करण्याची पध्दत –  ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 फेब्रुवारी 2023

पद संख्या – 27 पदे (BMC Recruitment 2023)

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

भरती प्रकार – सरकारी

भरले जाणारे पद – (BMC Recruitment 2023)

  1. कनिष्ठ लघुलेखक-नि-वृत्तनिवेदक (इंग्रजी) – 9 पदे
  2. कनिष्ठ लघुलेखक-नि-वृत्तनिवेदक (मराठी) – 18 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

1. कनिष्ठ लघुलेखक-नि-वृत्तनिवेदक (इंग्रजी) –

  • उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • तसेच इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रती मिनिट आणि इंग्रजी लघुलेखन 80 शब्द प्रती मिनिट आणि MS-CIT.

2. कनिष्ठ लघुलेखक-नि-वृत्तनिवेदक (मराठी) –

  • उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • तसेच इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रती मिनिट आणि इंग्रजी लघुलेखन 80 शब्द प्रती मिनिट आणि MS-CIT.

मिळणारे वेतन – 

  1. कनिष्ठ लघुलेखक-नि-वृत्तनिवेदक (इंग्रजी) – ₹25,500/- ते ₹81,100/- दरमहा
  2. कनिष्ठ लघुलेखक-नि-वृत्तनिवेदक (मराठी) – ₹25,500/- ते ₹81,100/- दरमहा

वय मर्यादा – 

कमीत कमी – 18 वर्ष
जास्तीत जास्त – 38 वर्ष

अर्ज/ परीक्षा फी –

Open/OBC/EWS – फि नाही

SC/ST – फि नाही. (BMC Recruitment 2023)

PWD/ Female – फि नाही.

असा करा अर्ज – 

  1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते काळजीपूर्वक वाचून घ्या.
  3. जाहीर झालेले Notification PDF मध्ये आपल्याला अर्जनमुना दिला जातो किंवा अधिकृत साईटवर जाऊन आपण काढू शकता (BMC Recruitment 2023)
  4. अर्ज भरा व त्याला सर्व कागदपत्रे जोडा.
  5. Notification PDF मध्ये दिल्यानुसार पत्त्यावर पाठवा.
  6. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

अर्ज पाठवण्याचा पत्ता –

महानगरपालिका सचिव यांचे कार्यालय, खोली क्रमांक 100, पहिला मजला, विस्तारित इमारत, महापालिका मार्ग, मुंबई – 400001.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – portal.mcgm.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : 26 जानेवारीलाच प्रजासत्ताक दिन का साजरा होतो? इथे मिळेल संपूर्ण माहिती

GK Updates (17)

करिअरनामा ऑनलाईन । भारतवासी दरवर्षी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक (GK Updates) दिन अपूर्व उत्साहात साजरा करतात. यावर्षी आपण आपला 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत. याचे औचित्य साधून दरवर्षी राजपथावर इंडिया गेट ते राष्ट्रपती भवनापर्यंत भव्यदिव्य परेड काढली जाते. या परेडमध्ये भारतीय लष्कर, हवाई दल, नौदल इत्यादींच्या विविध रेजिमेंट्स सहभाही होतात. आज आपण प्रजासत्ताक दिन फक्त 26 जानेवारीलाच का साजरा केला जातो याबद्दल सविस्तर महिती जाणून घेणार आहोत.

GK Updates (17)

26 जानेवारी 1950० रोजी संविधान लागू करण्यात आले, ज्याची अनेक कारणे होती. देश स्वतंत्र झाल्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली. त्याच वेळी 26 जानेवारी 1950 रोजी लोकशाही शासन प्रणालीसह संविधान लागू करण्यात आले. या दिवशी भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. 26 जानेवारीला संविधान लागू करण्याचे मुख्य कारण म्हणजे 1930 मध्ये या दिवशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली होती.

सन 1929 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून एक बैठक आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये (GK Updates) सर्वसंमतीने असे घोषित करण्यात आले की ब्रिटिश सरकारने 26 जानेवारी 1930 पर्यंत भारताला डोमिनियन दर्जा द्यावा. या दिवशी प्रथमच भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.

