RBI Recruitment 2023 : भारतीय रिझर्व्ह बँकेत विना परीक्षा थेट नोकरी; या पत्यावर पाठवा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय रिझर्व्ह बँकेत रिक्त पदांच्या (RBI Recruitment 2023) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून फार्मासिस्ट पदाच्या एकूण 25 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2023 आहे.
संस्था – भारतीय रिझर्व्ह बँक
भरले जाणारे पद – फार्मासिस्ट
पद संख्या – 25 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 एप्रिल 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (RBI Recruitment 2023)
उमेदवाराकडे फार्मसी कायदा 1948 अंतर्गत नोंदणीकृत मान्यताप्राप्त विद्यापीठातून फार्मसीमधील डिप्लोमाची किमान पात्रता असणे आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया – मुलाखत

  1. बँक शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांसाठी मुलाखत घेईल.
  2. उमेदवार सर्व शैक्षणिक पात्रता (PG/पदवी/डिप्लोमा), विविध बँक दवाखान्यांपासून राहण्याचे अंतर, PSB/PSU/सरकारी संस्था/RBI मधील अनुभव इत्यादींच्या आधारे निवडले जातील. (RBI Recruitment 2023)
  3. सर्व निवडलेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी आणि कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रादेशिक संचालक, मानव संसाधन व्यवस्थापन विभाग, भर्ती विभाग, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई प्रादेशिक कार्यालय, शहीद भगतसिंग रोड, फोर्ट, मुंबई – ४००००१
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.rbi.org.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com