Home Blog Page 326

SCI Mumbai Recruitment : शिपिंग कॉर्पोरेशन मुंबई अंतर्गत नवीन भरती; जाणून घ्या पात्रता

SCI Mumbai Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (SCI Mumbai Recruitment) लिमिटेड, मुंबई अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून इलेक्ट्रो टेक्निकल (इलेक्ट्रिकल) अधिकारी पदाच्या एकूण 30 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 आहे.

संस्था – शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई
भरले जाणारे पद – इलेक्ट्रो टेक्निकल (इलेक्ट्रिकल) अधिकारी
पद संख्या – 30 पदे (SCI Mumbai Recruitment)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-Mail)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून 2023
E-Mail ID – [email protected]

वय मर्यादा – 65 वर्षे
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
असा करा अर्ज – (SCI Mumbai Recruitment)
1. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
2. उमेदवारांनी [email protected] या ईमेल आयडीवर CV सबमिट करावा.
3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
4. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून 2023 आहे.
निवड प्रक्रिया –
Selection for the posting of the following categories (total 30 nos.) to be posted on board main fleet vessels on a contract basis.
The candidate must: (SCI Mumbai Recruitment)
1. Have all certificates and documents valid as per Flag State requirements.
2. Have completed 8 months of ship board training after completion of ETO course. OR
3. Have at least 1 year of shipboard experience as a full-fledged Electrical Officer.
4. His/her last sign off from previous vessel must not be more than 18 months.
Candidate must not be more than 65 years of age as on 01.03.2023
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 
अधिकृत वेबसाईट – www.shipindia.com
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IPS Success Story : नक्षलग्रस्त भागात कारवाईचा धडाका; राष्ट्रपतींनीही घेतली दखल; अभिषेक यांचा डॉक्टर ते IPS होण्याचा प्रवास जाणून घ्या

IPS Success Story of Abhishek Pallav

करिअरनामा ऑनलाईन । सोशल मीडियावर अधिराज्य गाजवणारे (IPS Success Story) आयपीएस अधिकारी अभिषेक पल्लव पोलिस सेवेत येण्यापूर्वी मानसोपचारतज्ज्ञ होते. त्यांनी दिल्लीच्या जी. बी. पंत हॉस्पिटलमध्ये वरिष्ठ मानसोपचारतज्ज्ञ म्हणूनही काम केले आहे. या लेखाच्या माध्यमातून आपण त्यांच्या IPS बनण्याची कहाणी जाणून घेणार आहोत.
केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा ही देशातील सर्वात प्रतिष्ठित नागरी सेवांपैकी एक आहे. या सेवेद्वारे काही तरुण प्रशासकीय अधिकारी बनून जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची सूत्रे सांभाळतात, तर काही तरुण पोलिस सेवेत रुजू होऊन कायदा व सुव्यवस्था सुधारतात. गणवेश घालून देशाची सेवा करण्याची तरुणाईमध्ये मोठी तळमळ दिसून येत आहे. आज आम्ही तुम्हाला सोशल मीडियावरील प्रसिध्द (IPS Success Story) व्यक्तिमत्व अभिषेक पल्लव यांची गोष्ट सांगणार आहोत, ज्यांनी IPS होण्यापूर्वी मानसोपचारतज्ज्ञ म्हणून काम केले होते. दिल्लीतील जी.बी.पंत हॉस्पिटलमध्ये त्यांनी काही काळ ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ म्हणून काम केले. यानंतर त्यांनी विविध रुग्णालयात काम केले आणि शेवटी ते IPS अधिकारी झाले.

IPS Success Story of Abhishek Pallav

वडील भारतीय सैन्यात (IPS Success Story)
अभिषेक पल्लव हे मूळचे बिहारच्या बेगुसरायचे रहिवासी आहेत. त्यांचे वडील ऋषी कुमार आणि आई आशा देवी. त्यांचे  वडील भारतीय सैन्यात होते, त्यामुळे अभिषेक यांनी आर्मी स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. यानंतर ते वैद्यकीय सेवेकडे वळले.
MBBSची पदवी मिळवली
अभिषेक पल्लवच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गोवा विद्यापीठात MBBSमध्ये प्रवेश घेतला. येथे त्यांनी 1999 ते 2005 पर्यंत वैद्यकीय (IPS Success Story) शिक्षण पूर्ण केले.

IPS Success Story of Abhishek Pallav

एम्समधून एमडी मानसोपचारतज्ज्ञ झाले
MBBS पूर्ण केल्यानंतर अभिषेक पल्लव यांनी आपला अभ्यास थांबवला नाही, उलट त्यांनी आपला पुढील अभ्यास चालू ठेवला आणि एम्समध्ये एमडीमध्ये प्रवेश घेतला. येथून त्यांनी मानसोपचाराचे शिक्षण पूर्ण केले.