 

GK Updates (17)

15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळेपर्यंत स्वातंत्र्य दिन 26 जानेवारीलाच साजरा केला जात होता. 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू करण्यात आले आणि 26 जानेवारी 1930 रोजी पूर्ण स्वराज्य घोषित करण्याच्या तारखेला महत्त्व देण्यासाठी 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून घोषित करण्यात आला.

राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

ज्या संविधानाच्या अनुषंगाने आज देशात काम चालू आहे तो मसुदा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (GK Updates) यांनी तयार केला आहे. अनेक सुधारणा आणि बदलांनंतर, समितीच्या 308 सदस्यांनी 24 जानेवारी 1950 रोजी हस्तलिखित कायद्याच्या दोन प्रतींवर सह्या केल्या. त्यानंतर दोन दिवसांनी 26 जानेवारी रोजी तो देशात लागू करण्यात आला.

26 जानेवारीचे महत्त्व कायम ठेवण्यासाठी त्याच दिवशी भारताला लोकशाही ओळख देण्यात आली. संविधानाच्या अंमलबजावणीनंतर, आधीपासून अस्तित्वात असलेला ब्रिटीश कायदा भारत सरकार कायदा (1935) भारतीय राज्यघटनेद्वारे भारतीय शासन दस्तऐवज म्हणून बदलण्यात आला. म्हणूनच दरवर्षी आपण भारतीय 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो.

GK Updates (17)
अन् भारत प्रजासत्ताक देश बनला (GK Updates)

26 जानेवारी 1950 रोजी सकाळी 10 वाजून 18 मिनिटांनी भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनला. त्यानंतर बरोबर 6 मिनिटांनी म्हणजेच 10 वाजून 24 मिनिटांनी डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. या दिवशी, डॉ. राजेंद्र प्रसाद पहिल्यांदाच (GK Updates) राष्ट्रपती म्हणून एका बग्गीतून राष्ट्रपती भवनातून बाहेर आले, जिथे त्यांनी प्रथमच लष्करी सलामी घेतली आणि त्यांना प्रथमच गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.

GK Updates (17)
असा असतो प्रजासत्ताक दिन सप्ताह

प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम सर्वसाधारणपणे 24 जानेवारीला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळालेल्या मुलांच्या नावाच्या घोषणेने सुरू होतो. मात्र यावेळी त्याची सुरुवात 23 जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीपासून झाली आहे. आणि 25 जानेवारीच्या संध्याकाळी राष्ट्रपती (GK Updates) राष्ट्राला संबोधित करतात. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित केला जातो. यादरम्यान दिल्ली येथे राजपथावर परेड काढली जाते. 27 जानेवारी रोजी, पंतप्रधान परेडमध्ये सहभागी झालेल्या NCC कॅडेट्सशी संवाद साधतात.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MahaGenco Recruitment : महिन्याला 1 लाखांच्या वर पगार!! MahaGenco अंतर्गत ग्रॅज्युएट्ससाठी नोकरीची मोठी संधी

MahaGenco Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी येथे लवकरच (MahaGenco Recruitment) काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ सुरक्षा अधिकारी पदांच्या एकूण 34 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कारायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी

भरले जाणारे पद –  कनिष्ठ सुरक्षा अधिकारी (Junior Officer Security)

पद संख्या – 34 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 फेब्रुवारी 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (MahaGenco Recruitment)

कनिष्ठ सुरक्षा अधिकारी –

  1. उमेदवारांनी संबंधित पदांनुसार कोणत्याही फिल्ड मध्ये पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  2. तसंच उमेदवारांना मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे.
  3. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण (MahaGenco Recruitment) संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  4. महत्वाचे म्हणजे उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव नसेल तरी अप्लाय करता येणार आहे.
  5. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

मिळणारे वेतन – 37,340/- ते 1,03,375/- रुपये दरमहा

वय मर्यादा – 38 वर्षे

परीक्षा फी –

ओपन प्रवर्गासाठी – 500/- रुपये

इतर सर्व प्रवर्गासाठी – 300/- रुपये

आवश्यक कागदपत्रे –

  • Resume (MahaGenco Recruitment)
  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंकवर CLICK करा – https://ibpsonline.ibps.in/magenjodec22/ 

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MDL Recruitment 2023 : डिप्लोमा/इंजिनियर्ससाठी मुंबईच्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स येथे भरती सुरु; लगेच Apply करा 

MDL Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे (MDL Recruitment 2023) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 150 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 फेब्रुवारी 2023 आहे.

