MBA Colleges in Maharashtra : हे आहेत महाराष्ट्रातील टॉप 10 MBA कॉलेजेस

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । मार्केटिंग मॅनेजमेंट हे एक विस्तृत क्षेत्र आहे. याची (MBA Colleges in Maharashtra) व्याप्ती सर्वत्र दिसून येते. मार्केटिंग मॅनेजरवर कंपनीची बऱ्यापैकी जबाबदारी अवलंबून असते. कंपनीला होणारा नफा-तोटाही मार्केटिंगशी संबंधित असतो. या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी आहेत. आगामी काळात हे क्षेत्र खूप विस्तारणार आहे. भारतात सर्वाधिक पगाराच्या नोकऱ्या ज्या प्रमुख क्षेत्रांमध्ये निर्माण होतील, त्यापैकी एक मार्केटिंगचं क्षेत्र असेल.
मार्केटिंगच्या क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी किमान 50 ते 55 टक्के गुणांसह बारावी उतीर्ण असणं आवश्यक आहे. त्यानंतर पदवी शिक्षणाला प्रवेश मिळेल. पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठीही 55 टक्के गुण असणे गरजेचं आहे. त्यानंतर पीएचडी करण्याची संधीही उपलब्ध आहे. त्याकरिता पदव्युत्तर शिक्षणात 55 ते 60 टक्के गुण असणं अनिवार्य असतं. दोन्ही पातळ्यांवर प्रवेश परीक्षेची तरतूद आहे.

कसा मिळेल प्रवेश (MBA Colleges in Maharashtra)
एमबीएसाठी थेट आणि प्रवेश परीक्षेच्या आधारावर प्रवेश मिळू शकतो. सरकारी संस्थांमध्ये प्रवेश परीक्षा दिल्यानंतर यातील गुणवत्ता यादीच्या आधारावर प्रवेश मिळतो. या परीक्षेत यश मिळवायचं असल्यास प्रचंड मेहनत आणि प्रभावी संवाद कौशल्य असणं आवश्यक असतं. पदवी आणि पदव्युत्तर स्तरावर ही परीक्षा घेतली जाते. या प्रवेश परीक्षेचं स्वरूप खूप विस्तीर्ण आहे. मार्केटिंग क्षेत्राशी संबंधित अभ्यास आणि नोकऱ्या देणाऱ्या विविध वेबसाईटच्या माध्यमातून या परीक्षांबद्दल माहिती मिळू शकते.

अशी आहे करिअरची संधी
कुठलंही क्षेत्र घेतलं तरीही तिथे मार्केटिंगची आवश्यकता असते. मार्केटिंगचं शिक्षण घेतल्यानंतर मोठमोठे उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्र, कन्सल्टन्सी, जनसंपर्क कार्यालयं, डिपार्टमेंटल स्टोअर, कॉम्प्युटर कंपनी, फूड प्रॉडक्शन युनिट, मॅन्युफॅक्चरिंग युनिट, सरकारी आणि बिगर सरकारी संघटना (MBA Colleges in Maharashtra) या ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. या क्षेत्रात चांगल्या पगाराच्या नोकऱ्या सध्या उपलब्ध आहेत. सुरुवातीला या क्षेत्रात 3 ते 4 लाख रुपयांपर्यंत वार्षिक पॅकेज मिळतं. अनुभवानंतर मार्केटिंग मॅनेजर 8 लाख रुपयांपासून 15 लाख रुपयांपर्यंत वार्षिक कमवू शकतात.

मार्केटिंगचे शिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्रातील टॉप 10 इन्स्टिट्युट –

  1. Symbiosis Institute of Business Management, Symbiosis International, Pune
  2. Shailesh J. Mehta School of Management, IIT Bombay
  3. National Institute of Industrial Engineering, Mumbai
  4. School of Management, MIT WPU, Kothrud, Pune (MBA Colleges in Maharashtra)
  5. ASM’s Institute of Business Management and Research, Chinchwad Pune
  6. NMIMS School of Business Management, Mumbai
  7. S.P. Jain Institute of Management and Research, Mumbai
  8. NMIMS, Mumbai
  9. ITM Business School, Navi Mumbai
  10. Suryadatta Institute of Management and Mass Communication, Bavdhan Pune

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com