Home Blog Page 339

NCL Recruitment 2023 : इंजिनियर्ससाठी नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे अंतर्गत भरती सुरु; या लिंकवर करा अर्ज

NCL Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे येथे रिक्त पदे (NCL Recruitment 2023) भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रकल्प सहयोगी-I,  वरिष्ठ प्रकल्प सहयोगी पदांच्या एकूण 5 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2023 आहे.
संस्था – नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे
भरले जाणारे पद – 

  1. प्रकल्प सहयोगी-I  (Project Associate-I)
  2. प्रकल्प सहयोगी-II (Project Associate-II)
  3. वरिष्ठ प्रकल्प सहयोगी

पद संख्या – 05 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 मार्च 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (NCL Recruitment 2023)
1) प्रकल्प सहयोगी-I / (Project Associate-I)
उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी / तंत्रज्ञान / अभियांत्रिकी गणितातील एम.एस्सी, सेंद्रिय रसायनशास्त्र / विश्लेषणात्मक रसायनशास्त्रात एम.एस्सी. किंवा समतुल्य शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे.
2) प्रकल्प सहयोगी-II (Project Associate-II)
उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी / तंत्रज्ञान / सेंद्रिय रसायनशास्त्र मध्ये एम.एस्सी किंवा समकक्ष पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान मध्ये एम.ई. / एम.टेक. किंवा समकक्ष शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे. (NCL Recruitment 2023)
3) वरिष्ठ प्रकल्प सहयोगी / (Senior Project Associate 02)
उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान बॅचलर पदवी / सेंद्रिय रसायनशास्त्रात एम.एस्सी किंवा समतुल्य किंवा एम.ई. / एम.टेक. किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान/अभियांत्रिकी/तंत्रज्ञान/फार्मा/एमडी/एमएस या विषयातील डॉक्टरेट पदवी किंवा समकक्ष शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे.

परीक्षा फी – फी नाही (NCL Recruitment 2023)
मिळणारे वेतन – 28,000/- रुपये ते 42,000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे (महाराष्ट्र)
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक महितीसाहि जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.ncl-india.org/
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

AIC Recruitment 2023 : ग्रॅज्युएट्ससाठी भारतीय कृषी विमा कंपनीत ‘या’ पदावर भरती सुरु; लगेच करा APPLY

AIC Recruitment 2023 (2)

करिअरनामा ऑनलाईन । अ‍ॅग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया (AIC Recruitment 2023) लिमिटेड मध्ये नवीन भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून मॅनेजमेंट ट्रेनी पदाच्या एकूण 40 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 एप्रिल 2023 आहे

संस्था – अ‍ॅग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड

भरले जाणारे पद – मॅनेजमेंट ट्रेनी

पद संख्या – 40 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (AIC Recruitment 2023)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 एप्रिल 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (AIC Recruitment 2023)

कृषी विपणन / कृषी विपणन आणि सहकार्य / कृषी व्यवसाय व्यवस्थापन / ग्रामीण व्यवस्थापन मध्ये 60% गुणांसह पदवी [SC/ST: 55% गुण] किंवा 60% गुणांसह पदवी +MBA/PGDM- ABM किंवा 60% गुणांसह LLB [SC/ST: 55% गुण]

वय मर्यादा – 01 मार्च 2023 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी – जनरल/ओबीसी 1000/- [SC/ST/PWD: ₹200/-]

मिळणारे वेतन –  60,000/- रुपये दरमहा

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

निवड प्रक्रिया – परीक्षा (AIC Recruitment 2023)

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.aicofindia.com/

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IIM Indore : इंदूर IIM च्या विद्यार्थ्यांनी मारली बाजी; 12 विद्यार्थ्यांना प्लेसमेंटमध्ये मिळालं तब्बल 1.14 कोटींचं पॅकेज

