Home Blog Page 327

Government Megabharti : मोठी बातमी!! सरकारी नोकरीची प्रतिक्षा संपली; राज्य सरकारने 19 हजार पदांसाठी काढले भरतीचे आदेश

Government Megabharti

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष (Government Megabharti) मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात येत आहे. त्यानिमित्त राज्य सरकारने अनेक नव्या घोषणा केल्या आहेत. यातीलच एक महत्वाची घोषणा म्हणजे सरळसेवा कोट्यातील रिक्त असलेली 75 हजार पदे भरण्याची घोषणा. यातील 20 हजार रिक्त पदे भरण्यासाठी राज्य सरकारने याआधीच आदेश काढले होते. त्यापाठोपाठ आता पुन्हा 19 हजार पदे भरण्यासाठीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. ही सर्व पदे 15 ऑगस्ट 2023 पूर्वी भरण्यात येणार आहेत. या आदेशामुळे राज्यातील सुशिक्षित तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
ग्रामविकास विभागाचे उपसचिव विजय चांदेकर यांनी पदभरतीचे आदेश काढले आहेत. याबाबत त्यांनी राज्यातील जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना निर्देश दिले (Government Megabharti) आहेत. ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील आरोग्य व इतर विभागातील संवर्गांसाठी ही पदभरती करण्यात येणार आहे.

राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये गट-क मधील आरोग्य आणि इतर विभागांतील एकूण 18 हजार 939 पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी IBPS या कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून तसा सामंजस्य करार करण्यात आला आहे. या पदभरतीला जिल्हा परिषदांनी सर्वोच्च प्राथमिकता द्यावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत.
या पदासाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत दोन वर्षे शिथिलता देण्यात आली आहे. त्यानुसार सर्व जिल्हा परिषदांतील रिक्त पदांची बिंदुनामावली (Government Megabharti) अंतिम करण्याचे काम पूर्ण झाले आहे. परीक्षा आयोजनाबाबत कोणतीही दिशाभूल करणारी माहिती दिली जाऊ नये; अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
गेल्या चार वर्षापासून पदभरती झाली नाही. त्यामुळे तरुणाईमध्ये तीव्र असंतोष आहे. त्यामुळे सर्व जिल्हा परिषदांनी पदभरतीबाबत संक्षिप्त टिप्पणी तयार करावी. जिल्हा परिषदांनी आगामी परीक्षा घेण्याबाबतचे नियोजन करावे, तसेच, शंकानिरसन करण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक सुरु करावा. पदभरतीला प्राथमिकता देऊन यात कोणताही विलंब होणार नाही याची काळजी घ्यावी; असेही या स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IRCTC Recruitment 2023 : ग्रॅज्युएट्ससाठी विना परीक्षा थेट मुलाखत; भारतीय रेल्वेत ‘या’ पदावर भरती सुरु

IRCTC Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (IRCTC Recruitment 2023) उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडने (IRCTC)  हॉस्पिटॅलिटी मॉनिटर पदांच्या भरतीची अधिसूचना जारी केली आहे.  या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखत दिनांक 11, 17, 18, 25 एप्रिल आणि 9, 11, 12, 16 व 17 मे 2023 रोजी होणार आहे.

संस्था – भारतीय रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC)
भरले जाणारे पद –  हॉस्पिटॅलिटी मॉनिटर
पद संख्या – 70 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (IRCTC Recruitment 2023)
उमेदवाराचे B.Sc. (हॉस्पिटॅलिटी & हॉटेल एडमिनिस्ट्रेशन) किंवा BBA/MBA (कुलिनरी आर्ट्स) किंवा B.Sc. (हॉटेल मॅनेजमेंट & कॅटरिंग सायन्स) किंवा M.B.A (टूरिज्म & हॉटेल मॅनेजमेंट) पर्यंत शिक्षण झाले असणे आवश्यक. तसेच 02 वर्षे अनुभव असावा.

