Home Blog Page 378

Government Jobs : राज्यात होणाऱ्या 75 हजार पदांच्या मेगाभरती संदर्भात उपमुख्यमंत्री म्हणाले…

Government Jobs (11)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील 75 हजार पदांच्या भरती प्रक्रियेला (Government Jobs) तातडीने सुरुवात करून, ती वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल; अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. फडणवीस यांनी शिक्षण आणि भरती प्रक्रियेबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली.

गेल्या सरकारच्या काळात सरकारी पदभरतीच्या प्रक्रियेत पेपर फुटीसारखे गैरप्रकार झाले. पेपर फुटीसारखे प्रकार होत असल्यास, हुशार आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांनी (Government Jobs) करायचे काय असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे या भरती प्रक्रियेत पारदर्शकता आवश्यक असून, त्यासाठी ‘टीसीएस’ आणि ‘आयबीपीएस’सारख्या कंपन्या नेमण्यात आल्या आहेत.

या कंपन्यांच्या विरोधात देशभरात एकही तक्रार नाही. पुण्यामध्ये पदभरती प्रक्रिया हा संवदेनशील विषय असून, कोचिंग क्लासची संख्या मोठ्या प्रमाणात (Government Jobs) आहे. त्यातही काही क्लासचे अजेंडे असतात. मात्र, यातूनही मार्ग काढून पदभरती प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यात येईल,’ असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Talathi Bharti 2023 : तलाठी भरतीसाठी लवकरच सुरु होणार रजिस्ट्रेशन; ‘ही’ कागदपत्रे ठेवा तयार

Talathi Bharti 2023 (2)

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सरकारकडून नुकतीच तलाठी (Talathi Bharti 2023) भरतीच्या तब्बल 4122 जागांवर मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. विविध शहरांमधील शेकडो जागांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. पण या भरतीसाठीची नेमकी पात्रता काय? आणि भरती परीक्षेसाठी नेमकी कोणती कागदपत्रं आवश्यक आहेत याबद्दल आज आपण  जाणून घेऊया.

भरले जाणारे पद – (Talathi Bharti 2023)

तलाठी (जिल्हानिहाय)

एकूण पदे – 4122

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  1. तलाठी पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी आणि ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  2. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  3. उमेदवारांना मराठी, हिंदी आणि (Talathi Bharti 2023) इंग्रजी विषयांचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे.
  4. तसंच राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्व अटी आणि शर्थी उमेदवारांनी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

वय मर्यादा –

  1. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय हे 18 ते 38 दरम्यान असणं आवश्यक आहे.
  2. SC/ST/PWD/OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी वय मर्यादेत शिथिलता देण्यात येणार आहे. (Talathi Bharti 2023)

तलाठी भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे –

  1. 10वी / SSC गुण पत्रक
  2. स्कॅन केलेला फोटो
  3. शैक्षणिक कागदपत्रे (गुणपत्रिका, हस्तांतरण प्रमाणपत्र, तात्पुरते प्रमाणपत्र इ.)
  4. स्वतःचा E – Mail ID आणि फोन नंबर (Talathi Bharti 2023)
  5. जातीचे प्रमाणपत्र (जर तुम्ही आरक्षित श्रेणीत असाल तर)
  6. नॉन क्रिमीलेयर सर्टिफिकेट (गरज असल्यास)
  7. अपंगत्व प्रमाणपत्र (तुम्हाला कोणतेही अपंगत्व असल्यास)
  8. जन्मतारीख प्रमाणपत्र
  9. स्वतःची स्कॅन केलेली स्वाक्षरी

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IAS Success Story : ‘मुलगीच खरा वंशाचा दिवा’… मुलीचा जन्म अशुभ मानणाऱ्या कुटुंबातील कन्या झाली IAS

IAS Success Story Shweta Agarwal

करिअरनामा ऑनलाईन । आजच्या कथेतील श्वेता अग्रवाल हिने (IAS Success Story) तीनदा UPSC परीक्षा दिली आहे. या परीक्षा ती तीन वेळा उत्तीर्ण झाली आणि तिची निवड देखील झाली. पण तिला तिच्या आवडीचे IAS पद मिळेपर्यंत तिने हार मानली नाही आणि आपले प्रयत्न सुरूच ठेवले. अखेर 2016 मध्ये तिला IAS पद मिळाले.

