Home Blog Page 332

Maharashtra Jobs : ग्रॅज्युएट्ससाठी राज्याच्या उत्पादन शुल्क विभागात ‘या’ पदांवर भरती; इथे पाठवा अर्ज

Maharashtra Jobs

करिअरनामा ऑनलाईन । राज्य उत्पादन शुल्क विभागांतर्गत विविध रिक्त (Maharashtra Jobs) पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून रिक्त पदांच्या एकूण 37 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 एप्रिल 2023 आहे.
संस्था – राज्य उत्पादन शुल्क विभाग
पद संख्या – 37 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 एप्रिल 2023

भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Maharashtra Jobs)
1.1.विधी सल्लागार / Legal Advisor – 01 पद
-उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असेल, तो सनदधारक असावा.
-विधी सल्लागार या पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान 10 वर्षांचा अनुभव आवश्यक राहील.

2. विधी अधिकारी (गट-अ) / Legal Officer (Group-A) – 20 पदे
-उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असेल, तो सनदधारक असेल. (Maharashtra Jobs)
-विधी अधिकारी, गट-अ या पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान 07 वर्षांचा अनुभव आवश्यक राहील.

3. विधी अधिकारी (गट-ब) / Legal Officer (Group-B) – 16 पदे
-उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असेल, तो सनदधारक असेल.
-विधी अधिकारी, गट-ब या पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान 07 वर्षांचा अनुभव आवश्यक राहील.

वय मर्यादा – 27 एप्रिल 2023 रोजी, 35 ते 45 वर्षापर्यंत
परीक्षा फी – फी नाही
मिळणारे वेतन – 20,000/- रुपये ते 28,000/- रुपये दरमहा
नोकरी ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra Jobs)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई, दुसरा मजला, जुने जकातघर, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई – 400001.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – stateexcise.maharashtra.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Success Story : ज्यांना मिळाली नाही शिपायाची नोकरी… तेच UPSC क्रॅक करुन बनले IAS

UPSC Success Story of IAS Maniram Sharma

करिअरनामा ऑनलाईन । करिअरमध्ये उच्च पद गाठलेल्या प्रत्येक (UPSC Success Story) अधिकाऱ्याच्या संघर्षाची कहाणी प्रेरणादायक असते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका आयएएस अधिकाऱ्याची गोष्ट सांगणार आहोत, ज्यांनी कधी शिपायाची नोकरी मागितली पण एका अधिकाऱ्याने त्यांना शिपायाची नोकरी देण्यास नकार दिला.
वडील मजूर तर आई दृष्टिहीन (UPSC Success Story)
आज आपण पाहणार आहोत IAS अधिकारी मणिराम शर्मा यांची कहाणी. मणिराम शर्मा हे राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील बंदनगढ़ी गावचे रहिवासी आहेत. मणिराम यांचे वडील मोलमजुरी करायचे तर त्यांच्या आईला दिसत नव्हते. एवढेच नव्हे तर मणिराम यांना स्वतःलाही ऐकू येत नव्हते. त्यांना अभ्यासाची खूप आवड होती पण गावात शाळा नसल्याने अभ्यास करणे खूप अवघड होते. अभ्यासासाठी ते दररोज 5 किलोमीटर लांब चालत शाळेत जायचे.

 

बोर्डाच्या परिक्षेत अव्वल
मेहनतीचे फळ गोड असते, असे म्हणतात. मणिराम यांनी प्रचंड मेहनत घेत शाळेचा अभ्यास केला. त्यावेळी त्यांनी राज्य शिक्षण मंडळाच्या परीक्षेत पाचवा आणि बारावीच्या परीक्षेत सातवा क्रमांक पटकावला होता. मणिराम दहावी पास झाल्याचे कळल्यावर त्यांच्या वडीलांना खूप आनंद झाला. वडिलांनी (UPSC Success Story) मणिराम यांना आपल्या ओळखीच्या एका अधिकाऱ्याकडे नेले. माझा मुलगा दहावी पास झाला आहे, त्याला शिपाई म्हणून नोकरी द्या, असे त्यांनी अधिकाऱ्याला सांगितले. त्यावेळी त्या अधिकाऱ्याचे बोलणे ऐकून मणिराम यांच्या वडिलांच्या डोळ्यात अश्रू तरळले. ते अधिकारी म्हणाले ‘मणिरामला ऐकू येत नाही. त्यामुळे घंटा किंवा कोणाचा आवाज त्याला ऐकू येणार नाही. त्यामुळे तो शिपाई कसा बनू शकतो?’
मुलांच्या शिकवण्या घेतल्या (UPSC Success Story)
त्यानंतर त्यांनी अलवर कॉलेजमधून पुढील शिक्षण घेतले. प्रसंगी शालेय मुलांची शिकवणीही घेतली. यामधून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्यांनी शिक्षणाचा आणि घरचा खर्च चालवला. त्यानंतर त्यांनी IAS होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. ते लिपिकाची परीक्षा देखील उत्तीर्ण झाले. यासह त्यांनी अल्वरमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर त्यांना पीएचडीसाठी शिष्यवृत्तीही मिळाली.

