Home Blog Page 331

Medical Sector : मेडिकल क्षेत्रात करिअर करण्यासाठी ‘हे’ कोर्स करा; मिळेल लाखोंचं पॅकेज

Medical Sector

करिअरनामा ऑनलाईन । मेडिकल अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी (Medical Sector) दरवर्षी राष्ट्रीय स्तरावर NEET ची परीक्षा घेतली जाते. जे विद्यार्थी या  प्रवेश परीक्षेत यशस्वी होऊ शकले नाहीत त्यांनी निराश होण्याची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला असे काही मेडिकल कोर्सेस सांगणार आहोत जे तुम्ही NEET परीक्षा न देताही करू शकता. चला तर मग जाणून घेऊया काही कोर्सविषयी…

1. B.Sc नर्सिंग- हा अभ्यासक्रम चार वर्षांच्या कालावधीत पूर्ण करता येतो. कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला 3 ते 8 लाखांचे पॅकेज मिळू शकते.
2. B. फार्मा- या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना चार (Medical Sector) वर्षे अभ्यास करावा लागेल. 2-5 लाखांपर्यंतचे वार्षिक पॅकेज मिळू शकते.
3. B.Sc बायोटेक्नॉलॉजी- B.Sc बायोटेक्नॉलॉजी हा तीन वर्षांचा अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे, हा कोर्स पूर्ण करून, उमेदवार दरवर्षी 3 ते 4 लाखांपर्यंत कमवू शकतात.
4. मायक्रोबायोलॉजीमध्ये B.Sc- (Medical Sector) हा देखील तीन वर्षांचा पदवीपूर्व कार्यक्रम आहे, तो पूर्ण केल्यानंतर, तुम्हाला वार्षिक 3-4 लाखांपर्यंत पॅकेज मिळू शकते.

5. B.Sc in Cardiovascular Technology- हा तीन वर्षांचा कोर्स केल्यानंतर आयुष्याला चांगले करिअरचे पर्याय मिळतात आणि पगारही चांगला मिळतो.
6. B.Sc in Nutrition- हा तीन वर्षांचा अंडरग्रॅज्युएट कोर्स केल्यानंतर वर्षाला तीन लाखांपर्यंतचे पॅकेज मिळू शकते.
7. बीएससी इन जेनेटिक्स- जेनेटिक्समध्ये तीन वर्षांचा कोर्स केल्यानंतर, तुम्हाला वार्षिक 5 लाखांपर्यंतचे पॅकेज मिळू शकते.

8. बायोमेडिकलमध्ये B.Sc- बायोमेडिकलचा हा 4 वर्षांचा कोर्स केल्यानंतर, व्यक्तीला वार्षिक 4 लाखांपर्यंत पगार मिळू शकतो.
9. सायबर फॉरेन्सिकमध्ये B.Sc- हा अभ्यासक्रम (Medical Sector) पूर्ण करण्यासाठी तीन वर्षे लागतात आणि अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर वेतन 5 ते 7 लाखांपर्यंत असू शकते.
10. बॅचलर इन फिजिओथेरपी- हा चार वर्षांचा कोर्स आहे, जो पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना 5 लाखांपर्यंत वार्षिक पगार मिळू शकतो.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : असा कोणता प्राणी आहे जो एकदा झोपल्यानंतर पुन्हा उठत नाही? UPSC/MPSC मुलाखतीत विचारतात असे Tricky प्रश्न

GK Updates 8 Apr.

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

1. असा कोणता प्राणी आहे जो एकदा (GK Updates) झोपल्यानंतर पुन्हा उठत नाही?
उत्तर :- मुंगी.
2. लिली, गुलाब आणि कमळात समान काय आहे?
उत्तर :- तिन्ही फुले आहेत.
3. असे काय आहे जे संपूर्ण महिन्यातून एकदा येते आणि 24 तास पूर्ण करून निघून जाते?
उत्तर :- तारीख.
4. सर्वात जास्त चंद्र असलेला ग्रह कोणता आहे?
उत्तर :- गुरु. (GK Updates)

