JEE Mains 2023 : JEE परीक्षेचं हॉल तिकीट लवकरच जारी होण्याची शक्यता; कसं कराल डाउनलोड

करिअरनामा ऑनलाईन । देशातील सर्वोच्च अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये (JEE Mains 2023) प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या संयुक्त प्रवेश परीक्षेचे प्रवेशपत्र लवकरच प्रसिद्ध होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया बंद झाली आहे. यामध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 12 जानेवारी 2023 पर्यंत मुदत देण्यात आली होती. जेईई मेन 2023 साठी सत्र 1 ची परीक्षा 24 जानेवारी 2023 पासून सुरू होईल. यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइटवर कधीही जारी केले जाऊ शकते.

JEE Mains 2023 परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे प्रवेशपत्र jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जारी केले जाईल. हे प्रवेशपत्र नक्की कसे डाउनलोड करायचे हे जाणून घेऊया.

Admit Card असं करा डाउनलोड (JEE Mains 2023)
  1. प्रवेशपत्र जारी केल्यानंतर, उमेदवाराला प्रथम अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in ला भेट द्यावी लागेल.
  2. वेबसाइटच्या होम पेजवर ताज्या बातम्यांवर क्लिक करा.
  3. आता JEE(मुख्य) 2023 सत्र प्रवेशपत्राच्या लिंकवर जा.
  4. हॉल तिकीट डाउनलोड करा या लिंकवर क्लिक करा.
  5. आता उमेदवार त्यांचा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड टाकतात.
  6. सबमिशन केल्यावर, प्रवेशपत्र (JEE Mains 2023) स्क्रीनवर उघडेल.
  7. प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि पुढील वापरासाठी प्रिंट आउट घ्या.
  8. प्रवेशपत्रावर उमेदवारांचे नाव, पालकांचे नाव, परीक्षा केंद्राचा पत्ता, परीक्षेची तारीख, नाव आणि फोटो असेल. हे तपशील तपासल्यानंतर प्रवेशपत्र डाउनलोड करा. प्रवेशपत्राबाबत काही समस्या असल्यास तुम्ही वेबसाइटवर दिलेल्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकता.

महत्वाच्या तारखा –

JEE Mains 2023 जानेवारी सत्र परीक्षा 24, 25, 27, 28, 29, 30 आणि 31 जानेवारी 2023 रोजी होणार आहे. या तारखांच्या काही काळापूर्वी प्रवेशपत्र जारी केले जाईल. तुम्ही अधिकृत अधिसूचनेत परीक्षेशी संबंधित काही महत्त्वाच्या तारखा पाहू शकता. जेईई मेन 2023 चे पहिले (JEE Mains 2023) सत्र 24 जानेवारी ते 31 जानेवारी आणि जेईई मेन 2023 चे दुसरे सत्र 6 एप्रिल ते 12 एप्रिल या कालावधीत आयोजित केले जाईल. उमेदवार जेईई मुख्य सत्र 2 साठी 7 फेब्रुवारी ते 7 मार्च 2023 या कालावधीत नोंदणी करू शकतात.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com