अखेर IAS झालेच
मणिराम यांनी 2005 मध्ये पहिल्यांदा UPSC परीक्षा उत्तीर्ण केली, परंतु बहिरेपणामुळे त्यांना नोकरी मिळू शकली नाही. यानंतर त्यांनी पुन्हा प्रयत्न केले आणि यावेळी त्यांना नोकरीही मिळाली पण पोस्ट आणि टेलिग्राफ खात्यात नोकरी देण्यात आली. मणिराम यांचे IAS होण्याचे स्वप्न उराशी बाळगून (UPSC Success Story) होते. असं म्हणतात की जो मेहनत करतो त्याला देवही मदत करतो. यावेळी मणिराम यांच्या कानाचे ऑपरेशन करण्यात आले, त्यानंतर त्यांना चांगले ऐकू येऊ लागले. आता 2009 मध्ये मणिराम यांनी पुन्हा UPSC परीक्षा दिली आणि यावेळी ते IAS झाले.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career Mantra : नोकरी मिळत नाही? ग्रॅज्युएशननंतर करा ‘हे’ कोर्स; मिळेल मनासारखा जॉब

Career Mantra (6)

करिअरनामा ऑनलाईन । सध्या बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर (Career Mantra) वाढत आहे. अशा परिस्थितीत नोकरीसाठी किती झगडावे लागते हे आपण पाहत आहोत. लोकांना नोकऱ्या शोधण्यात अडचणी येत आहेत. विशेषत: पदवीधर झालेल्या तरुणांना आजकाल नवीन नोकरी मिळणे फार कठीण जात आहे, कोरोनानंतर ही अडचण खूप वाढली आहे. आजच्या जगात फक्त पदवी मिळवणे पुरेसे नाही. आजच्या काळात कौशल्यावर आधारित शिक्षण घेणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. ज्यामध्ये डिप्लोमा कोर्सेसची सर्वाधिक मदत होत आहे. चला जाणून घेऊया अशाच काही डिप्लोमा कोर्सेस बद्दल ज्यातून सहज नोकरी मिळू शकते.

1. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन कॉम्प्युटर मॅनेजमेंट
पीजी डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्स- हा कॉम्प्युटर सायन्समधील दोन सेमिस्टर आणि एक वर्षाचा डिप्लोमा कोर्स आहे. या कोर्समध्ये सीए, एचटीएमएल, जावा, डेटाबेस मॅनेजमेंट आणि ओरॅकल आदी विषयांची माहिती दिली जाते. या अभ्यासक्रमातील प्रवेशाची प्रक्रिया प्रत्येक संस्थेनुसार बदलते, काही संस्था प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेतात तर काही विद्यार्थ्यांची निवड परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे करतात. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर उमेदवार वेब डिझायनर, सिस्टम अॅनालिस्ट, सॉफ्टवेअर डेव्हलपर बनतात.
2. PGDM Career Mantra
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट- हा बी-स्कूल्सद्वारे ऑफर केलेला 2 वर्षांचा मॅनेजमेंट कोर्स आहे. या अभ्यासक्रमासाठी उमेदवारांनी 50 ते 70 टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण केलेली असावी. PGDM मध्ये प्रवेश CAT, MAT, XAT इत्यादी व्यवस्थापन प्रवेश परीक्षांच्या आधारे केला जातो. यानंतर (Career Mantra) वैयक्तिक मुलाखत आणि गटचर्चा. कोर्स करणाऱ्या उमेदवारांना बँका, संशोधन संस्था, वित्त संस्था, शिक्षण क्षेत्र, उत्पादन क्षेत्र इत्यादींमध्ये नोकऱ्या मिळू शकतात.
3.मोबाईल अॅप डेव्हलपमेंट
आजकाल मोबाईल अॅप डेव्हलपर्सची उपयुक्तता समजावून सांगण्याची गरज नाही. मोबाइल फोन वापरणाऱ्या प्रत्येकाने त्यावर विविध अॅप्लिकेशन्स वापरणे बंधनकारक आहे. कोणताही (Career Mantra) उमेदवार पदवीनंतर मोबाईल अॅप डेव्हलपमेंटमध्ये डिप्लोमा कोर्स करू शकतो, जे अनेक प्रकारचे असतात. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर उमेदवार चांगले मोबाइल अॅप डेव्हलपर बनू शकतात.

4. मशीन लर्निंग (Career Mantra)
आजकाल मशीन लर्निंग हा देखील एक प्रमुख व्यवसाय आहे, उमेदवार मशीन लर्निंग आणि एआय मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा करून त्यांच्या करिअरला एक नवीन उड्डाण देऊ शकतात. प्रोग्राममध्ये पायथन शिकणे, नैसर्गिक भाषा प्रक्रिया, कॉम्प्युटर व्हिजन, स्पीच रेकग्निशन, मशीन लर्निंग, प्रगत डीप लर्निंग इत्यादींचा समावेश आहे. हा अभ्यासक्रम उमेदवारांना नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
5. सर्टिफिकेट ईन फायनान्स
हा लेखा आणि कर आकारणी क्षेत्रातील प्रमाणपत्र कार्यक्रम आहे. पात्र होण्यासाठी, उमेदवार किमान 50% गुणांसह संबंधित क्षेत्रातील पदवीधर असणे आवश्यक आहे. कोर्स केल्यानंतर (Career Mantra) उमेदवारांना अकाउंटंट, टॅक्स पॉलिसी अॅनालिस्ट, असिस्टंट मॅनेजर इत्यादी पदांवर नोकऱ्या मिळू शकतात.
6. फॅशन डिझायनिंग
फॅशन डिझायनिंग हा दोन वर्षांचा नियमित पीजी कोर्स किंवा 1 वर्षाचा डिप्लोमा कोर्स आहे. फॅशन आणि क्लोदिंग डिझायनिंगमधील डिप्लोमा कोर्सनंतर कापड, फुटवेअर, अॅक्सेसरीज आणि फॅशन आणि इतर क्षेत्रात करिअरच्या अनेक उत्तम संधी आहेत. विपणन, किरकोळ (Career Mantra) विक्री, व्यापार, ब्रँड व्यवस्थापन, पुरवठा साखळी व्यवस्थापन, निर्यात व्यवस्थापन आणि बाजार संशोधन इत्यादींमध्ये प्रभुत्व मिळवता येते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी आणि पर्ल अॅकॅडमी ऑफ फॅशन इत्यादीसारख्या काही प्रमुख संस्था हे अभ्यासक्रम देतात.

