Home Blog Page 340

UPSC Success Story : सलग 4 वेळा नापास, अवघ्या 17 दिवसांत केली तयारी, जाणून घ्या अक्षत कौशलच्या IPS होण्याची कहाणी

UPSC Success Story of IPS Akshat Kaushal

करिअरनामा ऑनलाईन । देशातील लाखो लोक UPSC नागरी सेवा (UPSC Success Story) परीक्षा उत्तीर्ण होण्याची आकांक्षा बाळगतात. या प्रवासात अनेक लोक अडथळे आणि अपयशांना तोंड देत हार मानतात. तर काही लोक आहेत जे धैर्याने सर्व अडचणींना तोंड देतात आणि शेवटी दृढ इच्छाशक्ती आणि समर्पणाने आपली स्वप्ने पूर्ण करतात. आज आम्ही तुम्हाला अक्षत कौशलची अशीच एक गोष्ट सांगणार आहोत.

UPSC Success Story of IPS Akshat Kaushal

सततचे अपयश
अक्षत कौशलने 2012 पासूनच UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. 2013 मध्ये तो पहिल्यांदा नागरी सेवा परीक्षेस बसला होता पण तो या परिक्षेत नापास झाला. मग अक्षतने या परीक्षेसाठी (UPSC Success Story) आणखी मेहनत करायला सुरुवात केली. मात्र, दुसऱ्या प्रयत्नातही तो अपयशी ठरला. त्याचप्रमाणे उत्तम तयारी करूनही तिसऱ्या आणि चौथ्या प्रयत्नातही तो परीक्षा पास होवू शकला नाही. अक्षत कौशलला सलग चार वेळा अपयशाला सामोरे जावे लागले. अशा परिस्थितीत त्याची निराशा होणे स्वाभाविक होते.

UPSC Success Story of IPS Akshat Kaushal

17 दिवसात केली तयारी (UPSC Success Story)
अक्षतने नागरी सेवेच्या परीक्षा देण्याचा मार्ग सोडण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, त्याला काही मित्र भेटले. मित्रांशी बोलून त्याने पुन्हा UPSC परीक्षा देण्याचे ठरवले. या निर्णयाला त्याच्या आई-वडिलांनीही खूप पाठिंबा दिला. मात्र, परीक्षेला अवघे 17 दिवस उरले होते. यादरम्यान त्याने खूप प्रयत्न केले आणि तयारीच्या काही दिवसांत पूर्व परीक्षा  क्लिअर केली. 2017 मध्ये त्याच्या पाचव्या प्रयत्नात त्याने केवळ परीक्षेत यश मिळविले नाही तर 55 वा क्रमांक मिळवून तो आयपीएस बनला.

UPSC Success Story of IPS Akshat Kaushal

अक्षतचा सल्ला
“UPSC परीक्षा देण्यापूर्वी ही परीक्षा नीट समजून घेतली पाहिजे. कोणत्याही विषयावर अती आत्मविश्वास बाळगू नका. तुमची ताकद तुमची कमजोरी बनू देऊ नका. एखाद्या (UPSC Success Story) विषयावर तुमची पकड चांगली असली तरी त्याकडेही लक्ष द्या. याशिवाय, तयारी दरम्यान तुमच्या जवळच्या व्यक्तींचे मार्गदर्शन घ्या;” असा सल्ला अक्षतने दिला आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Education : आता ‘या’ विद्यापीठांमध्ये एन्ट्रन्सशिवाय पदवीसाठी अॅ डमिशन घेता येणार

Education (6)

करिअरनामा ऑनलाईन । तुम्हाला माहित आहे का देशातल्या काही (Education) विद्यापीठांमध्ये कॉमन एन्ट्रन्स टेस्ट म्हणजेच CET शिवायही प्रवेश घेता येऊ शकतो. केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं काही विद्यापीठांना प्रवेश परीक्षा न घेता प्रवेश देण्याची परवानगी दिली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आता महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना विद्यापीठाची कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (CUET) अर्थात सामायिक प्रवेश परीक्षा द्यावी लागते. महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्यानं या परीक्षेसाठीही JEE किंवा NEET परीक्षेप्रमाणे स्पर्धा वाढली आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2022ला या परीक्षेसाठी 14 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती; मात्र काही विद्यापीठांनी अद्याप CUET साठी नोंदणी केली नसल्याने विद्यार्थ्यांना तिथे परीक्षेविना प्रवेश मिळू शकतो.
या विद्यापीठांनी प्रवेश परीक्षेशिवाय विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची परवानगी शिक्षण मंत्रालयाकडून घेतली आहे. ईशान्येकडच्या राज्यांमधल्या काही विद्यापीठांना (Education) केंद्रानं CUET UG 2023 या परीक्षेतून वगळलं आहे. उत्तराखंडमधल्या हेमवती नंदन बहुगुणा गढवाल विद्यापीठाचा त्यात समावेश आहे. या विद्यापीठांमध्ये डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधांची कमतरता असल्यानं केंद्रानं विद्यापीठांच्या संबंधित प्रबंधकांना त्याबाबत सूचना दिल्या आहेत.