वय मर्यादा – 01 एप्रिल 2023 रोजी 28 वर्षांपर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी – फी नाही
मिळणारे वेतन – 30,000/- रुपये दरमहा
या व्यतिरिक्त, ट्रेनमधील ड्युटीसाठी दररोजचा भत्ता रु.350/-, रात्रीचा मुक्काम असल्यास बाहेरगावी निवासाचे शुल्क रु.240/- असेल. राष्ट्रीय सुट्ट्यांवर (IRCTC Recruitment 2023) काम करण्यासाठी, हॉस्पिटॅलिटी मॉनिटर्स कर्मचाऱ्यांना 384/- प्रति NH. वैद्यकीय विमा- रु. 800/- p.m.
नोकरी करण्याचे ठिकाण – निवडलेल्या उमेदवारांना पूर्वोत्तर राज्ये/पश्चिम बंगाल/बिहार आणि झारखंड राज्यात नियुक्त केले जाऊ शकते. तथापि, IRCTC च्या नियमानुसार उमेदवाराची भारतात कुठेही बदली/पोस्टिंग केली जाऊ शकते.

निवड प्रक्रिया – मुलाखत (IRCTC Recruitment 2023)
मुलाखतीची तारीख – 11, 17, 18, 25 एप्रिल आणि 9, 11, 12, 16 व 17 मे 2023
मुलाखतीचा पत्ता – खाली दिलेली PDF पहा.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.irctc.co.in/
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BSF Recruitment 2023 : 10 वी/12वी/ITI पाससाठी देशसेवेची मोठी संधी!! BSF अंतर्गत ‘या’ पदावर होणार नवीन भरती

BSF Recruitment 2023 (3)

करिअरनामा ऑनलाईन । सीमा सुरक्षा दल अंतर्गत विविध रिक्त (BSF Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर), हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक्स) या पदांच्या एकूण 247 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 22 एप्रिल 2023 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मे 2023 आहे.

संस्था – सीमा सुरक्षा दल (Border Security Force)
भरले जाणारे पद –
1. हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) – 217 पदे
2. हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक्स) – 30 पदे
पद संख्या – 247 पदे
वय मर्यादा – 18 ते 25 वर्षे (BSF Recruitment 2023)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 22 एप्रिल 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 मे 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (BSF Recruitment 2023)
1. हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) – 12th with 60% Marks in Physics, Chem, and Maths OR
10th + ITI Pass
2. हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक्स) – 12th with 60% Marks in Physics, Chem, and Maths OR
10th + ITI Pass
मिळणारे वेतन –
1. हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) Rs. 25,500- 81,100/- (Level-4)
2. हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक्स) Rs. 25,500- 81,100/- (Level-4)

असा करा अर्ज –
1. वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. पात्र उमेदवारांनी केवळ दिलेल्या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना वेबसाईटवर उपलब्ध आहेत. (BSF Recruitment 2023)
4. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
5. अर्ज 22 एप्रिल 2023 पासून सुरु होतील.
6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मे 2023 आहे.
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत
निवड प्रक्रिया –
1. Written Exam (BSF Recruitment 2023)
2. Physical Measurement Test (PMT)
3. Document Verification
4. Medical Examination

काही महत्वाच्या लिंक्स – (BSF Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा (अर्ज प्रक्रिया 22 एप्रिल 2023 पासून सुरु होईल) – APPLY

अधिकृत वेबसाईट – bsf.nic.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CAPF Recruitment : गृह खात्याचा ऐतिहासिक निर्णय!! आता ‘या’ 13 भाषांमध्ये देता येणार CAPF कॉन्स्टेबल परीक्षा; पहा कोणत्या?

CAPF Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकारने एक ऐतिहासिक (CAPF Recruitment) निर्णय घेतला आहे. गृह मंत्रालयाने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (Central Armed Police Forces) कॉन्स्टेबल पदांसाठी हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा घेण्यास मान्यता दिली आहे. हे नवीन भाषेचे स्वरूप जानेवारी 2024 पासून लागू होईल; असेही गृहमंत्रालयाने जाहीर केलं आहे. या निर्णयामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे.

