Home Blog Page 377

CSB Recruitment 2023 : सरकारी नोकरीची मोठी संधी!! केंद्रीय रेशीम मंडळात ‘या’ पदावर भरती सुरु; तुम्ही आहात का पात्र?

CSB Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय रेशीम मंडळ अंतर्गत रिक्त पदांच्या (CSB Recruitment 2023) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक संचालक, संगणक अभियंता, सहाय्यक अधीक्षक (प्रशासन), सहाय्यक अधीक्षक, लघुलेखक, ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ अनुवादक, अप्पर डिव्हिजन क्लर्क, स्टेनोग्राफर, फील्ड असिस्टंट, कूक या पदांच्या एकूण 142 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2023 आहे.

संस्था – केंद्रीय रेशीम मंडळ (Central Silk Board)

भरली जाणारी पदे –

सहाय्यक संचालक, संगणक अभियंता, सहाय्यक अधीक्षक (प्रशासन), सहाय्यक अधीक्षक, लघुलेखक, ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ अनुवादक, अप्पर डिव्हिजन क्लर्क, स्टेनोग्राफर, फील्ड असिस्टंट, कूक

पद संख्या – 142 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 जानेवारी 2023

वय मर्यादा – (CSB Recruitment 2023)

सहाय्यक संचालक (प्रशासन व लेखा) – 35 वर्षे
संगणक अभियंता – 30 वर्षे
सहाय्यक अधीक्षक (प्रशासन) – 30 वर्षे
सहाय्यक अधीक्षक (तांत्रिक) – 30 वर्षे
लघुलेखक (ग्रेड-1) – 30 वर्षे
ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक – 30 वर्षे
कनिष्ठ अभियंता – 30 वर्षे (CSB Recruitment 2023)
कनिष्ठ अनुवादक (हिंदी) – 30 वर्षे
अप्पर डिव्हिजन क्लर्क – 18 ते 25 वर्षे
स्टेनोग्राफर (ग्रेड-II) – 18 ते 25 वर्षे
फील्ड असिस्टंट – 25 वर्षे
कूक – 18 ते 25 वर्षे

अर्ज फी –
Central Silk Board Bharti 2023

भरतीचा तपशील –

सहाय्यक संचालक 04 पदे
संगणक अभियंता 01 पद
सहाय्यक अधीक्षक (प्रशासन) 25 पदे
सहाय्यक अधीक्षक (तांत्रिक) 05 पदे
लघुलेखक (ग्रेड-1) 04 पदे (CSB Recruitment 2023)
ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक 02 पदे
कनिष्ठ अभियंता 05 पदे
कनिष्ठ अनुवादक (हिंदी) 04 पदे
अप्पर डिव्हिजन क्लर्क 85 पदे
स्टेनोग्राफर (ग्रेड-II) 04 पदे
फील्ड असिस्टंट 01 पद
कूक 02 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

सहाय्यक संचालक – Qualified Chartered Accountant
संगणक अभियंता – Graduate
सहाय्यक अधीक्षक (प्रशासन) – Bachelors Degree
सहाय्यक अधीक्षक (तांत्रिक) – Bachelors Degree
लघुलेखक (ग्रेड-1) – Bachelors Degree (CSB Recruitment 2023)
ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक – Bachelors Degree
कनिष्ठ अभियंता – Electrical Engineer
कनिष्ठ अनुवादक (हिंदी) – Masters Degree
अप्पर डिव्हिजन क्लर्क – Bachelors Degree
स्टेनोग्राफर (ग्रेड-II) – Bachelors Degree
फील्ड असिस्टंट – Matriculation
कूक – Diploma

मिळणारे वेतन –

सहाय्यक संचालक Pay Level 10 (56100 – 177500)
संगणक अभियंता Pay Level 7 (344900-2142400)
सहाय्यक अधीक्षक (प्रशासन) Pay Level-6( 35400-112400)
सहाय्यक अधीक्षक (तांत्रिक) Pay Level-6 (35400-112400)
लघुलेखक (ग्रेड-1) Pay Level-6 (35400-112400) (CSB Recruitment 2023)
ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक Pay Level-6 (35400-112400)
कनिष्ठ अभियंता Pay Level-6 (35400-112400)
कनिष्ठ अनुवादक (हिंदी) Pay Level-6 (35400-112400)
अप्पर डिव्हिजन क्लर्क Pay Level-4 (25500-81100)
स्टेनोग्राफर (ग्रेड-II) Pay Level-4 (25500-81100)
फील्ड असिस्टंट Pay Level-3 ( 21700-69100)
कूक Pay Level-2 ( 19900-63200)