5. कधी जांभई न येणारा प्राणी?
उत्तर :- (GK Updates) जिराफ.
6. कोणते राष्ट्र सिंथेटिक रबरचे सर्वात जास्त उत्पादक आहे?
उत्तर :- युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका
7. कानाचे किती भाग असतात?
उत्तर :- कनाचे बाह्य, मध्य आणि आतील असे तीन भाग असतात. (GK Updates)
8. अशी कोणती गोष्ट आहे जी मुलीचे नाव देखील आहे आणि तिच्या मेकअपसाठी देखील उपयुक्त आहे?
उत्तर :- पायल असे मुलीचे नाव आहे. यासोबतच ती मुलीच्या मेकअपच्या कामातही उपयोगी येते.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

HSC Exam : 12वीची परीक्षा वर्षातून दोनदा होणार…?

HSC Exam

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च (HSC Exam) माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी बारावीची  वर्णनात्मक आणि वैकल्पिक अशी वर्षातून दोनदा होण्याची शक्यता आहे. नेशनल करिक्युलम फ्रेमवर्क तयार करणाऱ्या तज्ञ समितीने बारावी परीक्षेसंदर्भात शिफारसी मांडल्या आहेत, जर समितीने केलेल्या शिफारशीनुसार निर्णय झाला तर परीक्षेचे स्वरूप बदलणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नव्या फ्रेमवर्कनुसार सेमिस्टर पद्धतीने बारावी बोर्ड परीक्षा वर्षातून दोन वेळा घेण्यात येतील. त्याचबरोबर कला, वाणिज्य विज्ञान या अभ्यासक्रमात शिकवल्या जाणाऱ्या विषयांची परीक्षा (HSC Exam) विद्यार्थ्यांना देण्याची मर्यादा नसेल, विद्यार्थ्याला बारावी बोर्ड परीक्षा देताना 16 विविध अभ्यासक्रमांचे कोर्स उपलब्ध होतील आणि त्यातून विद्यार्थी आपल्या आवडीचे अभ्यासक्रम निवडून बोर्ड परीक्षेला सामोरे जातील, यासाठी अकरावी आणि बारावी अभ्यासक्रमाच्या रचनेबरोबर पाठ्यपुस्तक बदल केला जाईल, असे देखील तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

राज्य सरकारच घेणार निर्णय (HSC Exam)
यांसदर्भात माहिती देताना राज्य मंडळातील एक अधिकारी म्हणाले, बारावीची परीक्षा वर्षातून दोनदा घ्यायची असेल तर तसा अभ्यासक्रम विद्या प्राधिकरणाला तयार करावा लागणार आहे. त्यानंतर संबंधित अभ्यासक्रमाला राज्य शासनाकडून मंजुरी घ्यावी लागणार आहे. त्यानंतर परीक्षा नेमकी कशी घ्यायची यासंदर्भात राज्य शासन धोरण ठरवून राज्य मंडळाला तसे आदेश देईल, नवीन शैक्षणिक धोरणात बारावीच्या दोन (HSC Exam) परीक्षा घेत असताना एक परीक्षा एमसीक्यू बेस्ड आणि दुसरी परीक्षा वर्णनात्मक पादतीने घेण्यासंदर्भात नमुद करण्यात आले आहे. नविन शैक्षणिक धोरणातील सर्वच घटकांची अंमलबजावणी करणे कोणत्याही राज्य सरकारवर बंधनकारक नाही. त्यामुळे बारावीच्या वर्षातून दोन परीक्षांच्या निर्णयाची अंमलबजावणी करायची का नाही? याचा निर्णय राज्य सरकारच घेणार आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Mobile Sector : मोठी अपडेट!! मोबाईल क्षेत्रात 1 लाख 50 हजार नवीन रोजगार; सरकारच्या PLI योजनेचा होणार फायदा

