Home Blog Page 328

IRDAI Recruitment 2023 : भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणात ‘या’ पदावर भरती; महिन्याला 44,500 पगार

IRDAI Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय विमा नियामक आणि विकास (IRDAI Recruitment 2023) प्राधिकरण अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून असिस्टंट मॅनेजर पदाच्या एकूण 45 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2023 आहे.

संस्था – भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण
भरले जाणारे पद – असिस्टंट मॅनेजर
पद संख्या – 45 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मे 2023

वय मर्यादा – किमान 21 वर्षे आणि कमाल 30 वर्षे
परीक्षा फी – (IRDAI Recruitment 2023)
SC / ST / PwBD – RS. 100/-
Other than SC/ST/PwBD – RS. 750/-
निवड प्रक्रिया –
पहिला टप्पा – ऑनलाईन प्राथमिक परीक्षा
दुसरा टप्पा – वर्णनात्मक परीक्षा
तिसरा टप्पा – मुलाखत (IRDAI Recruitment 2023)
मिळणारे वेतन – 44,500/- रुपये दरमहा

काही महत्वाच्या लिंक्स – (IRDAI Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – irdai.gov.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Dr. Babasaheb Aambedkar : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी जाणून घ्या ‘या’ गोष्टी

Dr. Babasaheb Aambedkar

करिअरनामा ऑनलाईन । भारतासह जगभरात मोठ्या (Dr. Babasaheb Aambedkar) उत्साहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिल रोजी साजरी केली जाते. या जयंतीला ‘आंबेडकर जयंती’ किंवा ‘भीम जयंती’ म्हणून ओळखले जाते. आंबेडकर हे आपल्या देशातील आघाडीचे आणि महान समाजकार्य केलेले महापुरुष म्हणून ओळखले जातात. आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना त्यांच्याबद्दलची काही महत्वाची माहिती जाणून घेऊया.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयानुसार जागतिक दर्जाचे वकील, समाजसुधारक आणि प्रथम क्रमांकाचे जागतिक दर्जाचे विद्वान होते. भारतातील दलित बौद्ध चळवळीचे प्रेरक शक्ती म्हणून त्यांना श्रेय देण्यात येतं. आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू म्हणजे आताच्या मध्य प्रदेशातील एका गरीब कुटुंबात झाला होता. तर त्यांचा मृत्यू 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे झाला.

डॉ. आंबेडकर यांच्याबद्दल महत्त्वाच्या गोष्टी – (Dr. Babasaheb Aambedkar)
जन्म तारीख – 14 एप्रिल 1891
जन्म स्थान – महू, मध्य प्रदेश (आता त्याला डॉ. आंबेडकर नगर म्हणून ओळखलं जातं)
मृत्यू – 6 डिसेंबर 1956 ( 65 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.)
राष्ट्रीयत्व – भारतीय
आंबेडकरांच्या वडिलांचे नाव – रामजी मालोजी सकपाळ
आईचे नाव – भीमाबाई
पत्नी – रमाबाई आंबेडकर आणि डॉ. सविता आंबेडकर आंबेडकरांची दोन लग्न झाली होती.
मुलगा – यशवंत भीमराव आंबेडकर (Dr. Babasaheb Aambedkar)
नातू – प्रकाश आंबेडकर

आंबेडकरांच्या शैक्षणिक पदव्या –
1. मुंबई विद्यापीठ (बीए), कोलंबिया विद्यापीठ (एमए, पीएचडी, एलएलडी), लंडन
2. स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (एमएससी, डीएससी), ग्रेज इन (बॅरिस्टर-एट-लॉ)
3. पुरस्कार/सन्मान – बोधिसत्व (१९५६), भारतरत्न (१९९०), प्रथम कोलंबियन अहेड ऑफ देयर टाईम (२००४), द ग्रेटेस्ट इंडियन (२०१२)