या भाषांमध्ये देता येणार परीक्षा (CAPF Recruitment)
गृह मंत्रालयाच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे देशभरातील लाखो उमेदवारांना त्यांच्या मातृभाषेत किंवा प्रादेशिक भाषेत परीक्षा देता येणार आहे. या (CAPF Recruitment) निर्णयाअंतर्गत सीएपीएफ कॉन्स्टेबल पदासाठी आता मराठी, बंगाली, आसामी, गुजराती, पंजाबी, उर्दू, मल्याळम, कन्नड, तामिळ, तेलगू, ओडिया, मणिपुरी आणि कोकणी अशा एकूण 13 प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा देता येणार आहे.

गृहमंत्रालयाने याबाबत एक निवेदन जारी करत म्हंटल आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गृह मंत्रालयाने CAPF मध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पदांसाठी हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा घेण्यास मान्यता दिली आहे. CAPF मध्ये स्थानिक तरुणांची संख्या वाढवण्यासाठी आणि प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांच्या पुढाकाराने हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे असं गृह मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हंटल आहे. दरम्यान, गृह मंत्रालयाच्या या निर्णयामुळे स्थानिक तरुणांच्या नोकरीच्या संधी वाढणार आहेत.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Salary of Mukesh Ambani Employees : अबब!! मुकेश अंबानींचा शेफ आणि ड्रायव्हर घेतात ‘इतका’ पगार; आकडा ऐकून चक्रावून जाल

Salary of Mukesh Ambani Employees

करिअरनामा ऑनलाईन । जगातील अब्जाधीशांच्या टॉप (Salary of Mukesh Ambani Employees) लिस्टमध्ये असलेले मुकेश अंबानी कोणाला माहित नाहीत? असगी व्यक्ति शोधून सापडणार नाही. अंबानींची जगात ख्याती असली तरी त्यांच्या स्टाफबाबत अनेकांना माहिती नाही. श्रीमंत मुकेश अंबानी आपल्या घरातील स्टाफकडेही विशेष लक्ष देतात. ते त्यांच्या घरात काम करणाऱ्यांना चांगल्या पगाराशिवाय अनेक सोयी पुरवतात. एका व्हायरल व्हिडिओमध्ये दावा करण्यात आला होता की, मुकेश अंबानींच्या पर्सनल ड्रायव्हरची सॅलरी महिन्याला जवळपास 2 लाख रुपये होती. आता एका रिपोर्टनुसार मुकेश अंबानींच्या शेफला अर्थात त्यांच्या घरी जेवण बनवणाऱ्या व्यक्तीला एखाद्या आमदारापेक्षाही जास्त पगार मिळतो.

Salary of Mukesh Ambani Employees

अंबानींचा शेफ किती घेतो पगार (Salary of Mukesh Ambani Employees)
आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश अंबानींच्या शेफचा दर महिन्याचा पगार 2 लाख रुपये आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिल्लीतील आमदारांचं वेतन दर महिन्याला 90 हजार रुपये आहे. तर दुसरीकडे मुकेश अंबानींच्या स्टाफची कमाई आमदारांहून अधिक आहे. अंबानींच्या (Salary of Mukesh Ambani Employees) जास्तीत जास्त स्टाफची सॅलरी एकसारखीच आहे. अंबानींच्या काही स्टाफची मुलंही विदेशात शिक्षण घेत आहेत. स्टाफमधील काही लोकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी अंबानीही मदत करतात.

Salary of Mukesh Ambani Employees

अंबानी सॅलरीसह देतात इन्शुरन्स आणि एज्युकेशन अलाऊन्सही
मुकेश अंबानींना साधं जेवण आवडतं. ते शाकाहारी आहेत. अंबानी स्टॅनफोर्ड यूनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत होते, तेव्हापासून त्यांनी साध्या जेवणाला पसंती दिली आहे. अँटिलियामध्ये (Salary of Mukesh Ambani Employees) काम करणारा जवळपास प्रत्येक कर्मचारी चांगला पगार घेतो. मुकेश अंबानी त्यांच्या स्टाफला सॅलरीसह इन्शुरन्स आणि एज्युकेशन अलाउंसदेखील देतात. मुकेश अंबानींचा ड्रायव्हर किंवा शेफ होणं सोपं नाही. त्यासाठी अनेक परीक्षा पास कराव्या लागतात. काही परीक्षा दिल्यानंतरच पुढे त्यांची निवड केली जाते.