श्वेता अग्रवाल यांचं बालपण

श्वेताचा जन्म पश्चिम बंगालमधील हुगळी येथे झाला. जुन्या विचारांच्या कुटुंबात जन्म झाल्यामुळे घरातील वातावरण आनंदी नव्हते. 28 लोकांच्या या (IAS Success Story) मारवाडी कुटुंबात सुरुवातीपासूनच मुलींचा जन्म झाल्यानंतर आनंद साजरा होत नव्हता. कारण या लोकांची समजूत अशी होती की घरात फक्त मुलीच जन्माला आल्या तर वंश वृध्दी कशी होणार?

IAS Success Story Shweta Agarwal

पण याउलट श्वेताच्या पालकांची विचारसरणी वेगळी होती. त्यांनी श्वेताचा जन्म केवळ देवाची कृपा मानला नाही तर त्या दोघांनी मिळून ठरवले की ते कुटुंबातील परंपरांच्या विरुद्ध जावून आपल्या मुलीला उच्च शिक्षण देतील. घरातील या वातावरणामुळे श्वेताला प्रत्येक पाऊलावर भविष्यात खूप संघर्ष करावा लागला आहे.

वयाच्या 7 व्या वर्षी पैसा आणि अभ्यास दोन्हीची किंमत कळली

श्वेता अग्रवालच्या आई-वडिलांची आर्थिक परिस्थिती बिकट होती. पण तरीही श्वेताने चांगल्या इंग्रजी शाळेत शिकावे अशी त्यांची इच्छा होती. या विचाराने त्यांनी श्वेताला खासगी शाळेत प्रवेश मिळवून दिला. एके दिवशी श्वेताच्या शाळेत एक कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमासाठी श्वेताने तिच्या पालकांकडे पैसे मागितले. यावर तिच्या आईने श्वेताला घरची परिस्थिती सांगितली आणि (IAS Success Story) सांगितले की कसे तरी ते तिच्या शाळेच्या फीची व्यवस्था करू शकतील, अशा प्रकारे ते इतका अतिरिक्त खर्च उचलू शकत नाहीत. या घटनेतून श्वेताला वयाच्या सातव्या वर्षी पैसा आणि अभ्यास या दोन्हीची किंमत कळली होती. त्यादिवशीच्या घटनेनंतर श्वेताने आई वडिलांचा आर्थिक भार कमी व्हावा यास्तही नातेवाईकांनी दिलेले पैसे आईला देण्यास सुरवात केली.

पदवीसाठी करावा लागला संघर्ष

श्वेता लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती आणि तिने 12 वी च्या परिक्षेत शाळेत टॉप केले. बारावीनंतर श्वेताने  ग्रॅज्युएशन करण्याबद्दल तिच्या कुटुंबात चर्चा केली, तेव्हा तिच्या घरच्यांनी श्वेताच्या अभ्यासात अजिबात रस दाखवला नव्हता. कारण श्वेताच्या (IAS Success Story) कुटुंबात वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत मुलींची लग्ने लावून दिली जात होती. शिक्षणासाठी घरातून विरोध होत होता; पण या विरोधाला न जुमानता श्वेता आपल्या निर्णयावर ठाम राहिली.

तिने सेंट झेवियर्स कॉलेजमधून इकॉनॉमिक्समध्ये ग्रॅज्युएशन केले आणि कॉलेजमध्ये टॉपर बनली. यानंतर श्वेताला एमबीए उत्तीर्ण झाल्यानंतर MNCमध्ये चांगली नोकरी मिळाली. अशा प्रकारे श्वेता तिच्या कुटुंबातील 15 मुलांपैकी पहिली पदवीधर मुलगी ठरली.