आंबेडकरांचे राजकीय पक्ष – शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन, स्वतंत्र मजूर पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
सामाजिक संघटना – बहिष्कृत हितकारिणी सभा, समता सैनिक दल (Dr. Babasaheb Aambedkar)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनमोल विचार – (Dr. Babasaheb Aambedkar)
1. मला तो धर्म आवडतो जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुता शिकवतो.
2. मी एखाद्या समाजाच्या प्रगतीचे मापन त्यानुसार करतो जितकी तिथल्या महिलांनी प्रगती केली असेल.
3. जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत.
4. शिक्षित व्हा, संघटित व्हा आणि उत्साही व्हा. (Dr. Babasaheb Aambedkar)
5. धर्म माणसासाठी आहे आणि माणूस धर्मासाठी नाही.
6. माणूस नश्वर आहे, त्याचप्रमाणे विचार देखील नश्वर आहेत. एखाद्या कल्पनेच्या प्रसाराची गरज असते, जसे वनस्पतीला पाण्याची गरज असते, अन्यथा ती कोमेजून मरते.
7. महापुरुष हा प्रतिष्ठित माणसापेक्षा वेगळा असा असतो की, तो समाजाचा सेवक होण्यास तयार असतो.
8. समानता ही काल्पनिक गोष्ट असू शकते, परंतु तरीही ती एक नियमन तत्त्व म्हणून स्वीकारली पाहिजे.
9. बुद्धिमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम ध्येय असले पाहिजे. (Dr. Babasaheb Aambedkar)
10. समानता ही काल्पनिक गोष्ट असू शकते, परंतु तरीही ते एक नियमन तत्त्व म्हणून स्वीकारले पाहिजे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

 Job Notification : पुण्यात आशा वर्कर्सची थेट मुलाखतीने होणार निवड; पात्रता फक्त 10 वी पास

Job Notification (38)

करिअरनामा ऑनलाईन ।  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत (Job Notification) आशा स्वयंसेविका पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सोशल हेल्थ अॅक्टिव्हिस्ट म्हणजेच आशा स्वयंसेविका पदाच्या एकूण 154 जागा भरल्या जाणार आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ही पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी विविध रुग्णालयात 25 एप्रिल 2023 ते 4 मे 2023 या दरम्यान अर्ज समक्ष सादर करायचे आहेत.

संस्था – राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission)
भरले जाणारे पद –  आशा स्वयंसेविका
पद संख्या – 154 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
पद संख्या – 154 पदे
वय मर्यादा – 25 ते 45 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
अनुभव – संबंधित लोकसंख्येमध्ये यापुर्वी लिंक वर्कर कार्यरत असल्यास व ते लिंक वर्कर आशा स्वयंसेविका म्हणुन काम करण्यास इच्छुक असल्यास लिंक वर्करची आशा (Job Notification) स्वयंसेविका म्हणुन निवडीसाठी प्राधान्य देण्यात येईल.

aasha Sevika Bharti 2023

असा करा अर्ज –
महापालिकेच्या आकुर्डी, यमुनानगर, भोसरी, नेहरूनगर, सांगवी, तालेरा, जिजामाता,नवीन थेरगाव, आदी विविध रुग्णालयात 25 एप्रिल 2023 ते 4 मे 2023 पर्यंत (Job Notification) सकाळी 09:00 ते दुपारी 12:00 या वेळेत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. प्रत्येक रुग्णालयनिहाय अर्ज स्वीकृतीची मुदत वेगवेगळी आहे. अधिक माहिती साठी दिलेली PDF जाहिरात वाचा.

आवश्यक कागदपत्रे – (Job Notification)
1. इच्छुक व पात्र उमेदवारांनी म.न.पा.संकेतस्थळ www.pcmcindia.gov.in वर दिलेल्या नमुन्यातील अर्ज व त्यासोबत शैक्षणीक अर्हता प्रमाणपत्रे व खालील कागदपत्रांच्या छायांकित सत्यप्रती जोडाव्यात. (अर्जासोबत मुळ कागदपत्रे जोडू नयेत)
2. पासपोर्ट साईज फोटो
3. जन्म तारखेचा पुरावा (जन्माचा दाखला/ शाळा सोडल्याचा दाखला)
4.  रहिवाशी दाखला, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, रेशनिंगकार्ड, लाईट बिल, कार्यक्षेत्रातील स्थायिक रहीवासी असलेबाबतचा पुरावा
5. पॅन कार्ड
6. लग्नपत्रिका किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र
7. नावात बदल असल्यास गॅझेट (राजपञ)
8. अनुभव प्रमाणपत्र (Job Notification)
9. विधवा असल्यास (पतीचा मृत्युचा दाखला) / परितक्त्या असल्यास (घटस्पोटाचे कागदपत्रे) त्याबाबतच्या कागदपत्रांची छायांकित सत्यप्रत