IPS Success Story of Abhishek Pallav

दिल्लीच्या जीबी पंत हॉस्पिटलमध्ये केली नोकरी
अभिषेक पल्लव यांनी 2010 मध्ये मानसोपचारतज्ज्ञ म्हणून जीबी पंत हॉस्पिटल, दिल्ली येथे वरिष्ठ मानसोपचारतज्ज्ञ म्हणून काम केले. सुमारे एक वर्ष 4 महिने त्यांनी (IPS Success Story) येथे काम केले आणि नंतर खाजगी रुग्णालयात सेवा देण्यासाठी गेले. काही काळानंतर, अभिषेक पल्लव यांनी 2011 ते 2013 या काळात दिल्लीतील प्रमुख मानसोपचार रुग्णालय, मानवी वर्तणूक आणि सहयोगी विज्ञान संस्था (IHBAS) मध्ये वरिष्ठ मानसोपचारतज्ज्ञ म्हणूनही काम केले.

IPS Success Story of Abhishek Pallav

प्राध्यापक असताना केली UPSC ची तयारी (IPS Success Story)
अभिषेक पल्लव यांनी रामा मेडिकल कॉलेज, इहबास येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले. या दरम्यान त्यांनी  यूपीएससीची तयारी सुरू केली होती. त्यांनी 2013 मध्ये UPSC परीक्षा पास केली. त्यानंतर त्यांनी सप्टेंबर 2013 मध्ये मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री नॅशनल अॅकॅडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये फाउंडेशन कोर्स केला आणि त्यानंतर राष्ट्रीय पोलिस अकादमीतून ते IPS झाले.

IPS Success Story of Abhishek Pallav

या घटनेमुळे मिळाली प्रसिध्दी
अभिषेक पल्लव यांनी एका माओवाद्यांवर उपचार केल्याने ते प्रसिद्धीच्या झोतात आले. विशेष म्हणजे अभिषेक यांनीच त्या माओवाद्याला गोळ्या घातल्या, त्यानंतर त्याच्यावर (IPS Success Story) उपचार करून ते प्रसिद्धीच्या झोतात आले होते.

IPS Success Story of Abhishek Pallav

पती-पत्नी नक्षलग्रस्त भागात घेतात वैद्यकीय शिबिरे
आयपीएस अभिषेक पल्लव हे प्रशिक्षित मानसोपचारतज्ज्ञ आहेत तर त्यांची पत्नी डॉ. यशा पल्लव त्वचारोगतज्ज्ञ आहेत. 2016 पासून, पती-पत्नी दोघेही नक्षलवादी (IPS Success Story) हिंसाचारामुळे प्रभावित झालेल्या दुर्गम गावांमध्ये स्थानिक लोकांसाठी वैद्यकीय शिबिरे आयोजित करतात. त्यांनी आतापर्यंत शेकडो वैद्यकीय शिबिरे घेतली आहेत. वैद्यकीय शिबिरात लोकांच्या आरोग्याच्या समस्यांची तपासणी केली जाते. गरज पडल्यास त्यांना पोलीस रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात पाठवले जाते.
पोलीस शौर्य पदकाचे मानकरी 
IPS डॉ. अभिषेक पल्लव यांना राष्ट्रपतींकडून पोलीस शौर्य पदक मिळाले आहे. नक्षलग्रस्त भागात केलेल्या धाडसी कामगिरीमुळे त्यांना हे पदक देण्यात आले.

IPS Success Story of Abhishek Pallav

छत्तीसगडमध्ये SP पदावर कार्यरत
अभिषेक पल्लव सध्या दंतेवाडा, छत्तीसगड येथे पोलीस अधीक्षक म्हणून तैनात आहेत. ते सध्या सोशल मीडियावर चांगलेच प्रसिध्द झाले आहेत. ते अनेकदा (IPS Success Story) सोशल मीडियावरील व्हिडिओंमधून लोकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचा आणि गुन्हेगारांना योग्य मार्गावर जाण्याचा सल्ला देत असतात. अभिषेक यांची पत्नी यशा उपेंद्र यादेखील व्यवसायाने डॉक्टर आहेत.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CA Exam 2023 : सीए फायनल आणि इंटरमिजिएट परीक्षेचं अॅडमिट कार्ड जारी; असं करा डाउनलोड

CA Exam 2023

करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट (CA Exam 2023) ऑफ इंडिया (ICAI) ने मे 2023 साठी इंटरमीडिएट आणि फायनल परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी केले आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट icai.org वरून परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.