7. फॉरेन लँग्वेज (Career Mantra)
हा कोर्स केल्यानंतर कॉर्पोरेट जगतात आणि दूतावासात भाषांतरकार इत्यादी पदांना मोठी मागणी असते. परदेशी भाषांमध्ये काही प्रमाणपत्र अभ्यासक्रम आणि पीजी डिप्लोमा अभ्यासक्रम आहेत. ते पूर्ण केल्यानंतर तुम्ही व्यावसायिक अनुवादक, परदेशी भाषा प्रशिक्षक, दुभाषी इत्यादींची जबाबदारी घेऊ शकता.
8. मास कम्युनिकेशन
ग्रॅज्युएशननंतर मास कम्युनिकेशनमधील पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा मीडिया, चित्रपट आणि जाहिरात, जनसंपर्क, डिजिटल कम्युनिकेशन आणि मनोरंजन व्यवस्थापनात नोकरीच्या (Career Mantra) संधी उघडतो. या क्षेत्रातही करिअरच्या अनेक संधी आहेत.
9. ट्रॅव्हल आणि टुरिझम
पर्यटन उद्योग हे असेच आणखी एक क्षेत्र आहे ज्यात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी आहेत. पदवीनंतरचा प्रवास आणि पर्यटन अभ्यासक्रम राज्य पर्यटन विभाग, इमिग्रेशन (Career Mantra) आणि कस्टम्स, ट्रॅव्हल एजन्सी इत्यादी विविध क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी उमेदवार पात्र ठरतो. पर्यटन उद्योगात अनेक पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IT Jobs : खुषखबर!! देशातील ‘या’ तीन IT कंपन्यांमध्ये नोकऱ्याच नोकऱ्या!! पहा एक खास अपडेट

IT Jobs

करिअरनामा ऑनलाईन । जागतिक मंदीचं आव्हान उभे ठाकले (IT Jobs) असताना भारतीय IT क्षेत्रात मात्र नोकरीच्या नवीन संधी निर्माण होताना दिसत आहेत. टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या TCS या आयटी कंपनीसह HCL आणि Wipro या आघाडीच्या आयटी कंपन्यांनी नवीन कर्मचाऱ्यांची भरती सुरू केली आहे. तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तुम्हाला कामाचा अनुभव असो किंवा नसो तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. ‘टेकगिग’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

TCS कंपनीने आपल्या बेंगळुरु ऑफिसमध्ये अँग्युलर डेव्हलपर पदासाठी कर्मचारी भरती सुरु केली आहे.
या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील –
1. अँग्युलर 6 आणि त्यापेक्षा जास्त स्तरांबाबत सखोल ज्ञान आणि डेव्हलपमेंटचा अनुभव आवश्यक आहे.
2. HTML5, CSS3, JSON या वेब तंत्रज्ञानामध्ये आणि क्रॉस-ब्राउझरशी सुसंगत कोड लिहिण्यात निपुण असणं आवश्यक.
3. टाइपस्क्रिप्ट डोम मॅनिप्युलेशन तंत्र आणि रेस्टफुल सेवांची चांगली समज आवश्यक.
4. आधुनिक MV-VM/MVC फ्रेमवर्कपैकी कोणत्याही एकामध्ये तज्ज्ञ असणं गरजेचं.
5. अँगुलर अ‍ॅप्लिकेशन्स आणि डिरेक्टिव्हची अंमलबजावणी करण्याचा अनुभव आवश्यक.