काही महत्वाच्या लिंक्स – (Job Notification)
अधिक माहितीसाठी आणि अर्जाचा नमूना पाहण्यासाठी येथे CLICK करा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UGC NET Result : UGC NET चा निकाल आज होणार जाहीर; निकाल पाहण्यासाठी ‘या’ स्टेप्स करा फॉलो

UGC NET Result

करिअरनामा ऑनलाईन । NET परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक (UGC NET Result) महत्वाची अपडेट हाती आली आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या UGC NET परीक्षेचा निकाल आज 13 एप्रिल 2023 रोजी जाहीर होणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच UGCचे अध्यक्ष एम जगदीश कुमार यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. UGC NET 2023 चा निकाल नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे जाहीर केला जाणार आहे. हा निकाल नक्की कसा चेक करायचा याची माहिती जाणून घेवूया…
UGC NET परीक्षा यावर्षी डिसेंबर 2021 आणि जून 2022 सायकलसाठी एकाच वेळी घेण्यात आली. UGC NET प्रवेश परीक्षा 21 फेब्रुवारी ते 16 मार्च या कालावधीत 5 टप्प्यांत घेण्यात आली. यामध्ये 83 विषयांसाठी एकूण 08 लाख 34 हजार 537 उमेदवार बसले होते.

निकाल जाहीर करण्यासाठी यूजीसी किंवा नॅशनल टेस्टिंग (UGC NET Result) एजन्सीने वेबसाइट सुरू केली आहे. UGC NET डिसेंबर 2022 चा निकाल ugcnet.nta.nic.in आणि ntaresuts.nic.in वर प्रसिद्ध केला जाईल. निकाल जाहीर झाल्यानंतर, आपण खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहू शकता.
असा चेक करा निकाल –
1. निकाल पाहण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर जा.
2. होमपेजवर, ‘उमेदवार कॉर्नर’ वर जा.
3. आता, UGC NET डिसेंबर 2022 निकाल लिंकवर क्लिक करा.
4. एक नवीन पृष्ठ उघडेल, तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख वापरून लॉग इन करा.
5. तुमचा NET निकाल स्क्रीनवर दिसेल.
6. डाउनलोड करा आणि प्रिंटआउट घ्या.

यावर्षी, यूजीसी नेट परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे देशभरातील 186 शहरांमधील 663 केंद्रांवर घेण्यात आली. UGC NET पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये, 150 वस्तुनिष्ठ (UGC NET Result) प्रकारचे प्रश्न एकूण 300 गुणांसाठी विचारले जातात आणि ते सोडवण्यासाठी 3 तास दिले जातात. NET परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर, उमेदवारांना त्यांचा नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख तपासता येईल.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NHM Recruitment 2023 : विना परीक्षा थेट मुलाखत!! राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत गडचिरोली येथे ‘या’ पदांवर भरती

NHM Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियान, गडचिरोली (NHM Recruitment 2023) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध रिक्त पदांच्या एकूण 107 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी पुढे दिलेल्या तारखेस थेट मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे.

संस्था – राष्ट्रीय आरोग्य अभियान, गडचिरोली
पद संख्या – 107 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 19 एप्रिल, 20 एप्रिल, 21 एप्रिल 2023 (पदानुसार)
मुलाखतीचे ठिकाण – कार्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, कॉम्पलेक्स परिसर, गडचिरोली.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (NHM Recruitment 2023)
1. सुपर स्पेशालिस्ट- 02 पदे
डीएम कॉर्डियोलॉजी / डीएम नेफ्रोलोए / एमडी ऍनेस्थेसिया / डीए / डीएनबी / एमडी, एमएस जीन / डीजीओ / डीएनबी / एमएस जनरल सर्जरी / एमडी बालरोग /
2. स्पेशलिस्ट – 26 पदे
MD मेडिसिन / DNB, MD Psvchiatrv/ DPM/ DNB, MS ENT/ DORL/ DNB
3. मेडिकल ऑफिसर एमबीबीएस – 29 पदे
MMC च्या नोंदणीसह MBBS (NHM Recruitment 2023)
4. मेडिकल ऑफिसर – आयुष पीजी – 01 पद
शैक्षणिक पात्रता : एमसीआयएम नोंदणीसह पीजी युनानी
5. मेडिकल ऑफिसर – आयुष यूजी – 02 पदे
MCIM नोंदणीसह BUMS
6. मेडिकल ऑफिसर- आरबीएसके – 15 पदे
MCIM नोंदणीसह BAMS
7. ऑडिओलॉजिस्ट- 02 पदे
ऑडिओलॉजी मध्ये पदवी
8. नर्सिंग ट्यूटर – 01 पद
MNC प्रतिकार सह B.Sc नर्सिंग
9. स्टाफ नर्स – 18 पदे
MNC च्या वैध नोंदणीसह GNM / B.Sc नर्सिंग
10. लॅब टेक्निशियन – 08 पदे
DMLT (MSBTE मुंबई)
11. सीटी स्कॅन टेक्निशियन – 01 पद (NHM Recruitment 2023)
संबंधित क्षेत्रातील डिप्लोमासह 12वी विज्ञान
12. डेंटल हायजिनिस्ट – 02 पदे
12 वी सायन्स आणि डिप्लोमा ln डेंटल हायजिनिस्ट कोर्स. राज्य दंत परिषदेकडे नोंदणी

