CA Exam 2023 : सीए फायनल आणि इंटरमिजिएट परीक्षेचं अॅडमिट कार्ड जारी; असं करा डाउनलोड

करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट (CA Exam 2023) ऑफ इंडिया (ICAI) ने मे 2023 साठी इंटरमीडिएट आणि फायनल परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी केले आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट icai.org वरून परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.

परीक्षेच्या तारखा –
प्रवेशपत्र आज 17 एप्रिल 2023 रोजी जारी करण्यात आले आहे. गट 1 साठी इंटरमिजिएट परीक्षा 3 मे ते 10 मे 2023 पर्यंत सुरू होईल आणि गट 2 ची (CA Exam 2023) परीक्षा 12 मे पासून सुरू होईल आणि 18 मे 2023 रोजी संपेल. सर्व परीक्षा दुपारी 2 ते 5 या वेळेत होतील.

प्रवेशपत्र असं करा डाउनलोड –
1. सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट esservices.icai.org ला भेट द्या.
2. मुख्यपृष्ठावर दिलेल्या अंतिम परीक्षेच्या प्रवेशपत्रासाठी लिंकवर क्लिक करा.
3. आवश्यक माहिती सबमिट करा जसे की नोंदणी क्रमांक इ. (CA Exam 2023)
4. परीक्षेचे प्रवेशपत्र तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
5. प्रवेशपत्र तपासा आणि प्रिंट काढा.

महत्वाची सूचना – (CA Exam 2023)
1. उमेदवारांना परीक्षेला येताना फोटो आयडी प्रूफ, मास्क, वैयक्तिक छोटे हॅण्ड सॅनिटायझर, पारदर्शक पाण्याची बाटली आणि प्रवेशपत्र परीक्षा केंद्रावर सोबत आणावे लागेल.
2. यासोबतच परीक्षा केंद्रावर प्रत्येकाने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे अनिवार्य आहे.
3. जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारच परीक्षा घेतली जाईल.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com