IIM Indore

करिअरनामा ऑनलाईन । आयआयएम इंदूरमध्येही नुकतीच कॅम्पस (IIM Indore) प्लेसमेंट झाली. कॅम्पस प्लेसमेंटमध्ये विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा व मुलाखतीच्या आधारे नोकरीसाठी निवड केली जाते. या प्लेसमेंटमध्ये एक-दोन नाही तर तब्बल 12 विद्यार्थ्यांना वार्षिक 1.14 कोटी रुपयांचं पॅकेज मिळालं आहे.
इंदूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधल्या 12 विद्यार्थ्यांना नोकरीसाठी 1.14 कोटी रुपयांचं वार्षिक सॅलरी पॅकेज ऑफर करण्यात आलं आहे. इथल्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सेशनच्या फायनल प्लेसमेंटदरम्यान ऑफर केलेलं हे सर्वाधिक सॅलरी पॅकेज आहे. यात मागच्या वर्षाच्या तुलनेत तब्बल 132.6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’ने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

मागील प्लेसमेंट सेशनमध्ये सर्वाधिक वेतन 49 लाख रुपये एवढं ऑफर करण्यात आलं होतं. या वेळच्या सेशनच्या फायनल प्लेसमेंटदरम्यान 160हून अधिक भारतीय आणि (IIM Indore) परदेशी कंपन्यांनी आयआयएम इंदूरच्या 568 विद्यार्थ्यांना सरासरी 30.21 लाख रुपये वेतन देऊ केलं. जे विद्यार्थी ही ऑफर मिळवण्यात यशस्वी ठरले आहेत, त्यात दोन वर्षांचा पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम (PGP) आणि पाच वर्षांचा इंटिग्रेटेड प्रोग्राम इन मॅनेजमेंट (IPM) यांचा समावेश आहे. हे दोन्ही अभ्यासक्रम एमबीएच्या समकक्ष मानले जातात.
आयआयएम इंदूरने दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक नोकऱ्यांच्या ऑफर्स म्हणजेच 29 टक्के ऑफर्स कन्सल्टन्सी फिल्डमधून आल्या आहेत. त्यानंतर जनरल मॅनेजमेंट (IIM Indore) व ऑपरेशन्स 19 टक्के, फायनान्स अँड मार्केटिंग प्रत्येकी 18 टक्के आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी फिल्डमधून 16 टक्के ऑफर्स आल्या आहेत. दरम्यान, आयआयएम इंदूरच्या IPM सोशल इंटर्नशिपमध्ये, कॅम्पस प्लेसमेंटसाठी निवडलेल्या 122 विद्यार्थ्यांनी तब्बल 127 ऑफर्ससह 100 टक्के प्लेसमेंट रेकॉर्ड मिळवला आहे.
आयआयएम इंदूरच्या विद्यार्थ्यांना यंदाच्या फायनल (IIM Indore) सेशनमध्ये खूप चांगलं सॅलरी पॅकेज कंपन्यांनी ऑफर केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे यंदा कॅम्पस प्लेसमेंटसाठी निवडलेल्या 122 विद्यार्थ्यांना तब्बल 127 ऑफर्स मिळाल्या. म्हणजेच काही विद्यार्थ्यांना दोन ऑफरही मिळाल्या होत्या. अशा रितीने आयआयएम इंदूरने यंदा 100 टक्के प्लेसमेंट रेकॉर्ड नोंदवला आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IAS Success Story : शाळेत असतानाच IAS व्हायचं ठरवलं; उत्तराखंडच्या अर्पितने 20वी रँक मिळवून जिद्द पूर्ण केलीच

IAS Success Story Arpit Chauhan

करिअरनामा ऑनलाईन । UPSCची परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या प्रत्येक (IAS Success Story) उमेदवाराचा प्रवास हा खास असतो. आज आम्ही तुम्हाला उत्तराखंडच्या अर्पित चौहानची गोष्ट सांगणार आहोत, ज्याने या परीक्षेत चांगली रँक मिळवली आणि अवघ्या तिसऱ्या प्रयत्नात तो पास झाला. चला तर मग त्याच्या प्रवासावर एक नजर टाकूया.
शाळेत असतानाच IAS होण्याचं ठरवलं (IAS Success Story)
अर्पित चौहान हा उत्तराखंडमधील उधम सिंग जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो काशीपूरच्या एका खासगी शाळेत शिकत असताना त्याला UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची माहिती मिळाली. यादरम्यान त्याने आपण भविष्यात IAS व्हायचं असं ठरवलं होतं.