वय मर्यादा – 18 ते 70 वर्षापर्यंत
परीक्षा फी – 150/- रुपये [राखीव प्रवर्ग – SC/ST – 100/- रुपये]
मिळणारे वेतन – 17,000/- रुपये ते 1,25,000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – गडचिरोली (महाराष्ट्र)

काही महत्वाच्या लिंक्स – (NHM Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.zpgadchiroli.in/
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Jio Work From Home Job : खुषखबर!! रिलायन्स जिओमध्ये Work From Homeचा गोल्डन चान्स; मिळेल तगडा पगार

Jio Work From Home Job

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या (Jio Work From Home Job) तरुणांसाठी नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. रिलायन्स जिओने Work From Home जॉब करण्यासाठी जागा काढल्या आहेत. ज्यामध्ये तुम्ही दरमहा 15,000 ते 45,000 रुपये पगार मिळवू शकता. काही अटींची पूर्तता करून तुम्ही ही नोकरी मिळवू शकता.

असं असेल Work From Home
1. जर तुम्हीही रिलायन्स जिओमध्ये काम करण्यास इच्छुक असाल तर तुमचे वय 17 ते 40 वर्षे असणे आवश्यक आहे.
2. तसेच काम करण्यासाठी तुमच्याकडे मोबाईल, टॅबलेट किंवा लॅपटॉप आणि चांगले इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे. तेव्हाच तुम्ही या जॉबसाठी अर्ज करू शकता.
3. तुम्ही जिओमध्ये काम करण्यासाठी (Jio Work From Home Job) टीम लीडर, कंटेंट रायटर, डेटा एंट्री ऑपरेटर, सपोर्ट सर्व्हिस यामधून जॉब निवडू शकता. या कामाचे स्वरूप तुम्हाला कंपनीकडून सांगण्यात येईल. तसेच हा जॉब तुम्हाला वर्क फ्रॉम होम करावा लागेल.

आवश्यक कागदपत्रे – (Jio Work From Home Job)
1. आधार कार्ड
2. पॅन कार्ड
3. बँक पासबुक
4. 10वी आणि 12वी मार्कशीट
5. मोबाईल नंबर (Jio Work From Home Job)
6. पासपोर्ट आकाराचा फोटो

असा करा अर्ज –
1. सर्वप्रथम, तुम्हाला तुमच्या Chrome ब्राउझरमध्ये Jio Careers ची अधिकृत वेबसाइट उघडावी लागेल.
2. वेबसाइटच्या होम पेजवर आल्यानंतर तुम्हाला Job Icon चा पर्याय निवडावा लागेल.
3. आता तुम्हाला जॉब्सचा एक पर्याय दिसेल, त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अनेक ऑनलाइन जॉब्स उघडतील.
4. नोकऱ्यांच्या यादीमध्ये, आता तुम्हाला ज्या नोकरीसाठी तुम्ही पात्र आहात त्यावर क्लिक करावे लागेल.
5. आता तुम्हाला Apply Now चा पर्याय निवडून अर्जामध्ये मागितलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी लागेल.
6. यानंतर तुम्हाला Submit या पर्यायावर क्लिक करावे लागेल. (Jio Work From Home Job)
7. आता तुम्हाला लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळेल जो तुम्हाला save करायचा आहे.