संस्था – माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, मुंबई

पद संख्या – 150 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 फेब्रुवारी 2023

भरली जाणारी पदे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – (MDL Recruitment 2023)

1) ग्रॅज्युएट अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) / Graduate Apprentice – 135 पदे

  • उमेदवाराकडे अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानातील पदवी असणे आवश्यक.
  • संबंधित संसदेच्या कायद्याद्वारे अशी पदवी प्रदान करण्याचा अधिकार असलेल्या संस्थेने दिलेली अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानाची पदवी
  • वरील समतुल्य म्हणून राज्य सरकार किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त व्यावसायिक संस्थांची पदवी परीक्षा पास असणे आवश्यक. (MDL Recruitment 2023)

2) डिप्लोमा अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) / Diploma Apprentice – 35 पदे

उमेदवाराने संबंधित विषयात विद्यापीठाने दिलेला अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानाचा डिप्लोमा पूर्ण केला असावा.

वय मर्यादा –

किमान 18 वर्षे आणि कमाल 25 वर्षे

वय मर्यादेत सूट – SC/ST/OBC/PWD/PH उमेदवारांना सरकारी नियमानुसार सूट

परीक्षा फी – फी नाही (MDL Recruitment 2023)

मिळणारे वेतन – 8,000/- रुपये ते 9,000/- रुपये दरमहा

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

निवड प्रक्रिया – मुलाखत

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.mazagondock.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IB Recruitment 2023 : 10 वी पाससाठी इंटेलिजेंस ब्युरोमध्ये ‘या’ पदावर भरती; सरकारी नोकरीची ही संधी सोडू नका

IB Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या 10 वी पास (IB Recruitment 2023) उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारत सरकारच्या इंटेलिजेंस ब्युरोमध्ये तब्बल 1675 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2023 आहे.

संस्था – इंटेलिजेंस ब्युरो, भारत

पद संख्या – 1675 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 21 जानेवारी 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 फेब्रुवारी 2023

भरली जाणारी पदे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – (IB Recruitment 2023)

1. सुरक्षा सहाय्यक/ कार्यकारी / Security Assistant/Executive (SA/Exe) – 1525 पदे

  • उमेदवाराने मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाकडून 10 वी पास किंवा समतुल्य शिक्षण घेतले असणे आवश्यक.  नमूद
  • केलेल्या स्थानिक भाषा/बोलीपैकी कोणत्याही एका भाषेचे ज्ञान

2.  मल्टी-टास्किंग स्टाफ / सामान्य / Multi-Tasking Staff/General (MTS/Gen) – 150 पदे

  • उमेदवाराने मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाकडून मॅट्रिक (दहावी पास) किंवा समतुल्य शिक्षण घेतले असणे आवश्यक. (IB Recruitment 2023)
  • नमूद केलेल्या स्थानिक भाषा/बोलीपैकी कोणत्याही एका भाषेचे ज्ञान
  • इंटेलिजन्स कामाचा फील्ड अनुभव असावा.