HCL कंपनीनं आपल्या बेंगळुरुतील ऑफिसमध्ये सीनिअर टेक्निकल लीड पदासाठी कर्मचारी भरती सुरू केली आहे.
या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील – (IT Jobs)
1. ETL प्रक्रियेदरम्यान वापरल्या जाणार्‍या SQL सर्व्हर संग्रहित प्रक्रिया, फंक्शन्स, व्ह्युज आणि ट्रिगर्स डिझाइन व विकसित करणं.
2. QRM द्वारे प्रक्रियेसाठी असंख्य अपस्ट्रीम सिस्टिम्समधून डेटा प्राप्त करण्यासाठी आणि तयार करण्यासाठी SSIS / SQL ETL उपायांचं डिझायनिंग आणि डेव्हलपिंग करता आलं पाहिजे.
3. SSIS सह फाइल्समधून डेटा इम्पोर्ट करणं, एका डेटाबेस प्लॅटफॉर्मवरून दुसर्‍या डेटाबेसवर डेटा हलवणं यासह डेटा ट्रान्सफॉर्मेशन करता येणं गरजेचं.
डेटाची अचूक आणि कार्यक्षम प्रोसेस सुनिश्चित करण्यासाठी SSIS किंवा इतर ETL प्रक्रिया डीबग आणि ट्युन करणं.
4. डेटाबेस ऑब्जेक्ट्स (टेबल, व्ह्युज, इंडेक्स) आणि डेटाबेस सिक्युरिटी डिझाईन, अंमलबजावणी आणि देखरेख करणं.
5. SSIS पॅकेजेससह काम करण्याचा अनुभव गरजेचा.
6. मायक्रोसॉफ्ट SSIS सारख्या ETL टूल्समध्ये निपुण असणं गरजेचं. (IT Jobs)
7. सोर्स, स्टेजिंग आणि ODS/डेटा वेअरहाउस डेस्टिनेशन्समधील डेटा इम्पोर्ट आणि ट्रान्सफर करण्यासाठी स्ट्रॅटजिज आणि दृष्टिकोनांचं विश्लेषण आणि ते विकसित करणं.
Explainer: राज्य सरकारकडून का बंद करण्यात आलं डीएड? मग आता शिक्षक व्हायचं तरी कसं? बघा रोडमॅप
8. प्रॉडक्शन आणि नॉन-प्रॉडक्शन वातावरणात तैनात करण्यासाठी ETL प्रक्रियांची तयारी करणं आणि त्यांची चाचणी करणं.
9. SQL सर्व्हर डेटाबेसचं ज्ञान असावं तसंच यासंबंधी डेव्हलपमेंट प्लॅन्स किंवा रिफाईनमेंट टेस्ट प्लॅन्ससह सपोर्ट सिस्टिम व अ‍ॅक्सेप्टन्स टेस्टिंगचही ज्ञान असावं.
10. कमीत कमी 3 ते 5 वर्षांचा डेटा इंटिग्रेशन (सोर्सिंग, स्टेजिंग, मॅपिंग, लोडिंग) अनुभव, SSIS प्रीफर्ड CSV फाइल्स, XML फाइल्स, कॉमन रिलेशनल डेटाबेस स्रोतांमधून डेटा बदलण्याचा अनुभव असलेल्या विस्तृत श्रेणीसह SSIS घटकांचे संपूर्ण ज्ञान आवश्यक.
11. ट्रान्झॅक्ट-एसक्यूएल सह संचयित प्रक्रिया डेव्हलपमेंटचा अनुभव गरजेचा.
12. स्टार स्कीमाज आणि डेटा क्युब्जसह रिलेशनल डेटाबेसच्या लॉजिकल आणि फिजिकल डिझाईनचं सखोल ज्ञान आवश्यक.
13. डिस्ट्रिब्युटेड डेव्हलपमेंट टीम्ससह काम करण्याचा अनुभव (IT Jobs)

Wipro कंपनीनं आपल्या नोएडातील ऑफिसमध्ये सॉफ्टवेअर टेस्ट इंजिनीअर पदासाठी कर्मचारी भरती सुरू केली आहे.
या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील – (IT Jobs)
1. माहितीच्या गरजा, सिस्टिम फ्लो, डेटा युसेज आणि कार्य प्रक्रियांचा अभ्यास करून सॉफ्टवेअर सोल्युशन्स डेव्हलप करणं.
2. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाइफ सायकलनंतर येणाऱ्या अडचणी तपासणं.
3. सिस्टिम इश्युज आणि प्रॉब्लेम स्टेटमेंटच्या मूळ कारणांचं विश्लेषण करून ते सोपं करणं.
4. सिस्टिम कार्यप्रदर्शन आणि इम्पॅक्ट उपलब्धता सुधारण्यासाठी नवीन आयडिया शोधणं.
5. क्लायंटच्या गरजांचं विश्लेषण करणं आणि त्या गरजांना व्यवहार्य डिझाईनमध्ये रूपांतरित करणं.
6. फंक्शनल टीम्स किंवा सिस्टिम अॅनॅलिस्ट्सच्या सहकार्यानं सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट्समधील तपशीलांची तपासणी करणं. (IT Jobs)
7. सॉफ्टवेअर क्षमतांबद्दल माहिती मिळविण्यासाठी प्रोजेक्ट मॅनेजरशी चर्चा करणं.
8. अॅनॅलिसिस, प्रॉब्लेम डेफिनेशन, रिक्वायरमेंट्स, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि प्रस्तावित सॉफ्टवेअरचं मूल्यांकन करून त्याची ऑपरेशनल व्यवहार्यता निश्चित करणं.
9. टेस्ट केसेस/सिनॅरिओज/युसेज केसेस सेट अप आणि डिझाईन करून, त्यांची अंमलबजावणी करून सॉफ्टवेअर प्रमाणीकरणासाठी प्रक्रिया विकसित आणि स्वयंचलित करणं.
10. त्रुटी दूर करण्यासाठी, नवीन हार्डवेअरशी जुळवून घेण्यासाठी, त्याचं कार्यप्रदर्शन सुधारण्यासाठी किंवा इंटरफेस अपग्रेड करण्यासाठी सॉफ्टवेअरमध्ये बदल करणं.
11. नवीन सिस्टिमच्या इन्स्टॉलमेंटची किंवा सध्याच्या प्रणालीतील बदलांची शिफारस करण्यासाठी आणि प्लॅन करण्यासाठी माहितीचं विश्लेषण करणं. (IT Jobs)
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CRPF Recruitment 2023 : 10वी पाससाठी भारतातील सर्वात मोठी भरती!! CRPFमध्ये तब्बल सव्वा लाखाहून अधिक पदे भरणार