अर्ज करण्याचा दुसरा टप्पा –
1. नोंदणीनंतर, आता तुम्हाला लॉगिन आयडी आणि पासवर्डद्वारे वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल.
2. आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल, ज्यामध्ये तुम्हाला वेबसाईटवर मागितलेली सर्व माहिती आणि कागदपत्रे अपलोड करायची आहेत. (Jio Work From Home Job)
3. कागदपत्रे अपलोड केल्यानंतर, तुम्हाला Submit पर्याय निवडावा लागेल.
4. आता तुम्हाला एक पावती दिली जाईल जी तुम्ही नोकरीसाठी अर्ज केल्याचा पुरावा असेल, तुम्हाला ही पावती सुरक्षित ठेवावी लागेल.
5. आता जिओ वर्क फ्रॉम होम जॉबची माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर, ईमेल आयडीद्वारे दिली जाईल.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CIDCO Recruitment : इंजिनियर्स/ग्रॅज्युएट्ससाठी CIDCO मध्ये ‘या’ पदावर नवीन भरती; ऑनलाईन करा APPLY

CIDCO Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । शहर आणि औद्योगिक विकास (CIDCO Recruitment) महामंडळ महाराष्ट्र लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कार्यकारी अभियंता (स्थापत्य), सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य), कार्यकारी अभियंता (विद्युत), सहायक कार्यकारी अभियंता (विद्युत), सहायक परिवहन अभियंता, वरिष्ठ नियोजक, अर्थतज्ज्ञ, सहायक कायदा अधिकारी पदांच्या एकूण 37 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मे 2023 आहे.

संस्था – शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र

भरली जाणारी पदे – (CIDCO Recruitment)
1. कार्यकारी अभियंता (स्थापत्य) – 10 पदे
2. सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य) – 03 पदे
3. कार्यकारी अभियंता (विद्युत) – 01 पद
4. सहायक कार्यकारी अभियंता (विद्युत) – 01 पद
5. सहायक परिवहन अभियंता – 16 पदे
6. वरिष्ठ नियोजक – 01 पद
7. अर्थतज्ज्ञ – 01 पद
8. सहायक कायदा अधिकारी – 4 पदे

पद संख्या – 37 पदे (CIDCO Recruitment)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 मे 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – महाराष्ट्र
अर्ज फी –
राखीव प्रवर्ग – रु. 1062/-
खुला प्रवर्ग – रु. 1180/-
वय मर्यादा –

CIDCO Bharti 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. कार्यकारी अभियंता (स्थापत्य) – Degree in Civil Engineering from a recognized University or equivalent qualification as declared by the Govt. of Maharashtra.
2. सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य) – Degree in Civil Engineering of a recognized University or equivalent qualification as declared by Govt. of Maharashtra (CIDCO Recruitment)
3. कार्यकारी अभियंता (विद्युत) – Degree in Electrical Engineering from a recognized University or equivalent qualification as declared by Govt. of Maharashtra.
4. सहायक कार्यकारी अभियंता (विद्युत) – Degree in Electrical Electrical Engineering of a recognized University or equivalent qualification as declared by Govt. of Maharashtra.
5. सहायक परिवहन अभियंता Degree in Civil Engg. With Post Graduate in Traffic & Transportation Planning Transportation Engineering or Highway Engineering
6. वरिष्ठ नियोजक B.Arch or BE (Civil) or equivalent in Architecture or Civil Engineering and Post graduate degree/diploma in Town Planning. The candidate should be the Associate / Fellow Member of the Inst. of Town Planner, India (CIDCO Recruitment)
7. अर्थतज्ज्ञ MA (Economics) or Masters Degree in Economics Statistics.
8. सहायक कायदा अधिकारी Graduate of any recognized university in any discipline and 3 years degree course in law of any recognized university or 5 yrs degree course in Law of any recognized university after 12th

मिळणारे वेतन –
कार्यकारी अभियंता (स्थापत्य) Rs, 67,000 – Rs. 2,08,700/- दरमहा
सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य) Rs, 56,100 – Rs. 1,77,500/- दरमहा
कार्यकारी अभियंता (विद्युत) Rs, 67,000 – Rs. 2,08,700/- दरमहा
सहायक कार्यकारी अभियंता (विद्युत) Rs, 56,100 – Rs. 1,77,500/- दरमहा (CIDCO Recruitment)
सहायक परिवहन अभियंता Rs, 56,100 – Rs. 1,77,500/- दरमहा
वरिष्ठ नियोजक Rs, 78,800 – Rs. 2,09,200/- दरमहा
अर्थतज्ज्ञ Rs, 67,000 – Rs. 2,08,700/- दरमहा
सहायक कायदा अधिकारी Rs, 56,100 – Rs. 1,77,500/-दरमहा