वय मर्यादा –

10 फेब्रुवारी 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा फी – 450/- रुपये

मिळणारे वेतन – (IB Recruitment 2023)

सुरक्षा सहाय्यक/ कार्यकारी – 21,700/- ते 69,100/- दरमहा

मल्टी-टास्किंग स्टाफ / सामान्य – 18,000/- ते 56,900/- दरमहा

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

निवड प्रक्रिया –

  1. टियर-I लेखी परीक्षा (उद्दिष्ट)
  2. टियर-II लेखी परीक्षा (वर्णनात्मक)
  3. स्थानिक भाषा चाचणी (केवळ SA साठी)
  4. मुलाखत (IB Recruitment 2023)
  5. दस्तऐवज पडताळणी
  6. वैद्यकीय तपासणी

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.mha.gov.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SBI PO Exam 2023 : SBI मध्ये कोण झालं सिलेक्ट? असा पहा संपूर्ण निकाल

SBI PO Exam 2023

करिअरनामा ऑनलाईन । स्टेट बँक ऑफ इंडिया ने एसबीआय प्रोबेशनरी (SBI PO Exam 2023) ऑफिसर प्रिलिम्सचा निकाल जाहीर केला आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन हा निकाल पाहू शकतील.  निकाल तपासण्यासाठी उमेदवारांना त्यांचा नोंदणी क्रमांक आणि रोल नंबर वापरावा लागेल. एसबीआय पीओ प्रिलिम्स परीक्षा डिसेंबर 2022 मध्ये घेण्यात आली होती. या भरतीद्वारे एकूण 1,673 पदे भरली जाणार आहेत. पुढे दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन उमेदवार त्यांचा निकाल पाहू शकतील…

SBI PO Prelims; असा पहा निकाल – (SBI PO Exam 2023)

  1. निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम एसबीआयच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जा.
  2. वेबसाइटच्या होमपेजवरील करिअर टॅबवर क्लिक करा.
  3. करिअर टॅबवर क्लिक केल्यानंतर, पीओ प्रीलिम्स परीक्षेच्या निकाल लिंकवर क्लिक करा.
  4. लिंकवर क्लिक केल्यानंतर (SBI PO Exam 2023) तुमची क्रेडेंशियल्स एंटर करा आणि सबमिट करा.
  5. सबमिट केल्यानंतर, तुमचा एसबीआय पीओ निकाल स्क्रीनवर दिसेल.
  6. निकाल तपासा आणि भविष्यातील वापरासाठी प्रिंट आउट घ्या.

SBI PO निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा – CLICK

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : पृथ्वीवर एकूण किती महासागर आहेत? सांगू शकाल का?

GK Updates (16)

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना (GK Updates) कोणत्याही प्रकारच्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी सामान्य ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. उत्तम सामान्य ज्ञान तुम्हाला सरकारी परीक्षा किंवा इंटरव्ह्यू देताना मदत करते.

जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी एखाद्या ठिकाणी मुलाखत देण्यासाठी गेलात तर तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न सोप्पे असतात, पण अचानक समोर आलेल्या प्रश्नामुळे (GK Updates) उमेदवारांचा गोंधळ उडतो. ऐनवेळी तुमचा गोंधळ उडू नये यासाठी आज आपण सामान्य ज्ञान वाढवणारे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत.

1. पाण्याची खोली मोजण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरतात?
उत्तर – A. सोनार तंत्रज्ञान
B. सोलार तंत्रज्ञान
C. सुपरसॉनीक तंत्रज्ञान
D. अल्ट्रासॉनिक तंत्रज्ञान
सोनार तंत्रज्ञानाचा वापर करून (GK Updates) पाण्याची खोली तसेच पाण्यात दडलेल्या वस्तूंचा शोध घेण्यासाठी केला जातो. आणि Sonar या शब्दाचे फुल फॉर्म आहे Sound Navigation and Ranging.

2. त्वचेला काळा रंग कोणत्या पदार्थामुळे प्राप्त होतो? (GK Updates)
उत्तर – A. मेलानिन
B. जीवनसत्व
C. लोह
D. यांपैकी काहीही नाही

3. राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम’ कोणी लिहले आहे?
उत्तर – A. बंकिमचंद्र चटर्जी
B. रवींद्रनाथ टागोर
C. अरबिंदो घोष
D. शरतचंद्र चट्टोपाध्याय (GK Updates)
वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहले होते तर भारताचे राष्ट्रगीत ‘जन गन मन’ हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहले होते.

