करिअरनामा ऑनलाईन । ग्रॅज्युएशन करत असताना अनेक (Top 10 MBA Colleges) विद्यार्थी करिअरच्या वाटा शोधत असतात. चांगल्या नोकरीबरोबर पगाराचे भरगच्च पॅकेज मिळावं या हेतूने एखाद्या चांगल्या कॉलेजमधून MBA पूर्ण करण्याची विद्यार्थ्यांची इच्छा असते. कॉलेजमधून पासआऊट होताच चांगली नोकरी मिळेल अशा मान्यताप्राप्त संस्थेमधून MBA करावं; असं प्रत्येकाला वाटत असतं. भारतात अनेक व्यवस्थापन संस्था आहेत ज्या MBA शिक्षण ऑफर करतात. यासोबतच या महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या तरुणांना कोट्यवधी रुपयांचे पॅकेजही मिळतं. आज आपण जाणून घेणार आहोत भारतातील आणि महाराष्ट्रातील टॉप 10 MBA महाविद्यालयांबद्दल…
1. आयआयएम अहमदाबाद (Top 10 MBA Colleges)
तुम्हाला मॅनेजमेंटचा अभ्यास करायचा असेल तर तुम्ही आयआयएम अहमदाबादमध्ये प्रवेश घेऊ शकता. हे कॉलेज गुजरातमध्ये आहे. NIRF रँकिंग 2022 मध्ये ते प्रथम क्रमांकावर होते. या कॉलेजमध्ये CAT म्हणजेच कॉमन अॅडमिशन टेस्ट (CAT) परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना प्रवेश दिला जातो.
2. आयआयएम बंगळूर
मॅनेजमेंट संस्थांमध्ये आयआयएम बंगळूरचे स्थान दुसरे आहे. कॅट परीक्षा उत्तीर्ण करुन आयआयएम, बंगळुरूमध्ये शिक्षण घ्यावे असे तरुणांचे स्वप्न असते. मात्र, येथे फक्त टॉप रँकर्सनाच प्रवेश मिळतो. येथे मॅनेजमेंट विषयातील पीएचडी शिकवली जाते.
3. आयआयएम, कोलकाता
तुम्हाला मॅनेजमेंटचा अभ्यास करायचा असेल तर आयआयएम कोलकाता हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय असू शकतो. येथून एमबीए किंवा पीएचडी केलेले (Top 10 MBA Colleges) तरुण व्यवसाय क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. इथेही फक्त टॉप रँकर्सनाच प्रवेश मिळतो.
4. आयआयएम, दिल्ली
आयआयएम दिल्ली हा उत्तम पर्याय ठरू शकतो. CAT परीक्षेत चांगले पर्सेंटाइल मिळाले असल्यास तुम्ही येथे प्रवेश घेऊ शकता. शिक्षण पूर्ण केल्यानंतर येथील तरुणांना नोकरीत करोडो रुपयांचे पॅकेज मिळते.
5. आयआयएम, कोझिकोड (Top 10 MBA Colleges)
आयआयएम, कोझिकोड हे केरळमध्ये वसले असून ते देशातील पाचव्या क्रमांकाचे कॉलेज आहे. येथे देखील कॅट परीक्षेत चांगले टक्केवारी मिळविणाऱ्या उमेदवारांना प्रवेश दिला जातो. तुम्हालाही येथे प्रवेश घ्यायचा असेल, तर ही संस्था तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते.
6. आयआयएम, लखनौ
आयआयएम लखनौ ही संस्था मॅनेजमेंट स्टडीमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे. येथे कॅट परीक्षेतील यशस्वी उमेदवार प्रवेश घेऊ शकतात. या कॉलेजचा परिसर अनेक (Top 10 MBA Colleges) एकरांमध्ये पसरलेला आहे. मॅनेजमेंट अभ्यासातील सर्वोत्तम स्टाफ येथे शिकवितो. प्रवेश शुल्क इत्यादी तपशील अधिकृत वेबसाइटवर तपासले जाऊ शकतात. तथापि, सर्व आयआयएममध्ये प्रवेशासाठी एकत्रित समुपदेशन केले जाते.
7. आयआयएम, इंदूर
मॅनेजमेंट अभ्यासात आयआयएम इंदूर देशात 7 व्या क्रमांकावर आहे. जर तुम्ही CAT परीक्षा पास केली असेल तर तुम्ही एकत्रित काऊन्सेलिंगमध्ये सहभागी (Top 10 MBA Colleges) होऊन प्रवेश घेऊ शकता. दरवर्षी येथून प्लेसमेंट मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना 50 लाखांपासून ते करोडो रुपयांपर्यंतचे पॅकेज मिळते.
8. एनआयआयई, मुंबई
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, मुंबई ही संस्था मॅनेजमेंट अभ्यासात देशात 8व्या क्रमांकावर आहे. जर तुम्हाला मॅनेजमेंटचा अभ्यास करून चांगली नोकरी मिळवायची असेल आणि तुम्ही CAT परीक्षा पास केली असेल तर तुम्ही येथे प्रवेश घेऊ शकता. परिक्षेत मिळालेल्या रँकवर तुमचा प्रवेश अवलंबून असतो.
9. झेवियर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (Top 10 MBA Colleges)
जमशेदपूर येथील झेवियर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्येही तुम्ही प्रवेश घेऊ शकता. व्यवस्थापन अभ्यासात झेवियर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट टॉप-10 मध्ये आहे. येथून शिक्षण घेणाऱ्या तरुणांना प्लेसमेंटमध्ये करोडो रुपयांचे पॅकेज मिळतात.
10. मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इंस्टीट्यूट
मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इंस्टिट्यूट गुरुग्राम येथे आहे. येथे CAT, MAT, JAT मध्ये यशस्वी उमेदवारांना व्यवस्थापन म्हणजेच एमबीए अभ्यासासाठी प्रवेश दिला (Top 10 MBA Colleges) जातो. येथील तरुणांना प्लेसमेंटमध्ये लाखो ते कोटींच्या नोकऱ्याही मिळतात. तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट देऊन माहिती घेवू शकता.
हे आहेत महाराष्ट्रातील टॉप 10 MBA महाविद्यालये –
01. जमनालाल बजाज इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट स्टडीज- [जेबीआईएमएस], मुंबई
02. शैलेश जे मेहता स्कूल ऑफ मैनेजमेंट- [एसजेएमएसओएम], मुंबई
03. राष्ट्रीय औद्योगिक इंजीनियरिंग संस्थान- [नीटी], मुंबई
04. एसपी जैन इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट एंड रिसर्च- [एसपीजेआईएमआर], मुंबई
05. सिम्बायोसिस इंस्टीट्यूट ऑफ बिजनेस मैनेजमेंट- [एसआईबीएम], पुणे
06. इंडस बिजनेस स्कूल- [आईआईईबीएम], पुणे (Top 10 MBA Colleges)
07. सिम्बायोसिस इंस्टीट्यूट ऑफ ऑपरेशंस मैनेजमेंट- [एसआईओएम], नाशिक
08. SIES कॉलेज ऑफ मैनेजमेंट स्टडीज- [SIESCOM], मुंबई (Top 10 MBA Colleges)
09. एएसएम इंस्टीट्यूट ऑफ बिजनेस मैनेजमेंट एंड रिसर्च- [आईबीएमआर], पुणे
10. बालाजी इंस्टीट्यूट ऑफ मॉडर्न मैनेजमेंट- [बीआईएमएम], पुणे
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com