निवड प्रक्रिया –
1. वरील पदांसाठी उमेदवारांची निवड करताना 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा पदनिहाय घेण्यात येणार असून सदर परीक्षेकरीता खालीलप्रमाणे अभ्यासक्रम असेल.
2. चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत.
3. लेखी परीक्षेमध्ये किमान 90 गुण प्राप्त करणारे उमेदवारच पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरतील.
4. गुणवत्ता यादीत येण्याकरीता उमेदवाराने ऑनलाईन लेखी परीक्षेत एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्तकरणे आवश्यक राहील. विहित अर्हता / अटी / शर्ती पूर्ण करणाऱ्या पात्र उमेदवारांची सदर परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे विहित आरक्षणानुसार निवड यादी बनविण्यात येईल. (CIDCO Recruitment)
5. ऑनलाईन परीक्षेनंतर त्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांची दिनांक 04.05.2022 रोजीच्या शासन निर्णय क्र. प्रानिमं 1222/प्र.क्र.54/का.13-अ नुसार मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची निवडसूची तयार करण्यात येऊन मुलाखत घेतली जाईल.
6. अंतिम निवड करताना ऑनलाईन परीक्षा व मुलाखतीसाठी अनुक्रमे 200 व 25 असे एकूण 225 गुण असतील.

काही महत्वाच्या लिंक्स – (CIDCO Recruitment)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – cidco.maharashtra.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Police Bharti 2023 : नवरा-बायको एकाचवेळी झाले पोलीस भरती; शेतात कांदे काढत असताना हाती आली मेरीट लिस्ट

Police Bharti 2023 (4)

करिअरनामा ऑनलाईन । शिरूर तालुक्यातील दाम्पत्याने (Police Bharti 2023) कामालच केली. या जोडप्याने पोलिस भरती होण्याचा ध्यास घेतला आणि पूर्णही केला. विशेष म्हणजे शेतात कांदा काढणी करत असताना शेवटची मेरिट लिस्ट लागली आणि या जोडप्याची पोलिस भरतीसाठी निवड झाल्याची बातमी हाती आली. आनंदाच्या भरात पतीने आपल्या पत्नीला उचलून घेऊन आनंद साजरा केला. यावेळीत्यांच्या आई वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

समाजासाठी झटणारं शेलार कुटुंब
पुण्याच्या शिरुर तालुक्यातील चांडोह येथे राहणारे शेलार कुटुंब. म्हातरबा शेलार यांचा मुलगा तुषार आणि सून भाग्यश्री हे दोघेही पोलिसात भरती झाल्याने त्यांच्या कुटुंबात उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे. या आनंदात पतीने पत्नीला उचलून घेऊन कांद्याच्या शेतात आनंद (Police Bharti 2023) उत्सव साजरा केला. शेलार यांचे कुटूंब हे गावाच्या सामाजिक विकासासाठी झटणारे कुटुंब आहे. शेलार कुटुंबातील त्यांची आई कुसूम शेलार यांनी गावचं सरपंच पद भूषवताना अनेक विकास कामे करुन गावाला वेगळी ओळख निर्माण करुन देण्याचे काम केले आहे.
कष्टाचं चीज झालं (Police Bharti 2023)
2020  मध्ये तुषार आणि भाग्यश्री यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पडला. दोघांनी पोलिसात भरती व्हायचे अशी शपथच घेतली होती. या दोघांनाही पोलिस भरतीचे वेध लागले होते. तुषार आणि भाग्यश्री यांनी गेल्या चार वर्षांपासून पोलिस भरती होण्यासाठी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले होते. अभ्यासाबरोबरच दररोज व्यायाम करणे, शेतीतील काम करणे हा त्यांचा नित्यक्रम होता. त्यांना हे सर्व करताना प्रचंड त्रास सहन करावा लागला; मात्र कष्टाचे चीज झाल्याची भावना तुषार यांनी व्यक्त केली आहे.

