UPSC Success Story : सलग 4 वेळा नापास, अवघ्या 17 दिवसांत केली तयारी, जाणून घ्या अक्षत कौशलच्या IPS होण्याची कहाणी
करिअरनामा ऑनलाईन । देशातील लाखो लोक UPSC नागरी सेवा (UPSC Success Story) परीक्षा उत्तीर्ण होण्याची आकांक्षा बाळगतात. या प्रवासात अनेक लोक अडथळे आणि अपयशांना तोंड देत हार मानतात. तर काही लोक आहेत जे धैर्याने सर्व अडचणींना तोंड देतात आणि शेवटी दृढ इच्छाशक्ती आणि समर्पणाने आपली स्वप्ने पूर्ण करतात. आज आम्ही तुम्हाला अक्षत कौशलची अशीच एक गोष्ट सांगणार आहोत.
सततचे अपयश
अक्षत कौशलने 2012 पासूनच UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. 2013 मध्ये तो पहिल्यांदा नागरी सेवा परीक्षेस बसला होता पण तो या परिक्षेत नापास झाला. मग अक्षतने या परीक्षेसाठी (UPSC Success Story) आणखी मेहनत करायला सुरुवात केली. मात्र, दुसऱ्या प्रयत्नातही तो अपयशी ठरला. त्याचप्रमाणे उत्तम तयारी करूनही तिसऱ्या आणि चौथ्या प्रयत्नातही तो परीक्षा पास होवू शकला नाही. अक्षत कौशलला सलग चार वेळा अपयशाला सामोरे जावे लागले. अशा परिस्थितीत त्याची निराशा होणे स्वाभाविक होते.
17 दिवसात केली तयारी (UPSC Success Story)
अक्षतने नागरी सेवेच्या परीक्षा देण्याचा मार्ग सोडण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, त्याला काही मित्र भेटले. मित्रांशी बोलून त्याने पुन्हा UPSC परीक्षा देण्याचे ठरवले. या निर्णयाला त्याच्या आई-वडिलांनीही खूप पाठिंबा दिला. मात्र, परीक्षेला अवघे 17 दिवस उरले होते. यादरम्यान त्याने खूप प्रयत्न केले आणि तयारीच्या काही दिवसांत पूर्व परीक्षा क्लिअर केली. 2017 मध्ये त्याच्या पाचव्या प्रयत्नात त्याने केवळ परीक्षेत यश मिळविले नाही तर 55 वा क्रमांक मिळवून तो आयपीएस बनला.
अक्षतचा सल्ला
“UPSC परीक्षा देण्यापूर्वी ही परीक्षा नीट समजून घेतली पाहिजे. कोणत्याही विषयावर अती आत्मविश्वास बाळगू नका. तुमची ताकद तुमची कमजोरी बनू देऊ नका. एखाद्या (UPSC Success Story) विषयावर तुमची पकड चांगली असली तरी त्याकडेही लक्ष द्या. याशिवाय, तयारी दरम्यान तुमच्या जवळच्या व्यक्तींचे मार्गदर्शन घ्या;” असा सल्ला अक्षतने दिला आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com