Smriti Mandhana : तुमची लाडकी क्रिकेटर जाणार कॉलेजात; ‘या’ ठिकाणी घेतलं ऍडमिशन

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । करिअरच्या उंच शिखरावर असताना काही (Smriti Mandhana) जणांचे शिक्षण मागे राहुन जाते. त्यामुळे काही जण हे शिक्षण पूर्ण करतात, तर काही जण आपल्याच क्षेत्रावर लक्ष केंद्रित करतात. त्यात भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि सलामीची फलंदाज स्मृती मानधना हिनेही पुढील शिक्षण सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
यासाठी स्मृती मानधना हिने कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील संजय घोडावत विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला आहे. बी. कॉम प्रथम वर्षासाठी तिने (Smriti Mandhana) प्रवेश घेतला आहे. संस्थेचे चेअरमन संजय घोडावत यांनी स्वतः उपस्थित राहून  पुष्पगुच्छ देत स्मृती मानधनाचे स्वागत केले.

Smriti Mandhana

भारताची सलामीवीर स्मृती मानधना हिला वुमन्स प्रीमियर लीगमध्ये देखील आरसीबीकडून सर्वाधिक बोली मिळाली होती. त्यामुळे स्मृती महिला आयपीएलमधील सर्वात महागडी खेळाडू ठरली होती.
भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि सलामीची (Smriti Mandhana) फलंदाज स्मृती मानधना हिनेही पुढील शिक्षण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तिने बी. कॉम प्रथम वर्षासाठी कोल्हापुरातील हातकणंगले तालुक्यातील संजय घोडावत विद्यापीठ येथे प्रवेश घेतला आहे, अशी माहिती विश्वस्त विनायक भोसले यांनी दिली.
दरम्यान स्मृतीने तिच्या शिक्षणासाठी आमच्या विद्यापीठाची निवड केली, ही आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. त्यामुळे तिच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आम्ही सर्वोत्तरी प्रयत्न करू असेही ते यावेळी म्हणाले आहेत.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com