परीक्षेच्या तारखा –
प्रवेशपत्र आज 17 एप्रिल 2023 रोजी जारी करण्यात आले आहे. गट 1 साठी इंटरमिजिएट परीक्षा 3 मे ते 10 मे 2023 पर्यंत सुरू होईल आणि गट 2 ची (CA Exam 2023) परीक्षा 12 मे पासून सुरू होईल आणि 18 मे 2023 रोजी संपेल. सर्व परीक्षा दुपारी 2 ते 5 या वेळेत होतील.

प्रवेशपत्र असं करा डाउनलोड –
1. सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट esservices.icai.org ला भेट द्या.
2. मुख्यपृष्ठावर दिलेल्या अंतिम परीक्षेच्या प्रवेशपत्रासाठी लिंकवर क्लिक करा.
3. आवश्यक माहिती सबमिट करा जसे की नोंदणी क्रमांक इ. (CA Exam 2023)
4. परीक्षेचे प्रवेशपत्र तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
5. प्रवेशपत्र तपासा आणि प्रिंट काढा.

महत्वाची सूचना – (CA Exam 2023)
1. उमेदवारांना परीक्षेला येताना फोटो आयडी प्रूफ, मास्क, वैयक्तिक छोटे हॅण्ड सॅनिटायझर, पारदर्शक पाण्याची बाटली आणि प्रवेशपत्र परीक्षा केंद्रावर सोबत आणावे लागेल.
2. यासोबतच परीक्षा केंद्रावर प्रत्येकाने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे अनिवार्य आहे.
3. जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारच परीक्षा घेतली जाईल.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : शिर्डीच्या साईबाबा संस्थानात ‘या’ पदावर नोकरीची संधी; तुम्ही पात्र आहात का?

Job Notification (39)

करिअरनामा ऑनलाईन । श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी येथे (Job Notification) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. अधिनियम, २००४ कलम ५ मधील तरतुदीनुसार अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि जास्तीत जास्त 15 अन्य सदस्य याप्रमाणे एकूण 17 सदस्यांची समिती नियुक्त करण्यात येणार आहेत. या समितीवर शिर्डी नगरपंचायतीचा अध्यक्ष हा पदसिध्द सदस्य असेल. सदर तरतुदीनुसार श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी), (व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची नियुक्ती आणि प्रतिज्ञापत्राचे नमुने) नियम २०१३ व श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी) (व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची नियुक्ती आणि प्रतिज्ञापत्राचे नमुने) (सुधारणा) नियम, २०२१ नुसार सदस्यांची अर्हता खालीलप्रमाणे आहे. या भरतीसाठी अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

संस्था – श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी
भरले जाणारे पद – (Job Notification)
1. अध्यक्ष – 01 पद
2. उपाध्यक्ष – 01 पद
3. सदस्य – 15 पदे
पद संख्या – 17 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – शिर्डी, अहमदनगर
वय मर्यादा – 25 ते 70 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. अध्यक्ष – विशिष्ट अर्हता / अनुभवाची अट नाही. विशेषीकृत ज्ञान या गटातील व्यक्ती
2. उपाध्यक्ष – विशेषीकृत ज्ञान या गटातील व्यक्ती (Job Notification)
3. सदस्य (महिला) विशिष्ट अर्हता / अनुभवाची अट नाही.