CRPF Recruitment 2023 (2)

करिअरनामा ऑनलाईन । सेंट्रल रिझर्व्ह पोलीस दलात देशातील (CRPF Recruitment 2023) सर्वात मोठी भरती होणार आहे. केंद्र सरकारने जाहीर केल्यानुसार आता केंद्राच्या विविध खात्यात मेगाभरती सुरू करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून CRPFमध्ये तब्बल सव्वा लाखाहून अधिक पदे भरण्यात येणार आहेत. या पदभरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

सेंट्रल रिझर्व्ह पोलीस दलात देशातील सर्वात मोठी भरती होणार आहे. CRPFमध्ये कॉन्स्टेबलची दीड लाख पदे भरण्यात येणार आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबतचं नोटिफिकेशन जारी केलं आहे.

संस्था – केंद्रीय राखीव पोलिस दल
भरले जाणारे पद – कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)
पद संख्या – 1,29,929 पदे
महिला – 4667 पदे
पुरुष – 1,25,262 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
मिळणारे वेतन –  21,700/- ते 69,100/- रुपये दरमहा  पगार मिळणार आहे.
वय मर्यादा – (CRPF Recruitment 2023)
1. 18 ते 23 वर्षे
2. SC आणि ST कॅटेगरीतील उमेदवारांच्या वय मर्यादेत 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
3. ओबीसी उमेदवारांच्या वयोमर्यादेत तीन वर्षाची सूट देण्यात आली आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
उमेदवारांनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली असणं आवश्यक आहे. किंवा त्या समकक्ष शैक्षणिक पात्रता असायला हवी. निवड प्रक्रिया –
1. फिजिकल आणि मेडिकल टेस्ट
2. फिजिकल एफिसेन्सी टेस्ट
3. लेखी परीक्षा (CRPF Recruitment 2023)

अग्नीवीरांनाही मिळणार संधी –
या भरतीसाठी माजी अग्नीवीर जर नोकरीसाठी अर्ज करत (CRPF Recruitment 2023) असतील तर त्यांना शारीरिक पात्रता चाचणीला सामोरे जावं लागणार आहे. केंद्र सरकारने यापूर्वीच केंद्रातील रिक्त पदे भरणार असल्याचं जाहीर केलं होतं. तसेच या पदांच्या नियुक्तीच्या नोटिफिकेशन काढणार असल्याचंही सांगितलं होतं. त्यानुसारच CRPFच्या भरतीची नोटिफिकेशन काढण्यात आली आहे.
काही महत्वाच्या लिंक्स – (CRPF Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – crpf.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Instagram मधून पैसे कमावण्यासाठी ‘या’ स्टेप्स फॉलो करा

Social Media Career

करिअरनामा ऑनलाईन । मित्रांनो सध्या अनेक लोक इंस्टाग्रामवरून भरपूर पैसे कमावत आहेत. सध्या Reels ला सोशल मीडियात चांगली डिमांड आहे. तुम्हाला रिल्स मागे इंस्टाग्रामकडून मोठा बोनस देखील देण्यात येतो. इंस्टाग्रामवरून पैसे कमावण्यासाठी खालील स्टेप्स फॉलोअ करा. How to earn money from Instagram

  1. सर्वात अगोदर तुम्हाला Instagram वर अकाऊं उघडावे लागेल
  2. त्यानंतर तुमचं प्रोफाईल बनवून एक विषयावर सातत्यपूर्ण रिल्स अपलोड करावे लागतील
  3. तुमचे हळूहळू फॉलोअर्स वाढू लागतील. तुमचा १ लाखाचा टप्पा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला चांगलीच मेहनत घ्यावी लागेल.
  4. आता इंस्टाग्राम ३० मिलियन रिल्स Views झाल्यानंतर क्रिएटर्सला बोनस देते
  5. याचसोबत तुम्ही वेवेगळ्या ब्रँडचे प्रमोशन करून देखील तगडा पैसे कमाऊ शकता

Social Media Career : Instagram वरुन कमवा 1 ते 10 लाख रुपये महिना; जाणून घ्या काय करावं लागेल

करिअरनामा ऑनलाईन । लोकं सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनून (Social Media Career) किती पैसे कमवू शकतात याबद्दल अनेक कथा आहेत. पण याचा नेमका अर्थ काय? आपण Instagram वर किती पैसे कमवू शकता? यासाठी तुम्हाला किती फॉलोअर्स हवे आहेत? इन्स्टाग्रामवर पैसे कसे कमवायचे याबद्दल आज आम्ही इथे माहिती उपलब्ध केली आहे. Instagramवरुन घरबसल्या पैसे कमावता येऊ शकतात. जसं युट्युब कडून काही क्रीएटर्सला शॉर्ट फंड मिळतो अगदी तसेच आता Instagram वरून रील्स बोनस मिळाल्यास पैसे कमवता येतात.