IAS Success Story Arpit Chauhan

घरात अभ्यासाचं वातावरण होतं
अर्पितचे आई-वडील दोघेही शिक्षक आहेत. त्याचे वडील (IAS Success Story) प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक तर आई प्राथमिक शाळेत आई शाळेत इंग्रजी शिक्षिका आहे. आई- वडील दोघे शिक्षक असल्यामुळे त्यांच्या घरात सुरुवातीपासूनच शिक्षणाचे वातावरण होते.

इंजिनीअरिंगनंतर UPSC ची तयारी सुरु झाली
काशीपूर येथून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर अर्पितने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. अभियांत्रिकीनंतरच त्याने शालेय जीवनातच आपले स्वप्न साकार करण्याचा निर्णय (IAS Success Story) घेतला आणि UPSC नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली.

IAS Success Story Arpit Chauhan

अवघ्या तिसऱ्या प्रयत्नात मिळाली 20 वी रॅंक
अर्पितला UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेच्या पहिल्या प्रयत्नात यश मिळाले नाही. पहिल्याच प्रयत्नात तो अपयशी ठरला होता. यानंतर न खचता प्रयत्न सुरु ठेवून तो पुन्हा मैदानात उतरला. यावेळी (IAS Success Story) अर्पितने पूर्व, मुख्य आणि मुलाखत असे परीक्षेचे  तिन्ही टप्पे यशस्वीपणे पूर्ण केले. तो यापूर्वी देशाच्या संरक्षण सेवेत रुजू झाला होता. या कामगिरीवर तो आनंदी नव्हता. त्यामुळे त्याने पुन्हा प्रयत्न केले आणि UPSC परीक्षेच्या तिसऱ्या प्रयत्नात तो यशस्वी झाला. या परीक्षेत त्याने संपूर्ण भारतातून 20 वा क्रमांक मिळवला आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job in Crisis : वाढत्या उष्णतेमुळे नोकऱ्या संकटात! वातावरणातील बदल असा करतात रोजगारावर परिणाम; एक रिपोर्ट

Job in Crisis

करिअरनामा ऑनलाईन । ऐन उन्हाळ्यात अनेक ठिकाणी पाऊस (Job in Crisis) झाला अन् वातावरणातील बदलामुळे अचानक उष्मा वाढू लागला. या वर्षी उष्णतेची लाट होरपळून टाकेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. इतकंच नाही, तर उष्ण वाऱ्यांमुळे प्राणी आणि जंगलावरही वाईट परिणाम होणार आहे. त्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होण्याची शक्यता आहे. आयएमडीसोबतच जागतिक बँकेनेही उष्णतेबाबत गंभीर इशारा दिला आहे.
जागतिक बँकेने दिलेल्या माहितीनुसार, तापमानात सातत्याने होणारी वाढ केवळ या वर्षीच नव्हे तर पुढील अनेक वर्षं सामान्य जनजीवनावर प्रतिकूल परिणाम करील. त्यामुळे (Job in Crisis) मानवी जीवनावर अनेक प्रकारे संकटाचे ढग दाटून राहतील. वाढतं तापमान आणि हवामानातले बदल यामुळे मानवी जीवनाला दुहेरी धोका निर्माण होईल, असं जागतिक बँकेच्या ‘क्लायमेट इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी इन इंडियाज कूलिंग सेक्टर’ या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