काही महत्वाच्या तारखा –

Central Silk Board Bharti 2023

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – csb.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Banking Jobs : पदवीधरांसाठी नॅशनल हाउसिंग बँकेत ‘या’ पदावर भरती सुरु; लगेच करा APPLY

Banking Jobs (7)

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल हाउसिंग बँक येथे रिक्त पदांच्या (Banking Jobs) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून रिक्त पदांच्या 36 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 फेब्रुवारी 2023 आहे.

संस्था – नॅशनल हाउसिंग बँक

पद संख्या – 36 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 फेब्रुवारी 2023

भरली जाणारी पदे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Banking Jobs)

1) महाव्यवस्थापक / General Manager – 01 पद
उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर सह चार्टर्ड अकाउंटंट तसेच 15 वर्षे अनुभव असणे आवश्यक

2) उपमहाव्यवस्थापक / Dy. General Manager – 03 पदे
उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर सह चार्टर्ड अकाउंटंट तसेच 12 वर्षे अनुभव असणे आवश्यक

3) सहाय्यक महाव्यवस्थापक / Asst. General Manager – 05 पदे
उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर सह सीए तसेच 12 वर्षे अनुभव असणे आवश्यक

4) प्रादेशिक व्यवस्थापक / Regional Manager – 08 पदे
उमेदवार संगणक विज्ञान मध्ये पदवीधर (Banking Jobs) पदवी किंवा समतुल्य तसेच 10 वर्षे अनुभव असणे आवश्यक

5) व्यवस्थापक / Manager – 06 पदे
उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठापासून पदवीधर सह कायदा पदवी किंवा कायदा पदवीधर ज्याने 5 वर्षे पूर्ण केली आहेत एकात्मिक कायदा अभ्यासक्रम / सिव्हिल/बॅचलर ऑफ आर्किटेक्चर मध्ये अभियांत्रिकी /पदव्युत्तर पदवी प्राधान्य : एम.फील./ पीएच.डी. तसेच 10 वर्षे अनुभव असावा.

6) उपव्यवस्थापक / Dy. Manager – 10 पदे (Banking Jobs)
उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर सह सीए / आकडेवारी / अर्थशास्त्र मध्ये पदव्युत्तर पदवी / एमबीए (एचआर) / अभियांत्रिकी मध्ये पदवी तसेच 02 वर्षे अनुभव असावा.

7) मुख्य अर्थशास्त्रज्ञ / Chief Economist – 01 पद
उमेदवार मान्यताप्राप्त भारतीय/ परदेशी विद्यापीठापासून अर्थशास्त्र मध्ये पदव्युत्तर पदवी सह अर्थशास्त्र चलनविषयक विशेषीकरण (Banking Jobs) अर्थशास्त्र किंवा अर्थमिती तसेच 15 वर्षे अनुभव असणे आवश्यक.

8) प्रोटोकॉल अधिकारी / Protocol Officer – 02 पदे
उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थापासून कोणत्याही शाखेतील पदवीधर तसेच 25 वर्षे अनुभव असणे आवश्यक.

वय मर्यादा –

01 जानेवारी 2023 रोजी 23 ते 64 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा फी –

850/- रुपये [SC/ST/PWD – 175/- रुपये]

मिळणारे वेतन – 48,170/- रुपये ते 1,29,000/- रुपये दरमहा

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत (Banking Jobs)

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.nhb.org.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – Other posts

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – Protocol Officer

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

JEE Mains 2023 : JEE परीक्षेचं हॉल तिकीट लवकरच जारी होण्याची शक्यता; कसं कराल डाउनलोड

JEE Mains 2023

करिअरनामा ऑनलाईन । देशातील सर्वोच्च अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये (JEE Mains 2023) प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या संयुक्त प्रवेश परीक्षेचे प्रवेशपत्र लवकरच प्रसिद्ध होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया बंद झाली आहे. यामध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 12 जानेवारी 2023 पर्यंत मुदत देण्यात आली होती. जेईई मेन 2023 साठी सत्र 1 ची परीक्षा 24 जानेवारी 2023 पासून सुरू होईल. यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइटवर कधीही जारी केले जाऊ शकते.

