Home Blog Page 376

Layoff : Microsoft कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात!! अमेरिकेत आर्थिक मंदीची चाहूल

Layoff

करिअरनामा ऑनलाईन । मागणीत झालेली घट आणि जागतिक आर्थिक (Layoff) घडामोडींमधील बदलांमुळे अमेरिकेसह अनेक देशांमधील टेक्नॉलॉजी सेक्टर अडचणीत आलं आहे. अनेक मोठ्या कंपन्यांपाठोपाठ मायक्रोसॉफ्टनंदेखील कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मायक्रोसॉफ्टनं घेतलेल्या भूमिकेवरून असं लक्षात येतं की भविष्यात टेक सेक्टरमधील नोकऱ्या आणखी कमी होऊ शकतात.

अमेरिकेमधील टेक्नॉलॉजी सेक्टरमधील अनेक लहानमोठ्या कंपन्यांनी कर्मचारी कपातीचा धडाका सुरू केला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये फेसबुक, मेटा, अ‍ॅमेझॉन आणि ट्विटरसारख्या आघाडीच्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. अमेरिकेत आर्थिक मंदीच्या संकटाची चाहूल लागल्यामुळे या घडामोडी सुरू झाल्या आहेत. यामध्ये (Layoff) आता मायक्रोसॉफ्टचाही समावेश होणार आहे. माध्यमांनी मंगळवारी दिलेल्या वृत्तांनुसार, मायक्रोसॉफ्ट कॉर्पनं ह्युमन रिसोर्स आणि इंजिनीअरिंग विभागांमधील काही पदं कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर नोकरी जाण्याची टांगती तलवार आहे.

मॉर्निंग स्टार या फायनान्स कंपनीतील विश्लेषक डॅन रोमनॉफ सांगतात, “मायक्रोसॉफ्टमधील कर्मचारी कपातीची ही दुसरी प्रलंबित फेरी असं सूचित करते की, टेक्नॉलॉजी क्षेत्रातील परिस्थितीमध्ये सुधारणा झालेली नाही;  कदाचित ही परिस्थिती भविष्यात आणखी बिघडतच जाईल.”

यूके ब्रॉडकास्टर स्काय न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार मायक्रोसॉफ्टनं आपल्या कर्मचार्‍यांपैकी 5 टक्के म्हणजे सुमारे 11 हजार पदं कमी करण्याची योजना आखली (Layoff) आहे. कंपनी अनेक अभियांत्रिकी विभागांतील नोकऱ्या कमी करण्याची योजना आखत आहे, असं वृत्त या प्रकरणाशी संबंधित असलेल्या एका व्यक्तीच्या हवाल्यानं ब्लूमबर्ग न्यूजनं दिलं आहे. तर, इनसाइडरनं दिलेल्या बातमीनुसार, मायक्रोसॉफ्ट एक तृतीयांश कर्मचारी कामावरून कमी करू शकते.

मागील वर्षातील इतर कर्मचारी कपातीच्या फेऱ्यांपेक्षा या वेळच्या फेऱ्या लक्षणीयरीत्या मोठ्या असतील, असं ब्लूमबर्गनं म्हटलं आहे. मायक्रोसॉफ्टनं मात्र, या वृत्तांबाबत भाष्य करण्यास नकार दिला आहे.

30 जून 2022 पर्यंत कंपनीकडे दोन लाख 21 हजार पूर्ण-वेळ कर्मचारी होते. ज्यामध्ये युनायटेड स्टेट्समधील एक लाख 22 हजार आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील 99 हजार कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

मागणीमध्ये घट होण्याची कारणे (Layoff)