 

Salary of Mukesh Ambani Employees

ड्रायव्हरला वर्षाला 24 लाखाचं पॅकेज (Salary of Mukesh Ambani Employees)
एका रिपोर्टनुसार, अंबानींच्या ड्रायव्हरला महिन्याला 2 लाख पगारानुसार वर्षाला 24 लाख रुपये मिळतात. एका खासगी कॉन्ट्रॅंक्टिंग फर्मद्वारे अंबानी कुटुंबासाठी ड्रायव्हर्स ठेवले जातात अशी माहिती आहे. अंबानी कुटुंबात काम करणारे शेफ, ड्रायव्हर्ससह गार्ड्स आणि हाउसकिपिंग स्टाफ सर्वांना इतर भत्ते आणि इन्शुरन्सही दिला जातो. जगातील श्रीमंतांच्या यादीमध्ये टॉपला असलेल्या अंबानीच्या घरात काम करणारे कोट्यवधींची कमाई करतात. नीता अंबानींच्या मेकअप आर्टिस्टचा पगार देखील काही लाखात आहे. मोठी गोष्ट म्हणजे मुकेश अंबानींच्या काही कर्मचाऱ्यांची मुलं अमेरिकेत शिकतात.

 

Salary of Mukesh Ambani Employees

मुकेश अंबानी आपल्या कर्मचाऱ्यांच्या सुखसोयींची पूर्ण काळजी घेतात. मग तो त्यांचा ड्रायव्हर असो की त्यांच्यासाठी चांगले पदार्थ बनवणारा आचारी असो. अंबानी (Salary of Mukesh Ambani Employees) कुटुंबासाठी काम करणं ही खूप आनंदाची गोष्ट आहे. कारण अंबानी कुटुंबातील प्रत्येक सदस्य केवळ त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचीच नव्हे तर त्यांच्या घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही विशेष काळजी घेतात. त्यामुळेच अंबानी कुटुंबाच्या घरात नोकरी मिळाली तर तुमचं आयुष्य घडेल; असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

Salary of Mukesh Ambani Employees

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

High Court Recruitment : पात्रता फक्त 4 थी पास; मुंबई हाय कोर्टात ‘या’ पदावर भरती

High Court Recruitment (1)

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई उच्च न्यायालयात रिक्त पदांच्या (High Court Recruitment) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कूक पदाच्या एकूण 3 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी केवळ 4 थी पास उमेदवार अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मे 2023 आहे.

संस्था – मुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court)
भरले जाणारे पद – कूक/Cook
पद संख्या – 3 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (High Court Recruitment)
1. उमेदवार 4थी पास असणे आवश्यक आहे.
2. उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहीता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.
3. उमेदवाराकडे स्वयंपाकाचे पुरेसे ज्ञान व त्यासंबंधी अनुभव असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा –
1. कमीत कमी 18 वर्षे
2. जास्तीत जास्त 38 वर्षे (High Court Recruitment)
3. मागासवर्गीयांसाठी कमाल वय मर्यादा 43 वर्षे
4. न्यायालयीन कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी यांना वयाची अट नाही. त्यांनी त्यांच्या कार्यालयामार्फत अर्ज करणे आवश्यक आहे.

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 मे 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रबंधक (प्रशासन), मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद येथील खंडपीठ, जालना रोड, औरंगाबाद ४३१००९.