IAS Success Story Shweta Agarwal
खाकी वर्दीने झाली प्रभावीत

श्वेताने एका मुलाखतीत सांगितले की, तिच्या घराजवळ एक पोलिस स्टेशन आहे, लहानपणी जेव्हा ती पोलिस स्टेशनमध्ये अधिकाऱ्यांना पाहायची तेव्हा (IAS Success Story) त्यांनी घातलेला खाकी गणवेश पाहून ती खूप प्रभावित झाली. तिला लहानपणापासूनच खाकीची खूप आवड होती आणि तिला नेहमी वाटायचे की एक दिवस तीही असा गणवेश घालेल.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी करत असताना तिचे मन नोकरीत रमले नाही.  लहानपणी अधिकारी होण्याचे स्वप्न पहिल्याने श्वेताने खूप विचार करून UPSCची तयारी करण्याचा निर्णय घेतला. श्वेतासाठी हा खूप मोठा निर्णय होता कारण ती मोठ्या पगरच्या पॅकेजसह खूप (IAS Success Story) मोठ्या पदावर काम करत होती. अखेर श्वेताने UPSC ची तयारी करण्याचा निर्णय घेऊन नोकरी सोडली आणि परीक्षेच्या तयारीस सुरवात केली.

लग्नासाठी कुटुंबातून दबाव

नोकरी सोडून घरी येण्याचा श्वेताचा अचानक घेतलेला निर्णय कोणालाच समजू शकला नाही. पण श्वेता सर्व काही विसरून UPSC ची तयारी करू लागली, पण हे करत असताना एक वेळ अशी आली जेव्हा श्वेता मानसिकदृष्ट्या अस्थिर झाली आणि तिला अजिबात अभ्यास (IAS Success Story) करता आला नाही. अशा परिस्थितीत तिच्यावर कुटुंबाकडून लग्नासाठी दबाव आणला जात होता कारण ती तिच्या कुटुंबातील एकमेव मोठी मुलगी होती जी अविवाहित होती. याबाबत श्वेताच्या पालकांनी तिच्याशी बोलले असता तिने थोडा वेळ मागितला आणि सांगितले की मला माहित आहे की ही परीक्षा अवघड आहे पण मी माझे IAS होण्याचे स्वप्न नक्कीच पूर्ण करेन.

IAS Success Story Shweta Agarwal

अभ्यासासाठी घरापासून लांब राहिली

UPSCच्या तयारीसाठी तिने घरापासून दोन तासांच्या अंतरावर एक खोली भाड्याने घेतली आणि ती तिथे राहू लागली. या दरम्यान ती सर्व कामे करायची (IAS Success Story) आणि अभ्यासही करायची. अभ्यास करताना श्वेताने दोन महिने कोचिंग घेतले, पण तिथूनही असमाधानी राहिल्याने शेवटी स्वयं अध्ययन करण्याचे ठरवले आणि रात्रंदिवस अभ्यास सुरू ठेवला.

तीन वेळा झाली निवड

श्वेताने एका मुलाखतीत सांगितले की, UPSC ही अशी परीक्षा आहे की त्यात विद्यार्थी पास झाला तरी पुढच्या प्रयत्नात त्याची पुन्हा निवड होईल की नाही याची शाश्वती नसते. या परीक्षेसाठी प्रत्येक वेळी शून्यापासून सुरुवात करावी लागते. हा धोका श्वेतसोबतही (IAS Success Story) झाला असता पण तिने फक्त मनाचे ऐकले आणि निरुपयोगी गोष्टींकडे लक्ष न देता पुन्हा परीक्षा दिली. श्वेता अग्रवाल हिला पहिल्याच प्रयत्नात 497 वी रँक मिळाली होती.

पुढच्या वर्षी 2015 मध्ये, श्वेता पुन्हा UPSC मध्ये निवडली गेली आणि यावेळी तिला 141 वा क्रमांक मिळाला आणि यावेळी देखील ती दहाव्या क्रमांकाने IAS पद मिळविण्यापासून वंचित राहिली. यावेळी तिला IPS पद मिळाले पण तरीही तीच्या मनात IAS होण्याही इच्छा घर करुन होती. एकीकडे इतर विद्यार्थी UPSC परिक्षेत एकदाच निवड होणं हे आपलं नशीब मानत असताना दुसरीकडे आयएएस पदासाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न करण्याची जोखीम पत्करून श्वेता धाडस करत होती.

