Free Training : 10वीच्या विद्यार्थ्यांना खुषखबर!! JEE, NEET च्या मोफत प्रशिक्षणासाठी असा करा अर्ज; टॅबही मिळणार मोफत

करिअरनामा ऑनलाईन । JEE, NEET परीक्षा देऊन भविष्याची स्वप्न (Free Training) बघणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘महाज्योती’नं मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. जे विद्यार्थी आता दहावीची परीक्षा देत आहेत किंवा ज्यांनी यावर्षी दहावीची परीक्षा दिली असून येत्या शैक्षणिक सत्रात 11वी विज्ञान शाखेत प्रवेश घेणार आहेत, अशा विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध होणार आहे. 2025 मध्ये होणाऱ्या जेईई, नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी त्यांना महाज्योती 18 महिन्यांचे मोफत प्रशिक्षण देणार आहे.
महाज्योती योजना (Free Training)
OBC, VJNT व SBC प्रवर्गातील विद्यार्थी दहावीमध्ये 60 ते 70 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण होतात. त्यानंरत 11वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतात आणि जेईई नीट स्पर्धा परीक्षेला सामोरे जातात. बरेच विद्यार्थी ग्रामीण भागातील असल्याने ते लाखो रुपये खर्च करून कोचिंग क्लास लावू शकत नाहीत. अशा विद्यार्थ्यांसाठी महाज्योतीकडून 18 महिने मोफत प्रशिक्षण दिले जाते.
हे विद्यार्थी ठरतात पात्र
महाज्योतीच्या या योजनेचा लाभ घेण्याकरिता सर्व OBC, VJNT व SBC प्रवर्गातील दहावीची परीक्षा देणारे विद्यार्थी पात्र आहेत. विशेष म्हणजे विद्यार्थी नियमित 11 वी व 12 वी (Free Training) शिकत असतानाच ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या अभ्यासाचा फायदा 12 वीच्या परीक्षेतसुद्धा होणार आहे.

ही कागदपत्रे आवश्यक

  1. इयत्ता 9वी पासची गुणपत्रिका
  2. 10वीचे हॉल तिकीट
  3. रहिवासी दाखला (Free Training)
  4. जातीचे प्रमाणपत्र
  5. नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र
  6. आधार कार्ड

या कागदपत्राच्या प्रती अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करताना अपलोड करावयाच्या आहेत. नोंदणी केलेल्या अर्जाची प्रिंट किंवा स्क्रीनशॉट जपून ठेवावा. दहावीचा निकाल लागल्यावर 11वी विज्ञानला प्रवेश घेतल्याचे महाविद्यालयाचे बोनाफाईड व नीट सीईटी परीक्षेची तयारी करीत असल्याचे हमीपत्र याच संकेतस्थळावर अपलोड करावे लागेल.
असा करा ऑनलाइन अर्ज
या मोफत प्रशिक्षणाकरिता ऑनलाइन अर्ज करण्याचीही (Free Training) सुविधा असल्याने विद्यार्थ्यांना कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही. त्यांनी घर बसल्याच महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन 31 मार्च पूर्वी नोंदणी करायची आहे.
प्रशिक्षणासाठी टॅबही मिळणार मोफत
या प्रशिक्षणासाठी यशस्वी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना महाज्योतीच्या वतीने एक 8 इंची ब्रँडेड कंपनीचा टॅब मोफत दिला जातो. तसेच प्रशिक्षणादरम्यान सुमारे दोन (Free Training) वर्षे दररोजचा 6 GB इंटरनेट डाटाही मोफत दिला जाणार आहे; अशी माहिती महाज्योतीचे माजी संचालक प्रा. दिवाकर गमे यांनी दिली आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com