पर्सनल कॉम्प्युटर मार्केटमधील मंदीमुळे विंडोज आणि उपकरणांच्या विक्रीला धक्का बसला आहे. त्यामुळे मायक्रोसॉफ्टवर आपल्या क्लाउड युनिट अझूरमधील (Layoff) वाढीचा दर राखण्यासाठी दबाव आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये काही कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्याची नोंद आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये न्यूज साइट Axios नं दिलेल्या वृत्तानुसार, मायक्रोसॉफ्टनं अनेक विभागांमधील शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं होतं.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : टायपिंग येणाऱ्या ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी इथे मिळेल नोकरी; ऑनलाईन करा APPLY

Job Notification (20)

करिअरनामा ऑनलाईन । खडकी कन्टोमेंट बोर्ड, पुणे येथे लवकरच काही (Job Notification) जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ लिपिक या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कारायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 फेब्रुवारी 2023 आहे.

संस्था – खडकी कन्टोमेंट बोर्ड, पुणे

भरले जाणारे पद – (Job Notification)

कनिष्ठ लिपिक (Junior Clerk)

पद संख्या – 07 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

  1. उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण तसेच 35 श.प्र.मि. इंग्रजी किंवा हिंदी टायपिंग पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  2. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  3. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. (Job Notification)

मिळणारे वेतन –

कनिष्ठ लिपिक (Junior Clerk) – 19,900/- ते 63,200/- रुपये दरमहा

परीक्षा फी –

Open/OBC/EWS – 600/- रुपये

SC/ST – 300/- रुपये (Job Notification)

PWD/ Female – 300/- रुपये

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume (Job Notification)
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 फेब्रुवारी 2023

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अर्ज करण्यासाठी या लिंकवर CLICK करा – https://www.parikshaworld.com/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Jobs : ITI ते इंजिनियर्ससाठी पुण्याच्या आर्मी बेस वर्कशॉपमध्ये ‘या’ पदांवर भरती; ऑनलाईन करा APPLY

Government Jobs (12)

करिअरनामा ऑनलाईन । 512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी, पुणे येथे रिक्त (Government Jobs) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या एकूण 283 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2023 आहे.

संस्था – 512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी, पुणे

पद संख्या – 283 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 फेब्रुवारी 2023

भरली जाणारी पदे – (Government Jobs)

  • पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल अप्रेंटिस (एकूण 03 पदे)
    1 इलेक्ट्रिकल 01 पद
    2 इलेक्ट्रॉनिक 01पद
    3 मेकॅनिकल 01पद
  • ट्रेड अप्रेंटिस (EX-ITI) (एकूण 280 पदे)
    4 मेकॅनिक (मोटर व्हेईकल) – 43 पदे
    5 टर्नर 12 पदे (Government Jobs)
    6 इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 17 पदे
    7 शीट मेटल वर्कर 04 पदे
    8 इंस्ट्रूमेंट मेकॅनिक 04 पदे
    9 टूल्स & डाई मेकर (Die & Moulds) 02 पदे
    10 टूल्स & डाई मेकर (Press Tools,Jigs & Fixure) 01पद
    11 इलेक्ट्रोप्लेटर 02 पदे
    12 मेकॅनिक (डिझेल) 53 पदे
    13 वेल्डर (G &E) 22 पदे
    14 कारपेंटर 02 पदे
    15 DTMN (मेकॅनिकल) 02 पदे
    16 फिटर 23 पदे
    17 MMTM 01पद
    18 COPA 27 पदे
    19 पेंटर (जनरल) 13 पदे
    20 मशीनिस्ट 17 पदे (Government Jobs)
    21 प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर (PPO) 02 पदे
    22 इलेक्ट्रिशियन 29 पदे
    23 मशीनिस्ट (ग्राइंडर) 04 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  1. ट्रेड अप्रेंटिस (EX-ITI) – संबंधित ट्रेड मध्ये ITI प्रशिक्षण पूर्ण केले असणे आवश्यक.
  2. पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल अप्रेंटिस – संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा शिक्षण घेतले असणे आवश्यक

वय मर्यादा – किमान 14 वर्षे (14 वर्षांपेक्षा कमी नाही)