पुढील विद्यापीठांमध्ये पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षेशिवाय प्रवेश घेता येवू शकतो – (Education)

  1. सिक्कीम युनिव्हर्सिटी
  2. राजीव गांधी युनिव्हर्सिटी
  3. मणिपूर युनिव्हर्सिटी
  4. आसाम युनिव्हर्सिटी
  5.  तेजपूर युनिव्हर्सिटी
  6. नागालँड युनिव्हर्सिटी (Education)
  7. त्रिपुरा युनिव्हर्सिटी
  8. मिझोराम युनिव्हर्सिटी
  9. नॉर्थ इस्टर्न हिल युनिव्हर्सिटी (NEHU)
  10. हेमवी नंदन बहुगुणा गढवाल युनिव्हर्सिटी, उत्तराखंड (HNBGU)

केंद्रीय विद्यापीठांमध्ये सर्व पदवी अभ्यासक्रमांसाठी नॅशनल टेस्टिंग अकॅडमीतर्फे कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट घेतली जाते. देशाच्या सर्व भागांतल्या विद्यार्थ्यांना या परीक्षेमुळे समान संधी समान व्यासपीठाद्वारे उपलब्ध करून दिली जाते. विशेषतः ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना याचा खूप उपयोग होतो.
देशातल्या काही केंद्रीय विद्यापीठांमध्ये व इतर (Education) विद्यापीठांमध्ये ही प्रवेश परीक्षा घेतली जाते. 12वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास देशभरातल्या विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणं शक्य होतं. केंद्रीय शिक्षण मंत्रायलयानं सर्व विद्यापीठांना ही प्रवेश परीक्षा घेण्याबाबत सक्ती केली आहे; मात्र काही विद्यापीठांना त्यातून वगळलं आहे. त्यामुळे त्या विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा द्यावी लागत नाही. या परीक्षेसाठी यंदाची नोंदणीही झाली आहे. अधिकृत वेबसाइटवर याबाबतची अधिक माहिती व इतर तपशील विद्यार्थ्यांना जाणून घेता येतील. प्रवेश परीक्षेबाबतची माहितीही विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होऊ शकते.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : चालू घडामोडीसाठी न्यूज पेपरमध्ये काय वाचावे आणि काय वाचू नये

GK Updates 23 Mar

करिअरनामा ऑनलाईन । MPSC, UPSC अथवा कोणतीही स्पर्धा परीक्षा (GK Updates) देताना चालू घडामोडी माहित असणं अत्यंत आवश्यक आहे. परीक्षेच्या आधी काही दिवस चालू घडामोडीवर एक झक्कास लेटेस्ट पुस्तक घेईन आणि खूप अभ्यास करीन वेळेवर, तेव्हाचं तेव्हाच लक्षात राहील; हे काय आत्तापासून टेन्शन घेत बसायचं! अशा समजात तुम्ही असाल तर हा मोठा गैरसमज लगेच दूर करा; कारण जेव्हा जनरल स्टडीज चा पेपर हाती येईल तेव्हा नक्कीच तुमचं डोकं एकदम काम करायचं बंद होईल आणि काय करू आणि काय नको असं वाटेल. त्यावेळी पश्चाताप करण्यापेक्षा जर आधीपासूनच तुम्ही तयारी सुरु ठेवली तर कुठे बिघडलं? यासाठी आज आम्ही तुम्हाला वर्षभर घडणाऱ्या चालू घडामोडींची परीक्षेसाठी तयारी करताना काय वाचावे आणि काय वाचू नये हे सांगणार आहोत.