IAS Success Story Shweta Agarwal

पश्चिम बंगालची पहिली टॉपर (IAS Success Story)

श्वेताने 4 ते 5 वर्षे IAS होण्यासाठी दिवसातून 9 तास अभ्यास केला आणि शेवटी नशिब ही श्वेतासमोर नतमस्तक झाले आणि 2016 मध्ये तिने ऑल इंडिया (IAS Success Story) रँक 19 मिळवून ही परीक्षा उत्तीर्ण केली. यासह श्वेता अग्रवाल ही जवळपास दशकभरानंतर पश्चिम बंगालची पहिली टॉपर ठरली, जिने टॉप 20 मध्ये स्थान मिळवले.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IBM Recruitment 2023 : सरकारी नोकरी!! नागपूरच्या भारतीय खाण ब्युरोमध्ये भरती सुरु; तुम्ही आहात का पात्र?

IBM Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय खाण ब्युरो, नागपूर येथे रिक्त (IBM Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून रिक्त पदांच्या एकूण 13 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 फेब्रुवारी 2023 आहे.

संस्था – भारतीय खाण ब्युरो, नागपूर

भरली जाणारी पदे – (IBM Recruitment 2023)

  1. वरिष्ठ खाण भूवैज्ञानिक / Senior Mining Geologist – 03 पदे
  2. अधीक्षक रसायनशास्त्रज्ञ / Superintending Chemist – 01 पद
  3. दिग्दर्शक / Director – 01 पद
  4. कर्मचारी कार चालक / Staff Car Driver – 08 पदे

पद संख्या – 13 पदे

अर्ज करणाची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 19 फेब्रुवारी 2023

आवश्यक शैक्षणीक पात्रता –
1) वरिष्ठ खाण भूवैज्ञानिक / Senior Mining Geologist
उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून भूविज्ञान किंवा उपयोजित जिओलॉजीमध्ये पदव्युत्तर पदवी असावी.

उमेदवाराकडे 05 वर्षे अनुभव असावा. (IBM Recruitment 2023)

2) अधीक्षक रसायनशास्त्रज्ञ / Superintending Chemist
उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून रसायनशास्त्रात पदव्युत्तर पदवी असल्यास प्राधान्य

मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून रसायनशास्त्रात डॉक्टरेट पदवी

उमेदवाराकडे 10 वर्षे अनुभव असावा.

3) दिग्दर्शक / Director

उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून अयस्क ड्रेसिंग किंवा मिनरल प्रोसेसिंग किंवा भूगर्भशास्त्र किंवा रसायनशास्त्र किंवा भौतिकशास्त्रात (IBM Recruitment 2023) पदव्युत्तर पदवीकिंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेकडून खनिज अभियांत्रिकी किंवा केमिकल अभियांत्रिकी किंवा धातूशास्त्रातील अभियांत्रिकी पदवी किंवा बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी पदवी असावी.

उमेदवाराकडे 8 वर्षे अनुभव असावा.

4) कर्मचारी कार चालक / Staff Car Driver
उमेदवार 10 वी परीक्षा उत्तीर्ण असावा.

उमेदवाराकडे मोटार कार वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक.

उमेदवाराकडे 03 वर्षे अनुभव असावा. (IBM Recruitment 2023)

वय मर्यादा – 19 फेब्रुवारी 2023 रोजी 56 ते 58 वर्षे

परीक्षा फी – फी नाही

मिळणारे वेतन – (IBM Recruitment 2023)

वरिष्ठ खाण भूवैज्ञानिक – 67,700/- ते 2,08,700/- दरमहा
अधीक्षक रसायनशास्त्रज्ञ – 78800/- ते 209200/- दरमहा
दिग्दर्शक – 1,82,200/- ते 2,24,100/- दरमहा
कर्मचारी कार चालक- 19,900/- ते 63,200/- दरमहा

नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर (महाराष्ट्र)

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.ibm.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CISF Recruitment 2023 : 10 वी पास उमेदवारांसाठी खुशखबर!! CISF मध्ये ‘या’ पदावर भरती सुरु; लगेच करा APPLY

CISF Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल येथे विविध रिक्त (CISF Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कॉन्स्टेबल/ड्रायव्हर, कॉन्स्टेबल/(ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर) या पदांच्या 451 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2023 आहे.

