GK Updates : हिरा कोणत्या धातुपासून बनतो? हे ’10’ प्रश्न तुमचं जनरल नॉलेज वाढवतील

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न 1 : ताजमहाल बांधायला किती वर्षं लागली?
उत्तर: (GK Updates) 20 वर्ष लागली.
प्रश्न 2 : हिरा कोणत्या धातुपासून बनतो?
उत्तर: कार्बन.
प्रश्न 3 : भारतातील कोणतं विमानतळ केवळ सौरऊर्जेद्वारे चालवलं जातं?
उत्तर : कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ.
प्रश्न 4 : ‘आरबीआय’चे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत?
उत्तर : शक्तिकांत दास.

प्रश्न 5 : ‘सीबीएसई’च्या सध्याच्या अध्यक्षा कोण आहेत?
उत्तर : निधी छिब्बर. (GK Updates)
प्रश्न 6 : भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते?
उत्तर : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर.
प्रश्न 7 : संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षा होणाऱ्या पहिल्या भारतीय कोण होत्या?
उत्तर : विजयलक्ष्मी पंडित.

प्रश्न 8 : ‘रेड सी’ कुठे आहे?
उत्तर : ‘रेड सी’ हा आफ्रिका आणि आशियामधील हिंदी महासागराचा एक भाग आहे. ‘रेड सी’ हा सर्वांत खारट समुद्र आहे.
प्रश्न 9 : ‘रेड सी’ हे नाव कसं पडलं?
उत्तर : ‘रेड सी’ नावाच्या उत्पत्तीबद्दल सांगण्यात येतं की, त्या पाण्यात ट्रायकोडेस्मियम एरिथ्रेयम नावाचा सायनोबॅक्टेरिया आहे, जो सामान्यतः निळ्या-हिरव्या पाण्याला (GK Updates) लाल-तपकिरी बनवतो.
प्रश्न 10 : ग्लोबल वॉर्मिंगसाठी कोणते वायू जबाबदार आहेत?
उत्तर : कार्बन डायऑक्साइड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड आणि फ्लोरिनेटेड वायू.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com