हवामानाचा आणि नोकरी जाण्याचा काय आहे संबंध? (Job in Crisis)
जागतिक बँकेने आपल्या अहवालात एका बाजूला असं म्हटलं आहे, की यावर्षी उष्णतेच्या लाटेचा नागरिकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होणार आहे, तर दुसरीकडे उष्ण वारे वाहिल्याने उत्पादकतेवरही परिणाम होणार असल्याचं स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे. उत्पादकता घटल्याने रोजगारावर परिणाम होईल. यासोबत अहवालात असंही म्हटलं आहे, की सतत वाढणाऱ्या उन्हाळ्याच्या कालावधीमुळे जगभरातले 80 दशलक्ष नागरिक येत्या सात वर्षांत म्हणजेच 2030पर्यंत आपल्या नोकऱ्या गमावू शकतात. भयावह अंदाज असा आहे, की खराब हवामानामुळे एकट्या भारतात यापैकी तीन कोटी नोकऱ्या जातील.
हवामान वेगानं बदलतंय
या वर्षी देशात उष्णतेची तीव्र लाट येईल, असा इशारा हवामानशास्त्रज्ञांनी मार्च 2022मध्ये दिला होता. त्यांचा हा अंदाज खरा ठरला आणि उष्णतेनं देशभरातले नागरिक (Job in Crisis) होरपळून निघाले. फेब्रुवारी 2023मध्येही अचानक हवामान बदलले आणि हलक्या थंड हवामानात जून-जुलैचा फील येऊ लागला. गेल्या 17 वर्षांत या वर्षी फेब्रुवारी महिना सर्वाधिक उष्ण होता, असं हवामान खात्याने सांगितलं. यंदाही उष्णतेच्या लाटेचा सामान्य जनजीवनावर वाईट परिणाम होईल, असा अंदाज आता हवामान खात्याने पुन्हा वर्तवला आहे.

असा होईल परिणाम (Job in Crisis)
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, यंदाही देशभरात उष्णतेची लाट येणार आहे. एवढंच नाही, तर वर्षानुवर्षं हा प्रकार वाढत जाणार आहे. सतत वाढणाऱ्या उष्णतेचा सर्वांच्या जीवनावर थेट परिणाम होणार हे नक्की. कडक उन्हाचा पाणी, जंगल, जमीन आणि सर्वसामान्यांच्या जीवनावर प्रतिकूल परिणाम होईल. यंदा फेब्रुवारीत कमाल तापमान 33 अंश सेल्सिअसवर पोहोचलं होतं. फेब्रुवारी 2023मधले सहा दिवस कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. दिल्ली, राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, पंजाब, छत्तीसगड, महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये फेब्रुवारीतच मे-जूनमधला उन्हाळा अनुभवायला मिळाला.
वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पाऊस पडतो
गेल्या काही वर्षांपासून सतत वाढत असलेला उष्मा आणि येत्या काही वर्षांसाठी वर्तवण्यात येत असलेल्या अंदाजानुसार आता नागरिकांनी वाढत्या उष्म्याला तोंड देण्यासाठी तयारी करायला हवी. भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, या वेळी एप्रिल-मे मध्येच जून आणि जुलैप्रमाणे उष्ण वारे वाहण्याची (Job in Crisis) शक्यता आहे. आता प्रश्न असा आहे, की यंदाच्या फेब्रुवारीतच एवढी उष्णता का होती? यावर हवामान खात्याने सांगितलं, की या वेळी वेस्टर्न डिस्टर्बन्स नव्हता. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यातच प्रचंड उष्णता जाणवत होती. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पाऊस पडतो आणि वातावरण आल्हाददायक राहतं. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे मान्सून नसतानाही पाऊस पडतो. त्यामुळे यंदा मान्सूनच्या आधीच पावसाने धुमाकूळ घातला.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : डायटिशियन्ससाठी मुंबईत नोकरी; ‘इतका’ मिळणार दिवसाचा पगार; ऑनलाईन करा अर्ज

Job Notification (34)

करिअरनामा ऑनलाईन । बृहन्मुंबई महानगरपालिका येथे लवकरच काही (Job Notification) जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. आहारतज्ञ या पदाच्या 35 जागा भरण्यासाठी ही भरती असणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 एप्रिल 2023 आहे.
संस्था – बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई
भरले जाणारे पद – आहारतज्ञ (Dietician)
पद संख्या – 35 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 एप्रिल 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Notification)
उमेदवारांनी ग्रॅज्युशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