परीक्षा फी – फी नाही

मिळणारे वेतन –

ट्रेड अप्रेंटिस – 8000/- दरमहा

पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल अप्रेंटिस – 9000/- दरमहा (Government Jobs)

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Visitors Room of 512 Army Base Workshop, Kirkee, Pune 411003

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.indianarmy.nic.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा –

पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल अप्रेंटिस – APPLY

ट्रेड अप्रेन्टिस (EX-ITI) – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

India Post Recruitment : 10वी उत्तीर्णांसाठी खुशखबर!! भारतीय डाक विभाग अंतर्गत कोल्हापूर येथे भरती सुरु

India Post Recruitment (2)

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय डाक विभाग, कोल्हापूर येथे रिक्त पदांच्या (India Post Recruitment) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विमा प्रतिनिधी पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 31 जानेवारी 2023 आहे.

संस्था – भारतीय डाक विभाग, कोल्हापूर

भरले जाणारे पद – विमा प्रतिनिधी / Insurance Representative

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (India Post Recruitment)

1. उमेदवार 10 वी पास/ मान्यताप्राप्त मंडळाद्वारे समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा.
2. उमेदवारास विमा पॉलिसी विक्रीचा अनुभव (Marketing Skill), संगणकाचे ज्ञान व स्थानिक भागाची पूर्णतः माहिती असणे अपेक्षित आहे.

वय मर्यादा – 18 ते 50 वर्षे

परीक्षा फी – फी नाही

नोकरी करण्याचे ठिकाण – कोल्हापूर (महाराष्ट्र)

आवश्यक कागदपत्रे –

बायोडाटा
आधार कार्ड (India Post Recruitment)
पॅन कार्ड
जन्मतारखेचा पुरावा
शैक्षणिक प्रमाणपत्र
फोटो

निवड प्रक्रिया – मुलाखत (India Post Recruitment)

मुलाखतीची तारीख – 31 जानेवारी 2023

मुलाखतीचा पत्ता – मा. अधीक्षक डाकघर, कोल्हापूर विभाग, रमणमळा, कोल्हापूर – 416003.

काही महत्वाच्या लिंक्स – (India Post Recruitment)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –

India post

अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

AAI Recruitment 2023 : महिन्याला 1,80,000 पगार!! Airports Authority of India मध्ये ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी बंपर भरती

AAI Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय विमानतळ प्राधिकरण येथे लवकरच काही (AAI Recruitment 2023) जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. व्यवस्थापक (अधिकृत भाषा), कनिष्ठ कार्यकारी (एअर ट्रॅफिक कंट्रोल), कनिष्ठ कार्यकारी (राजभाषा), वरिष्ठ सहाय्यक (राजभाषा) या पदांसाठी ही भरती असणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कारायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2023 आहे.

संस्था – भारतीय विमानतळ प्राधिकरण (Airports Authority of India)

भरली जाणारी पदे – (AAI Recruitment 2023)

  1. व्यवस्थापक (अधिकृत भाषा)
  2. कनिष्ठ कार्यकारी (एअर ट्रॅफिक कंट्रोल)
  3. कनिष्ठ कार्यकारी (राजभाषा)
  4. वरिष्ठ सहाय्यक (राजभाषा)

पद संख्या – 364 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जानेवारी 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

1. व्यवस्थापक (अधिकृत भाषा) –

उमेदवारांनी संबंधित पदांनुसार हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. (AAI Recruitment 2023)

2. कनिष्ठ कार्यकारी (एअर ट्रॅफिक कंट्रोल) –

उमेदवारांनी संबंधित पदांनुसार भौतिकशास्त्र आणि गणितासह विज्ञान (B.Sc) मध्ये तीन वर्षांची बॅचलर पदवी किंवा अभियांत्रिकीमध्ये बॅचलर पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