संस्था – केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (Central Industrial Security Foece)

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 23 जानेवारी 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – 22 फेब्रुवारी 2023

पद संख्या – 451 पदे (CISF Recruitment 2023)

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही

भरती प्रकार – सरकारी

भरले जाणारे पद – (CISF Recruitment 2023)

  1. कॉन्स्टेबल/ड्रायव्हर – 183 पदे
  2. कॉन्स्टेबल/(ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर) – 268 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  1. कॉन्स्टेबल/ड्रायव्हर – 10 वी उत्तीर्ण आणि वाहन चालक परवाना (HMV/TV)
  2. कॉन्स्टेबल/(ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर) – 10 वी उत्तीर्ण आणि वाहन चालक परवाना (HMV/TV)

मिळणारे वेतन – (CISF Recruitment 2023)

कॉन्स्टेबल/ड्रायव्हर – रुपये 21,700/- ते 69,100/- दरमहा

कॉन्स्टेबल/(ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर) – रुपये 21,700/- ते 69,100/- दरमहा

वय मर्यादा –

कमीत कमी – 21 वर्ष
जास्तीत जास्त – 27 वर्ष

अर्ज फी –
Open/OBC/EWS – Rs. 100/-

SC/ST – फि नाही (CISF Recruitment 2023)
PWD/ Female – फि नाही

असा करा अर्ज –

  1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
  3. किंवा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल च्या अधिकृत वेबसाईट www.cisf.gov.in ला भेट द्या.
  4. अर्ज करण्याची शेवटची दिनांक २२ फेब्रुवारी २०२३ आहे. (CISF Recruitment 2023)
  5. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  6. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
  7. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  8. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स – 

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंकवर CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.cisf.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Army Recruitment : ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी देशसेवेची सुवर्णसंधी!!  Indian Army मध्ये ‘या’ पदांवर भरती सुरु 

Indian Army Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । Indian Army मध्ये लवकरच काही (Indian Army Recruitment) जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून SSC (T)-६१ & SSCW (T)-३२, SSC(W) (Non-Tech) (Non-UPSC), SSC (W) (Tech) ही पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2023 आहे.

संस्था – भारतीय लष्कर (Indian Army)

भरली जाणारी पदे – (Indian Army Recruitment)

  1. SSC (T)-६१ & SSCW (T)- 32
  2. SSC(W) (Non-Tech) (Non-UPSC)
  3. SSC (W) (Tech)

पद संख्या – 191 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन (Indian Army Recruitment)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 फेब्रुवारी 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

  1. SSC (T)-६१ & SSCW (T)- 32

उमेदवारांनी संबंधित पदांनुसार इंजिनिअरिंग पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

2. SSC(W) (Non-Tech) (Non-UPSC) –

उमेदवारांनी संबंधित पदांनुसार पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

3. SSC (W) (Tech) – (Indian Army Recruitment)

उमेदवारांनी संबंधित पदांनुसार इंजिनिअरिंग पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

मिळणारे वेतन –

आवश्यक कागदपत्रे – (Indian Army Recruitment)

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx 

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

 लग्नानंतर अवघ्या 15 दिवसांनी पतीने सोडलं; ती जिद्दीनं बनली IAS अधिकारी

Inspirational Story । एका मुलीच्या आयुष्यात लग्न ही खूप मोठी गोष्ट असते. लग्न होऊन मूल झाल्यानंतर एका महिलेचे आयुष्य पूर्णत्वास जाते. असा समज आजही समाजामध्ये पाहायला मिळतो. जर पतीने पत्नीला सोडून दिल्यास त्या महिलेचे आयुष्य खूप हाल-अपेष्टाने जात असल्याचा समज आहे. भारतीय समाजामध्ये वट- सावित्री अशा कहाण्या प्रसिद्ध असताना, एका महिलेला सोडून देणे ही खूप मोठी गोष्ट समाजामध्ये समजली जाते. असाच कठीण प्रसंग कोमल गणात्रा या महिलेवर आला. पण त्यांनी धीरगंभीर होऊन एक निर्णय घेतला तो म्हणजे UPSC परीक्षा देऊन अधिकारी होण्याचे !