सदस्य – 15 पदे
1. सदस्य (सामाजिक व आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटक) जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र तसेच कमी उत्पन्नाचा दाखला.
2. सदस्य (विधी) विधिमधील पदवी (एल.एल.बी) धारण केलेली असावी आणि महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेकडे किमान ५ वर्षाकरिता अधिवक्ता म्हणून नोंदणी केलेली असावी आणि जिल्हा न्यायाधीश किंवा प्रबंधक, उच्च न्यायालय यांनी दिलेले वकील व्यवसाय प्रमाणपत्र धारण केलेली असावे.
3. सदस्य (व्यवसाय व्यवस्थापन) व्यवसाय प्रशासनामधील पदवी (बी. बी.ए.) किंवा अन्य समतुल्य पदवी व्यवस्थापकीय पदावरील किमान ५ वर्षाचा अनुभव धारण केलेली असावी किंवा भारतीय सनदी लेखापाल संस्थेकडे किमान ५ वर्षाच्या कालावधीकरिता सनदी लेखापाल म्हणून नोंदणी केलेली असावी किंवा अर्थशास्त्र अथवा वित्तव्यवस्था यांमधील पदवी धारण केलेली असावी. (Job Notification)
किंवा
लोक प्रशासनामधील पदवी आणि किमान ५ वर्षांचा अनुभव | धारण केलेली असावी किंवा जिल्हाधिकाऱ्याच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसेल अशा पदावरुन सेवानिवृत्त झालेली व्यक्ती असावी.
4. सदस्य (अभितांत्रिकी व वास्तुशास्त्र) मान्यता प्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकीमधील पदवी (बी.ई) किंवा पदविका आणि अभियांत्रिकी उपक्रमांमधील किमान ५ वर्षांचा अनुभव धारण केलेली असावी. किंवा
वास्तुशास्त्रामधील पदवी (बी.आर्क.) किंवा पदविका आणि ५ वर्षाचा अनुभव.
एम.बी.बी.एस. / बी.ए.एम.एस. / बी. यु.एम.एस. / बी.एच.एम.एस. पदवी धारण करणारी असावी आणि रुग्णालय प्रशासन किंवा आरोग्य संस्था यामधील किमान ५ | वर्षांचा अनुभव असलेली वैद्यक व्यवसायी.
5. सदस्य (सार्वजनिक आरोग्य) एम.बी.बी.एस. / बी.ए.एम.एस. / बी. यु.एम.एस. / बी.एच.एम.एस. पदवी धारण करणारी असावी आणि रुग्णालय प्रशासन किंवा आरोग्य संस्था यामधील किमान ५ वर्षांचा अनुभव असलेली वैद्यक व्यवसायी. (Job Notification)
6. सदस्य (ग्रामीण विकास) कोणत्याही ज्ञानशाखेतील पदवीधर असावी आणि ग्रामीण क्षेत्रांच्या विकासामधील किमान ५ वर्षाचा अनुभव आणि प्राविण्य मिळवलेले असावे. तसेच राज्य किंवा केंद्र शासनाने त्यास मान्यता दिलेली असावी.
7. सदस्य (सर्वसाधारण) 1) एकतर जे भक्तमंडळाचे आश्रयदाते किंवा आजीव सदस्य असतील. आणि
2) पुढीलपैकी सर्व किंवा त्यापैकी कोणताही घटक विचारांत घेण्यात येतील:- (एक) स्नातक पदवी धारण करणे;
(दोन) शिर्डीतील किंवा अहमदनगर जिल्हयातील रहिवाशी असणे;
(तीन) सामाजिक किंवा शैक्षणिक बांबीमध्ये अथवा सामाजिक किंवा शैक्षणिक विकासामध्ये व्यक्तीने दिलेले योगदान;
(चार) शिर्डीचे प्रतिनिधित्व करणारा संसद सदस्य अथवा शिर्डी विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारा राज्य विधानमंडळाचा सदस्य असणे.

असा करा अर्ज –
1. उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इतर अर्ज सादर करण्याचे साधन/पद्धती स्वीकारली जाणार नाही. (Job Notification)
3. विहीत वेळेनंतर / दिनांकानंतर आलेले अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत.
4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – sai.org.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Top 10 MBA Colleges : प्लेसमेंटमध्ये मिळेल करोडोंचं पॅकेज!! ‘हे’ आहेत देशातील आणि महाराष्ट्रातील टॉप MBA कॉलेजेस

Top 10 MBA Colleges

करिअरनामा ऑनलाईन । ग्रॅज्युएशन करत असताना अनेक (Top 10 MBA Colleges) विद्यार्थी करिअरच्या वाटा शोधत असतात. चांगल्या नोकरीबरोबर पगाराचे भरगच्च पॅकेज मिळावं या हेतूने एखाद्या चांगल्या कॉलेजमधून MBA पूर्ण करण्याची विद्यार्थ्यांची इच्छा असते. कॉलेजमधून पासआऊट  होताच चांगली नोकरी मिळेल अशा मान्यताप्राप्त संस्थेमधून MBA करावं; असं प्रत्येकाला वाटत असतं. भारतात अनेक व्यवस्थापन संस्था आहेत ज्या MBA शिक्षण ऑफर करतात. यासोबतच या महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या तरुणांना कोट्यवधी रुपयांचे पॅकेजही मिळतं. आज आपण जाणून घेणार आहोत भारतातील आणि महाराष्ट्रातील टॉप 10 MBA महाविद्यालयांबद्दल…

1. आयआयएम अहमदाबाद (Top 10 MBA Colleges)
तुम्हाला मॅनेजमेंटचा अभ्यास करायचा असेल तर तुम्ही आयआयएम अहमदाबादमध्ये प्रवेश घेऊ शकता. हे कॉलेज गुजरातमध्ये आहे. NIRF रँकिंग 2022 मध्ये ते प्रथम क्रमांकावर होते. या कॉलेजमध्ये CAT म्हणजेच कॉमन अॅडमिशन टेस्ट (CAT) परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना प्रवेश दिला जातो.
2. आयआयएम बंगळूर
मॅनेजमेंट संस्थांमध्ये आयआयएम बंगळूरचे स्थान दुसरे आहे. कॅट परीक्षा उत्तीर्ण करुन आयआयएम, बंगळुरूमध्ये शिक्षण घ्यावे असे तरुणांचे स्वप्न असते. मात्र, येथे फक्त टॉप रँकर्सनाच प्रवेश मिळतो. येथे मॅनेजमेंट विषयातील पीएचडी शिकवली जाते.
3. आयआयएम, कोलकाता
तुम्हाला मॅनेजमेंटचा अभ्यास करायचा असेल तर आयआयएम कोलकाता हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय असू शकतो. येथून एमबीए किंवा पीएचडी केलेले (Top 10 MBA Colleges) तरुण व्यवसाय क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. इथेही फक्त टॉप रँकर्सनाच प्रवेश मिळतो.

