Home Blog Page 330

Pune University Recruitment : शिक्षण फक्त 5 वी अन् पुण्यात ‘या’ संस्थेत नोकरीची संधी; ऑनलाईन करा APPLY

Pune University Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । कमी शिक्षण झालेल्या पण (Pune University Recruitment) नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत जनरल हाउसकीपर, कार्यालयीन सहाय्यक, कार्यालय संचालन कार्यकारी पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. मुख्य म्हणजे या भरतीसाठी केवळ 5 वी ते 12 वी पास उमेदवार अर्ज करू शकतात.
संस्था – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
भरली जाणारी पदे –
1. जनरल हाउसकीपर – 02 पदे
2. कार्यालयीन सहाय्यक – 03 पदे
3. कार्यालय संचालन कार्यकारी – 02 पदे
पद संख्या – 07 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Pune University Recruitment)
1. जनरल हाउसकीपर – 5th Pass
2. कार्यालयीन सहाय्यक – 8th Pass
3. कार्यालय संचालन कार्यकारी – 12th Pass
मिळणारे वेतन –
1. जनरल हाउसकीपर Rs. 5,000.00/- ते  20,000.00/- दरमहा
2. कार्यालयीन सहाय्यक Rs. 5,000.00/- ते 20,000.00/- दरमहा (Pune University Recruitment)
3. कार्यालय संचालन कार्यकारी Rs. 7,000.00/- ते 20,000.00/- दरमहा

असा करा अर्ज –
1. सर्वप्रथम Apprenticeship India च्या अधिकृत संकेतस्थळ @apprenticeshipindia.gov.in ला भेट द्या किंवा खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
2. त्यानंतर Register यावर क्लिक करा. (Pune University Recruitment)
3. तुमचे नाव, पत्ता, शैक्षणिक पात्रता व इतर महत्वाचा तपशील प्रविष्ट करा.
4. त्यानंतर Location/University नुसार पद शोध किंवा वर दिलेल्या डायरेक्ट लिंक वर क्लिक करा.
5. Apply for this Opportunity वर क्लिक करा.
6. अर्ज सबमिट करा.

काही महत्वाच्या लिंक्स – (Pune University Recruitment)
अधिकृत वेबसाईट – www.unipune.ac.in
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा –
1. जनरल हाउसकीपर- APPLY

2. कार्यालयीन सहाय्यक – APPLY
3. कार्यालय संचालन कार्यकारी – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Success Story : IAS म्हणजे काय माहित नव्हतं…आजोबांचं ऐकलं अन् अपराजिताने क्रॅक केली UPSC

Success Story IAS Aparajita Sharma

करिअरनामा ऑनलाईन । देशातील अनेक तरुणांचे आयएएस (Success Story) अधिकारी होण्याचे स्वप्न आहे. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून ते अधिकारी होण्यापर्यंतचा सर्वच तरुणांचा प्रवास खडतर असतो. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी ही परीक्षा देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे.
दरवर्षी लाखो उमेदवार या परीक्षेची तयारी करतात, परंतु केवळ काही नशीबवान उमेदवारांनाच या परिक्षेत यश मिळतं;  त्यापैकी एक आहे अपराजिता शर्मा. या तरुणीने आपली नोकरी पणाला लावली आणि यूपीएससीची तयारी केली. कोण आहे अपराजिता शर्मा, जिने आपल्या आजोबांचे एकमेव स्वप्न पूर्ण केले; हे आज आपण पाहणार आहोत…

Success Story IAS Aparajita Sharma

वडील IRS तर आई प्रोफेसर (Success Story)
सकाळी 9 ते संध्याकाळी 5 अशी नोकरी करणाऱ्या अपराजिताला माहीत नव्हते की एक दिवस ती IAS अधिकारी होणार आहे. असं म्हणतात की जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं. असेच काहीसे अपराजिताच्या बाबतीत घडले. बनारसमध्ये वाढलेल्या अपराजिताने विज्ञान शाखेत बारावीचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर, प्रत्येक विद्यार्थ्याप्रमाणे तिने बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, रांची येथून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. अपराजिताचे वडील सेवानिवृत्त आयआरएस अधिकारी आणि आई प्राध्यापक आहे.