मिळणारे वेतन – 1200/- रुपये प्रतिदिवस
आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume (Job Notification)
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Free Training : 10वीच्या विद्यार्थ्यांना खुषखबर!! JEE, NEET च्या मोफत प्रशिक्षणासाठी असा करा अर्ज; टॅबही मिळणार मोफत

Free Training

करिअरनामा ऑनलाईन । JEE, NEET परीक्षा देऊन भविष्याची स्वप्न (Free Training) बघणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘महाज्योती’नं मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. जे विद्यार्थी आता दहावीची परीक्षा देत आहेत किंवा ज्यांनी यावर्षी दहावीची परीक्षा दिली असून येत्या शैक्षणिक सत्रात 11वी विज्ञान शाखेत प्रवेश घेणार आहेत, अशा विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध होणार आहे. 2025 मध्ये होणाऱ्या जेईई, नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी त्यांना महाज्योती 18 महिन्यांचे मोफत प्रशिक्षण देणार आहे.
महाज्योती योजना (Free Training)
OBC, VJNT व SBC प्रवर्गातील विद्यार्थी दहावीमध्ये 60 ते 70 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण होतात. त्यानंरत 11वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतात आणि जेईई नीट स्पर्धा परीक्षेला सामोरे जातात. बरेच विद्यार्थी ग्रामीण भागातील असल्याने ते लाखो रुपये खर्च करून कोचिंग क्लास लावू शकत नाहीत. अशा विद्यार्थ्यांसाठी महाज्योतीकडून 18 महिने मोफत प्रशिक्षण दिले जाते.
हे विद्यार्थी ठरतात पात्र
महाज्योतीच्या या योजनेचा लाभ घेण्याकरिता सर्व OBC, VJNT व SBC प्रवर्गातील दहावीची परीक्षा देणारे विद्यार्थी पात्र आहेत. विशेष म्हणजे विद्यार्थी नियमित 11 वी व 12 वी (Free Training) शिकत असतानाच ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या अभ्यासाचा फायदा 12 वीच्या परीक्षेतसुद्धा होणार आहे.

ही कागदपत्रे आवश्यक

  1. इयत्ता 9वी पासची गुणपत्रिका
  2. 10वीचे हॉल तिकीट
  3. रहिवासी दाखला (Free Training)
  4. जातीचे प्रमाणपत्र
  5. नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र
  6. आधार कार्ड

या कागदपत्राच्या प्रती अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करताना अपलोड करावयाच्या आहेत. नोंदणी केलेल्या अर्जाची प्रिंट किंवा स्क्रीनशॉट जपून ठेवावा. दहावीचा निकाल लागल्यावर 11वी विज्ञानला प्रवेश घेतल्याचे महाविद्यालयाचे बोनाफाईड व नीट सीईटी परीक्षेची तयारी करीत असल्याचे हमीपत्र याच संकेतस्थळावर अपलोड करावे लागेल.
असा करा ऑनलाइन अर्ज
या मोफत प्रशिक्षणाकरिता ऑनलाइन अर्ज करण्याचीही (Free Training) सुविधा असल्याने विद्यार्थ्यांना कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही. त्यांनी घर बसल्याच महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन 31 मार्च पूर्वी नोंदणी करायची आहे.
प्रशिक्षणासाठी टॅबही मिळणार मोफत
या प्रशिक्षणासाठी यशस्वी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना महाज्योतीच्या वतीने एक 8 इंची ब्रँडेड कंपनीचा टॅब मोफत दिला जातो. तसेच प्रशिक्षणादरम्यान सुमारे दोन (Free Training) वर्षे दररोजचा 6 GB इंटरनेट डाटाही मोफत दिला जाणार आहे; अशी माहिती महाज्योतीचे माजी संचालक प्रा. दिवाकर गमे यांनी दिली आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