JEE Mains 2023 परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे प्रवेशपत्र jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जारी केले जाईल. हे प्रवेशपत्र नक्की कसे डाउनलोड करायचे हे जाणून घेऊया.

Admit Card असं करा डाउनलोड (JEE Mains 2023)
  1. प्रवेशपत्र जारी केल्यानंतर, उमेदवाराला प्रथम अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in ला भेट द्यावी लागेल.
  2. वेबसाइटच्या होम पेजवर ताज्या बातम्यांवर क्लिक करा.
  3. आता JEE(मुख्य) 2023 सत्र प्रवेशपत्राच्या लिंकवर जा.
  4. हॉल तिकीट डाउनलोड करा या लिंकवर क्लिक करा.
  5. आता उमेदवार त्यांचा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड टाकतात.
  6. सबमिशन केल्यावर, प्रवेशपत्र (JEE Mains 2023) स्क्रीनवर उघडेल.
  7. प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि पुढील वापरासाठी प्रिंट आउट घ्या.
  8. प्रवेशपत्रावर उमेदवारांचे नाव, पालकांचे नाव, परीक्षा केंद्राचा पत्ता, परीक्षेची तारीख, नाव आणि फोटो असेल. हे तपशील तपासल्यानंतर प्रवेशपत्र डाउनलोड करा. प्रवेशपत्राबाबत काही समस्या असल्यास तुम्ही वेबसाइटवर दिलेल्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकता.

महत्वाच्या तारखा –

JEE Mains 2023 जानेवारी सत्र परीक्षा 24, 25, 27, 28, 29, 30 आणि 31 जानेवारी 2023 रोजी होणार आहे. या तारखांच्या काही काळापूर्वी प्रवेशपत्र जारी केले जाईल. तुम्ही अधिकृत अधिसूचनेत परीक्षेशी संबंधित काही महत्त्वाच्या तारखा पाहू शकता. जेईई मेन 2023 चे पहिले (JEE Mains 2023) सत्र 24 जानेवारी ते 31 जानेवारी आणि जेईई मेन 2023 चे दुसरे सत्र 6 एप्रिल ते 12 एप्रिल या कालावधीत आयोजित केले जाईल. उमेदवार जेईई मुख्य सत्र 2 साठी 7 फेब्रुवारी ते 7 मार्च 2023 या कालावधीत नोंदणी करू शकतात.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career News : खबरदार!! ऑफिसमधील सहकारी सुट्टीवर असताना फोन केला तर भरा 1 लाखाचा दंड; कंपनीचा अजब फतवा 

Career News (8)

करिअरनामा ऑनलाईन । सुट्टीवर जाताना तुम्ही ऑफिसचं काम काही (Career News) प्रमाणात शिल्लक राहते. तुमच्या सुट्टीच्या काळात ऑफिसमधून तुम्हाला कुणीही त्रास देणार नाही, अशी आशा बाळगता. मात्र, भारतात अजूनही अशी अनेक कार्यालये आहेत, जिथे सुट्टीच्या काळातही त्यांच्यावर कामाचं ओझं असतं. अशा परिस्थितीत मुंबई येथील एका कंपनीने एक धक्कादायक निर्णय घेतला, ज्यामुळे ऑफिसमधील कर्मचाऱ्याचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. एका भारतीय टेक स्टार्टअप कंपनीने सुट्टीच्या काळात सहकाऱ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दंड आकारून या समस्येचं निराकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

कंपनीने यावर एक उपाय काढला आहे. त्यांनी त्यांचे कर्मचारी दरवर्षी एक आठवडा कामापासून दूर राहतील आणि सिस्टमशी अनप्लग असतील असं ठरवलं आहे. या दरम्यान (Career News) त्यांना कुणी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर त्यांना एक लाख रुपये दंड भरावा लागेल. ड्रीम11 फँटसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म चालवणारी मुंबईस्थित कंपनी ड्रीम स्पोर्ट्सने एका मीडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, दरवर्षी आपल्या कर्मचाऱ्यांनी एक आठवड्याची सुट्टी घेणे आवश्यक आहे.

कंपनीचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हर्ष जैन या बाबत म्हणतात, “जर एखाद्या सहकाऱ्याने सुट्टीच्या काळात त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर त्यांना 1,00,000 रुपये दंड ठोठावण्यात येईल. “वर्षातून एकदा तुम्हाला आठवडाभरासाठी (Career News) सिस्टिममधून बाहेर काढलं जाईल  ते पुढे म्हणाले की, यामुळे सुट्टीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना एका आठवड्याचा चांगला ब्रेक मिळतो. तसेच अनप्लग झालेल्या काळात कोणालाही कामाचे ओझे नको असते. त्यामुळे त्या कर्मचाऱ्याला सुट्टीचा आनंद घेता येईल आणि एकमेकांच्या सुट्टीचा आदर करण्याची शिकवण या माध्यमातून रुजवली जाईल.”

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : भारताच्या नकाशात नेहमी श्रीलंका का? इथे मिळेल उत्तर

GK Updates (15)

करिअरनामा ऑनलाईन । शालेय जिवनापासून आपण पाहत आलोय की (GK Updates) भारत आणि श्रीलंका हे दोन्ही स्वतंत्र देश असले तरी भारताच्या नकाशात श्रीलंका देश दाखवला जातो. तर पाकिस्तान आणि चीनचा ही काही भाग भारताच्या नकाशात कापला गेला आहे. भारताच्या नकाशात श्रीलंका देशाचा नकाशा का दाखवला जातो हे आज  आपण समजून घेणार आहोत…

युनायटेड नेशन्सचा कायदा

भारताच्या नकाशात श्रीलंका नेहमीच जोडलेली दिसते. आता प्रश्न असा पडतो की, भारत आणि श्रीलंका हे दोन्ही स्वतंत्र देश असताना भारताच्या नकाशात ही श्रीलंका का दाखवली जाते. तर पाकिस्तान आणि चीनचा ही काही भाग भारताच्या नकाशात कापला गेला आहे. युनायटेड (GK Updates) नेशन्सचा एक कायदा आहे, ज्याला समुद्राचा कायदा म्हणतात. या कायद्यानुसार जर एखाद्या देशाची सीमा समुद्राला लागून असेल तर सीमेपासून 200 सागरी मैल म्हणजेच 370 किलोमीटरचा परिसर हा त्या देशाचा सागरी क्षेत्र मानला जातो. आता श्रीलंका आणि भारत यांच्यातील अंतर केवळ 18 सागरी मैल आहे. त्यामुळेच भारताच्या नकाशात श्रीलंका दाखवली जाते.

असा तयार झाला कायदा (GK Updates)

खरं तर 1956 साली युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन द लॉ ऑफ द सी (UNCLOS-I) संयुक्त राष्ट्रसंघाने आयोजित केले होते. या परिषदेत अनेक देश सहभागी झाले होते. या चर्चेचा निकाल 1958 मध्ये लागला. परिणामी देशांच्या सागरी हद्दीसंदर्भातील करारांवर कायदे करण्यात आले. मात्र 1973 ते 1982 या काळात तिसरी परिषद (UNCLOS-III) झाली आणि समुद्राशी संबंधित आंतरराष्ट्रीय कायद्यांना मान्यता देण्यात आली.

यापैकी एक कायदा म्हणजे सी चा (समुद्राचा) कायदा, ज्याअंतर्गत एखाद्या देशाच्या नकाशात त्या देशाच्या बेस लाइनपासून 200 नॉटिकल मैलांपर्यंतची मर्यादा (GK Updates) दाखवणे बंधनकारक आहे. एक सागरी मैल 1.824 किलोमीटर आहे. अशा परिस्थितीत 200 सागरी मैल म्हणजे 370 किलोमीटर.