Success Story IAS Aparajita Sharma

आजोबांचे स्वप्न केले पूर्ण
जेव्हा एखादी व्यक्ती आपले ध्येय गाठण्यासाठी झोकून देते तेव्हा काम करण्यात अधिक मजा येते. अपराजिताच्या बाबतीतही तेच झालं. पहिल्यांदाच अपराजिताच्या (Success Story) आजोबांनी तिला IAS होण्यासाठी प्रोत्साहन दिले. IAS म्हणजे काय याबाबत अपराजिताला अजिबात कल्पना नव्हती. ती मोठी झाल्यावर तिला आयएएसची ओळख पटली. तीच्या नानांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अपराजिताने ठरवले होते की ती आता IAS अधिकारी होणार आहे.

Success Story IAS Aparajita Sharma

कंपनी सोडून पूर्णवेळ अभ्यास
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अपराजिताला नोकरी लागली होती. एका बड्या कंपनीत ती काम करत होती. नोकरी करत असताना तीच्या डोळ्यात आयएएस होण्याची तळमळ होती आणि ती पूर्ण करण्यासाठी तिने नोकरी सोडली. आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत तिने रात्रंदिवस अभ्यास केला (Success Story) आणि तिला तीच्या मेहनतीचे फळ मिळाले. अपराजिताने 2017 मध्ये UPSC ने घेतलेल्या परीक्षेत संपूर्ण भारतातून 40 वा क्रमांक मिळवून आजोबांचे स्वप्न पूर्ण केले.

Success Story IAS Aparajita Sharma

अपराजिताचा तरुणांना सल्ला (Success Story)
‘यूपीएससीच्या मुलाखतीत कधीही खोटे बोलू नका’; असा सल्ला IAS अधिकारी अपराजिता शर्मा यांनी दिला आहे. कारण मुळखतीच्या पॅनेलवर बसलेले लोक अतिशय हुशार आणि तज्ज्ञ असतात. तुमची (Success Story) एखादी गोष्ट त्यांना लगेच समजेल. जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाचे उत्तर माहित नसेल तर तुम्हाला माहित नसलेले अचूक सत्य सांगा. ते तुमचे ज्ञान पाहत नाहीत तर तुमची प्रामाणिकता पाहतात.

 

Success Story IAS Aparajita Sharma

अशी करा सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी
अपराजिताने सांगितले की नागरी सेवांची तयारी करताना जास्त सोर्सेसवर अवलंबून राहण्याची गरज नाही. त्याऐवजी मर्यादित सोर्सेसचा आधार घ्या. तसेच वाचलेल्या (Success Story) साहित्याचा पुन्हा पुन्हा अभ्यास करा, जेणेकरुन प्रत्येक विषयावरील पकड मजबूत करता येईल. नागरी सेवांचा अभ्यासक्रम नीट समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. अभ्यास करताना काय वाचावे आणि काय वाचू नये हे खूप महत्वाचे आहे. अभ्यासाची योग्य रणनिती आखून कठीण वाटणाऱ्या विषयांची तयारी करणं महत्वाचं आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

DBSKKV Recruitment 2023 : कृषी पदवीधरांसाठी राज्यातील ‘या’ विद्यापीठात नोकरीची संधी; इथे पाठवा अर्ज

DBSKKV Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण (DBSKKV Recruitment 2023) कृषी विद्यापीठ, रत्नागिरी येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रक्षेत्र सहाय्यक पदांच्या एकूण 5 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 एप्रिल 2023 आहे.

संस्था – डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, रत्नागिरी
भरले जाणारे पद – प्रक्षेत्र सहाय्यक
पद संख्या – 05 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (DBSKKV Recruitment 2023)
1. उमेदवार हा कृषी पदविका / कृषी पदविधर असावा.
2. MS-CIT/ CCC संगणकीय हाताळणी कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
3. विद्यापीठ प्रक्षेत्रावरील तसेच कार्यालयीन कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

वय मर्यादा – 38 वर्षे [अनुसूचित जाती /जमाती – नियमानुसार सूट]
परीक्षा फी – फी नाही
मिळणारे वेतन – 15,000/- रुपये दरमहा (DBSKKV Recruitment 2023)

नोकरी करण्याचे ठिकाण – रत्नागिरी (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 एप्रिल 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. संचालक मध्यवर्ती संशोधन केंद्र, वाकवली, प्रशासकीय कार्यालय, दापोली, जिल्हा – रत्नागिरी, पिन – 415711

काही महत्वाच्या लिंक्स – (DBSKKV Recruitment 2023)
अधिकृत वेबसाईट – https://dbskkv.org/
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : सूर्याच्या किरणांमध्ये किती रंग असतात? सावली नसलेल्या वस्तूचे नाव सांगा? पहा Tricky प्रश्नांची उत्तरे

GK Updates 9 Apr.