Instagram वरून पैसे कमावण्यासाठी येथे क्लिक करा

Instagram वरुन पैसे कमवण्यासाठी काय करावं लागेल
सोशल मीडियावर रिल्स हा प्रकार सध्या जास्तच ट्रेंडमध्ये आहे. अनेक जण हौस म्हणून रिल्स तयार करतात मात्र यापासून मोठी कमाई देखील केली जाऊ शकते. लोकं दररोज रीलवर बराच वेळ घालवत आहेत आणि विशेष म्हणजे वापरकर्त्यांना त्यावर भरपूर पैसा मिळत आहे. इंस्टाग्रामवर (Social Media Career) रिल्स बनविणाऱ्यांची संख्या देखील खूप मोठी आहे. म्हणूनच इंस्टाग्राम (Instagram Reels) त्याच्या वापरकऱ्यांसाठी बोनस कार्यक्रम देखील राबवत आहे.
म्हणजे इंस्टाग्राम केवळ अशाच वापरकर्त्यांना या बोनस प्रोग्रामचा भाग बनवते, जे कंटेंटच्या अटी पूर्ण करतात. याशिवाय, इन्स्टाग्रामने काही नियम देखील तयार केले आहेत. ज्यामध्ये वापरकर्त्यांना याचे पालन करावे लागते.

‘या’ स्टेप्स करा फॉलो –
1. इन्स्टाग्रामवर कमाईची पहिली पायरी म्हणजे फॉलोअर्स वाढवणे. तुमच्या फॉलोअर्सची संख्या जास्त असेल तरच ब्रँड तुमच्यासोबत भागीदारी करतील. (Social Media Career)
2. एक लाखाहून अधिक फॉलोअर्स असलेल्या पेजना सहजपणे ब्रँड पार्टनर मिळतात.
यानंतर तुम्ही कोणत्या क्षेत्रात पोस्ट करू इच्छिता ते ठरवा. तुम्ही खेळ, सौंदर्य, फॅशन, क्रिएटिव्हिटी, प्रेरणादायी कथा, रेसिपी, प्रवास, आरोग्य, आध्यात्मिक किंवा इतर कोणताही विषय निवडू शकता.
3. निवडलेल्या विषयावर मूळ पोस्ट टाका. जर तुम्ही कुठूनही (Social Media Career) मजकूर घेतला असेल तर त्याच्या सोर्सचे नाव नक्की लिहा.
4. योग्य हॅशटॅग वापरा जेणेकरून अधिकाधिक लोक तुमच्या पोस्टपर्यंत पोहोचू शकतील.
5. तुमच्या पृष्ठाच्या सामग्रीशी जुळणारा ब्रँड निवडा. हा ब्रँड तुम्हाला तुमच्या पोस्टसाठी पैसे देईल. यासाठी तुमचे शुल्क जास्त नसावे हे लक्षात ठेवा.

Affiliate Marketing करुन कमावू शकता लाखो रुपये
इंस्टाग्रामवर कमाई करण्याची पद्धत ब्लॉगर्ससारखीच आहे, जिथे क्रिएटर्स त्याच्या खात्याद्वारे त्याच्या पार्टनरचा किंवा त्याच्या क्लायंटच्या प्रॉडक्टचा प्रचार करतो. ज्याच्या बदल्यात वापरकर्त्याला पैसे दिले जातात. यामध्ये, क्रिएटर्सला खात्याद्वारे सोशल नेटवर्कमध्ये क्लायंटची प्रभावी जाहिरात (Social Media Career) करावी लागेल. इन्स्टाग्रामच्या प्रोफाईल बायोडेटामध्ये उत्पादनाच्या खरेदीशी संबंधित माहिती दिली जाते, जेणेकरून दुसर्या क्रिएटर्सला हवे असल्यास, तो Instagram च्या खात्याद्वारे लिंकवर जाऊन ते उत्पादन खरेदी करू शकतो.
Affiliate Marketing मधून कमाई करण्यासाठी, फॉलोअर्सची चांगली संख्या असणे खूप महत्वाचे आहे. यामध्ये, क्रिएटर्सच्या पोस्टमधून विशिष्ट कंपनी किंवा क्लायंटच्या उत्पादनाची जाहिरात केली जाते. यामाध्यमातून होणाऱ्या विक्रीमधून तुम्हाला चांगले पैसे मिळू शकतात.
अफ़िलिएट प्रोग्राम जॉईन करायचा असेल तर  google वर सर्च करावा लागेल. hoes affiliate program, mobile affiliate program, headphone affiliate program असे गुगल वर सर्च करून तुम्ही अफ़िलिएट प्रोग्राम जॉईन करू शकता.