Mobile Sector

करिअरनामा ऑनलाईन । देशात उत्पादनाला चालना देण्यासाठी (Mobile Sector) सुरू करण्यात आलेल्या सरकारच्या प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह म्हणजेच PLI  योजनेचे फायदे आता रोजगाराच्या आघाडीवरही मिळू लागले आहेत. ही योजना लागू झाल्यानंतर देशाच्या निर्यातीत भाग घेणारा मोबाईल उत्पादन उद्योग या वर्षी झपाट्याने विस्तारणार आहे. यामुळे चालू आर्थिक वर्षात देशातील मोबाइल उत्पादन उद्योगात 1,50,000 नवीन रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
इंग्रजी वृत्तपत्र इकॉनॉमिक टाईम्समध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालात रिक्रूटमेंट फर्मच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, हँडसेट निर्माते भारतात मोठ्या प्रमाणात नोकर (Mobile Sector) भरतीची योजना आखत आहेत. पुढे असे म्हटले आहे की चीनबाहेरील उत्पादनाकडे जागतिक स्तरावर झालेले बदल आणि भारत सरकारच्या उत्पादनाशी संबंधित प्रोत्साहन योजनेमुळे हा बदल दिसून येत आहे.

कोणकोणत्या आहेत मोबाईल कंपन्या (Mobile Sector)
सॅमसंग, नोकिया, फॉक्सकॉन, विस्ट्रॉन, पेगाट्रॉन, टाटा ग्रुप आणि सॅलकॉम्प यांसारख्या मोठ्या कॉर्पोरेट दिग्गज कंपन्या देशात त्यांचे कर्मचारी वाढवण्याची शक्यता असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. टीमलीज, रँडस्टॅड, क्वेस आणि सील एचआर सर्व्हिसेस सारख्या स्टाफिंग कंपन्यांनी म्हटले आहे की या आर्थिक वर्षात या क्षेत्रात अंदाजे 1,20,000 ते 1,50,000 नवीन नोकऱ्या निर्माण होतील. यापैकी जवळपास 30,000 ते 40,000 पदांवर थेट भरती होण्याची शक्यता आहे.

भरतीमध्ये 100 टक्के वाढ
बहुतेक मोबाइल ब्रँड आणि त्यांचे घटक उत्पादन आणि असेंबली भागीदार, ज्यांचे भारतात आधीपासून काही प्रकारचे उत्पादन आहे किंवा ते उभारू पाहत आहेत, ते कर्मचाऱ्यांची भरती वाढवत आहेत; अशी माहिती टीमलीज सर्व्हिसेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक नारायण यांनी (Mobile Sector) दिली आहे. Quess आणि CIL मधील HR एक्झिक्युटिव्ह्सनी दिलेल्या माहितीप्रमाणे त्यांनी 2023 च्या तुलनेत या आर्थिक वर्षात भरतीमध्ये 100 टक्के वाढ केली आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Krushi Vibhag Recruitment : महिन्याला 1,12,400 पगार!! ग्रॅज्युएट्ससाठी कृषि विभागात ‘या’ पदांवर भरती

Krushi Vibhag Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । कृषि विभाग अंतर्गत रिक्त पदांच्या (Krushi Vibhag Recruitment) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ लिपिक आणि सहाय्यक अधीक्षक पदांच्या एकूण 20 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक  उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2023 आहे.

संस्था – कृषि विभाग
भरली जाणारी पदे –
1. वरिष्ठ लिपिक – 14 पदे
2. सहाय्यक अधीक्षक – 6 पदे
पद संख्या – 20 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 एप्रिल 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Krushi Vibhag Recruitment)
1. वरिष्ठ लिपिक – उमेदवाराकडे पदवी आणि मसूदालेखन व पत्रव्यवहाराच्या कामाचा अनुभव असावा. विधी पदवीधारकांना प्राधान्य.
2. सहाय्यक अधीक्षक – पदवी आणि पदवीनंतर मसुदालेखन व पत्रव्यवहाराच्या कामाचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल.
मिळणारे वेतन – 
वरिष्ठ लिपिक – Rs. 25,500/-  ते Rs. 1,12,400/- दरमहा (Krushi Vibhag Recruitment)
सहाय्यक अधीक्षक – Rs. 25,500/-  ते Rs. 1,12,400/- दरमहा
वय मर्यादा –
कमीत कमी – 18 वर्ष
जास्तीत जास्त – 40 वर्ष
अर्ज/ परीक्षा फी –
Open/OBC/EWS: Rs. 720/-
SC/ST : Rs. 650/-
PWD/ Female – फि नाही.