त्यामुळेच भारताच्या समुद्राला लागून असलेल्या भारताच्या सीमेपासून 370 किलोमीटर अंतरावर येणारा परिसर नकाशात दाखवण्यात आला आहे. त्यामुळे स्वतंत्र देश असूनही भारताच्या नकाशात श्रीलंकेला नेहमीच पाहिले जाते.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

VRDE Recruitment 2023 : सरकारी नोकरीची नामी संधी!! VRDE अंतर्गत ‘या’ पदावर भरती सुरु

VRDE Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । वाहन संशोधन आणि विकास आस्थापना (VRDE Recruitment 2023) येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ संशोधन सहकारी पदाच्या 18 जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. 06, 08 आणि 10 फेब्रुवारी 2023 रोजी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.

संस्था – वाहन संशोधन आणि विकास आस्थापना (Vehicles Research & Development Establishment)

भरले जाणारे पद – कनिष्ठ संशोधन सहकारी

पद संख्या – 18 पदे

पदभरतीचा तपशील – (VRDE Recruitment 2023)

  1. जुनिअर रिसर्च फेलो इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन – 02 पदे
  2. कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर – 02 पदे
  3. मेकॅनिकल – 14 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

उमेदवाराने संबंधित विषयात प्रथम श्रेणी B.E/ B.Tech + NET/ GATE किंवा M.E/ M.Tech/ M.S. पर्यंत शिक्षण घेतले असावे.

वय मर्यादा –

खुला – 18 ते 28 वर्षे
मागासवर्गीय – 05 वर्षे सूट
ओबीसी – 03 वर्षे सूट

नोकरी करण्याचे ठिकाण – अहमदनगर

निवड प्रक्रिया – मुलाखत (VRDE Recruitment 2023)

मुलाखतीची तारीख – 6 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी 2023

मुलाखतीची वेळ – सकाळी 09:30 ते सायं 05:00

मुलाखतीचे ठिकाण – VRDE, PO; Vahannagar, Ahmednagar – 414006

काही महत्वाच्या लिंक्स – 

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://drdo.gov.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

LIC Recruitment 2023 : LIC मध्ये नोकरीची संधी सोडू नका; ग्रॅज्युएट असाल तर त्वरित Apply करा

LIC Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय जीवन विमा निगम येथे रिक्त (LIC Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक प्रशासकीय अधिकारी पदांच्या 300 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2023 आहे.

संस्था – भारतीय जीवन विमा निगम (Life Insurance Corporation of India)

पद संख्या – 300 पदे

भरले जाणारे पद – सहाय्यक प्रशासकीय अधिकारी.

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (LIC Recruitment 2023)

उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा –

  1. खुला – 21 ते 30 वर्षे
  2. मागासवर्गीय – 05 वर्षे सूट (LIC Recruitment 2023)
  3. ओबीसी – 03 वर्षे सूट

अर्ज फी –

खुला/ ओबीसी 700/- रुपये + GST (LIC Recruitment 2023)
मागासवर्गीय/ PwBD 85/- रुपये + GST

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

निवड प्रक्रिया – परीक्षा

परीक्षेची तारीख –

  1. पूर्व परीक्षा – 17 व 20 फेब्रुवारी 2023
  2. मुख्य परीक्षा – 18 मार्च 2023 (LIC Recruitment 2023)

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यसाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – https://www.licindia.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IAS Success Story : ना कोचिंग क्लास…ना टाईम मॅनेजमेंट… केवळ स्टेशनच्या फ्री Wi Fi वर अभ्यास करून हमाल झाला IAS

IAS Success Story Shrinath K

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल होण्याचं (IAS Success Story) स्वप्न अनेकवेळा सत्यात उतरतं तर अनेक जणांना या ध्येयापासून वंचित राहावं लागतं. UPSC ची परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. त्यामुळे या परीक्षेत यशस्वी होण्याचं प्रमाण तुलनेनं कमी असतं. जे युवक-युवती ही परीक्षा उत्तीर्ण होतात. त्यांचा इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास नक्कीच खडतर आणि इतरांसाठी प्रेरणादायी असतो. आज आम्ही तुम्हाला कठोर परिश्रम घेत जिद्दीनं UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन जिल्हाधिकारी बनलेल्या एका तरुणाच्या प्रवासाविषयी सांगणार आहोत.