Instagram क्रिएटर्सला देतं महिन्याला एवढे रुपये
1. भारतातील लोक शॉर्ट्स व्हिडिओ कंटेंट खूप पाहतात आणि YouTube शॉर्ट्स आणि Instagram रील हे शॉर्ट्सचे खूप मोठे प्लॅटफॉर्म आहेत. इंस्टाग्राम निर्मात्यांसाठी रील बोनस हे एक उत्तम अपडेट आहे.
2. काही लोकांना 1000$ ते 5000$ डॉलर म्हणजेच 80 हजार ते 4 लाखांपर्यंत बोनस मिळत आहे.
3. जेवढे व्हिडिओ आणि व्ह्यूजचे टार्गेट महिन्यासाठी (Social Media Career) दिले जाते तेवढं टार्गेट पूर्ण करणं हा इंस्टाग्राम प्लॅटफॉर्मचा criteria आहे. यानंतर महिन्यला पैसे मिळायला सुरुवात होते.
4. 1000 डॉलर्सचा बोनस allocated झाला असेल तर 20 मिलियन व्ह्यूज किंवा 500 व्हिडिओ टाकावे लागतात.
5. जर इथे मेन्शन केलं असेल तर ते एक महिन्यामध्ये दिलेल्या तारखे पर्यंत पूर्ण केले तर 1000 रुपये मिळतात.
6. याऐवजी जेवढे डॉलर झाले असतील तेवढे पैसे मिळतील. परंतु किमान 100 डॉलर शिल्लक जमा करणे म्हणजे आपण ते थेट paypal वरुण काढू शकतो किंवा (Social Media Career) आपल्याला आपली खरी माहिती किंवा paypal द्यावी लागेल.
7. 10M रिल्स व्हिव्जला बोनस म्हणून 1000 $ दिले जातात. कधी कधी काही instagram स्टार्सला 10,000$ देखील मिळाले आहेत.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career Mantra : 12वीनंतर काय करायचं? माहित नाही? ‘हे’ कोर्स तुमचे जीवन बदलतील

Career Mantra (5)

करिअरनामा ऑनलाईन । 10वी किंवा 12वी पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर (Career Mantra) करिअर कशात करायचं हा मोठा प्रश्न पडलेला असतो. काही विद्यार्थ्यांनी करिअर कशात करायचं आहे हे आधीच ठरवलेलं असतं. पण काही विद्यार्थी त्यांच्या करिअर बाबत गोंधळलेले असतात. तर अशाच करिअर बाबतीत गोंधळलेल्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही काही करिअरचे सोपे पर्याय सांगणार आहोत.
प्रत्येक विद्यार्थ्याला कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात रस असतो, त्यानुसार तो उच्च शिक्षणासाठी आपले करिअर आणि अभ्यास ठरवतो. परंतु अनेक वेळा विद्यार्थी अनेक करिअरपैकी एक (Career Mantra) निवडू शकत नाहीत. असे होण्याचे कारण ते त्यांचा आत्मविश्वास गमावतात किंवा काही वेळा त्यांना कोर्सबद्दल योग्य ज्ञान नसते. आज आम्ही तुम्हाला देशातील काही लोकप्रिय अभ्यासक्रमांबद्दल सांगणार आहोत.

1. अभियांत्रिकी (Engineering) (Career Mantra)
देशातील बहुतांश विद्यार्थ्यांमध्ये इंजिनियरिंग आणि टेक्नॉलॉजी हा एक लोकप्रिय अभ्यासक्रम आहे. यामागचे कारण म्हणजे या क्षेत्रातून मिळणारी भरीव कमाई हे आहे. विद्यार्थ्यांना हा कोर्स खूप आवडतो. इंजिनियरिंगच्या अभ्यासक्रमांमध्ये मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स इ. साठी देशातील जेईई मेन, जेईकप आदी प्रवेश परीक्षांना सामोरे जावे लागते.
2. व्यवसाय व्यवस्थापन (Business Management)
बिझनेस मॅनेजमेंट कोर्सही विद्यार्थ्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. यामध्ये विविध विषयांतील पदवी आणि पदविका अभ्यासक्रमांचा समावेश आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी या (Career Mantra) अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात.

3. विज्ञान (Science)
विज्ञान हा विषय अनेक विद्यार्थ्यांचा आवडीचा विषय आहे. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी विद्यार्थी वेगवेगळे कोर्स करतात. मात्र, प्रत्येक विद्यार्थ्याची आवड वेगळी असते. काहींना भौतिकशास्त्र, काहींना रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र यामध्ये रस असतो.
4. वैद्यकीय (Medical)
12 वी नंतर विद्यार्थी मेडीकलशी  संबंधित अभ्यासक्रम निवडू शकतात. हे खूप व्यस्त आणि आव्हानात्मक क्षेत्र आहे, परंतु तुम्ही डॉक्टर बनून भरपूर पैसे (Career Mantra) कमवू शकता.
5. संगणक अनुप्रयोग (Computer Applications)
हे क्षेत्र सॉफ्टवेअर डिझायनिंग, संगणक प्रोग्रामिंग, डेटाबेस व्यवस्थापन आणि इतर विषयांवर लक्ष केंद्रित करते. या अभ्यासक्रमातही विद्यार्थ्यांचे सोनेरी करिअर बनू शकते.