असा करा अर्ज –
1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा. (Krushi Vibhag Recruitment)
2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
किंवा कृषि विभाग च्या अधिकृत वेबसाईट www.krishi.maharashtra.gov.in ला भेट द्या.
3. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
4. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या. (Krushi Vibhag Recruitment)
5. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
6. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स – (Krushi Vibhag Recruitment)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.krishi.maharashtra.gov.in
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MPSC Recruitment 2023 : MPSC ने जाहीर केली नवीन भरती; तुम्ही होऊ शकता ‘या’ पदांवर सरकारी अधिकारी 

SSC HSC Exam Result 2023

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील तरुण उमेदवारांसाठी सरकारी (MPSC Recruitment 2023) अधिकारी होण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ भूभौतिकतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, अभिरक्षक, सहायक संचालक, निरीक्षक / अधिक्षक या पदांच्या एकूण 157 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा  आहे. अर्ज प्रक्रिया 10 एप्रिल 2023 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मे 2023 आहे.

आयोग – महाराष्ट्र लोकसेवा आयोग
भरली जाणारी पदे – (MPSC Recruitment 2023)
1. वरिष्ठ भूभौतिकतज्ञ
2. वैद्यकीय अधिकारी
3. प्रशासकीय अधिकारी
4. अभिरक्षक
5. सहायक संचालक
6. निरीक्षक / अधिक्षक
पद संख्या – 157 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 मे 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –
1. वरिष्ठ भूभौतिकशास्त्रज्ञ – जिओफिजिक्स किंवा अप्लाइड जिओफिजिक्समध्ये पदव्युत्तर पदवी असणे; किंवा B.Sc मध्ये पर्यायी किंवा उपकंपनी विषयांपैकी एक म्हणून (MPSC Recruitment 2023) भौतिकशास्त्रासह भूविज्ञान किंवा उपयोजित भूविज्ञान आणि पदव्युत्तर पदवी किंवा सरकारने घोषित केलेल्या इतर कोणत्याही पात्रतेवर जिओफिजिक्समधील किमान एक किंवा दोन पेपर असणं आवश्यक.
2. वैद्यकीय अधिकारी – M.B.B.S. पदवी किंवा भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम, 1956 च्या पहिल्या किंवा दुसऱ्या शेड्यूलमध्ये निर्दिष्ट केलेली कोणतीही पात्रता
3. प्रशासकीय अधिकारी – वैधानिक विद्यापीठाची पदवी किंवा त्याच्या समतुल्य म्हणून सरकारद्वारे मान्यताप्राप्त पात्रता असणे आवश्यक.
4. सहाय्यक संचालक – पेपरद्वारे इतिहासातील किमान द्वितीय श्रेणीतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी, किंवा प्रबंधाद्वारे इतिहासातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी; किंवा इतिहासातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची डॉक्टरेट.
5. निरीक्षक – सामाजिक कार्यात बॅचलर पदवी; कला, वाणिज्य, विज्ञान, कायदा किंवा कृषी या विषयातील पदवी आणि सामाजिक कार्य किंवा सामाजिक कल्याण प्रशासनातील (MPSC Recruitment 2023) पदव्युत्तर पदविका किंवा शारीरिकदृष्ट्या अपंगांच्या शिक्षणात पदवी किंवा डिप्लोमा भारतीय पुनर्वसन परिषद अधिनियम, 1992 अंतर्गत मान्यताप्राप्त संस्था म्हणून किंवा शिक्षणाची पदवी; किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडून अपंग व्यक्तींसाठी विशेष शिक्षणातील प्रमाणपत्र, पदवी किंवा डिप्लोमा किंवा त्याच्या समकक्ष म्हणून सरकारने घोषित केलेली इतर कोणतीही पात्रता असणं आवश्यक.

आवश्यक कागदपत्रे – (MPSC Recruitment 2023)
1. Resume
2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
3. शाळा सोडल्याचा दाखला (MPSC Recruitment 2023)
4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
6. पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF (पदानुसार)
1. वरिष्ठ भूभौतिकतज्ञ – PDF
2. वैद्यकीय अधिकारी – PDF
3. प्रशासकीय अधिकारी – PDF
4. अभिरक्षक – PDF
5. सहायक संचालक – PDF
6. निरीक्षक / अधिक्षक – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Jobs : यंत्र इंडिया अंतर्गत तब्बल 5395 जागांवर भरती; पात्रता फक्त 10वी/ITI पास

Government Jobs (31)

करिअरनामा ऑनलाईन । यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत रिक्त पदांच्या (Government Jobs) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून तब्बल 5395 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 एप्रिल 2023 आहे.