4. आयआयएम, दिल्ली
आयआयएम दिल्ली हा उत्तम पर्याय ठरू शकतो. CAT परीक्षेत चांगले पर्सेंटाइल मिळाले असल्यास तुम्ही येथे प्रवेश घेऊ शकता. शिक्षण पूर्ण केल्यानंतर येथील तरुणांना नोकरीत करोडो रुपयांचे पॅकेज मिळते.
5. आयआयएम, कोझिकोड (Top 10 MBA Colleges)
आयआयएम, कोझिकोड हे केरळमध्ये वसले असून ते देशातील पाचव्या क्रमांकाचे कॉलेज आहे. येथे देखील कॅट परीक्षेत चांगले टक्केवारी मिळविणाऱ्या उमेदवारांना प्रवेश दिला जातो. तुम्हालाही येथे प्रवेश घ्यायचा असेल, तर ही संस्था तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते.
6. आयआयएम, लखनौ
आयआयएम लखनौ ही संस्था मॅनेजमेंट स्टडीमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे. येथे कॅट परीक्षेतील यशस्वी उमेदवार प्रवेश घेऊ शकतात. या कॉलेजचा परिसर अनेक (Top 10 MBA Colleges) एकरांमध्ये पसरलेला आहे. मॅनेजमेंट अभ्यासातील सर्वोत्तम स्टाफ येथे शिकवितो. प्रवेश शुल्क इत्यादी तपशील अधिकृत वेबसाइटवर तपासले जाऊ शकतात. तथापि, सर्व आयआयएममध्ये प्रवेशासाठी एकत्रित समुपदेशन केले जाते.

7. आयआयएम, इंदूर
मॅनेजमेंट अभ्यासात आयआयएम इंदूर देशात 7 व्या क्रमांकावर आहे. जर तुम्ही CAT परीक्षा पास केली असेल तर तुम्ही एकत्रित काऊन्सेलिंगमध्ये सहभागी (Top 10 MBA Colleges) होऊन प्रवेश घेऊ शकता. दरवर्षी येथून प्लेसमेंट मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना 50 लाखांपासून ते करोडो रुपयांपर्यंतचे पॅकेज मिळते.
8. एनआयआयई, मुंबई
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, मुंबई ही संस्था मॅनेजमेंट अभ्यासात देशात 8व्या क्रमांकावर आहे. जर तुम्हाला मॅनेजमेंटचा अभ्यास करून चांगली नोकरी मिळवायची असेल आणि तुम्ही CAT परीक्षा पास केली असेल तर तुम्ही येथे प्रवेश घेऊ शकता. परिक्षेत मिळालेल्या रँकवर तुमचा प्रवेश अवलंबून असतो.
9. झेवियर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (Top 10 MBA Colleges)
जमशेदपूर येथील झेवियर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्येही तुम्ही प्रवेश घेऊ शकता. व्यवस्थापन अभ्यासात झेवियर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट टॉप-10 मध्ये आहे. येथून शिक्षण घेणाऱ्या तरुणांना प्लेसमेंटमध्ये करोडो रुपयांचे पॅकेज मिळतात.
10. मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इंस्टीट्यूट
मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इंस्टिट्यूट गुरुग्राम येथे आहे. येथे CAT, MAT, JAT मध्ये यशस्वी उमेदवारांना व्यवस्थापन म्हणजेच एमबीए अभ्यासासाठी प्रवेश दिला (Top 10 MBA Colleges) जातो. येथील तरुणांना प्लेसमेंटमध्ये लाखो ते कोटींच्या नोकऱ्याही मिळतात. तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट देऊन माहिती घेवू शकता.