कोमल गणत्रा यांचे लग्न एका एनआरआय मुलाशी झाले होते. लग्न झाल्यावर त्यांनाही आपले आयुष्य पूर्ण झाल्यासारखे वाटले. पण तसे झाले नाही. नवरा मुलगा लग्नानंतर पंधरा दिवसात परत न्यूझीलंडला गेला. यांना खूप वाईट वाटले पण त्या खचल्या नाहीत. त्यांनी अधिकारी होण्याचे स्वप्न मनात पक्के केले होते. त्यांनतर त्यांनी परीक्षा दिली व त्यांची आयएएस अधिकारी म्हणून निवड झाली आहे.

गुजराती मीडियममधून कोमल लग्नाच्या वर्षीच साहित्याच्या विषयात टॉपर म्हणून यशस्वी झाल्या. लग्नाआधी त्या एका शाळेत शिक्षिका म्हणून काम केले आहे. कोमल यांनी मुक्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केले आहे. सोबतच त्यांनी तीन वेगवेगळ्या भाषांची तीन विद्यापीठांमधून पदवी मिळवली आहे. गुजरात लोक सेवा आयोगाची मुख्य परीक्षाही पास केली होती. मात्र त्यावेळी पतीनं त्यांना मुलाखतीसाठी जाण्याची परवानगी दिली नव्हती. कोमल सुद्ध्या रक्षा मंत्रालयात एडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Success Story : एकेकाळी विमान तिकिटाचे पैसे नव्हते; आज आहेत जगातील सर्वात महागडे CEO

Success Story (7)

करिअरनामा ऑनलाईन । सुंदर पिचाई यांना कोण ओळखत नाही?? गुगल (Success Story) आणि अल्फाबेटचे CEO सुंदर पिचाई आज संपूर्ण जगात प्रख्यात आहेत. भारतीय वंशाचे सुंदर पिचाई, जगातील सर्वोच्च सीईओंपैकी एक म्हणून ओळखले जातात. पिचाई यांना मिळणारा पगार हजारो, लाखो किंवा कोटीत नसून ते अब्जावधी रुपये पगार मिळवतात. सुंदर पिचाई आज करोडपती असले तरी त्यांचे सुरुवातीचे आयुष्य खूप संघर्षमय होते. एखाद्या  बॉलीवूड चित्रपटाच्या कहाणीला शोभावी अशी त्यांची यशोगाथा आहे.

पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित

अलीकडेच पिचाई यांना नुकतेच अमेरिकेत भारतातील प्रतिष्ठेच्या पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांना भारत सरकारने वर्ष २०२२ साठी (Success Story) व्यापार आणि उद्योग श्रेणीसाठी दिला आहे. पिचाई यांना अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजीत सिंग संधू यांनी हा सन्मान दिला. या खास प्रसंगी सुंदर पिचाई भावूक दिसले.

Success Story of sundar pichai
वडिलांनी एक वर्षाचा पगार देऊन अमेरिकेचे तिकीट काढले (Success Story)

सुंदर पिचाई म्हणतात की, “जेव्हा अमेरिकेत अभ्यासासाठी जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा ते सोपे नव्हते. त्यावेळी वडिलांचा एक वर्षाचा पगार देऊन मला तिकीट काढावे लागले.” एक काळ असा होता की सुंदर पिचाई यांना भारतातून अमेरिकेला जाण्यासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता, मात्र, आज त्यांच्याकडे इतकी संपत्ती आहे, की ते केवळ विमानाचे तिकीटच नाही तर विमान देखील खरेदी करू शकतात.