न्यूज पेपर वाचताना खाली दिलेले महत्वाचे मुद्दे वाचा – (GK Updates)

  1. नवीन कायदे, बिल्स (उदा. महिलांसाठी आरक्षण)
  2. इ- गव्हर्नन्स (e -governance), प्रशासनिक फेरफार, सरकारच्या वेग वेगळ्या योजना
  3. डीम्ड युनिव्हर्सिटीशी (Deemed -University) संबंधित व इतर शिक्षणाशी संबंधित बातम्या
  4. आंतरराष्ट्रीय घडामोडी, वेगवेगळ्या देशांशी केलेले करार, भारताचे आजूबाजूच्या देशांशी असलेले वाद, सार्क[SAARC ], ओपेक[OPEC ], एशियन[ASEAN], चोग्म [CHOGM], सारख्या ओर्गानाय्झेशानांशी संबंधित बातम्या, आंतरराष्ट्रीय निवडणुका बद्दल बातम्या. (GK Updates)
  5. भारतीय सेनेच्या दुसऱ्या राष्ट्रांसोबत झालेल्या एक्झार्स्यीज[excercises], सैनिकी सामान खरेदी करार, सैनिकी ऑपरेशन्स, इत्यादी
  6. भारतीय आर्थिक बातम्या- जसं सरकारच्या पोलिसिज, मोठ्या कंपन्या व त्यांचे बॉस, भारतीय बजेट, चालू पंचवार्षिक योजनांचे आराखडे व त्यात घडून येणार बदल. रुपयाचे दुसऱ्या देशांच्या नाणेशी होत असलेले बदल, दुसऱ्या देशांशी आर्थिक संबंध व नवे करार.
  7. नवे रोग व त्यावर होणारे उपाय [vaccines], स्वाईन फ्लू, एड्स, इत्यादींवर नवीन उपचाराशी निगडीत बातम्या, सोलर एनर्जी, वातावरणाशी संबंधित होणारे बदल व त्यासाठी करण्यात येणार बदल.
  8. उपग्रह व नवनवीन मिशन्स, बायोटेक्नॉलॉजीशी संबधित बातम्या, हायब्रीड बीज उपक्रम, इत्यादी.
  9. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय अवार्ड्स कुणाला मिळालेत व कशासाठी (GK Updates)
  10. रविवारच्या पुरवणीमध्ये नवीन पुस्तके व त्यांच्या लेखकाबद्दल माहिती येत असते तर ती लिहून ठेवणे.
  11. टेनिस खेळाशी संबंधित बातम्या, क्रिकेट वर फार कमी प्रश्न असतात तर बाकी दुसऱ्या खेळा विषयीच्या बातम्या.
  12. भौगोलीक बदल, त्याची कारणे व त्यामुळे होणारे दुष्परिणाम. ह्यावर करण्यात आलेले व करण्यात येणारे उपाय, इत्यादी.

खाली दिलेले मुद्दे महत्वाचे नसल्यामुळे MPSC/UPSC मध्ये त्यावर प्रश्न येत नाहीत –

  1. राजकीय पक्ष व त्यांचे दलबदलू धोरण. राजनैतिक नेत्यांची भाषणे व एकमेकांवरच्या टीका
  2. टेररिस्ट ग्रुप्स, माओवादी ग्रुप्स, उल्फा व त्यांचे हल्ले, इतर आतंकवादी संघटन.
  3. अक्सीडेनट्स, नवीन ट्राफिक रुल्स, इत्यादी (GK Updates)
  4. चोरी व इतर गुन्हे, ह्याप्रकारच्या घटना
  5. क्रिकेट, बॉलीवूड बातम्या, फिल्मी गॉसिप इत्यादी

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : मुंबई महापालिकेत ‘या’ पदांवर भरती; पात्रता 12 वी/GNM; इथे पाठवा अर्ज

Job Notification (32)

करिअरनामा ऑनलाईन । बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत रिक्त (Job Notification) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रशिक्षित अधिपरिचारिका पदाच्या एकूण 135 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे.

संस्था – बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई
भरले जाणारे पद – प्रशिक्षित अधिपरिचारिका
पद संख्या – 135 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Notification)

  1. उमेदवार 12वी पास व कमीत कमी परिचारिका पदासाठी आवश्यक असलेली GNM ही पदवी धारण केलेली असावी
  2. उमेदवार मान्यताप्रप्त नर्सिंग कौन्सिलचा नोंदणीकृत उमेदवार असावा. किंवा त्यांनी Nursing Council चे Registration 3 महिन्यात मिळवावे.