6. पत्रकारिता (Journalism)
पत्रकारितेचा अभ्यासक्रमही विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहे, जो मीडिया, लेखन, संवाद तंत्र, चित्रपट निर्मिती आणि डिझाइन इत्यादी विषयांवर लक्ष केंद्रित करतो. हा अभ्यासक्रमही विद्यार्थ्यांसाठी वरदानापेक्षा कमी नाही. देशातील अनेक विद्यापीठे हा अभ्यासक्रम देतात.
7. मानवता (Humanity)
हा देखील विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय अभ्यासक्रम आहे, जो मानव (Career Mantra) संसाधन, लोक विकास आणि मानव संसाधन व्यवस्थापन यासारख्या विषयांवर लक्ष केंद्रित करतो.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NPCIL Recruitment 2023 : न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन अंतर्गत ‘या’ पदांवर भरती; महिन्याला 56 हजार पगार

NPCIL Recruitment 2023 (2)

करिअरनामा ऑनलाईन । न्यूक्लियर पॉवर कोर्पोरेशन (NPCIL Recruitment 2023) ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई अंतर्गत भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या एकूण 325 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 एप्रिल 2023 आहे.

संस्था – न्यूक्लिर पॉवर कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई
पद संख्या – 325 पदे
भरली जाणारी पदे – (NPCIL Recruitment 2023)
1) मेकॅनिकल/ Mechanical – 123 पदे
2) केमिकल/ Chemical – 50 पदे
3) इलेक्ट्रिकल/ Electrical – 57 पदे
4) इलेक्ट्रॉनिक्स/ Electronics – 25 पदे
5) इंस्ट्रुमेंटेशन/ Instrumentation – 25 पदे
6) सिव्हिल/ Civil – 45 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 11 एप्रिल 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 एप्रिल 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. ६०% गुणांसह संबंधित शाखेत/विषयात बी.ई. / बी.टेक. / बी.एससी. (इंजिनियरिंग) / एम.टेक.
2. GATE २०२०/GATE २०२१/GATE २०२२ (NPCIL Recruitment 2023)
वय मर्यादा – 18 ते 26 वर्षांपर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
परीक्षा फी – 500/- रुपये [SC/ST/PwBD/DODPKIA/महिला – शुल्क नाही]
मिळणारे वेतन –
प्रशिक्षण कालावधी दरम्यान मिळणारे वेतन – 55000/- रुपये दरमहा (NPCIL Recruitment 2023)
प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर कार्यकारी प्रशिक्षणार्थींना वेतन – 56,100/- रुपये दरमहा

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)
निवड प्रक्रिया –
1.गेट स्कोअर
2. मुलाखत (NPCIL Recruitment 2023)
3. दस्तऐवज पडताळणी
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक महितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.npcil.co.in
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Apple Layoffs : जागतिक मंदीचा इफेक्ट… लोकप्रिय Apple कंपनीकडून कर्मचाऱ्यांना मिळणार डच्चू

Apple Layoffs

करिअरनामा ऑनलाईन । जागतीक मंदी आणि त्यापाठोपाठ येणाऱ्या (Apple Layoffs) संकटाची गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा सुरु आहे. प्रत्यक्षात तशा अधिकृत नोंदी दिसत नसल्यातरी याचाच परिणाम म्हणून की काय अनेक बड्या कंपन्यांनी कर्मचारी कपात केली आहे. यामध्ये गुगल, अॅमेझॉन फेसबुकची मदर कंपनी मेटा यांच्यानंतर आता आयफोन बनवणारी कंपनी अॅपलनंही कर्मचारी कपातीला सुरुवात केली आहे. ब्लुमबर्ग न्यूजनं याबाबत वृत्त दिलं आहे.
ब्लुमबर्गच्या अहवालासनुसार, अॅपलच्या कर्मचारी कपातीच्या निर्णयाचा फटका कंपनीच्या डेव्हलपमेंट आणि प्रिझर्व्हेशन टीमला बसणार आहे. पण नेमकी किती कर्मचारी कपात होणार आहे, याचा आकडा अद्याप समोर आलेला नाही. त्याचबरोबर बिझनेस इनसाईडरने देखील हा (Apple Layoffs) दावा केला आहे की, अॅपलनं कर्मचाऱ्यांना पुन्हा अॅप्लाय करायला सांगितलं आहे अन्य़था त्यांची हाकालपट्टी केली जाईल. या कर्मचारी कपातीचा फटका अॅपलच्या रिटेल स्टोअर्स आणि इतर सुविधा केंद्रांतील कर्मचाऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.

दरम्यान, महागाई वाढल्यानं व्याजाचे दर वाढले आहेत त्यामुळेच जगभरात सध्या आर्थिक मंदीची स्थिती असल्याच्या बातम्या यापूर्वीच आल्या आहेत. याचा फटका अनेक (Apple Layoffs) बड्या टेक कंपन्यांना बसला आहे. यामध्ये फेसबुकची पॅरेंट कंपनी मेटानं दोन टप्प्यात कर्मचारी कपात केली. पहिल्या टप्प्यात 11 हजार त्यानंतर त्यानंतर 10 हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकलं होतं.
तसेच गुगलने गेल्यावर्षी आपल्या 12 हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकलं होतं. कंपनीची आर्थिक परिस्थिती अधिक बिकट होण्यापूर्वीच हा निर्णय घेण्यात आल्याचं कंपनीनं (Apple Layoffs) म्हटलं आहे. त्याचबरोबर अॅमेझॉननं 27 हजार कर्मचाऱ्यांची दोन टप्प्यात कपात केली होती. पहिल्या टप्प्यात 18 हजार कर्मचारी तर दुसऱ्या टप्प्यात 9 हजारकर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली होती.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com