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

1. प्रश्न: जिल्हा गॅझेटियर म्हणजे काय? (GK Updates)
उत्तर : इंग्रजांच्या काळापासून हा अहवाल दरवर्षी तयार केला जायचा, त्यात संपूर्ण जिल्ह्याच्या नोंदी ठेवल्या जायच्या.
2. प्रश्न: सूर्याच्या किरणांमध्ये किती रंग असतात?
उत्तरः सात रंग.
3. प्रश्न: जर एखाद्या मुलाने मुलीला प्रपोज केले तर ते गुन्ह्याच्या कक्षेत येईल का?
उत्तर: नाही, कारण आयपीसीच्या कोणत्याही कलमात, प्रस्ताव मांडणे गुन्हा म्हणून वर्गीकृत केलेले नाही.
4. प्रश्न: मानवी डोळ्याचे वजन किती आहे?
उत्तर: डोळ्याचे वजन फक्त आठ ग्रॅम आहे.
5. प्रश्न: (GK Updates) कोणता प्राणी असा आहे की त्याचे डोके कापल्यानंतरही तो बरेच दिवस जगू शकतो?
उत्तर: झुरळ.

6. प्रश्न: भारतातील सर्वात महागडे शहर कोणते आहे?
उत्तर : मुंबई.
7. प्रश्न: पेट्रोल पंपावर कपडे कसे घालू नयेत?
उत्तर: सिंथेटिक कपडे
8. प्रश्न: रेल्वेमध्ये बसवलेल्या W/L बोर्डचा अर्थ काय आहे? (GK Updates)
उत्तर: जिथे W/L बोर्ड बसवलेले असतात, तिथे ड्रायव्हरला हॉर्न वाजवावा लागतो.
9. प्रश्न: सावली नसलेल्या वस्तूचे नाव सांगा?
उत्तर: रस्ता.
10. प्रश्न: असे काय आहे जे महासागरात तयार होते आणि तुमच्या घरात राहते?
उत्तर: मीठ. (GK Updates)
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Knowledge : UPSC परीक्षा देशात कधी सुरु झाली? कोण होते देशातील पहिले IAS अधिकारी? जाणून घ्या….

UPSC Knowledge

करिअरनामा ऑनलाईन । यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेच्या निकालाची (UPSC Knowledge) दरवर्षी देशभर चर्चा होते. जेव्हा जेव्हा निकाल जाहीर केला जातो तेव्हा सहसा प्रत्येकाला हे जाणून घ्यायचे असते की कोणत्या राज्यातून आणि कोणत्या पार्श्वभूमीतून उमेदवार या परीक्षेत यशस्वी झाले आहेत. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की या परीक्षेत सर्वात आधी  कोणाला यश मिळाले? देशातील पहिले IAS अधिकारी कोण होते? यासोबतच पहिली UPSC परीक्षा कधी सुरू झाली? चला तर मग.. आज आपण याबाबतीत सविस्तर जाणून घेऊया…
इंग्रजांनी सुरू केली UPSC
सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा सर्वप्रथम इंग्रजीतून सुरू झाली. 1855 मध्ये इंग्रजांनी ही परीक्षा सुरु केली, तोपर्यंत ही सेवा बहुतेक ब्रिटिश सरकारच्या मालकीची होती.

