Talathi Bharti 2023 : तलाठी भरती रजिस्ट्रेशन्सला लवकरच सुरु होणार; ‘ही’ कागदपत्रे ठेवा तयार

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सरकारकडून नुकतीच तलाठी (Talathi Bharti 2023) पदाच्या तब्बल 4122 जागांवर मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. राज्याच्या विविध शहरांमधील शेकडो जागांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. आता या भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या भरतीसाठी रजिस्ट्रेशन लवकरच सुरु होणार आहेत. त्यामुळे उमेदवारांनी स्वतःजवळ कोणते कागदपत्रं ठेवणं आवश्यक आहेत हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

पद – विविध जिल्ह्यांतील तलाठी (Talathi)

एकूण पद संख्या – 4122 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

  1. उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी आणि ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  2. उमेदवारांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे.
  3. तसंच राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्व अटी आणि शर्थी उमेदवारांनी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

वय मर्यादा – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय हे 18 ते 38 दरम्यान असणं आवश्यक आहे. SC/ST/PWD/OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी शिथिलता देण्यात येणार आहे.

मिळणारे वेतन – रु.5,200/- ते 20,200/-रुपये दरमहा

ही कागदपत्रे ठेवा तयार – (Talathi Bharti 2023)

  1. शाळा सोडल्याचा दाखला (10 वी, 12 वी, पदवी ) अधिवास प्रमाणपत्र (Domacile Certificate)
  2. 10 वीची मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र (Nationality Certificate)
  3. 12 वीची मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट जातीचा दाखला (Caste Certificate)
  4. पदवी प्रमाणपत्र (Degree Certificate) नॉन क्रिमिलियर (Non Creamy Layer Certificate)
  5. पोस्ट ग्रॅज्युएशन प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate)
  6. इतर शैक्षणिक कागदपत्रे (NSS,NCC, etc) EWS प्रमाणपत्र (आवश्यकतेनुसार)

इतर आवश्यक कागदपत्रे (आवश्यकतेनुसार) –

  1. अपंग प्रमाणपत्र (Disability Certificate)
  2. माजी सैनिक प्रमाणपत्र
  3. खेळाडू प्रमाणपत्र (Sport Certificate)
  4. प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र (Talathi Bharti 2023)
  5. आत्महत्याग्रस्त शेतकरी पाल्य प्रमाणपत्र

कोणत्या विभागात किती पदे –

  1. नाशिक – 1035
  2. औरंगाबाद – 874
  3. कोकण – 731 (Talathi Bharti 2023)
  4. नागपूर – 580
  5. अमरावती – 183
  6. पुणे – 746

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com