4. धातूंचा राजा कोणाला म्हटले जाते?
A. चांदी
B. लोह
उत्तर – C. सोने
D. अल्युमिनियम

5. भारतीय चलनावरील कोणत्या नोटेवर गांधीजींचा फोटो नाही?
उत्तर – A. Rs. 1
B. Rs. 10
C. Rs. 20
D. Rs. 50

6. मानवी शरीराचा सर्वात मोठा अंग कोणता असतो?
उत्तर – A. त्वचा
B. हृदय
C. यकृत
D. मेंदू (GK Updates)

7. मौर्य समाजाची स्थापना कोणी केली होती?
A. अशोक
उत्तर – B. चंद्रगुप्त
C. बिंदुसागर
D. यांपैकी कोणीही नाही

8. हिराकुड धरण कोणत्या नदीवर बांधले गेले आहे?
A. यमुना
B. गंगा
उत्तर – C. महानदी
D. गोदावरी
ओडिशा राज्यातील हिराकुंड धरणाची पूर्ण लांबी जवळ जवळ ३० किमी एवढी असून हे धरण 1957 मध्ये बांधून पूर्ण झाले होते. (GK Updates)

9. पृथ्वीवर एकूण किती महासागर आहेत?
A. 9
B. 6
उत्तर – C. 5
D. 4
अटलांटिक महासागर, प्रशांत महासागर, इंडियन महासागर, आर्कटिक महासागर आणि दक्षिण
महासागर मिळून एकूण 5 महासागर आहेत .

10. पृथ्वीवर एकूण किती महाद्वीप आहेत?
A. 6
उत्तर – B. 7
C. 8 (GK Updates)
D. 10
आफ्रिका, अंटार्क्टिका, आशिया, ऑस्ट्रेलिया(ओशिनिया), युरोप, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका मिळून एकूण 7 महाद्वीप आहेत.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Success Story : भरतनाट्यम् पासून भारताच्या IAS पदापर्यंत; अशी आहे कविता रामू यांची दिमाखदार कामगिरी

UPSC Success Story IAS Kavita Ramu

करिअरनामा ऑनलाईन । UPSC परिक्षेत पास होण्यासाठी जीव तोडून मेहनत (UPSC Success Story) करावी लागते. यासाठी अनेक उमेदवार अभ्यास करताना अडथळा येवू नये म्हणून आपले छंद मागे सोडतात. पण काहीजण असेही असतात जे आपले छंद जोपासत असतानाच निश्चित केलेल्या ध्येयापर्यंत सहज पोहचून दाखवतात आज आपण अशाच एका महिला IAS अधिकाऱ्याचा यशस्वी प्रवास जाणून घेणार आहोत. ज्यांचं नांव आहे IAS कविता रामू…

UPSC Success Story IAS Kavita Ramu

4 थ्या वर्षापासून गिरवले नृत्याचे धडे (UPSC Success Story)

IAS कविता रामू या प्रसिद्ध नृत्यांगना आहेत. त्यांनी 600 हून अधिक शोमध्ये सोलो परफॉर्मन्स दिला आहे. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासून त्यांनी नृत्याचे व्यावसायिक प्रशिक्षण घेणे सुरू केले. हे सर्व असूनही त्यांनी आपल्या ध्येयापासून कधीही विचलित न होता आपला अभ्यास चालूच ठेवला. छंद आणि अभ्यास यामध्ये त्यांनी खंड पडू दिला नाही.

UPSC Success Story IAS Kavita Ramu
वडील IAS तर आई प्रोफेसर

IAS कविता रामू यांचा जन्म मदुराई, तामिळनाडू येथे झाला. त्यांचे वडील एम. रामू हे देखील आयएएस अधिकारी होते. तर त्यांच्या आई मणिमेगाली लग्नापूर्वी (UPSC Success Story) अर्थशास्त्राच्या प्राध्यापक होत्या. कविता यांच्या पालकांनी त्यांना अभ्यासासोबतच कलेची आवड निर्माण करण्यास प्रोत्साहन दिले. त्यांची आई – वडिलांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे त्या उत्तम कामगिरी करू शकल्या आहेत.