UPSC Knowledge

भारतात 1922 मध्ये पहिल्यांदा घेतली परीक्षा (UPSC Knowledge)
देशातील सर्वोच्च प्रशासकीय पदांवर सेवा करण्याची संधी देणारी केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC ची नागरी सेवा परीक्षा (CSE) 1922 मध्ये देशात सुरू झाली. पूर्वी ही परीक्षा ‘इंडियन इम्पीरियल सर्व्हिस’ म्हणून ओळखली जात होती. मात्र, नंतर ही परीक्षा ‘संघ लोकसेवा आयोग’ म्हणून ओळखली जाऊ लागली.
सत्येंद्रनाथ टागोर पहिले भारतीय IAS
देशातील पहिल्या IAS अधिकाऱ्याचे नाव सत्येंद्रनाथ टागोर होते. सत्येंद्र नाथ हे कोलकात्याचे होते. ते प्रेसिडेन्सी कॉलेजचे विद्यार्थी होते. सत्येंद्रनाथ यांच्या पत्नी जनांदनी (UPSC Knowledge) टागोर, मुलगा सुरेंद्र नाथ टागोर आणि मुलगी इंदिरा देवी असा त्यांचा परिवार होता.

 

UPSC Knowledge

टागोर हे कोलकात्याचे होते
भारतात पहिल्यांदाच UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन IAS झालेले सत्येंद्र नाथ टागोर हे कवीही होते. बंगाली आणि इंग्रजी भाषेतही त्यांनी अनेक पुस्तके (UPSC Knowledge) लिहिली. सत्येंद्रनाथ टागोर यांचा जन्म 1 जून 1842 रोजी कोलकाता येथे झाला. सत्येंद्रनाथ टागोर हे रवींद्रनाथ टागोरांचे मोठे बंधू होते. सत्येंद्रनाथ टागोर यांच्यानंतर आणखी चार भारतीयांनीही या परीक्षेत यश मिळवले.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MBA CET Exam : एमबीए सीईटी आता 27 एप्रिलला; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

MBA CET Exam

करिअरनामा ऑनलाईन । परीक्षेदरम्यान आलेल्या विविध तांत्रिक (MBA CET Exam) कारणांमुळे एमबीए सीईटी देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) आणखी एक संधी दिली आहे. ही परीक्षा आता 27  एप्रिल 2023 रोजी होणार असून, त्यासाठी विद्यार्थ्यांनी 11 एप्रिल 2023 पर्यंत अर्ज करणे आवश्‍यक आहे.
राज्य सीईटी सेलमार्फत MBA अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 25 आणि 26 मार्च रोजी राज्यभरात ऑनलाइन पद्धतीने सीईटी परीक्षा घेण्यात आली. राज्यातील 191 केंद्रांवर ही सीईटी झाली. मात्र पहिल्याच दिवशी तांत्रिक कारणामुळे काही विद्यार्थ्यांना सीईटी देता आली नाही. काही ठिकाणी (MBA CET Exam) सर्व्हर डाऊन झाल्याने परीक्षेची यंत्रणाच बंद पडली होती. त्यामुळे एमबीए सीईटी पुन्हा एकदा घ्यावी, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून करण्यात आली होती.

पालक आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारींची दखल घेत राज्य सीईटी सेलने चौकशी समिती नेमली होती. सीईटीच्या सर्व तक्रारींची शहानिशा करीत चौकशी समितीने दिलेल्या अहवालानुसार (MBA CET Exam) एमबीएची पुन्हा एकदा सीईटी घेण्याचा निर्णय झाला. त्यानुसार, विद्यार्थ्यांना 11 एप्रिलपर्यंत पुनर्परीक्षेसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यांची परीक्षा 27 एप्रिल रोजी सकाळी 9 ते 11:30 या वेळेत घेण्यात येणार असल्याचे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे. याबाबत अधिक माहिती सीईटी सेलच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Ordnance Factory Recruitment : इंजिनियर्ससाठी मोठी अपडेट!! सरकारच्या ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये भरती सुरु; लगेच करा APPLY

Ordnance Factory Recruitment (1)

करिअरनामा ऑनलाईन । ऑर्डनन्स फॅक्टरी, चंद्रपूर येथे रिक्त (Ordnance Factory Recruitment) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ग्रॅज्युएट अप्रेंटीस, टेक्निशियन अप्रेंटीस ही पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2023 आहे.