यशस्वी दाम्पत्याने व्यक्त केल्या भावना…
शिरुर तालुक्यातील जांबूत येथील पोलिस अकादमीतून प्रशिक्षण घेतलेले अनेक तरुण परीक्षेत पास झाले आहेत. असे असले तरी या जोडप्याला मिळालेल्या यशाचे महत्त्व आगळेवेगळेच आहे. याबाबत आपल्या भावना व्यक्त करताना भाग्यश्री शेलार यांनी सांगितले की; “सासरी नांदायला (Police Bharti 2023) आल्यावर मला सासूने मुलीप्रमाणे अन् थोरल्या जावेने बहिणीप्रमाणे वागणूक दिली. सासरे आणि भावाने खुप सहकार्य केले. दररोजचा व्यायाम व अभ्यास या परीक्षेसाठी कामी आला. जिद्द अन चिकाटीच्या जोरावर हे यश मिळाले आहे. आई-वडीलांच्या आशीर्वादाने पोलिस दलात भरती झाले.”
या घवघवीत यशानंतर तुषार यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की; आई, वडील व भाऊ, वहिनीच्या आशीर्वादाने हे यश मिळाले आहे. गेल्या चार वर्षात (Police Bharti 2023) चार वेळा या भरतीसाठी जिवाचं रान केलं; अखेर यावर्षी हे यश मिळवता आले. यासाठी पत्नी भाग्यश्रीने मोलाची साथ दिली. त्यामुळेच आम्ही दोघेही पोलिस भरती झालो. भविष्यात शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरूद्ध लढेन. कायदा आणि सुव्यवस्था राखताना कोणावर अन्याय होऊ देणार नाही.”
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Tattoo Banned Jobs : अंगावर टॅटू काढल्यानंतर हातातून निसटतील ‘या’ सरकारी नोकऱ्या; जाणून घ्या नियम

Tattoo Banned Jobs

करिअरनामा ऑनलाईन । जर तुम्ही सरकारी नोकरीची तयारी करत (Tattoo Banned Jobs) असाल तर टॅटू काढण्यापासून सावध रहा. तुम्हाला माहित आहे का; सरकारी नोकरीसाठी अनेक पात्रता आहेत. यापैकी काही पात्रता अभ्यासाशी संबंधित आहेत तर काही वागणुकीच्या संदर्भात. प्रत्येक कामाच्या ठिकाणी स्वतःचे नियम असतात. असाच एक नियम म्हणजे, भारतात अनेक सरकारी नोकऱ्यांमध्ये शरीरावर टॅटू काढण्यास मनाई आहे.
भारतात अनेक सरकारी नोकऱ्यांमध्ये शरीरावर टॅटू काढण्यास मनाई करण्यात आली आहे. कारण भारतातील अनेक उच्च नोकऱ्यांमध्ये टॅटूंबाबत अतिशय कडक नियम करण्यात आले आहेत. जाणून घ्या कोणत्या सरकारी नोकरीचे उमेदवार शरीराच्या कोणत्याही भागावर टॅटू काढू कत नाहीत याबद्दल..

जर तुम्ही शरीराच्या कोणत्याही भागावर टॅटू काढला (Tattoo Banned Jobs) असेल तर तुम्ही पुढील मोठ्या सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज करू शकत नाही.
1. भारतीय प्रशासकीय सेवा- IAS (भारतीय प्रशासकीय सेवा)
2. भारतीय पोलीस सेवा- IPS (भारतीय पोलीस सेवा)
3. भारतीय महसूल सेवा- IRS (अंतर्गत महसूल सेवा)
4. भारतीय विदेश सेवा- IFS (भारतीय विदेश
5. भारतीय सेना- भारतीय सैन्य
6. भारतीय नौदल- भारतीय नौदल
7. भारतीय वायुसेना- भारतीय वायुसेना
8. भारतीय तटरक्षक- भारतीय तटरक्षक दल
9. पोलीस दल
या नोकऱ्यांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या शरीरावर आढळणारे कोणतेही टॅटू नाकारले जातात. यामागे अनेक कारणे दिली जातात.