Success Story of sundar pichai
अमेरिकेत राहताना खूप संघर्ष करावा लागला

भारतीय वंशाच्या पिचाई यांचा जन्म 12 जुलै 1972 रोजी चेन्नई येथे झाला. त्यांनी सुरुवातीचे शिक्षण भारतातच पूर्ण केले. आयआयटी खरगपूरमधून अभियांत्रिकी (Success Story) केल्यानंतर त्यांनी व्हार्टन बिझनेस स्कूलमधून MBA शिक्षण पूर्ण केले. तर पुढील शिक्षणासाठी ते अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठात गेले. तेथे त्यांनी मेटलर्जिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले. अमेरिकेत राहताना त्यांना खूप संघर्ष करावा लागला. तिथला खर्च भागवणं त्यांच्यासाठी खूप अवघड होतं.

Success Story of sundar pichai
पहिल्यांदा अमेरिकेत संगणक पाहिला

एका मुलाखतीत सुंदर पिचाई म्हणाले होते की; आज ते जगातील सर्वात मोठ्या टेक कंपनीचे प्रमुख असले तरी अजूनही त्यांचे पाय जमिनीवर आहेत.” त्यांचे जुने दिवस, संघर्ष आणि बालपण ते कधीच विसरले नाहीत. त्यामुळे त्यांना पुढे जाण्याची ऊर्जा मिळते. जेव्हा ते अमेरिकेत (Success Story) आले होते तेव्हा ISD कॉलचे शुल्क प्रति मिनिट 2 डॉलर होते. खर्च जास्त असल्याने त्यांना घरच्यांशी जास्त वेळ बोलता येत नव्हते. आयुष्यात पहिल्यांदा पिचाई यांनी फक्त अमेरिकेत संगणक पाहिला.

Success Story of sundar pichai
जगातील सर्वात महागडे CEO

आज पिचाई हे जगातील सर्वात महागडे CEO आहेत. सुंदर पिचाई यांची एकूण संपत्ती अंदाजे 1310 दशलक्ष डॉलर म्हणजे सुमारे 10,810 कोटी रुपये आहे. सुंदर पिचाई (Success Story) यांची निव्वळ संपत्ती दरवर्षी वाढते. पिचाई यांचा वार्षिक पगार 242 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 1,880 कोटी रुपये आहे. त्याच वेळी, त्यांना दरमहा सुमारे 20 दशलक्ष डॉलर पगार मिळतो, जो जगातील सर्वात मोठ्या पगारांपैकी एक आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NPCIL Recruitment 2023 : 10/12 वी उमेदवारांसाठी खुशखबर!! न्यूक्लिर पॉवर कोर्पोरेशनमध्ये भरती सुरु

NPCIL Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । न्यूक्लिर पॉवर कोर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCIL Recruitment 2023) लिमिटेड, पालघर येथे विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 295 रिक्त पदे भरली जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2023 आहे.

संस्था – न्यूक्लिर पॉवर कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, पालघर

भरले जाणारे पद – ट्रेड अप्रेंटिस ( प्रशिक्षणार्थी)

पद संख्या – 295 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जानेवारी 2023

भरतीचा तपशील – (NPCIL Recruitment 2023)

१) फिटर/ Fitter 25 पदे
२) टर्नर/ Turner 09 पदे
३) इलेक्ट्रिशिअन/ Electrician 33 पदे
४) वेल्डर/ Welder 38 पदे (NPCIL Recruitment 2023)
५) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/ Electronic Mechanic 16 पदे
६) इंस्ट्रूमेंट मेकॅनिक/ Instrument Mechanic 06 पदे
७) Reff. & AC मेकॅनिक/ Reff. & AC Mechanic 20 पदे