संस्था – ऑर्डनन्स फॅक्टरी, चंद्रपूर
भरले जाणारे पद – (Ordnance Factory Recruitment)
1. ग्रॅज्युएट अप्रेंटीस
2. टेक्निशियन अप्रेंटीस
पद संख्या – 76 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –
1. उमेदवार अभियांत्रिकी/तंत्रज्ञानातील अंतिम वर्षाची पदवी किंवा सामान्य प्रवाहातील पदवी (म्हणजे विज्ञान, वाणिज्य, संगणक अनुप्रयोग) पदवी आणि एखाद्या राज्याच्या मान्यताप्राप्त विद्यापीठ/तंत्रशिक्षण मंडळाकडून अभियांत्रिकी/तंत्रज्ञान डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक. (Ordnance Factory Recruitment)
2. पात्रता प्राप्त झाल्यानंतर एक वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधीचा प्रशिक्षण किंवा नोकरीचा अनुभव नसावा.
3. पदवी/डिप्लोमा प्राप्त केल्यानंतर 2 वर्षांपेक्षा जास्त कालावधी पूर्ण केलेला नसावा.
मिळणारे स्टायपेंड – 8000/- ते 9000/- रुपये दरमहा

आवश्यक कागदपत्रे –
1. Resume (Ordnance Factory Recruitment)
2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
3. शाळा सोडल्याचा दाखला
4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
6. पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक, आयुध निर्माणी चांदा, चंद्रपूर 442501
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – http://www.ofhss.ednl.in/
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : 10वी पाससाठी सरकारी नोकरी!! दक्षिणी कमांड अंतर्गत पुण्यात होतेय भरती; इथे पाठवा अर्ज

Job Notification (36)

करिअरनामा ऑनलाईन । मुख्यालय दक्षिणी कमांड, पुणे येथे रिक्त (Job Notification) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सिव्हिलियन स्विच बोर्ड ऑपरेटर ग्रेड-II, गट ‘क’ हे पद भरले जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2023 आहे.
संस्था – मुख्यालय दक्षिणी कमांड, पुणे (Headquarters Southern Command, Pune)
भरले जाणारे पद – सिव्हिलियन स्विच बोर्ड ऑपरेटर ग्रेड-II, गट ‘क’
पद संख्या – 78 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 मे 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (Job Notification)
1. उमेदवाराने 10 वी किंवा समतुल्य शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
2. खाजगी शाखा एक्सचेंज (PBX) बोर्ड हाताळण्यात प्रवीणता असणं आवश्यक आहे.
3. इंग्रजी आणि हिंदी भाषांचं ज्ञान असणं आवश्यक आहे.
4. अनुभव असल्यास प्राधान्य.

मिळणारे वेतन – 21,700/- रुपये दरमहा
आवश्यक कागदपत्रे –
1. Resume (Job Notification)
2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
3. शाळा सोडल्याचा दाखला
4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
6. पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठी पत्ता –
प्रभारी अधिकारी, दक्षिण कमांड सिग्नल रेजिमेंट, पुणे (महाराष्ट्र) पिन – 411001
काही महत्वाच्या लिंक्स – (Job Notification)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://indianarmy.nic.in/ 
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Success Story : या हँडसम व्यक्तीला एकेकाळी भंगार विक्रेता व्हायचं होतं; नशीब बदललं आणि थेट झाले IAS

UPSC Success Story IAS Deepak Rawat

करिअरनामा ऑनलाईन । भारतात दरवर्षी हजारो विद्यार्थी नागरी सेवा (UPSC Success Story) परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात.  परंतु काही मोजकेच तरुण ही परीक्षा पास करतात. UPSC परीक्षा देणाऱ्या सर्व उमेदवारांची अभ्यासाची स्वतःची वेगळी रणनीती असते आणि असे फार कमी विद्यार्थी असतात ज्यांनी आखलेली रणनिती परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात प्रभावी ठरते. असं म्हटलं जातं की आयुष्य तुम्हाला कुठे घेऊन जाईल हे कोणालाही ठाऊक नाही आणि ही बाबा IAS दीपक रावत यांच्याशी अगदी जुळते.
IAS दीपक रावत यांच्याबद्दल (UPSC Success Story)
24 सप्टेंबर 1977 रोजी जन्मलेले दीपक रावत मूळचे बारलोगंज, मसुरी, उत्तराखंडचे आहेत. त्यांनी आपले शालेय शिक्षण सेंट जॉर्ज कॉलेज, मसुरी येथे पूर्ण केले आणि दिल्ली विद्यापीठाच्या हंसराज कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून राज्यशास्त्र आणि एमफिलमध्ये त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले.