3. कनिष्ठ कार्यकारी (राजभाषा) –

उमेदवारांनी संबंधित पदांनुसार हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. (AAI Recruitment 2023)

4. वरिष्ठ सहाय्यक (राजभाषा) –

उमेदवारांनी संबंधित पदांनुसार पदवी स्तरावर एक विषय म्हणून इंग्रजीसह हिंदीमध्ये मास्टर्स किंवा पदवी स्तरावर हिंदीसह इंग्रजीमध्ये मास्टर्स. पर्यंत (AAI Recruitment 2023) शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

मिळणारे वेतन –

  1. व्यवस्थापक (अधिकृत भाषा) – ₹60,000/- ते ₹1,80,000/- रुपये दरमहा
  2. कनिष्ठ कार्यकारी (एअर ट्रॅफिक कंट्रोल) – ₹40,000/- ते ₹1,40,000/- रुपये दरमहा
  3. कनिष्ठ कार्यकारी (राजभाषा) – ₹40,000/- ते ₹1,40,000/- रुपये दरमहा (AAI Recruitment 2023)
  4. वरिष्ठ सहाय्यक (राजभाषा) – ₹ 36,000/- ते ₹ 1,10,000/- रुपये दरमहा

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume (AAI Recruitment 2023)
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंकवर CLICK करा – https://www.aai.aero/en/recruitment/release/29623

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : सूर्यावरील स्फोटांचे आवाज आपणास ऐकू का येत नाहीत?

GK Updates 16 Jan

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना (GK Updates) कोणत्याही प्रकारच्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी सामान्य ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. उत्तम सामान्य ज्ञान तुम्हाला सरकारी परीक्षा किंवा इंटरव्ह्यू देताना मदत करते.

जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी एखाद्या ठिकाणी मुलाखत देण्यासाठी गेलात तर तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न सोप्पे असतात, पण अचानक समोर आलेल्या प्रश्नामुळे (GK Updates) उमेदवारांचा गोंधळ उडतो. ऐनवेळी तुमचा गोंधळ उडू नये यासाठी आज आपण सामान्य ज्ञान वाढवणारे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत.

1. खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार हा पाण्यामार्फत होतो?
A. अतिसार
B. कावीळ (GK Updates)
C. विषमज्वर
उत्तर – D. वरिल सर्व
कारण अतिसार, कावीळ आणि विषमज्वर हे तिन्ही आजारांचे मुख्य कारण हे दूषित पाणी असते.

2. सूर्यावरील स्फोटांचे आवाज आपणास ऐकू का येत नाहीत?
A. सूर्याचे तापमान फार आहे.
B. सूर्य पृथ्वीपासून फार दूर आहे.
उत्तर – C. सूर्य व पृथ्वीमध्ये काही अंतरा नंतर वातावरण नाही =
D. यांपैकी काहीही नाही. (GK Updates)
सूर्य व पृथ्वीमध्ये काही अंतरानंतर वातावरण नाही, त्यामुळे सूर्यावरील स्फोटांचे आवाज आपणास ऐकू का येत येत नाहीत.

3. वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते?
उत्तर – A. कार्बन डायऑक्साईड
B. ऑक्सिजन
C. हैड्रोजन
D. नायट्रोजन (GK Updates)

4. ——– च्या अभावामुळे रक्तातील हिमोग्लोबीन कमी होऊन व्यक्तीस रक्ताक्षय(Anemia) हा रोग होतो ?
A. आयोडीन
B. कॅल्शियम
उत्तर – C. लोह
D. अ जीवनसत्व

5. पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी खालीलपैकी काय वापरण्यात येते ?
A. सोडा
B. तुरटी (GK Updates)
उत्तर – C. क्लोरीन
D. यांपैकी काहीही नाही

6. विषाणूंचा अभ्यास कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखला जातो ?
A. बॅक्टेरिऑलॉजी
उत्तर – B. व्हायरॉलॉजी
C. मेटॅलर्जी
D. यांपैकी काहीही नाही

7. भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरु झाली?
उत्तर – A. कोलकाता (GK Updates)
B. दिल्ली
C. मुंबई
D. चेन्नई
कोलकाता या शहरात 1984 मध्ये सर्वप्रथम मेट्रो धावली होती आणि भारतातील सर्वात मोठे मेट्रो ट्रेन नेटवर्क हे दिल्ली शहरात आहे.