IAS Success Story Shrinath K

स्टेशनवर केली हमाली (IAS Success Story)

हा युवक रेल्वे स्टेशनवर कुली अर्थात हमालाचे काम करत होता. पण कष्टाच्या जोरावर त्याने केरळ लोकसेवा आयोगाची परीक्षा आणि आयएएस परीक्षेत घवघवीत यश मिळवलं. जवळ पैसे नसल्याने पुस्तक घेऊ न शकलेला हा युवक रेल्वे स्टेशनवरील फ्री वाय-फायच्या (IAS Success Story) मदतीने अभ्यास करून KPSC आणि KAS परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. आपल्याला सरकारी नोकरीच करायची आहे हे त्याचं स्वप्न त्याने अत्यंत मेहनतीनं पूर्ण केलं आहे. या तरुणाचा IAS पदापर्यंत पोहचण्याचा प्रवास निश्चितच सुखकर नव्हता.

IAS Success Story Shrinath K
फ्री Wi Fi च्या मदतीने केला अभ्यास

भारतीय प्रशासकीय सेवेत जाणं हे एक दिव्यच समजलं जातं. केरळ येथील हमाली करणाऱ्या तरुणाने केरळ लोकसेवा आयोग परीक्षेत उत्तीर्ण होण्यात तसेच IAS होवून स्वतःचे स्थान निर्माण करण्यात यश मिळवले आहे. श्रीनाथ के. असं या युवकाचं नाव. रेल्वे स्टेशनवर हमालीचे काम करताना तेथे उपलब्ध असलेल्या फ्री Wi Fi च्या मदतीने सरकारी परिक्षेत त्याने यश मिळवलं (IAS Success Story) आहे. मुन्नार येथील रहिवासी असलेल्या श्रीनाथनं कोचीन रेल्वे स्टेशनवर कधीकाळी हमाल म्हणून काम केलं आहे. स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी चांगल्या आयुष्याची आकांक्षा बाळगून श्रीनाथने सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अभ्यास सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय योग्य करुन दाखवला.

 

IAS Success Story Shrinath K

अन् अधिकारी होण्याचं ठरवलं

श्रीनाथ के. हा रेल्वे स्टेशनवर हमाल म्हणून काम करत होता. पण हमालीतून मिळणारं उत्पन्न कुटुंबाच्या पालन पोषणासाठी पुरेसं नव्हतं. घरच्या बिकट (IAS Success Story) परिस्थितीची झळ तीव्र होत होती. त्यावेळी त्याच्या पदरात एक वर्षाची मुलगी होती. मुलीचं भविष्य चांगलं असावं या विचारानं त्याने अजून काही चांगल्या गोष्टी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी 2018 मध्ये त्याने सरकारी परीक्षा देवून अधिकारी होण्याचा निर्णय घेतला.

स्मार्टफोन, मेमरी कार्ड आणि ईयरफोन वर केला अभ्यास

काम आणि जबाबदारीमुळे श्रीनाथला अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळत नव्हता. 2016 मध्ये Airtel आणि Google ने भारतातील अनेक रेल्वे स्थानकांवर (IAS Success Story) फ्री वाय-फाय सुविधा सुरू केली. या सुविधेमुळे श्रीनाथला काम करताना अभ्यास करणं सोपं झालं. UPSC अभ्यासासंदर्भात Audiobook आणि व्हिडिओ डाउनलोड करून त्याने रेल्वे स्टेशनवर काम करत करत केपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.