EPFO Recruitment 2023 : बॅचलर्ससाठी सरकारी नोकरी!! EPFO अंतर्गत ‘या’ पदांवर मेगाभरती सुरु

EPFO Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । कर्मचारी भविष्य निधी संघटन अंतर्गत (EPFO Recruitment 2023) मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून सामाजिक सुरक्षा सहाय्यक आणि लघुलेखक पदाच्या एकूण 2859 जागा भरल्या जाणार आहेत.  या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 एप्रिल 2023 आहे.
संस्था – कर्मचारी भविष्य निधी संघटन
भरले जाणारे पद –

  1. सामाजिक सुरक्षा सहाय्यक – 2674 पदे
  2. लघु लेखक – 185 पदे

पद संख्या – 2859 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 एप्रिल 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही
भरती प्रकार – सरकारी

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (EPFO Recruitment 2023)

  1. सामाजिक सुरक्षा सहाय्यक – बॅचलर पदवी आणि टायपिंग स्पीड इंग्रजी 35 W.P.M. अथवा हिंदी 30 W.P.M. असावे.
  2. लघुलेखक – 12 वी पास आणि कौशल्य चाचणी मानदंड. (EPFO Recruitment 2023)

मिळणारे वेतन –

  1. सामाजिक सुरक्षा सहाय्यक – ₹२९२००/- ते  ₹९२३००/- दरमहा
  2. लघुलेखक – ₹२५,५००/- ते ₹८१,१००/- दरमहा (EPFO Recruitment 2023)

वय मर्यादा – 18 ते 27 वर्ष
अर्ज फी –
Open/OBC/EWS: ₹७००/-
SC/ST: फि नाही.
PWD/ Female: फि नाही.

असा करा अर्ज –

  1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
    किंवा कर्मचारी भविष्य निधी संघटन च्या अधिकृत वेबसाईट www.epfindia.gov.in ला भेट द्या.
  3. अर्ज करण्याची शेवटची दिनांक २६ एप्रिल २०२३ आहे. (EPFO Recruitment 2023)
  4. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  5. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
  6. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  7. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक महितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.epfindia.gov.in/site_en/index.php
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

RBI Recruitment 2023 : भारतीय रिझर्व्ह बँकेत विना परीक्षा थेट नोकरी; या पत्यावर पाठवा अर्ज

RBI Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय रिझर्व्ह बँकेत रिक्त पदांच्या (RBI Recruitment 2023) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून फार्मासिस्ट पदाच्या एकूण 25 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2023 आहे.
संस्था – भारतीय रिझर्व्ह बँक
भरले जाणारे पद – फार्मासिस्ट
पद संख्या – 25 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 एप्रिल 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (RBI Recruitment 2023)
उमेदवाराकडे फार्मसी कायदा 1948 अंतर्गत नोंदणीकृत मान्यताप्राप्त विद्यापीठातून फार्मसीमधील डिप्लोमाची किमान पात्रता असणे आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया – मुलाखत

  1. बँक शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांसाठी मुलाखत घेईल.
  2. उमेदवार सर्व शैक्षणिक पात्रता (PG/पदवी/डिप्लोमा), विविध बँक दवाखान्यांपासून राहण्याचे अंतर, PSB/PSU/सरकारी संस्था/RBI मधील अनुभव इत्यादींच्या आधारे निवडले जातील. (RBI Recruitment 2023)
  3. सर्व निवडलेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी आणि कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रादेशिक संचालक, मानव संसाधन व्यवस्थापन विभाग, भर्ती विभाग, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई प्रादेशिक कार्यालय, शहीद भगतसिंग रोड, फोर्ट, मुंबई – ४००००१
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.rbi.org.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MBA Colleges in Maharashtra : हे आहेत महाराष्ट्रातील टॉप 10 MBA कॉलेजेस