आवश्यक कागदपत्रे –
1. शैक्षणिक गुणपत्रक (उदा. ४थी, ७वी, १०वी, १२वी आणि पदवी इत्यादी).
2. जन्मतारखेचा दाखला (शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र) अथवा तत्सम
3. अधिकान्याने प्रदान केलेला जन्मतारखेचा पुरावा. (High Court Recruitment)
4. उमेदवार दिव्यांग असल्यास दिव्यांगत्वाचा दाखला.
5. जातीचा दाखला (मागासवर्गीयांसाठी).
6. स्वयंपाकाचा पुर्वानुभव असल्यास संबंधीत हॉटेल / केटरींग व्यावसायिकाने दिलेला दाखला.
7. विशेष पाककृती संबंधी प्राविण्याबाबतचा दाखला (असल्यास)
8. महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
9. विवाहित महिला उमेदवाराच्या बाबतीत, जर उमेदवाराने नाव बदलले असल्यास नाव बदलाबाबतचे दस्तऐवज उदा. शासकीय राजपत्र किंवा सक्षम प्राधिकरणाने जारी केलेल्या विवाह प्रमाणपत्राची प्रत इत्यादी. सेवायोजन कार्यालयात नोंदणी केली असल्यास, नोंदणी प्रमाणपत्राची प्रत.
10. विशेष अर्हता असल्याबाबतचा दाखला. (High Court Recruitment)
11. न्यायालय प्रशासनाने विचारल्यास इतर कोणतेही दस्तऐवज.
उमेदवारांनी अर्जासोबत मूळ दाखले/ कागदपत्रे जोडावीत – PDF पहा

काही महत्वाच्या लिंक्स – (High Court Recruitment)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 

Application Form – CLICK
अधिकृत वेबसाईट – bombayhighcourt.nic.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career Mantra : नोकरी देणारं शिक्षण!! परदेशात नोकरी मिळवण्यासाठी करा ‘हे’ कोर्स

Career Mantra (8)

करिअरनामा ऑनलाईन । सध्या तरुण पिढीची चांगली नोकरी (Career Mantra) मिळवण्यासाठी सतत धावाधाव सुरु असते. जागतिक मंदीच्या काळात नोकरी मिळवणं आणि ती टिकवणं म्हणजे तारेवरची कसरतच. आजकाल अनेक तरुण नोकरीविना बेरोजगार झाले आहेत. अशा वेळी तुम्ही तुमच्या करीअरबाबत काहीतरी वेगळा विचार करणे आवश्यक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काही सर्टिफिकेट कोर्सेस बद्दल सांगणार आहे, ते करूनही तुम्ही चांगली कमाई करू शकता. यापैकी तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार कोणताही कोर्स निवडू शकता.
विशेष म्हणजे हे सर्टिफिकेट कोर्स केल्यानंतर फक्त (Career Mantra) विद्यार्थीच नाही, तर व्यावसायिकांनाही या अभ्यासक्रमांच्या आधारे अधिक चांगली प्रगती करता येते. कारण हे कोर्स केल्यानंतर चांगली नोकरी मिळण्याची आणि नोकरीत बढती मिळण्याची शक्यता दाट होते. पाहूया काही सर्टिफिकेट कोर्सविषयी…

1. गूगल सर्टिफाइड प्रोफेशनल क्लाउड आर्किटेक्ट (Career Mantra)
तुम्हाला आयटी उद्योगात चांगली संधी निर्माण करायची असेल, तर गुगल सर्टिफाइड प्रोफेशनल क्लाउड आर्किटेक्ट सर्टिफिकेट कोर्स तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरेल. हा अभ्यासक्रम या विशाल क्षेत्रातील भारतातील सर्वोत्तम प्रमाणपत्र कार्यक्रमांपैकी एक आहे. दुसरीकडे, क्लाउड जॉब इंजिनिअर्सची प्रचंड मागणी आणि कमतरता यामुळे, तुम्हाला झटपट नोकरी मिळू शकते. या नोकरीतून तुम्हाला लाखोंचे पॅकेज मिळू शकते.
2. कंप्लीट इनवेस्टमेंट बैंकिंग कोर्स
ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर नोकरी शोधत असणाऱ्या तरुणांसाठी कंप्लीट इनवेस्टमेंट बैंकिंग कोर्स करणं फायद्याचं ठरू शकतं. या कोर्सच्या माध्यमातून तुम्ही गुंतवणूक (Career Mantra) बँकिंगमध्ये चांगले करिअर करू शकता.