8. बीसीजी लस ———— या रोगापासून बचाव करते?
A. पोलिओ
B. रातांधळेपणा
उत्तर – C. क्षयरोग
D. कुष्ठरोग (GK Updates)

9. कॉलरा रोगाच्या जिवाणूंचा आकार कसा असतो ?
उत्तर – A. स्वल्पविराम सारखा
B. पूर्णविरामासारखा
C. उद्गारवाचक चिन्हा सारखा
D. यांपैकी काहीही नाही

10. कोणत्या जीवनसत्वाअभावी मनुष्यास रात आंधळेपणा रोग होतो ?
उत्तर – A. अ जीवनसत्व
B. ब जीवनसत्व
C. क जीवनसत्व
D. ड जीवनसत्व (GK Updates)

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UGC NET 2023 : UGC NET परीक्षेच्या रजिस्ट्रेशनसाठी अवघे काही तास शिल्लक; त्वरा करा

UGC NET 2023

करिअरनामा ऑनलाईन । विद्यापीठ अनुदान आयोगाकडून नेट (UGC NET 2023) परीक्षेची अर्ज प्रक्रिया लवकरच बंद होणार आहे. ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज केले नाहीत त्यांनी लवकरात लवकर UGC NET या ugcnet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करायचा आहे. यावर्षी यूजीसी नेट परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया 29 डिसेंबर 2022 पासून सुरू झाली आहे. यामध्ये अर्ज करण्यासाठी 17 जानेवारी 2023 पर्यंत वेळ आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वेबसाइटवरील तपशील तपासून पाहणे गरजेचे आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, NET JRF डिसेंबर 2022 साठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने घेतले जात आहेत. 21 फेब्रुवारी 2023 ते 10 मार्च 2023 या कालावधीत परीक्षा घेतली जाईल.

असा करा अर्ज – (UGC NET 2023)

उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in ला भेट द्या.

वेबसाइटच्या होम पेजवरील ताज्या बातम्यांच्या लिंकवर जा.

यानंतर, तुम्हाला UGC NET डिसेंबर २०२२ च्या अर्जाच्या लिंकवर जावे लागेल.

पुढील पृष्ठावर मागितलेल्या तपशीलापूर्वी नोंदणी करा.

नोंदणी केल्यानंतर, तुम्ही अर्ज भरू शकता. (UGC NET 2023)

यामध्ये शुल्क जमा केल्यानंतरच अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

अर्ज केल्यानंतर अर्जाची प्रिंट घ्या.

UGC NET डिसेंबर 2022 नोंदणी येथे थेट अर्ज करा.

महत्वाची सूचना –

अर्ज करण्यासाठी, सामान्य श्रेणीतील उमेदवारांना फी म्हणून 1100 रुपये भरावे लागतील. त्याच वेळी, एससी एसटी आणि दिव्यांग प्रवर्गातील (UGC NET 2023) उमेदवारांना 275 रुपये जमा करावे लागतील, तर ओबीसी उमेदवारांना 550 रुपये जमा करावे लागतील. शुल्क ऑनलाइन भरता येईल.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने UGC NET जून 2023 साठी अधिसूचना जारी केली आहे. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, जून 2023 सत्राची परीक्षा 13 जून ते 22 जून 2023 या कालावधीत होणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे ही परीक्षा आयोजित केली जाते.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Earn and Learn Scheme : ‘कमवा आणि शिका’ योजनेतील विद्यार्थ्यांच्या मानधनात वाढ; विद्यार्थ्यांमध्ये आनंदी आनंद

