Education : फक्त एका क्लीकवर सर्व माहिती तुमच्या हाती, नाशिक मुक्त विद्यापीठाचं ‘YCMOU E Suvidha’ ऍप लॉंच

करिअरनामा ऑनलाईन । राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची (Education) बातमी आहे. नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने नवीन संकल्पना राबवली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांच्या सोयीचा विचार करून एकाच व्यासपीठावर विद्यापीठाच्या सर्वच सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विद्यापीठाने ‘YCMOU E Suvidha’ नावाचं ऍप्लिकेशन सुरु केले आहे.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने पाच लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी तसेच कामकाजामध्ये गती  येण्यासाठी हे ऍप सुरु केलं आहे.  नाशिकपासून शेकडो कि. मी. अंतरावर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना या ऍपचा जास्तीत उपयोग होण्याची अपेक्षा आहे. जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र (Education) विद्यापीठाने सुरू केलेल्या ई सुविधा ऍपच्या धर्तीवर हे ऍप सुरु करण्यात आले आहे. हे ऍप प्ले स्टोअर वर उपलब्ध असून यातून विद्यार्थ्यांना प्रवेशापासून  सर्व विविध सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे आता थेट विद्यापीठ किंवा विभागीय उपकेंद्राशी संपर्क साधण्याची आता आवश्यकता राहणार नाही. हे ऍप 15 हजार विद्यार्थ्यांनी आतापर्यंत डाउनलोड केलं आहे.

दरम्यान गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेले हे ऍप जवळपास 5 MB चे असून सध्या पाच लाख विद्यार्थ्यांनी विद्यापीठात प्रवेश घेतला आहे. यापैकी सुमारे 15 हजार विद्यार्थी त्याचा वापर करत आहेत. लवकरच इतरही विद्यार्थ्यांनाच्या मोबाईल मध्ये हे ॲप्लिकेशन (Education) डाऊनलोड झालेले दिसून येईल आणि बहुतांशी सर्व विद्यार्थ्यांद्वारे त्याचा वापर करण्यासाठी विद्यापीठ विद्यापीठाकडून विशेष उपक्रम हाती घेतला जाईल. हे मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करून वापरावे असे आवाहनही विद्यापीठामार्फत करण्यात आले आहे.

ऍपमधील सुविधा (Education)

या ऍप मध्ये वेबसाईटवर उपलब्ध असलेली PDF स्वरूपातील पुस्तके या द्वारे लिंकवर दिसतील. ॲपद्वारे प्रवेश अर्ज भरण्याची सुविधा. प्रवेशानंतरच्या सेवांसाठी पर्याय. कॅलेंडरच्या माध्यमातून वर्षभरातील नियोजनाची माहिती प्रश्नपत्रिका डाऊनलोड करणे. आपली प्रोफाइल (Education) पाहण्याची सुविधा. पेपरची माहिती मिळवण्याचा उत्तर पत्रिकेची फोटो कॉपी बघणे सुलभ होणार असून परीक्षेचे वेळापत्रक प्राप्त पर्याय देखील ऍप्लिकेशनमध्ये देण्यात आला आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com