 

UPSC Success Story IAS Deepak Rawat

वडिलांनी पॉकेटमनी देणं केलं बंद
दीपक रावत जेव्हा 24 वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना स्वतः पैसे कमवायला सांगितले आणि त्यांना पॉकेटमनी देणं बंद केलं. JNU मधून एमफिल केलेल्या (UPSC Success Story) रावत यांची 2005 मध्ये JRF साठी निवड झाली जिथे त्यांना दरमहा 8000 रुपये मिळू लागले त्यामुळे त्यांना खर्च भागवण्यास मदत झाली.

 

UPSC Success Story IAS Deepak Rawat

UPSC चे पहिले दोन प्रयत्न अयशस्वी
दीपक यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. बिहारमधील काही विद्यार्थी UPSC ची तयारी करत होते ते रावत यांना भेटले. या मित्रांमुळे दीपक यांना या क्षेत्रात रस निर्माण झाला आणि त्यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. दुर्दैवाने पहिल्या दोन प्रयत्नात त्यांना यश मिळाले नाही. पण त्यांनी हार मानली नाही आणि कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयाने त्यांनी तिसऱ्या प्रयत्नात (UPSC Success Story) यशस्वीरित्या परीक्षा उत्तीर्ण केली. यावेळी त्यांची IRS अधिकारी म्हणून निवड झाली. त्यांचं समाधान होत नव्हतं. त्यांनी पुन्हा परीक्षेची तयारी केली आणि त्यांना नेहमीच हवे असलेले IAS पद त्यांनी मिळवले. दीपक रावत यांनी 2007 मध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांनी संपूर्ण भारतातून 12 वी रॅंक मिळवली आहे. उत्तराखंड कॅडरचा IAS अधिकारी बनल्यानंतर त्यांनी लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीमध्ये प्रशिक्षण पूर्ण केले.

UPSC Success Story IAS Deepak Rawat

बनायचं होतं भंगार विक्रेता (Ragman)
दीपक जेव्हा 11वी-12वीच्या वर्गात शिकत होते तेव्हा बहुतेक विद्यार्थी अभियांत्रिकी किंवा संरक्षण क्षेत्रात जाण्याची तयारी करत होते. पण दीपक यांना प्लॅस्टिक कॅन, टूथपेस्टच्या रिकाम्या नळ्या इत्यादी गोष्टींमध्ये रस होता. जर तुम्ही IAS अधिकारी बनला नसता तर तुम्ही करिअर (UPSC Success Story) म्हणून काय निवडले असते? या प्रशावर ते म्हणतात; “मी UPSC अधिकारी झालो नसतो तर मी ‘कबाडीवाला’ म्हणजेच भंगार विक्रेता (Ragman) होणं पसंत केलं असतं.” दीपक रावत यांना वाटले की कबाडीवाला बनल्याने त्यांना विविध गोष्टी शोधण्याची संधी मिळाली असती.

UPSC Success Story IAS Deepak Rawat

IAS दीपक रावत यांच्या पोस्टिंग
दीपक रावत यांनी बागेश्वरचे जिल्हा दंडाधिकारी, कुमाऊ मंडल विकास निगम, उत्तराखंडचे 2011 ते 2012 या कालावधीत व्यवस्थापकीय (UPSC Success Story) संचालक, 2014 ते 2017 पर्यंत नैनितालचे जिल्हा दंडाधिकारी, 2017 पासून हरिद्वारचे जिल्हा दंडाधिकारी आणि 2017 पासून त्यांच्यावर कुंभकधीचा कार्यभार सोपवला होता. 2021 मध्ये MD-PTCU, MD-UPCL, आणि संचालक-उत्तराखंड रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी (UREDA) म्हणून आणि सध्या कुमाऊँचे आयुक्त म्हणून ते कार्यरत आहेत.