हे आहेत महाराष्ट्रातील टॉप 10 MBA महाविद्यालये –
01. जमनालाल बजाज इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट स्टडीज- [जेबीआईएमएस], मुंबई
02. शैलेश जे मेहता स्कूल ऑफ मैनेजमेंट- [एसजेएमएसओएम], मुंबई
03. राष्ट्रीय औद्योगिक इंजीनियरिंग संस्थान- [नीटी], मुंबई
04. एसपी जैन इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट एंड रिसर्च- [एसपीजेआईएमआर], मुंबई
05. सिम्बायोसिस इंस्टीट्यूट ऑफ बिजनेस मैनेजमेंट- [एसआईबीएम], पुणे
06. इंडस बिजनेस स्कूल- [आईआईईबीएम], पुणे (Top 10 MBA Colleges)
07. सिम्बायोसिस इंस्टीट्यूट ऑफ ऑपरेशंस मैनेजमेंट- [एसआईओएम], नाशिक
08. SIES कॉलेज ऑफ मैनेजमेंट स्टडीज- [SIESCOM], मुंबई (Top 10 MBA Colleges)
09. एएसएम इंस्टीट्यूट ऑफ बिजनेस मैनेजमेंट एंड रिसर्च- [आईबीएमआर], पुणे
10. बालाजी इंस्टीट्यूट ऑफ मॉडर्न मैनेजमेंट- [बीआईएमएम], पुणे
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Army Recruitment : 10 वी पास उमेदवारांसाठी देशसेवेची मोठी संधी!! Indian Army च्या ASC सेंटर मध्ये भरती सुरु

Indian Army Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय सैन्याच्या ASC सेंटर मध्ये रिक्त (Indian Army Recruitment) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कुक, सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर, निम्न श्रेणी लिपिक, ट्रेड्समन मेट (लेबर), टिन स्मिथ, बार्बर, -, एमटीएस (चौकीदार), सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर, क्लिनर (सफाईकर्मी), व्हेईकल मेकॅनिक, पेंटर, कारपेंटर, फायरमन, फायर इंजिन ड्राइव्हर या पदांच्या एकूण 236 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल.

संस्था – भारतीय सैन्य ASC सेंटर
भरली जाणारी पदे – (Indian Army Recruitment)
१ कुक – ०२ पदे
२ सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर – १९ पदे
३ निम्न श्रेणी लिपिक – ०५ पदे
४ ट्रेड्समन मेट (लेबर) – १०९ पदे
५ टिन स्मिथ – ०८ पदे
६ बार्बर – ०३ पदे (Indian Army Recruitment)
७ एमटीएस (चौकीदार) – १७ पदे
८ सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर – ३७ पदे
९ क्लिनर (सफाईकर्मी) – ०५ पदे
१० व्हेईकल मेकॅनिक – १२ पदे
११ पेंटर – ०३ पदे
१२ कारपेंटर – ११ पदे
१३ फायरमन – ०१ पद
१४ फायर इंजिन ड्राइव्हर ०४ पदे

पद संख्या – 236 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही (Indian Army Recruitment)
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच उपलब्ध होईल
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

अर्ज/ परीक्षा फी –
Open/OBC/EWS – फि नाही.
SC/ST – फि नाही.
PWD/ Female – फि नाही.
असा करा अर्ज –
1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात PDF पर्यायाववर क्लिक करा.
2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
3. जाहीर झालेले Notification PDF मध्ये आपल्याला अर्ज नमुना दिला जातो किंवा अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपण अर्जाची प्रिंट काढू शकता. (Indian Army Recruitment)
4. अर्ज भरा व त्याला सर्व कागदपत्रे जोडा.
5. अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवा.

अर्ज पाठवण्याचा पत्ता – (पदानुसार)
1. Post 1 to 6: The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ, ASC Centre (South) -2 ATC, Agram Post, Bangalore -07. (Indian Army Recruitment)
2. Post 7 to 14: The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ, ASC Centre (North) – 1 ATC, Agram Post, Bangalore-07.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.indianarmy.nic.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IIIT Nagpur Recruitment : शिक्षकेतर पदांची नवीन भरती; IIIT नागपूरमध्ये नोकरीचा हा चान्स सोडू नका 

IIIT Nagpur Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, नागपूर येथे (IIIT Nagpur Recruitment) शिक्षकेतर पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मे 2023 आहे. तसेच, अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख 15 मे 2023 आहे.
संस्था – भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, नागपूर (IIIT Nagpur)
भरले जाणारे पद – शिक्षकेतर पदे
पद संख्या – 07 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन/ ऑफलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 मे 2023
अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख – 15 मे 2023
अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, नागपूर

असा करा अर्ज – (IIIT Nagpur Recruitment)
1. वर नमूद केलेल्या भरतीकरिता ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी दिलेल्या वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
3. उमेदवारांनी वर दिलेल्या पत्त्यावर संबंधित पत्त्यावर अर्जाची प्रत पाठवावी.
4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
5. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. (IIIT Nagpur Recruitment)
6. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मे 2023 आहे.
7. तसेच, अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची 15 मे 2023 तारीख आहे.
8. देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