वय मर्यादा – 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी – रु. 345/-
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (Job Notification)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2023
अर्ज मिळण्याचे ठिकाण – रोखपाल विभाग,कॉलेज बिल्डिंग तळमजला रूम नं 15, शीव मुंबई – 400022
अर्ज सादर करण्याचे ठिकाण – आवक-जावक विभाग, तळ मजला, विद्यालय इमारत, लो.टि.म.स. रुग्णालय

काही महत्वाच्या लिंक्स – (Job Notification)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – portal.mcgm.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Bal Vikas Prakalp Bharti 2023 : महिलांसाठी खुषखबर!! अंगणवाडी मदतनीसांची मुंबई येथे भरती सुरु

Bal Vikas Prakalp Bharti 2023

करिअरनामा ऑनलाईन । बाल विकास प्रकल्प अंतर्गत अंगणवाडी (Bal Vikas Prakalp Bharti 2023) मदतनीस पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 38 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 एप्रिल 2023 आहे.
संस्था – बाल विकास प्रकल्प (महाराष्ट्र शासन)
भरले जाणारे पद – अंगणवाडी मदतनीस
पद संख्या – 38 पदे (Bal Vikas Prakalp Bharti 2023)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 एप्रिल 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई, महाराष्ट्र
आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  1. मराठी भाषा (उमेदवाराने इयत्ता 10 वी मराठी भाषासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.)
  2. उमेदवार 12 वी पास, पदवी, पदव्युत्तर, D. Ed. B. Ed आणि MS-CIT उत्तीर्ण असणे आवश्यक.

वय मर्यादा – 18 ते 35 वर्षे

असा करा अर्ज –

  1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
  3. अर्ज भरा व त्याला सर्व कागदपत्रे जोडा. (Bal Vikas Prakalp Bharti 2023)
  4. दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा.

अर्ज पाठवण्याचा पत्ता –

बालविकास प्रकल्प अधिकारी, प्रभादेवी यांचे कार्यालय 117, पहिला मजला, बी. डी. डी. चाळ, वरळी, मुंबई – 18
काही महत्वाच्या लिंक्स – (Bal Vikas Prakalp Bharti 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
Bal Vikas Prakalp Mumbai Bharti 2023

Bal Vikas Prakalp Mumbai Bharti 2023

अधिकृत वेबसाईट – https://mumbaicity.gov.in/
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Satara ZP Teachers : सातारा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या; ‘इतक्या’ शिक्षकांना दुसरे गाव गाठावे लागणार

Satara ZP Teachers

करिअरनामा ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद (Satara ZP Teachers) प्राथमिक शाळेतील शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम केले जाते. सध्या सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांची ऑनलाईन बदली प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या प्रक्रियेत एकूण 6 संवर्गामधील तब्बल 1 हजार 288 शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
गेल्या तीन महिन्यापासून जिल्हांतर्गत व जिल्ह्याबाहेरील शिक्षकांची ऑनलाईन बदली प्रक्रिया सुरु आहे. संवर्ग एक, दोन, तीन व चार, विस्थापित राऊंड व अवघड क्षेत्रातील रिक्त (Satara ZP Teachers) जागा भरण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉगिनवरुन बदलीचे आदेश प्रसिध्द करण्यात आले आहेत.

असे आहेत बदलीचे निकष – (Satara ZP Teachers)
यापूर्वी विविध संवर्गातील शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या करण्यात आलेल्या आहेत. पती-पत्नी एकत्रीकरण, पती-पत्नी दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी असतील तर दोघांपैकी एक जिल्हा परिषद व दुसरा राज्य शासनाचा कर्मचारी असेल तर, एक जिल्हा परिषद व दुसरा केंद्र शासनाचा कर्मचारी असेल (Satara ZP Teachers) तर त्यांना संवर्ग दोनमध्ये प्राधान्य देण्यात आले होते. वरीलप्रमाणे बदली प्रक्रिया पार पडत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी दिली.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Bodhi Ramteke : गडचिरोलीच्या तरुणाची गगनभरारी! अशी मिळवली तब्बल 45 लाखांची स्कॉलरशिप; जाणून घ्या