UPSC Success Story IAS Kavita Ramu

कविता रामू यांनी वयाच्या अवघ्या 4 व्या वर्षापासून नृत्य शिकण्यास सुरुवात केली. त्यांनी गुरु नीला यांच्याकडून भरतनाट्यमचे मूलभूत शिक्षण घेतले. मग लवकरच नृत्य त्याची आवड बनली. आयएएस कविता रामू या काही नागरी सेवा अधिकार्‍यांपैकी एक आहेत ज्यांनी स्वतःला कलेसाठी देखील समर्पित केले आहे.

UPSC Success Story IAS Kavita Ramu
600 पेक्षा जास्त सोलो परफॉर्मन्स

IAS कविता रामू यांनी आतापर्यंत 600 हून अधिक सोलो स्टेज परफॉर्मन्स दिले आहेत. 1981 मध्ये वयाच्या 8 व्या वर्षी त्यांना पाचव्या जागतिक तमिळ परिषदेत त्यांना नृत्य सादरीकरण करण्याची संधी मिळाली. झाकीर हुसेन यांच्याकडून त्यांनी नृत्याचे धडे घेतले आहेत. सनदी (UPSC Success Story) अधिकारी असल्याने कविता यांच्या वडिलांची काही वर्षांच्या अंतराने बदली व्हायची. कविता 10 वर्षांच्या असताना त्यांच्या वदिलंनची चेन्नईला बदली झाली होती. त्यामुळे आयएएस कविता रामू यांचे सुरुवातीचे शिक्षण तामिळनाडूच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये पूर्ण झाले आहेत. त्यांनी अर्थशास्त्रात पदवी घेतली आहे. वडिलांच्या प्रेरणेने कविता यांनी पदवीचे शिक्षण घेत असताना UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. त्यानंतर त्यांनी लोक प्रशासनात एम.ए. ची पदवी मिळवली. त्या कॉलेजमध्ये टॉपर ठरत होत्या.

UPSC Success Story IAS Kavita Ramu
IAS व्हायचंच होतं (UPSC Success Story)

IAS कविता रामू यांनी 1999 साली तामिळनाडू राज्य नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली. पण UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन IAS अधिकारी होण्याचे त्यांचे मुख्य ध्येय होते. भरतनाट्यम नृत्यांगना म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवताना UPSC परीक्षेची तयारीही केली. 2002 मध्ये त्यांना (UPSC Success Story) त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले. त्यावेळी, यूएसए आणि कॅनडामध्ये त्यांच्या कामगिरीशिवाय, त्या IAS अधिकारी देखील बनल्या. त्यांचा प्रवास आजच्या तरुणाईसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

AIC Recruitment 2023 : पदवीधरांसाठी सरकारच्या अग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया अंतर्गत ‘या’ पदावर भरती 

AIC Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । अग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया (AIC Recruitment 2023) मध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदाच्या 50 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2023 आहे.

संस्था – अग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया

भरले जाणारे पद – व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी

पद संख्या – 50 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 फेब्रुवारी 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (AIC Recruitment 2023)

उमेदवारांनी पदवी /पदव्युत्तर पदवी (कला/विज्ञान/वाणिज्य/कृषी/उद्यान/पशु संवर्धन/व्यवस्थापन/सांख्यिकी/HR) पर्यंत शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे.

मिळणारे वेतन – 60,000/- दरमहा

वय मर्यादा –

कमीत कमी – 21 वर्ष (AIC Recruitment 2023)
जास्तीत जास्त – 30 वर्ष

अर्ज/ परीक्षा फी –

Open/OBC/EWS – ₹१०००/-.
SC/ST – ₹२००/-.
PWD/ Female – ₹२००/-.

असा करा अर्ज –

  1. आपण खाली दिलेल्या स्टेप वाचून आपण अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
  2. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा. (AIC Recruitment 2023)
  3. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
  4. किंवा अग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया च्या अधिकृत वेबसाईट www.aicofindia.com ला भेट द्या.
  5. अर्ज करण्याची शेवटची दिनांक २५ फेब्रुवारी २०२३ आहे.
  6. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  7. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
  8. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  9. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.aicofindia.com

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com