3. आर्टिफिशियल इंटेलीजेंस
या सर्टिफिकेशन कोर्सद्वारे तुम्ही ऑटोमेशन, रोबोटिक्स, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर आणि प्रोग्राम्स बद्दल तपशील मिळवू शकता. हे केल्यानंतर आरोग्यसेवा, शिक्षण, बँकिंग, वाहतूक क्षेत्रात नोकरी मिळवण सहज सोपं होतं.
4. साइबर सिक्योरिटी
पदवीनंतर तुम्ही सायबर सिक्युरिटी कोर्स करू शकता. हे तंत्रज्ञान नेटवर्क आणि गोपनीय डेटाचे चोरीपासून संरक्षण करण्यासाठी वापरले जाते. हे अभ्यासक्रम (Career Mantra) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या स्वायत्त वैज्ञानिक संस्थेद्वारे चालवले जातात.

5. वेब डेव्हलपर
वेब डेव्हलपरचे काम वेबसाइट (Career Mantra) डिझाइन करणे आहे. आजकाल, कोणताही व्यवसाय, लहान किंवा मोठा, स्वतःच्या वेबसाइटशिवाय प्रगती करू शकत नाही. त्यामुळे वेब डेव्हलपर प्रोफाइल तुमच्या करिअरसाठी उत्तम पर्याय ठरू शकते.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

HAL Recruitment 2023 : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत ‘या’ पदांवर भरती; 1,80,00 पर्यंत पगार

HAL Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत (HAL Recruitment 2023) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून जनरल ड्युटी वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी/वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधीक्षक पदाच्या एकूण 9 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 मे 2023 आहे.
संस्था – हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड
भरले जाणारे पद – (HAL Recruitment 2023)
1. जनरल ड्युटी वैद्यकीय अधिकारी
2. वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी/वैद्यकीय अधीक्षक
3. वैद्यकीय अधीक्षक
पद संख्या – 09 पदे
वय मर्यादा – 45 वर्षे

अर्ज फी – Rs. 500/-
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 मे 2023
E-Mali ID – [email protected].
अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर (HAL Recruitment 2023)
भरतीचा तपशील –

HAL Bharti 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. General Duty Medical Officer – MBBS with minimum post qualification experience of 01 year.
2. Sr. Medical Officer/ Medical Superintendent – MBBS + Post Graduate Degree / DNB in Relevant Specialization. No experience is required for candidates with Post Graduate Degree OR MBBS + Post Graduate Diploma in Relevant Specialization with a minimum of 01-year post-qualification experience. (HAL Recruitment 2023)
3. Medical Superintendent – MBBS + Post Graduate Degree / DNB in Relevant Specialization
with a minimum of 03 years post-qualification experience OR MBBS + Post Graduate Diploma in Relevant Specialization with a minimum of 04 years post-qualification experience.

मिळणारे वेतन – (HAL Recruitment 2023)
1. General Duty Medical Officer – Rs. 40,000-3%-1,40,000
2. Sr. Medical Officer/ Medical Superintendent – Rs. 50,000-3%- 1,60,000/-
Rs. 60,000-3%-1,80,000/-
3. Medical Superintendent – Rs. 60000-3%- 180000

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. फक्त भारतीय नागरिक अर्ज करू शकतात.
3. उमेदवार वर दिलेल्या पत्त्यावर अर्ज करू शकतात. (HAL Recruitment 2023)
4. इच्छुक आणि पात्र उमेदवार HAL वेबसाइटवरून अर्ज डाउनलोड करू शकतात आणि परिशिष्ट-I नुसार
विहित नमुन्यात, रीतसर भरलेले अर्ज पाठवू शकतात.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 मे 2023 आहे.
6. देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
7. या भरतीकरिता अधिक माहिती hal-india.co.in या वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.

निवड प्रक्रिया – मुलाखत (HAL Recruitment 2023)
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 

अधिकृत वेबसाईट – hal-india.co.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Police Bharti 2023 : पोलीस भरती झालेल्या उमेदवारांचे ट्रेनिंग ‘या’ तारखेपासून; 8 हजार नव्या पोलिसांचा समावेश