Tattoo Banned Jobs

काय आहे कारण – (Tattoo Banned Jobs)
1. टॅटू हे अनेक आजारांचे कारण असल्याचे मानले जाते. यामुळे एचआयव्ही, त्वचा रोग आणि हिपॅटायटीस ए आणि बी सारख्या आजारांचा धोका वाढतो.
2. शरीरावर टॅटू गोंदवून घेणारी व्यक्ती शिस्तीत राहत नाही; असा अनेकांच्या मनात एक समज आहे. ही लोकं कामापेक्षा आपले छंद महत्त्वाचे समजतात; असं जाणकारांना वाटतं. (Tattoo Banned Jobs)
3. ज्या व्यक्तीने शरीरावर गोंदवले आहे किंवा टॅटू काढला आहे अशा व्यक्तीला देशाच्या सुरक्षा दलात नोकरी दिली जात नाही कारण त्यामुळे सुरक्षा धोक्यात येते. जेव्हा एखादी व्यक्ती पकडली जाते तेव्हा त्याला टॅटूद्वारे ओळखता येते; यामुळे देशाची सुरक्षा धोक्यात येवू शकते. त्यामुळेच टॅटू असलेल्या व्यक्तीला सुरक्षा दलात नोकरी दिली जात नाही.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Navy Success Story : परीक्षेला जाण्यासाठी नव्हते पैसे; आई-वडिलांनी केलं ‘असं’ काही… रिक्षा चलकाची मुलगी बनली नेव्ही ऑफिसर

Indian Navy Success Story Vaishnavi Patil

करिअरनामा ऑनलाईन । शहर असो किंवा ग्रामीण (Indian Navy Success Story) भागातील एखादं गांव… तिथली अनेक मुलं हुशार होतकरू असतात. अनेकांना घरच्या परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही. ज्यांना शिक्षण घ्यायचं असतं त्यांना अनेकदा अर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. काही विद्यार्थी असे असतात जे कशाचीही तमा न बाळगता ठरवलेले ध्येय गाठतात. महाराष्ट्रातील अशाच एका जिद्दी मुलीची प्रेरणादायी कहाणी आज आपण पाहणार आहोत.
वैष्णवी ज्ञानेश्वर पाटील
जळगावच्या बोदवड तालुक्यातील चिखली येथील एका गाव खेड्यातील रिक्षा चालकाच्या मुलीने किमयाच केली आहे. तिने चक्क नेव्ही अधिकारी होण्यापर्यंत मजल (Indian Navy Success Story) मारली आहे. यामुळे गावकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या मुलींचं सर्वत्र कौतुक होत आहे. वैष्णवी ज्ञानेश्वर पाटील असं त्या मुलीचं नाव असून तीने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करून आपले ध्येय गाठत थेट नेव्ही अधिकाऱ्यापर्यंत मजल मारली आहे.

Indian Navy Success Story Vaishnavi Patil

वडील रिक्षा चालक (Indian Navy Success Story)
वैष्णवी ज्ञानेश्वर पाटील या विद्यार्थिनीने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हलाखीच्या परिस्थितीवर मात करत आपले ध्येय गाठलं आहे. तिने थेट नेव्हीच्या अधिकारी पदापर्यंत मजल मारल्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. या विद्यार्थिनीचे वडील ज्ञानेश्वर पाटील हे घर खर्च भागवण्यासाठी (Indian Navy Success Story) रिक्षा चालवतात. मुलीच्या शिक्षणात आर्थिक अडचणी येवू नयेत यासाठी  त्यांनी खूप कष्ट घेतले आहेत. त्यांनी मुलीला लागेल ते अभ्यासाचे साहित्य वेळोवेळी पुरवले.

Indian Navy Success Story Vaishnavi Patil

परीक्षेला जाताना पैसे जमवण्यासाठी आई-वडिलांनी ‘हे’ केलं
वैष्णवीचा हैदराबाद येथे नेव्हीच्या परिक्षेचा पेपर होता. त्यावेळी घरात एक रुपया सुध्दा नव्हता. शेवटी वैष्णवीच्या आई-वडिलांनी एलआयसी मनी बॅक पॉलिसीचे पैसे काढले. त्यांनी तात्काळ ते पैसे मुलीला विमानाच्या तिकिटासाठी दिले.  अखेर वैष्णवीने नेव्हीची परीक्षा दिली. अत्यंत (Indian Navy Success Story) बिकट आर्थिक परिस्थितीवर मात करीत वैष्णवीने आपल्या आई-वडिलांचे  स्वप्न पूर्ण केले. सध्या ती इंडियन नेव्हीमध्ये अधिकारी पद भूषवत आहे. वैष्णवीला घरच्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे ती इथपर्यंत पोहचली.  तिच्यामधील अभ्यासाची तळमळ पाहून घरच्यांनी देखील तिला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाही.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com