IAS Success Story Shrinath K

स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे बहुतांश विद्यार्थी कोचिंग क्लास, एक्स्ट्रा क्लास, अभ्यासाच्या पुस्तकांवर मोठा खर्च करतात. याउलट श्रीनाथने त्याच्याकडे उपलब्ध असलेल्या पैशातून मेमरी कार्ड, स्मार्टफोन आणि ईयरफोन खरेदी केले. तयारी पूर्ण झाल्यावर त्याने ग्राम सहाय्यक पदासाठी केरळ लोकसेवा परीक्षेसाठी अर्ज भरला. या परीक्षेत त्याला 82 टक्के गुण मिळाले. श्रीनाथनची (IAS Success Story) संपूर्ण कहाणी गुगल इंडियाने शेअर केली तेव्हा केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी 2018 मध्ये त्याने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे कौतुक केले. त्यानंतर श्रीनाथने यूपीएससी नागरी सेवा परीक्षा दिली आणि यूपीएससी सीएसईमध्ये तो चौथ्या प्रयत्नात यशस्वी झाला. यानंतर तो आयएएस अधिकारी बनला. रेल्वे स्टेशनवर हमालीचे काम करणारा श्रीनाथ के. कोणत्याही कोचिंग क्लास शिवाय IAS ऑफिसर झाला. हमाली करून उच्च पदस्थ अधिकारी पदापर्यंत पोहचणाऱ्या श्रीनाथ के. या होतकरू तरुणाचा खडतर प्रवास तमाम तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Income Tax Recruitment : 10 वी ते ग्रॅज्युएट्सना सरकारी नोकरीची संधी! आयकर विभागात ‘या’ पदावर भरती सुरु

Income Tax Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (Income Tax Recruitment) उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आयकर विभागात विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 फेब्रुवारी 2023 आहे.

संस्था – आयकर विभाग, भारत सरकार

पद संख्या – 72 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 फेब्रुवारी 2023 (Income Tax Recruitment)

भरली जाणारी पदे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –

1. प्राप्तिकर निरीक्षक – 28 पदे
शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केली असावी.

2. कर सहाय्यक – 28  पदे
शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केली असावी तसेच प्रति तास 8000 की डिप्रेशन्सचा डेटा एंट्रीचा वेग आवश्यक आहे.

3. मल्टी टास्किंग स्टाफ – 16 पदे (Income Tax Recruitment)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य परीक्षा पास असणे आवश्यक.

मिळणारे वेतन –
प्राप्तिकर निरीक्षक – रु.9300/- ते 34,800/- दरमहा

कर सहाय्यक/MTS – रु.5200/- ते 20,200/- दरमहा

वय मर्यादा – (Income Tax Recruitment)
आयकर निरीक्षक – 18 वर्षे 30 वर्षे
कर सहाय्यक – 18 वर्षे 27 वर्षे
एमटीएस – 18 वर्षे 27 वर्षे

परीक्षा फी – फी नाही

नोकरी करण्याचे ठिकाण – तामिळनाडू आणि पुडुचेरी प्रदेश

`काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – tnincometax.gov.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंकवर CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : सर्वात प्रथम माणसाने दुधासाठी कोणत्या प्राण्याचा वापर केला?

GK Updates 14 jan

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना (GK Updates) कोणत्याही प्रकारच्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी सामान्य ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. उत्तम सामान्य ज्ञान तुम्हाला सरकारी परीक्षा किंवा इंटरव्ह्यू देताना मदत करते.

जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी एखाद्या ठिकाणी मुलाखत देण्यासाठी गेलात तर तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न सोप्पे असतात, पण अचानक समोर आलेल्या प्रश्नामुळे (GK Updates) उमेदवारांचा गोंधळ उडतो. ऐनवेळी तुमचा गोंधळ उडू नये यासाठी आज आपण सामान्य ज्ञान वाढवणारे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत.

प्रश्न : भारतातील सर्वात सुंदर इमारत कशाला म्हणतात?
उत्तर : ताजमहाल

प्रश्न : कोणता देश पाणी विकत घेतो?
उत्तर : सौदी अरेबिया

प्रश्न : (GK Updates) कोणत्या देशात ५ सूर्य दिसतात?
उत्तर : चीन

प्रश्न : सर्वात अगोदर माणसाने दुधासाठी कोणत्या प्राण्याचा वापर केला होता?
उत्तर : शेळी

प्रश्न : भारतात कापसाचे उत्पादन कोणत्या राज्यात सर्वात जास्त होते?
उत्तर : गुजरात (GK Updates)

प्रश्न : महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध पदार्थ कोणता आहे?
उत्तर : पुरण पोळी

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com