संस्था – यंत्र इंडिया लिमिटेड (नागपूर)
पद संख्या – 5395 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख –  14 एप्रिल 2023
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Government Jobs)
1. आयटीआय / Non- ITI – 1887 पदे
उमेदवाराने 10वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य घेतले असणे आवश्यक आहे.

2. आयटीआय / Ex- ITI – 3508 पदे
उमेदवाराने NCVT किंवा SCVT द्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही संस्थेमधून संबंधित ट्रेड चाचणी उत्तीर्ण केली असणे आवश्यक आहे. तसेच 50% गुणांसह 10 वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा – 15 वर्षे ते 24 वर्षापर्यंत [SC/ST – 5 वर्षे सूट, OBC – 3 वर्षे सूट]
परीक्षा फी – 200 रुपये /-[SC/ST/PWD/Transgender/महिला: ₹100/-]
मिळणारे वेतन – 6000/- रुपये ते 7000/- रुपये दरमहा
निवड प्रक्रिया –
लेखी परीक्षा/मेरिट लिस्टवर आधारित असेल
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत (Government Jobs)

काही महत्वाच्या लिंक्स – (Government Jobs)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.yantraindia.co.in
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CRPF Constable Recruitment 2023 : 10 वी पास असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरीची संधी; तब्बल 1,29,929 जागांसाठी भरती जाहीर, Apply Now

CRPF Constable Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मध्ये कॉन्स्टेबल पदाच्या सुमारे 1 लाख 30 हजार पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. गृह मंत्रालयाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. CRPF द्वारे सुमारे 1,29,929 पदे भरली जाणार असून यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.

यातील एकूण जागांपैकी 1,25,262 जागा या पुरुष उमेदवारांसाठी राखीव आहेत तर 4667 महिला उमेदवारांसाठी राखीव आहेत. १० वी पास उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी crpf.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

 

CRPF ला अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

शैक्षणिक पात्रता – केंद्र सरकार किंवा राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून मॅट्रिक (१० वी) किंवा समतुल्य शिक्षण घेतलेले असावे.

वयोमर्यादा काय आहे?
या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराची वयोमर्यादा 18 ते 23 वर्षांच्या दरम्यान असावी. (अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीच्या बाबतीत वयात पाच वर्षे सूट आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत तीन वर्षे सूट आहे).

निवड प्रक्रिया कशी असेल?
CRPF मधील पदांसाठी उमेदवारांना शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) आणि कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) साठी विहित केलेली लेखी परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. तसेच, माजी अग्निवीरांना पीईटीमधून सूट दिली जाईल.

पगार किती रुपये मिळेल?
कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) साठी 21,700 ते 69,100 रुपये पगार मिळेल.

संस्था – केंद्रीय राखीव पोलिस दल
भरले जाणारे पद – कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)
पद संख्या – 1,29,929 पदे
महिला – 4667 पदे
पुरुष – 1,25,262 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
मिळणारे वेतन –  21,700/- ते 69,100/- रुपये दरमहा  पगार मिळणार आहे.
वय मर्यादा – (CRPF Recruitment 2023)
1. 18 ते 23 वर्षे
2. SC आणि ST कॅटेगरीतील उमेदवारांच्या वय मर्यादेत 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
3. ओबीसी उमेदवारांच्या वयोमर्यादेत तीन वर्षाची सूट देण्यात आली आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
उमेदवारांनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली असणं आवश्यक आहे. किंवा त्या समकक्ष शैक्षणिक पात्रता असायला हवी. निवड प्रक्रिया –
1. फिजिकल आणि मेडिकल टेस्ट
2. फिजिकल एफिसेन्सी टेस्ट
3. लेखी परीक्षा (CRPF Recruitment 2023)