Police Bharti 2023 (5)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात सर्वत्र पोलिस भरती सुरु (Police Bharti 2023) आहे. सर्व जिल्ह्यांमधून 14 हजार 956 पोलिस शिपाई व चालक पदांची भरती होणार आहे. मुंबई वगळता उर्वरित सर्वच जिल्ह्यांमधील उमेदवारांची मैदानी व लेखी परीक्षा पार पडली आहे. पण, एकाचवेळी भरती होऊनही उमेदवारांना नेमणूक वेगवेगळ्या वर्षांत मिळणार आहे. त्यांचे प्रशिक्षण दोन टप्प्यात होणार आहे. येत्या 1 जुलैपासून 8 हजार उमेदवारांचे प्रशिक्षण सुरु होईल. पुढच्या टप्प्यात मुंबईतील 6 हजार 740 उमेदवारांचे प्रशिक्षण सुरु होईल.
गृह विभागात सद्य:स्थितीत 25 हजारांवर पदे रिक्त आहेत. आता त्यातील जवळपास 15 हजार पदे भरली जात आहेत. त्यातही पोलिस प्रशिक्षण केंद्रांची संख्या मर्यादित असल्याने दोन टप्प्यात उमेदवारांना प्रशिक्षण पूर्ण करावे लागणार आहे.

मुंबईतील 6 हजार 740 जागांसाठी तब्बल सात लाख उमेदवारांचे अर्ज आले आहेत. अजूनही मैदानी चाचणी संपलेली नाही. तत्पूर्वी, सर्वच जिल्ह्यातील उमेदवारांची मैदानी व लेखी परीक्षा संपली आहे. चालक पदांचा निकाल देखील जाहीर झाला असून आता काही दिवसांत शिपायांचाही निकाल (Police Bharti 2023) लागेल. त्यांचे प्रशिक्षण 1 जुलैपासून राज्यातील 10 प्रशिक्षण केंद्रांवर सुरु होईल. नऊ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या उमेदवार त्याठिकाणी जातील. तत्पूर्वी, पोलिस प्रशिक्षण केंद्रांची क्षमता साडेसहा हजारांवरून आठ हजारांपर्यंत वाढवली आहे. त्यात सोलापूर, नाशिकसह इतर पोलिस प्रशिक्षण केंद्रांचा समावेश आहे.
1 जुलैपासून सुरु होणार पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण
मुंबईतील पोलिस भरती होणाऱ्या उमेदवारांचे प्रशिक्षण दुसऱ्या टप्प्यात होईल. तत्पूर्वी, राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील उमेदवारांचे प्रशिक्षण 1 जुलैपासून सुरु करण्याचे (Police Bharti 2023) नियोजन आहे. राज्यातील दहा प्रशिक्षण केंद्रांमध्ये 8 हजार उमेदवार प्रशिक्षण पूर्ण करतील, अशी व्यवस्था केली आहे.

अनेक जिल्ह्यात महिला पोलिसांना करावी लागते अतिरिक्त ड्यूटी
कुटुंब आणि नोकरी, अशा दुहेरी भूमिकेतील महिला पोलिस अंमलदारांना आठ तासांची ड्यूटी करण्याचा निर्णय सव्वावर्षापूर्वी झाला. पण, अजूनही निम्म्यापेक्षा जास्त शहर-जिल्ह्यात हा नियम लागू झालेला नाही. त्याला प्रमुख अडथळा म्हणजे अपुरे मनुष्यबळ हेच आहे. राज्यातील बहुतेक (Police Bharti 2023) शहरांचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून लोकसंख्या देखील वाढली आहे. गुन्ह्यांची संख्या दरवर्षी सरासरी 9 ते 10 टक्क्यांनी वाढत आहे. तरीपण त्यांचे वर्षातील 365 पैकी 200 हून अधिक दिवस बंदोबस्तातच जातात. पोलिस दलातील रिक्तपदांमुळे कामाचा ताण वाढला आहे. धक्कादायक बाब म्हणजे सद्य:स्थितीत 30 टक्क्यांपेक्षा जास्त पोलिस अधिकारी, अंमलदारांना रक्तदाब, मधुमेहचा त्रास आहे. सध्या पोलिस दलात झालेल्या नवीन भरतीमुळे पोलिसांवरील कामाचा ताण कमी होईल; असा विश्वास आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Dream 11 Recruitment : तरुणांसाठी गोल्डन चान्स!! Dream 11 देणार जॉब्स; असं असेल जॉब प्रोफाईल

