Medical Sector : मेडिकल क्षेत्रात करिअर करण्यासाठी ‘हे’ कोर्स करा; मिळेल लाखोंचं पॅकेज

करिअरनामा ऑनलाईन । मेडिकल अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी (Medical Sector) दरवर्षी राष्ट्रीय स्तरावर NEET ची परीक्षा घेतली जाते. जे विद्यार्थी या  प्रवेश परीक्षेत यशस्वी होऊ शकले नाहीत त्यांनी निराश होण्याची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला असे काही मेडिकल कोर्सेस सांगणार आहोत जे तुम्ही NEET परीक्षा न देताही करू शकता. चला तर मग जाणून घेऊया काही कोर्सविषयी…

1. B.Sc नर्सिंग- हा अभ्यासक्रम चार वर्षांच्या कालावधीत पूर्ण करता येतो. कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला 3 ते 8 लाखांचे पॅकेज मिळू शकते.
2. B. फार्मा- या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना चार (Medical Sector) वर्षे अभ्यास करावा लागेल. 2-5 लाखांपर्यंतचे वार्षिक पॅकेज मिळू शकते.
3. B.Sc बायोटेक्नॉलॉजी- B.Sc बायोटेक्नॉलॉजी हा तीन वर्षांचा अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे, हा कोर्स पूर्ण करून, उमेदवार दरवर्षी 3 ते 4 लाखांपर्यंत कमवू शकतात.
4. मायक्रोबायोलॉजीमध्ये B.Sc- (Medical Sector) हा देखील तीन वर्षांचा पदवीपूर्व कार्यक्रम आहे, तो पूर्ण केल्यानंतर, तुम्हाला वार्षिक 3-4 लाखांपर्यंत पॅकेज मिळू शकते.

5. B.Sc in Cardiovascular Technology- हा तीन वर्षांचा कोर्स केल्यानंतर आयुष्याला चांगले करिअरचे पर्याय मिळतात आणि पगारही चांगला मिळतो.
6. B.Sc in Nutrition- हा तीन वर्षांचा अंडरग्रॅज्युएट कोर्स केल्यानंतर वर्षाला तीन लाखांपर्यंतचे पॅकेज मिळू शकते.
7. बीएससी इन जेनेटिक्स- जेनेटिक्समध्ये तीन वर्षांचा कोर्स केल्यानंतर, तुम्हाला वार्षिक 5 लाखांपर्यंतचे पॅकेज मिळू शकते.

8. बायोमेडिकलमध्ये B.Sc- बायोमेडिकलचा हा 4 वर्षांचा कोर्स केल्यानंतर, व्यक्तीला वार्षिक 4 लाखांपर्यंत पगार मिळू शकतो.
9. सायबर फॉरेन्सिकमध्ये B.Sc- हा अभ्यासक्रम (Medical Sector) पूर्ण करण्यासाठी तीन वर्षे लागतात आणि अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर वेतन 5 ते 7 लाखांपर्यंत असू शकते.
10. बॅचलर इन फिजिओथेरपी- हा चार वर्षांचा कोर्स आहे, जो पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना 5 लाखांपर्यंत वार्षिक पगार मिळू शकतो.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com