MBA Colleges in Maharashtra

करिअरनामा ऑनलाईन । मार्केटिंग मॅनेजमेंट हे एक विस्तृत क्षेत्र आहे. याची (MBA Colleges in Maharashtra) व्याप्ती सर्वत्र दिसून येते. मार्केटिंग मॅनेजरवर कंपनीची बऱ्यापैकी जबाबदारी अवलंबून असते. कंपनीला होणारा नफा-तोटाही मार्केटिंगशी संबंधित असतो. या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी आहेत. आगामी काळात हे क्षेत्र खूप विस्तारणार आहे. भारतात सर्वाधिक पगाराच्या नोकऱ्या ज्या प्रमुख क्षेत्रांमध्ये निर्माण होतील, त्यापैकी एक मार्केटिंगचं क्षेत्र असेल.
मार्केटिंगच्या क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी किमान 50 ते 55 टक्के गुणांसह बारावी उतीर्ण असणं आवश्यक आहे. त्यानंतर पदवी शिक्षणाला प्रवेश मिळेल. पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठीही 55 टक्के गुण असणे गरजेचं आहे. त्यानंतर पीएचडी करण्याची संधीही उपलब्ध आहे. त्याकरिता पदव्युत्तर शिक्षणात 55 ते 60 टक्के गुण असणं अनिवार्य असतं. दोन्ही पातळ्यांवर प्रवेश परीक्षेची तरतूद आहे.

कसा मिळेल प्रवेश (MBA Colleges in Maharashtra)
एमबीएसाठी थेट आणि प्रवेश परीक्षेच्या आधारावर प्रवेश मिळू शकतो. सरकारी संस्थांमध्ये प्रवेश परीक्षा दिल्यानंतर यातील गुणवत्ता यादीच्या आधारावर प्रवेश मिळतो. या परीक्षेत यश मिळवायचं असल्यास प्रचंड मेहनत आणि प्रभावी संवाद कौशल्य असणं आवश्यक असतं. पदवी आणि पदव्युत्तर स्तरावर ही परीक्षा घेतली जाते. या प्रवेश परीक्षेचं स्वरूप खूप विस्तीर्ण आहे. मार्केटिंग क्षेत्राशी संबंधित अभ्यास आणि नोकऱ्या देणाऱ्या विविध वेबसाईटच्या माध्यमातून या परीक्षांबद्दल माहिती मिळू शकते.

अशी आहे करिअरची संधी
कुठलंही क्षेत्र घेतलं तरीही तिथे मार्केटिंगची आवश्यकता असते. मार्केटिंगचं शिक्षण घेतल्यानंतर मोठमोठे उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्र, कन्सल्टन्सी, जनसंपर्क कार्यालयं, डिपार्टमेंटल स्टोअर, कॉम्प्युटर कंपनी, फूड प्रॉडक्शन युनिट, मॅन्युफॅक्चरिंग युनिट, सरकारी आणि बिगर सरकारी संघटना (MBA Colleges in Maharashtra) या ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. या क्षेत्रात चांगल्या पगाराच्या नोकऱ्या सध्या उपलब्ध आहेत. सुरुवातीला या क्षेत्रात 3 ते 4 लाख रुपयांपर्यंत वार्षिक पॅकेज मिळतं. अनुभवानंतर मार्केटिंग मॅनेजर 8 लाख रुपयांपासून 15 लाख रुपयांपर्यंत वार्षिक कमवू शकतात.

मार्केटिंगचे शिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्रातील टॉप 10 इन्स्टिट्युट –

  1. Symbiosis Institute of Business Management, Symbiosis International, Pune
  2. Shailesh J. Mehta School of Management, IIT Bombay
  3. National Institute of Industrial Engineering, Mumbai
  4. School of Management, MIT WPU, Kothrud, Pune (MBA Colleges in Maharashtra)
  5. ASM’s Institute of Business Management and Research, Chinchwad Pune
  6. NMIMS School of Business Management, Mumbai
  7. S.P. Jain Institute of Management and Research, Mumbai
  8. NMIMS, Mumbai
  9. ITM Business School, Navi Mumbai
  10. Suryadatta Institute of Management and Mass Communication, Bavdhan Pune

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com