UPSC Success Story IAS Deepak Rawat

सोशल मिडियावर असंख्य चाहते (UPSC Success Story)
दीपक रावत यांचे फेसबुकवर प्रचंड चाहते आहेत. त्याचे YouTube वर 4 दशलक्षाहून अधिक सदस्य आहेत आणि 14,000 हून अधिक लोक त्यांना ट्विटरवर फॉलो करतात.
किती मिळतो पगार
IAS सारखं प्रतिष्ठित पद आणि त्यासोबत मिळणारी ताकद पाहून आपल्यापैकी अनेकांना अजूनही प्रश्न पडतो की एक IAS अधिकारी किती पगार किती घेतात?” 7 व्या वेतन आयोगानुसार, IAS अधिकाऱ्याचे मूळ वेतन दरमहा 56,100 रुपये आहे. आयएएस अधिकार्‍यांचा पगार (UPSC Success Story) अनेक वर्षांच्या सेवेवर अवलंबून असतो आणि तो 1,50,000 पर्यंत वाढू शकतो. त्यामुळे आम्ही दीपक रावत यांचा पगार त्यांच्या वर्षांच्या सेवा आणि पदोन्नतीनुसार 1,50,000 ते 1,80,000 रुपये इतका असेल असा अंदाज लावला आहे.

UPSC Success Story IAS Deepak Rawat

विजया सिंगशी प्रेमविवाह
दीपक रावत यांनी विजया सिंगशी लग्न केले आहे ज्या न्यायिक सेवांमध्ये अधिकारी आहेत आणि दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट आहेत. हंसराज कॉलेजमध्ये शिकत असताना दीपक विजया यांना भेटले आणि दोघेही प्रेमात पडले. दोघांनाही एक मुलगी आणि एक मुलगा आहे.
IAS दीपक रावत या युवा पिढीसाठी प्रेरणा (UPSC Success Story) आहेत. त्यांनी आपल्या जीवनातील सर्व अडथळ्यांवर मात करून UPSC परीक्षेच्या तयारीसाठी पूर्ण समर्पण दिले आहे. दोन अयशस्वी प्रयत्नांनंतर UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. आयएएस अधिकारी झाल्यावर त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले. जीवनात कधीही हार मानू नका; स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा; तुम्ही तुम्हाला जे हवं ते मिळवाल; असा बोध दीपक रावत यांच्या जीवन प्रवासातून घेता येईल.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Jobs : ग्रॅज्युएट्ससाठी खुषखबर!! राज्याच्या पर्यटन संचालनालयात ‘या’ पदावर भरती

Government Jobs (33)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयात (Government Jobs) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राचार्य, वरिष्ठ प्राध्यापक, सहायक प्राध्यापक या पदांच्या एकूण 7 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2023 आहे.
संस्था – महाराष्ट्र शासन पर्यटन संचालनालय
भरली जाणारी पदे –
1. प्राचार्य (Principal)
2. वरिष्ठ प्राध्यापक (Sinior Professor)
3. सहायक प्राध्यापक (Assistant Lecturer)
पद संख्या – 07 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 एप्रिल 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (Government Jobs)
1. प्राचार्य – पोस्ट-ग्रॅज्युएशन/पूर्ण-वेळ पदवी/पूर्ण वेळ हॉटेल प्रशासनात तीन वर्षांचा डिप्लोमा पूर्ण केला असणं आवश्यक आहे.
2. वरिष्ठ प्राध्यापक – मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून आतिथ्य/पर्यटन किंवा एमबीए मध्ये पदव्युत्तर पदवीधर असणं आवश्यक आहे.
3. असिस्टंट लेक्चरर – पूर्णवेळ पदवी / हॉटेल प्रशासन / हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट / हॉटेल मॅनेजमेंट / हॉस्पिटॅलिटीमध्ये पूर्ण वेळ तीन वर्षांचा डिप्लोमा पूर्ण केला असणं आवश्यक आहे. (Government Jobs)

मिळणारे वेतन –
1. प्राचार्य – Rs. 1,00,000/- दरमहा
2. वरिष्ठ प्राध्यापक – Rs. 60,000/- दरमहा
3. सहायक प्राध्यापक – Rs. 30,000/- दरमहा
आवश्यक कागदपत्रे –
1. Resume (Government Jobs)
2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
3. शाळा सोडल्याचा दाखला
4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
6. पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्याचा पत्ता –
पर्यटन संचालनालय नरीमन भवन, 156/157, 15वा मजला, नरीमन पॉईंट, मुंबई-21

काही महत्वाच्या लिंक्स – (Government Jobs)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.maharashtratourism.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com