CRPF Recruitment 2023 : 10वी पाससाठी भारतातील सर्वात मोठी भरती!! CRPFमध्ये तब्बल सव्वा लाखाहून अधिक पदे भरणार

करिअरनामा ऑनलाईन । सेंट्रल रिझर्व्ह पोलीस दलात देशातील (CRPF Recruitment 2023) सर्वात मोठी भरती होणार आहे. केंद्र सरकारने जाहीर केल्यानुसार आता केंद्राच्या विविध खात्यात मेगाभरती सुरू करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून CRPFमध्ये तब्बल सव्वा लाखाहून अधिक पदे भरण्यात येणार आहेत. या पदभरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

सेंट्रल रिझर्व्ह पोलीस दलात देशातील सर्वात मोठी भरती होणार आहे. CRPFमध्ये कॉन्स्टेबलची दीड लाख पदे भरण्यात येणार आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबतचं नोटिफिकेशन जारी केलं आहे.

संस्था – केंद्रीय राखीव पोलिस दल
भरले जाणारे पद – कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)
पद संख्या – 1,29,929 पदे
महिला – 4667 पदे
पुरुष – 1,25,262 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
मिळणारे वेतन –  21,700/- ते 69,100/- रुपये दरमहा  पगार मिळणार आहे.
वय मर्यादा – (CRPF Recruitment 2023)
1. 18 ते 23 वर्षे
2. SC आणि ST कॅटेगरीतील उमेदवारांच्या वय मर्यादेत 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
3. ओबीसी उमेदवारांच्या वयोमर्यादेत तीन वर्षाची सूट देण्यात आली आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
उमेदवारांनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली असणं आवश्यक आहे. किंवा त्या समकक्ष शैक्षणिक पात्रता असायला हवी. निवड प्रक्रिया –
1. फिजिकल आणि मेडिकल टेस्ट
2. फिजिकल एफिसेन्सी टेस्ट
3. लेखी परीक्षा (CRPF Recruitment 2023)

अग्नीवीरांनाही मिळणार संधी –
या भरतीसाठी माजी अग्नीवीर जर नोकरीसाठी अर्ज करत (CRPF Recruitment 2023) असतील तर त्यांना शारीरिक पात्रता चाचणीला सामोरे जावं लागणार आहे. केंद्र सरकारने यापूर्वीच केंद्रातील रिक्त पदे भरणार असल्याचं जाहीर केलं होतं. तसेच या पदांच्या नियुक्तीच्या नोटिफिकेशन काढणार असल्याचंही सांगितलं होतं. त्यानुसारच CRPFच्या भरतीची नोटिफिकेशन काढण्यात आली आहे.
काही महत्वाच्या लिंक्स – (CRPF Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – crpf.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com