Bodhi Ramteke

करिअरनामा ऑनलाईन । आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यातील (Bodhi Ramteke) चामोर्शी येथील ॲड. बोधी शाम रामटेके या तरुण वकीलास परदेशात उच्चशिक्षणासाठी युरोपियन शिक्षण आणि संस्कृती एग्जीक्यूटिव कमीशनमार्फत देण्यात येणारी ‘इरासमूस मुंडस’ ही तबल 45 लाखांची जागतिक प्रतिष्ठेची शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे.
यासाठी संपूर्ण जगभरातून 15 स्कॉलर्सची निवड करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी सारख्या भागातून पुढे आलेल्या बोधी रामटेकेची निवड होणं ही बाब खूप आनंददायी आहे. इंग्लंड, स्पेन, नॉर्वे, स्वीडन येथे पुढील दोन वर्ष जगातील विविध चार नामांकित विद्यापीठाच्या संयुक्त (Bodhi Ramteke) अभ्यासक्रमात बोधी उच्चशिक्षण घेणार आहे. बोधीची सामाजिक वकीली, प्रत्यक्ष जमीन पातळीवरचं काम अत्यंत प्रेरणादायी आहे. खरंतर त्याच्या या कामाचाच सन्मान आहे.

Bodhi Ramteke

बोधी हा नवोदय विद्यालयाचा विद्यार्थी. त्यांनी पुण्यातील आय.एल.एस. लॉ कॉलेजमध्ये कायद्याचं शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी मित्रांसमवेत राज्यभर विधी विषयक उपक्रम राबवले. ब्रिटिश सरकारची ‘चेवेनिंग शिष्यवृत्ती’ मिळवलेले वकील ॲड. दीपक चटप, ॲड. वैष्णव इंगोले आणि ॲड. बोधी या तरुण वकीलांनी मिळून ‘पाथ संस्थेची’ स्थापना केली आहे. पाथ फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यातील दुर्बल घटकांच्या मूलभूत प्रश्नांना कायद्याने वाचा फोडण्याचं विधायक काम हे तरुण करत आहेत.

Bodhi Ramteke

बोधी यांनी केलेली उल्लेखनीय कामगिरी (Bodhi Ramteke)

  1. या शिष्यवृत्तीसाठी सामाजिक व विधिविषयक संस्थेची ‘समता फेलोशिप’ मिळवून त्याद्वारे संविधानिक मुल्यांवर काम केले.
  2. गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे मूलभूत हक्कांचे प्रश्न पाथ फाऊंडेशनच्या माध्यमातून राज्य मानवाधिकार आयोगात पोहचवण्यासाठी केलेली याचिका महत्त्वाची ठरली आहे.
  3. आदिम समुदायांना न्यायव्यवस्थेत येणाऱ्या अडचणी यावर पाथ फाउंडेशनने केलेले संशोधन त्यांनी इजिप्त येथे झालेल्या अंतिरराष्ट्रीय समर स्कूलमध्ये मांडले.
  4. दुर्गम गाव मुख्य न्यायाधिश यांना पत्र लिहून जनहित (Bodhi Ramteke) याचिकेच्या माध्यमातून गडचिरोलीतील दुर्गम वंगणुर भागातील 1500 नागरिकांना रस्ता व पुल मिळावा यासाठी न्यायिक लढा दिला; याची फलश्रुती म्हणजे उच्च न्यायालयाने सरकारकडे निधीची तरतूद करत मूलभूत सुविधा देण्याचे आदेश दिले आहेत.
  5. नुकतेच प्रकाशित झालेले त्यांचे कायदेविषयक माहिती देणारे ‘न्याय’ हे पुस्तक वंचित घटकांसाठी महत्वपूर्ण ठरले आहे.
  6. बोधी सध्या संस्थात्मक कामासोबतच दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयात विधी संशोधक म्हणून कार्यरत आहेत.

 

Bodhi Ramteke

गडचिरोली जिल्ह्यातील या तरुण वकीलाला मिळालेल्या (Bodhi Ramteke) जागतिक शिष्यवृत्तीमुळे त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. “माझ्या उच्च शिक्षणाचा उपयोग समाजातील सर्व घटकांसाठी व्हावा यासाठी मी कार्यरत राहिन. तळागाळातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळावी; यासाठी मी प्रयत्न करणार आहे;” असे बोधी म्हणाले.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Central Bank of India Recruitment 2023 : खुषखबर!! ग्रॅज्युएट्ससाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये तब्बल 5 हजार पदांवर भरती

Central Bank of India Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । बँकेत नोकरी करण्याची इच्छा (Central Bank of India Recruitment 2023) असणाऱ्यांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिकाऊ उमेदवारांच्या तब्बल 5 हजार रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 एप्रिल 2023 आहे.