निवड प्रक्रिया – मुलाखत
1. मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी TA/DA आणि/किंवा लॉजिंग/बोर्डिंगचे पैसे दिले जाणार नाहीत.
2. उमेदवारांनी मुलाखतीच्या वेळी जन्मतारीख, पात्रता आणि श्रेणी इत्यादींच्या पुराव्यासंबंधी मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. (IIIT Nagpur Recruitment)
3. केवळ शॉर्ट-लिस्टेड उमेदवारांना मुलाखत/चाचणीसाठी पद्धत, तारीख आणि इतर संबंधित तपशीलांबद्दल कळवले जाईल.
काही महत्वाच्या लिंक्स – (IIIT Nagpur Recruitment)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – iiitn.ac.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

New Education Policy : आता MBBS विद्यार्थ्यांसाठी UG PG मध्ये आयुर्वेद, होमिओपॅथी, रामायण, महाभारताचा अभ्यास करणं अनिवार्य

New Education Policy

करिअरनामा ऑनलाईन । युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशननं उच्च शिक्षण (New Education Policy) अभ्यासक्रमात भारतीय ज्ञान प्रणालीचा समावेश करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा जारी केला आहे. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, यूजीसीनं देशातील सर्व विद्यापीठं आणि शिक्षण संस्थांना सांगितलं आहे की, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि अंडर ग्रॅज्युएशन अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आयकेएस (Indian Knowledge System) अभ्यासक्रम घेण्यास प्रोत्साहित केले पाहिजे. हा अभ्यासक्रम अनिवार्य क्रेडिटच्या किमान 5 टक्के असेल.

हा अभ्यासक्रम शिकता येणार
यूजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांत असं नमूद केलं आहे की, जे विद्यार्थी मेडिसीनमधील यूजी प्रोग्रॅम्समध्ये नावनोंदणी करतील ते पहिल्या वर्षी भारतीय वैद्यक पद्धतीचा क्रेडिट कोर्स घेऊ शकतात. त्यामुळे त्यांना आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथीची मूलभूत माहिती (New Education Policy) मिळेल. या विद्याशाखा अजूनही भारतीय लोकसंख्येपैकी मोठ्या भागाच्या आरोग्याच्या गरजा भागवणाऱ्या औषधांच्या परंपरा चालू ठेवत आहेत. दुसर्‍या वर्षात गेल्यानंतर विद्यार्थी आयुर्वेद, सिद्ध, योग इत्यादींसारख्या कोणत्याही भारतीय वैद्यक पद्धतीचा थिअरी आणि प्रॅक्टिसचा दोन-सेमिस्टरचा क्रेडिट कोर्स करू शकतात.

रामायण, महाभारत, वेद, पुराणांचा समावेश (New Education Policy)
मार्गदर्शक तत्त्वांमध्ये काही मॉडेल अभ्यासक्रमांचाही उल्लेख करण्यात आला आहे. हे अभ्यासक्रम विद्यापीठांमधील यूजी आणि पीजी अभ्यासक्रमांमध्ये समाविष्ट केले जाऊ शकतात. उदाहरणार्थ, भारतीय संस्कृतीतील मूलभूत साहित्याचा यामध्ये समावेश केला जाऊ शकतो. या साहित्यात वैदिक कॉर्पस, रामायण, महाभारत आणि त्यांच्या महत्त्वाच्या प्रादेशिक आवृत्त्या, पुराणं, वेद यांचा अभ्यास असेल. भारतीय तत्त्वज्ञानाचे मूलभूत ग्रंथ, जैन आणि बौद्ध, भारतीय धार्मिक संप्रदायांचे मूलभूत ग्रंथ, वैदिक काळापासून वेगवेगळ्या (New Education Policy) प्रदेशातील भक्ती परंपरांपर्यंतचं सर्व साहित्य विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपलब्ध करून दिलं जाणार आहे.
शिक्षण, व्याकरण, छंद, निरुक्त, ज्योतिष आणि कल्प या सहा वेदांगांसह आयुर्वेद, स्थापत्य, नाट्यशास्त्र, धर्मशास्त्र, अर्थशास्त्र इत्यादी सारख्या भारतीय ज्ञान प्रणालींचा इतर प्रवाहांतील विद्यार्थ्यांना अभ्यास करावा लागेल.