Earn and Learn Scheme

करिअरनामा ऑनलाईन । विद्यार्थ्यांच्या श्रमप्रतिष्ठेला महत्त्व देऊन (Earn and Learn Scheme) विद्यार्थ्यांमध्ये आत्मभान व स्वयंनिर्भरता या हेतूने सुरु असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ स्तरावरील ‘कमवा आणि शिका’ योजनेतील विद्यार्थ्यांना यंदापासून दरमहा तीन हजार रुपये मिळणार आहेत. मानधनात वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, योजनेतील सहभागी विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

विद्यापीठात अनेक वर्षांपासून ही योजना राबविली जाते. अशा प्रकारची योजना राबविणारे हे राज्यातील पहिले विद्यापीठ आहे. सध्या 500 विद्यार्थी या योजनेअंतर्गत कार्यरत असून, मानधन वाढविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. विद्यापीठातील विविध (Earn and Learn Scheme) शैक्षणिक विभागात प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी अनेक विद्यार्थी योजनेत सहभागी होण्यासाठी प्रयत्न करतात.

विद्यापीठात प्रवेश घेणारे बहुतांशी विद्यार्थी ग्रामीण भागातून येतात. यामध्ये कुटुंबातील परिस्थिती विचारात घेऊन विविध कामे करून उच्च शिक्षण घेणारे (Earn and Learn Scheme) अनेक विद्यार्थी आहेत. योजनेत प्रवेशासाठी विभागांकडे मोठ्या प्रमाणात अर्ज येतात. विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष परिस्थिती, उच्च शिक्षणाची जिद्द लक्षात घेऊन योजनेत सहभागी करून घेण्यात येते.

असं असतं कामाचं नियोजन (Earn and Learn Scheme)

‘कमवा आणि शिका’ या योजनेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना दररोज दोन तास काम करावे लागते. त्या बदल्यात त्यांना 70 रुपये दिले जातात. या पैशातून विद्यार्थ्यांना (Earn and Learn Scheme) शैक्षणिक खर्च भागवण्यास मदत होते. अनेक दिवसांपासून मानधन वाढविण्याबाबतची मागणी विद्यार्थ्यांकडून होत होती. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आता हे मानधन 100 रुपये करण्याचा निर्णय घेतला. विद्यापीठ प्रशासनाच्या निर्णयाने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.

काय असतं काम

प्रशासकीय कामकाजात वापरली जाणारी पाकिटे, फाइल असे शैक्षणिक साहित्य तयार करणे, ग्रंथालय आणि इतर विभागांतील कामे करणे यांसह कमवा व शिका योजनेची शेती असून, शेतीतील कामे, स्वच्छता, साफसफाईची कामे योजनेतील विद्यार्थी (Earn and Learn Scheme) करतात. या कामाच्या मोबदल्यातून मिळणाऱ्या पैशातून शालेय साहित्य खरेदी, प्रवास, मेस, हॉस्टेल अशा प्रकारचा खरच भागवण्यास मदत होत असते.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Maharashtra Jobs : अंगणवाडी सेविकांना लागली लॉटरी!! मानधनात दुपटीने वाढ अन् नवीन 20 हजार पदे भरणार

Maharashtra Jobs

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात लवकरच 20 हजार अंगणवाडी सेविकांची (Maharashtra Jobs) भरती करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच केली होती. यापाठोपाठ अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दुप्पट वाढ, नवे मोबाइल, जागेच्या भाड्याच्या तुटपुंज्या रकमेमध्ये बदल, अंगणवाड्यांची संख्या वाढवणे यासारख्या बदलांबाबतही राज्य सरकारच्या पातळीवर विचार सुरू असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे. अंगणवाडी सेविकांना लवकरच नवे मोबाइल देण्यासाठी 125 कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचेही सांगण्यात आले.

राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या विविध प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक पार (Maharashtra Jobs) पडली. या बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आल्यानंतर 20 हजार अंगणवाडी सेविकांच्या भरतीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यानंतर अंगणवाडी सेविकांना इतरही सुविधा देण्याचा विचार राज्य सरकार करीत असल्याची माहिती मिळाली आहे.

राज्यात अनेक ठिकाणी भाडेतत्त्वावर अंगणवाडी भरविल्या जातात. अशा अंगणवाड्यांना अत्यंत तुटपुंजे भाडे देण्यात येते. काही ठिकाणी ३ ते ४ हजार रुपयेच भाडे मिळते. त्यामुळे या अंगणवाड्यांचे भाडे वाढवून देण्याबाबतही सरकार विचार करत असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय (Maharashtra Jobs) राज्यातील अंगणवाड्यांची संख्या वाढविण्यासाठी महिला व बालविकास विभागामार्फत नवा प्रस्तावांच्या हालचालींना वेग आला असून त्या माध्यमातून राज्यातील ग्रामपंचायत आणि इतर भागातील शाळांमधील सुमारे २० हजार खोल्या अंगणवाड्यांसाठी देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील अंगणवाड्यांची संख्या वाढणार असल्याची माहिती आहे.

राज्यातील अंगणवाडी सेविकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मध्यंतरी आझाद मैदानावर आंदोलन केले होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. या पार्श्वभूमीवर ‘वर्षा’वर बैठक झाली. या बैठकीत अंगणवाडी (Maharashtra Jobs) कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या २० हजार १८६ पदांच्या भरतीला मान्यता मिळाली असून ही भरती प्रक्रिया सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश शिंदे यांनी बैठकीत दिले.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ICG Recruitment 2023 : 12 वी ते पदवीधरांसाठी भारतीय तटरक्षक दलात भरती सुरु; ‘या’ पदासाठी आजच अर्ज करा

ICG Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय तटरक्षक दलामध्ये रिक्त पदांच्या (ICG Recruitment 2023) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 25 जानेवारीपासून सुरु होईल तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2023 आहे.

संस्था – भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard)

पद संख्या – 71 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 25 जानेवारी 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 फेब्रुवारी 2023

भरली जाणारी पदे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – (ICG Recruitment 2023)

1) जनरल ड्यूटी (GD) – 40 पदे
60% गुणांसह पदवीधर आणि 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण

2) कमर्शियल पायलट लायसन्स (SSA) – 10 पदे
55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण तसेच CPL (Commercial Pilot License)

3) टेक्निकल (मेकॅनिकल) – 06 पदे (ICG Recruitment 2023)
60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (नेव्हल आर्किटेक्चर/मेकॅनिकल / मरीन/ ऑटोमोटिव्ह किंवा मेकॅट्रॉनिक्स किंवा इंडस्ट्रियल & प्रोडक्शन /मेटलर्जी/डिझाइन/एरोनॉटिकल/एरोस्पेस) तसेच 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण

4) टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स) – 14 पदे
60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन/इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ पॉवर इंजिनिअरिंग किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स) आणि 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण

5) लॉ एन्ट्री – 01 पद (ICG Recruitment 2023)
60% गुणांसह LLB

वय मर्यादा –  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

जनरल ड्यूटी (GD): जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2002 दरम्यान.

कमर्शियल पायलट एंट्री (SSA): जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2004 दरम्यान.

टेक्निकल (मेकॅनिकल): जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2002 दरम्यान.

टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स): जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2002 दरम्यान.

लॉ एन्ट्री: जन्म 01 जुलै 1994 ते 30 जून 2002 दरम्यान.

परीक्षा फी – फी नाही

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

काही महत्वाच्या लिंक्स – (ICG Recruitment 2023)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 

अधिकृत वेबसाईट – www.indiancoastguard.gov.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com