८) सुतार/ Carpenter 19 पदे
९) प्लंबर/ plumber 20 पदे
१०) वायरमन/ Wireman 16 पदे
११) डिझेल मेकॅनिक/ Diesel Mechanic 07 पदे
१२) यांत्रिक मोटार वाहन / Mechanical Motor Vehicle 07 पदे
१३) मशिनिस्ट/ Mechanist 13 पदे
१४) पेंटर/ Painter 18 पदे (NPCIL Recruitment 2023)
१५) ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)/ Draughtsman (Mechanical) 02 पदे
१६) ड्राफ्ट्समन (सिव्हिल)/ Draughtsman (Civil) 02 पदे
१७) माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान प्रणाली देखभाल/ Information and Communication Technology System Maint 18 पदे
१८) स्टेनोग्राफर (इंग्रजीसंगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट -18 पदे
१९) स्टेनोग्राफर (इंग्रजी) / Stenographer (English) 02 पदे
२०) स्टेनोग्राफर (हिंदी) / Stenographer (Hindi) 02 पदे
२१) सचिवीय सहाय्यक/ Secretarial Assistant 04 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  1. उमेदवार 10/12 वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (NPCIL Recruitment 2023)
  2. तसेच संबंधित ट्रेड मध्ये ITI परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे परीक्षा फी – फी नाही

मिळणारे विद्या वेतन (Stipend) – 7,700/- रुपये ते 8,855/- रुपये दरमहा

नोकरी करण्याचे ठिकाण – पालघर (महाराष्ट्र)

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंकवर CLICK करा – Apply

अधिकृत वेबसाईट – www.npcilcareers.co.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Global Recession : जागतिक मंदीची चाहूल… कंपनीच्या मेलने कर्मचारी धास्तावले; अनेक नोकरदारांना दाखवला घरचा रस्ता

Global Recession (1)

करिअरनामा ऑनलाईन । अल्फाबेट कंपनीची एक उप कंपनी वेरिलीने (Global Recession) आपल्या 15 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं आहे. लिंक्डइन या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर CNBCने जारी केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार कंपनीने सुमारे 240 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. गेल्या काही दिवसांपासून जगभरातील बिघडत चाललेल्या आर्थिक व्यवस्थेदरम्यान आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणारी अल्फाबेटच्या मालकीची व्हेरिली ही पहिली कंपनी आहे.

Verily च्या एका उच्चस्तरीय अधिकाऱ्यानेही कंपनी सोडली आहे. कर्मचार्यांना Verily च्या सहयोगी ब्रँड Google मधून देखील कमी केले जाऊ शकते अशी शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहे. मात्र, कंपनीने अद्याप याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. CNBC ने आपल्या रिपोर्ट मध्ये सांगितलं की, वेरिलीचे सीईओ स्टीफन गिलेटकडून कर्मचाऱ्यांना एक ईमेल प्राप्त (Global Recession) झाला. यामध्ये काही आठवड्यांपर्यंत कर्मचार्‍यांना घरून काम करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच जे आज ऑफिस मध्ये आहेत ते आता घरी परत जाऊ शकतात असं म्हटलं आहे.  याशिवाय, ई-मेलमध्ये म्हटले आहे की, कर्मचार्‍यांना त्यांच्या भूमिकांबाबत महत्त्वाची अपडेट लवकरच दिली जाईल. जे सध्या नोकरी करत आहेत त्यांना Verily Headline व तुमच्या रोलबाबत ई-मेल मिळेल.

या आठवड्याच्या अखेरीस अमेरिकेबाहेरील इतर देशात राहून कंपनीसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही हा ई-मेल पाठवला जाईल. या ई-मेल्सचा हवाला देत रिपोर्ट मध्ये म्हटले आहे की, अशा प्रकारचे बंद ही कंपनी भविष्यात मोठ्या प्रमाणात कपात करण्याच्या तयारीत (Global Recession) असल्याची झलक आहे. कंपनी अनेक कार्यकारी बदल देखील करत आहे. Verily चे उपकरण व्यवसायाचे अध्यक्ष, Jordi Parramon, जे सुरुवातीच्या दिवसांपासून कंपनीचा भाग आहेत, यांनी कंपनी सोडली आहे. यापूर्वी 2022 मध्येही फेसबुकच्या मालकीच्या मेटा, ट्विटर, अॅमेझॉन आणि सेल्सफोर्स, गोल्ड मॅन साच यांसारख्या तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक मोठ्या कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com