संस्था – सेंट्रल बँक ऑफ इंडिया
भरले जाणारे पद – शिकाऊ उमेदवार
पद संख्या – 5000 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 एप्रिल 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Central Bank of India Recruitment 2023)
उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा – 20 ते 28 वर्षे
अर्ज फी –

  1. PWBD – 400/- रुपये
  2. SC, ST आणि महिला – 600/- रुपये
  3. इतर सर्व उमेदवारांसाठी – 800/- रुपये

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत
निवड प्रक्रिया –

  1. लेखी चाचणी
  2. मुलाखत (Central Bank of India Recruitment 2023)

(लेखी परीक्षेत वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश असेल.)

मिळणारे वेतन –

  1. ग्रामीण व निमशहरी शाखेसाठी – 10,000/- रुपये दरमहा
  2. शहरी शाखेसाठी – 15,000/- रुपये दरमहा
  3. मेट्रो शाखेसाठी – 20,000/- रुपये दरमहा

काही महत्वाच्या लिंक्स – (Central Bank of India Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – centralbankofindia.co.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Jobs : ग्रॅज्युएट्ससाठी मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत ‘या’ पदावर भरती; असा करा अर्ज

Government Jobs (26)

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत नवीन (Government Jobs) भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून  स्वीय सहाय्यक पदांच्या एकूण 16 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे.

संस्था – औरंगाबाद खंडपीठ, औरंगाबाद
भरले जाणारे पद – स्वीय सहाय्यक
पद संख्या –16 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Government Jobs)

  1. उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे.
  2. तसेच इंग्रजी शॉर्टहैंड 120 श.प्र.मि., इंग्रजी टायपिंग 50 श.प्र.मि. आणि संगणक प्रमाणपत्र असणे आवश्यक.

वय मर्यादा – 31 मार्च 2023 रोजी 21 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी – रु. 300/-
नोकरी करण्याचे ठिकाण – औरंगाबाद खंडपीठ (Government Jobs)
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Police Bharti 2023 : अखेर पोलीस भरती लेखी परीक्षेची तारीख ठरली; केंद्रावर 2 तास आधीच पोहचा 

Police Bharti 2023 (3)

करिअरनामा ऑनलाईन । मैदानी परीक्षा झाल्यानंतर तब्बल अडीच (Police Bharti 2023) महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षा जाहीर करण्यात आली आहे. शिपाई आणि चालक पदासाठी 26 मार्चला लेखी परीक्षा होणार आहे. मुंबई वगळता पूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षा होत आहे. या संदर्भातील माहिती पोलीस महासंचालक संजय कुमार यांनी दिली आहे. लेखी परीक्षा 90 मिनिटांची व 100 गुणांची असेल. त्याचे स्वरूप ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच बहूपर्यायी असेल.
सीसीटीव्ही कॅमेरे ठेवणार वॉच (Police Bharti 2023)
लेखी परीक्षेचे केंद्र निश्चित करण्यात येत आहे. पात्र उमेदवारांना एमएच-आयटीकडून परस्पर हॉल तिकीट उपलब्ध केले जाणार आहे. ज्या शाळा, महाविद्यालय इमारतीत तसेच वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध आहेत, तेथे परीक्षेची व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती आहे. अन्यथा प्रत्येक वर्गात (Police Bharti 2023) स्वतंत्र व्हिडिओग्राफर नियुक्त केला जाणार आहे. परीक्षेच्या दिवशी वेळेच्या आधी 2 तास उमेदवारांना परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यासाठी सांगण्यात आले आहे.

मैदानी चाचणीसाठी उपस्थित असलेल्या उमेदवारांचे छायाचित्र व अंगठय़ाचा ठसा पोलिसांनी नोंदवून घेतलेला आहे. यावरून लेखी परीक्षेसाठी उपस्थित राहणारे उमेदवार (Police Bharti 2023) तेच आहेत का, याची खातरजमा केली जाणार आहे. त्यामुळे परिक्षेत होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसणार आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com