Smriti Mandhana : तुमची लाडकी क्रिकेटर जाणार कॉलेजात; ‘या’ ठिकाणी घेतलं ऍडमिशन

Smriti Mandhana

करिअरनामा ऑनलाईन । करिअरच्या उंच शिखरावर असताना काही (Smriti Mandhana) जणांचे शिक्षण मागे राहुन जाते. त्यामुळे काही जण हे शिक्षण पूर्ण करतात, तर काही जण आपल्याच क्षेत्रावर लक्ष केंद्रित करतात. त्यात भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि सलामीची फलंदाज स्मृती मानधना हिनेही पुढील शिक्षण सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
यासाठी स्मृती मानधना हिने कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील संजय घोडावत विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला आहे. बी. कॉम प्रथम वर्षासाठी तिने (Smriti Mandhana) प्रवेश घेतला आहे. संस्थेचे चेअरमन संजय घोडावत यांनी स्वतः उपस्थित राहून  पुष्पगुच्छ देत स्मृती मानधनाचे स्वागत केले.

Smriti Mandhana

भारताची सलामीवीर स्मृती मानधना हिला वुमन्स प्रीमियर लीगमध्ये देखील आरसीबीकडून सर्वाधिक बोली मिळाली होती. त्यामुळे स्मृती महिला आयपीएलमधील सर्वात महागडी खेळाडू ठरली होती.
भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि सलामीची (Smriti Mandhana) फलंदाज स्मृती मानधना हिनेही पुढील शिक्षण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तिने बी. कॉम प्रथम वर्षासाठी कोल्हापुरातील हातकणंगले तालुक्यातील संजय घोडावत विद्यापीठ येथे प्रवेश घेतला आहे, अशी माहिती विश्वस्त विनायक भोसले यांनी दिली.
दरम्यान स्मृतीने तिच्या शिक्षणासाठी आमच्या विद्यापीठाची निवड केली, ही आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. त्यामुळे तिच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आम्ही सर्वोत्तरी प्रयत्न करू असेही ते यावेळी म्हणाले आहेत.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IRCTC Recruitment 2023 : विना परीक्षा थेट मुलाखत!! रेल्वेच्या केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची संधी

IRCTC Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (IRCTC Recruitment 2023) तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून हॉस्पिटॅलिटी मॉनिटर पदाच्या एकूण 61 जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने होणार आहे.  उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 11 आणि 12 एप्रिल 2023 आहे.

संस्था – भारतीय रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC)|
भरले जाणारे पद – हॉस्पिटॅलिटी मॉनिटर
पद संख्या – 61 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (IRCTC Recruitment 2023)
B.Sc. (हॉस्पिटॅलिटी & हॉटेल एडमिनिस्ट्रेशन) किंवा BBA/MBA (कुलिनरी आर्ट्स) किंवा B.Sc. (हॉटेल मॅनेजमेंट & कॅटरिंग सायन्स) किंवा M.B.A (टूरिज्म & हॉटेल मॅनेजमेंट) तसेच 02 वर्षे अनुभव असावा.

वय मर्यादा – 28 मार्च 2023 रोजी 28 वर्षांपर्यंत. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी – फी नाही
मिळणारे वेतन आणि भत्ते –
रु. 30,000/- दरमहा
दैनंदिन भत्ता – रु. 350/- दररोज ट्रेनमध्ये ऑन-बोर्ड ड्यूटीसाठी (12 तासांपेक्षा जास्त काळ 100%, 70%)
6 ते 12 तासांसाठी, आणि 30% आणि 6 तासांपेक्षा कमी)
निवासाचे शुल्क – रु. 240/- जर बाहेरच्या ठिकाणी रात्रीचा मुक्काम असेल तरच. (IRCTC Recruitment 2023)
राष्ट्रीय सुट्टी भत्ता (NHA): रु. ३८४/- प्रति राष्ट्रीय सुट्टी (काम केल्यास).
वैद्यकीय विमा – रु. 800/- दरमहा (वैध कागदपत्रे सादर केल्यावर परतफेड करण्यायोग्य)

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 11 आणि 12 एप्रिल 2023
मुलाखतीचे ठिकाण – Institute of Hotel Management (IHM) IHMCTAN, Veer Savarkar Marg, Dadar (W), Mumbai 400028 (IRCTC Recruitment 2023)

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक महितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.irctc.com
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com