Dream 11 Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । Dream 11 हे मोबाईल गेमिंग अ‍ॅप क्रिकेट (Dream 11 Recruitment) प्रेमींमध्ये चंगलच फेमस आहे. आता याच ड्रीम इलेव्हन कंपनीमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. मात्र कंपनी सध्या क्रिकेटसाठी नाही; तर दुसऱ्या विभागात उमेदवारांची भरती करत आहे. त्यासाठी त्यांनी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. ही कंपनी असोसिएट मॅनेजर व बिझनेस अ‍ॅनॅलिटिक्स या पदासाठी अनुभवी उमेदवारांच्या शोधात आहे.
Dream 11 च्या मुंबई ऑफिससाठी ही भरती होणार आहे. निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांना SQL, Python इत्यादी टूल्सचा वापर करून योग्य मेट्रिक्स डिझाईन आणि (Dream 11 Recruitment) इन्स्ट्रुमेंटेशनद्वारे बिझनेस हेल्थ डॅशबोर्ड तयार करावे लागतील. या नोकरीसाठी पात्रता आणि कोणती स्कील्स आवश्यक आहेत, त्याबद्दल जाणून घेवूया. या संदर्भात ‘स्टडी कॅफे’ने वृत्त दिलं आहे.

Dream 11 मध्ये जॉब मिळवण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा – (Dream 11 Recruitment)
1.अ‍ॅनॅलिटिकल सोल्युशनिंग स्कील्स वापरून मोठ्या प्रमाणावर वास्तविक बिझनेस प्रॉब्लेम्स सोडवणं.
2. डिझाईन आणि प्रयोगांचं विश्लेषण (A/B चाचण्या, सिंथेटिक नियंत्रण इत्यादी.) आणि उत्पादन वैशिष्ट्यांना प्राधान्य देण्यासाठी मदत करणं.
3. डेटाद्वारे युजर्सना इनसाइट्स प्रदान करणं, युजर्सचं विभाजन, दीर्घकालीन ट्रेंड आणि वर्तणूक विश्लेषण.
4. ऑर्गनायझेशनल स्ट्रॅटर्जी व प्रॉडक्ट रोडमॅप्ससाठी बिझनेस व प्रॉडक्ट टीमसोबत काम करणं.
5. SQL, Python इत्यादी टूल्सचा वापर करून योग्य मेट्रिक्स डिझाईन आणि इन्स्ट्रुमेंटेशनद्वारे बिझनेस हेल्थ डॅशबोर्ड तयार करणं.

अशा आहेत पात्रतेच्या अटी –
1. दोन वर्षांपेक्षा जास्त अ‍ॅनॅलिटिकल अनुभव. (Dream 11 Recruitment)
2. SQLमध्ये काम करण्याचा अनुभव. (Dream 11 Recruitment)
3. गूगल अ‍ॅनॅलिटिक्स, लूकर, PowerBI व Tableau इत्यादी टूल्समध्ये काम करण्याचा अनुभव.
4. पायथॉनसारख्या स्टॅटिस्टिकल अ‍ॅनॅलिसिस लँग्वेजचा अनुभव.

या पदासाठी अर्ज करण्यास तुम्ही इच्छुक असाल तर ड्रीम इलेव्हनच्या अधिकृत वेबसाईट https://www.dream11.com/ ला भेट द्या. तिथे दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्ही या नोकरीसाठी पात्र असाल तर तुम्ही अर्ज करू शकता. वर दिलेल्या पात्रतेच्या अटी तुम्ही पूर्ण करत असाल, व तुम्हाला ड्रीम इलेव्हनमध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज कसा करायचा या संदर्भात त्यांच्या वेबसाईटवर सविस्तर (Dream 11 Recruitment) माहिती दिली असेल. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना कंपनीच्या  मुंबई ऑफिसमधून काम करावं लागेल, असं कंपनीने ही जाहिरात प्रसिद्ध करताना म्हटलं आहे. त्यामुळे तुम्हाला क्रिकेटची आवड असली तरी तुम्हाला कंपनी भरती करत असलेल्या पदाच्या पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com