यूजीसीनं जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये, भारतीय खगोलशास्त्र शिकवण्याची आवश्यकता असलेल्या साहित्याचादेखील उल्लेख आहे. असाच एक चॅप्टर लग्न आणि त्याची गणना याबाबतदेखील असेल. विद्यार्थ्यांना लग्नाची संकल्पना सांगा आणि लग्नासह इतर सामाजिक व (New Education Policy) धार्मिक कार्यक्रमांसाठी मुहूर्त म्हणजे विशिष्ट वेळ निश्चित करणं कसं महत्त्वाचं आहे हे विद्यार्थ्यांना समजवलं पाहिजे. काळाची अचूक गणना कशा पद्धतीने करायची आणि ती स्थिती नंतर कशी लय पावते याबद्दलही शिकवायला हवं. नंतरच्या खगोलशास्त्रज्ञांनी काल लग्नाची संकल्पना मांडून त्यातून सादर केलेली अधिक अचूक सूत्रंही विद्यार्थ्यांना शिकवायला हवीत, असं मार्गदर्शक तत्त्वांच्या मसुद्यात सांगितलं आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

AIIMS NORCET Recruitment : B.Sc पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरी!! AIIMS अंतर्गत 3055 पदांवर मेगाभरती

CIDCO Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल (AIIMS NORCET Recruitment) सायन्सेस अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून नर्सिंग अधिकारी पदाच्या एकूण 3055 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मे 2023 आहे.

संस्था – ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस
भरले जाणारे पद – नर्सिंग अधिकारी
पद संख्या – 3055 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 मे 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – B.Sc (Hons.) नर्सिंग/ B.Sc. (नर्सिंग) किंवा GNM डिप्लोमा+ किमान 50 बेड्सच्या हॉस्पिटलमधील 02 वर्षे अनुभव.
वय मर्यादा – 05 मे 2023 रोजी 18 ते 30 वर्षे आहे. (नियमांनुसार वयात सवलत दिली जाईल.)
परीक्षा फी – (AIIMS NORCET Recruitment)
सामान्य/ओबीसी: ₹ 3,000/-
SC/ST/EWS : ₹ 2,400/-
PH : शून्य/-
मिळणारे वेतन – 9,300 ते 34,800/- अधिक 4,600/- ग्रेड पे (स्तर 7)

निवड प्रक्रिया –
1. लेखी परीक्षा
2. दस्तऐवज पडताळणी
3. वैद्यकीय तपासणी (AIIMS NORCET Recruitment)
परीक्षेचे स्वरुप –
1. निगेटिव्ह मार्किंग – १/३रा
2. वेळ कालावधी – 3 तास
3. परीक्षेची पद्धत – ऑनलाईन (CBT)

पात्रता गुण –
UR/ EWS: ५०%
ओबीसी: ४५%
SC/ST: 40% (AIIMS NORCET Recruitment)
PwBD/ PH: 45%
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत
काही महत्वाच्या लिंक्स – (AIIMS NORCET Recruitment)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.aiimsexams.ac.in
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : हिरा कोणत्या धातुपासून बनतो? हे ’10’ प्रश्न तुमचं जनरल नॉलेज वाढवतील

GK Updates 16 Apr

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न 1 : ताजमहाल बांधायला किती वर्षं लागली?
उत्तर: (GK Updates) 20 वर्ष लागली.
प्रश्न 2 : हिरा कोणत्या धातुपासून बनतो?
उत्तर: कार्बन.
प्रश्न 3 : भारतातील कोणतं विमानतळ केवळ सौरऊर्जेद्वारे चालवलं जातं?
उत्तर : कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ.
प्रश्न 4 : ‘आरबीआय’चे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत?
उत्तर : शक्तिकांत दास.

प्रश्न 5 : ‘सीबीएसई’च्या सध्याच्या अध्यक्षा कोण आहेत?
उत्तर : निधी छिब्बर. (GK Updates)
प्रश्न 6 : भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते?
उत्तर : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर.
प्रश्न 7 : संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षा होणाऱ्या पहिल्या भारतीय कोण होत्या?
उत्तर : विजयलक्ष्मी पंडित.

प्रश्न 8 : ‘रेड सी’ कुठे आहे?
उत्तर : ‘रेड सी’ हा आफ्रिका आणि आशियामधील हिंदी महासागराचा एक भाग आहे. ‘रेड सी’ हा सर्वांत खारट समुद्र आहे.
प्रश्न 9 : ‘रेड सी’ हे नाव कसं पडलं?
उत्तर : ‘रेड सी’ नावाच्या उत्पत्तीबद्दल सांगण्यात येतं की, त्या पाण्यात ट्रायकोडेस्मियम एरिथ्रेयम नावाचा सायनोबॅक्टेरिया आहे, जो सामान्यतः निळ्या-हिरव्या पाण्याला (GK Updates) लाल-तपकिरी बनवतो.
प्रश्न 10 : ग्लोबल वॉर्मिंगसाठी कोणते वायू जबाबदार आहेत?
उत्तर : कार्बन डायऑक्साइड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड आणि फ्लोरिनेटेड वायू.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com