Home Blog Page 312

CDAC Recruitment 2023 : CDAC अंतर्गत ‘या’ पदावर मोठी भरती; जाणून घ्या पात्रता

CDAC Recruitment 2023 (4)

करिअरनामा ऑनलाईन । प्रगत संगणन विकास केंद्रात विविध (CDAC Recruitment 2023) पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध रिक्त पदांच्या एकूण 63 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2023 आहे.
संस्था – प्रगत संगणन विकास केंद्र
पद संख्या – 63 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 मे 2023 (06:00 PM)

भरली जाणारी पदे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – (CDAC Recruitment 2023)
1. प्रोजेक्ट असोसिएट – 35 पदे
BE/B.Tech/MCA/विज्ञान/कॉम्प्युटर सायन्स पदव्युत्तर पदवी तसेच 01 ते 04 वर्षे अनुभव आवश्यक.
2. प्रोजेक्ट इंजिनिअर – 17 पदे
60% गुणांसह BE/B.Tech/MCA/विज्ञान/कॉम्प्युटर सायन्स पदव्युत्तर पदवी तसेच 03 ते 04 वर्षे अनुभव आवश्यक.
3. प्रोजेक्ट मॅनेजर – 02 पदे (CDAC Recruitment 2023)
60% गुणांसह BE/B.Tech/MCA/विज्ञान/कॉम्प्युटर सायन्स पदव्युत्तर पदवी तसेच 12 ते 15 वर्षे अनुभव आवश्यक.

वय मर्यादा – 24 मे 2023 रोजी 34 ते 50 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी – फी नाही (CDAC Recruitment 2023)
नोकरी करण्याचे ठिकाण – दिल्ली/संपूर्ण भारत
काही महत्वाच्या लिंक्स – (CDAC Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Recruitment 2023 : सरकारी नोकरीची मोठी संधी!! UPSC अंतर्गत 285 पदांवर भरतीची घोषणा

UPSC Recruitment 2023 (2)

करिअरनामा ऑनलाईन । संघ लोक सेवा आयोग अंतर्गत नवीन (UPSC Recruitment 2023) भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ फार्म मॅनेजर, केबिन सेफ्टी इन्स्पेक्टर, मुख्य ग्रंथपाल, शास्त्रज्ञ ‘बी’, स्पेशालिस्ट ग्रेड II, सहाय्यक केमिस्ट, सहाय्यक कामगार आयुक्त, वैद्यकीय अधिकारी (GDMO उप-संवर्ग), जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर (होमिओपॅथी) पदांच्या एकूण 285 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 जून 2023 आहे.
संस्था – संघ लोक सेवा आयोग (Union Public Service Comission)
भरली जाणारी पदे – वरिष्ठ फार्म मॅनेजर, केबिन सेफ्टी इन्स्पेक्टर, मुख्य ग्रंथपाल, शास्त्रज्ञ – ‘बी’, स्पेशालिस्ट ग्रेड II, सहाय्यक केमिस्ट, सहाय्यक कामगार आयुक्त, वैद्यकीय अधिकारी (GDMO उप-संवर्ग), जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर (होमिओपॅथी)
पद संख्या – 285 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 जून 2023

वय मर्यादा – (UPSC Recruitment 2023)
1. वरिष्ठ फार्म मॅनेजर – 35 वर्ष
2. केबिन सेफ्टी इन्स्पेक्टर – 40 वर्ष
3. मुख्य ग्रंथपाल -35 वर्ष
4. शास्त्रज्ञ – ‘बी’ -35 वर्ष
5. स्पेशालिस्ट ग्रेड II – 40 वर्ष
6. सहाय्यक केमिस्ट – 30 वर्ष (UPSC Recruitment 2023)
7. सहाय्यक कामगार आयुक्त – 35 वर्ष
8. वैद्यकीय अधिकारी (GDMO उप-संवर्ग) – 32 वर्ष
9. जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर (होमिओपॅथी) – 35 वर्ष
अर्ज फी– Rs. 25/-
निवड प्रक्रिया – मुलाखत

भरतीचा तपशील – (UPSC Recruitment 2023)
1. वरिष्ठ फार्म मॅनेजर – 01 पद
2. केबिन सेफ्टी इन्स्पेक्टर – 20 पदे
3. मुख्य ग्रंथपाल – 01 पद
4. शास्त्रज्ञ – ‘बी’ 07 पदे
5. स्पेशालिस्ट ग्रेड II – 13 पदे
6. सहाय्यक केमिस्ट – 03 पदे
7. सहाय्यक कामगार आयुक्त – 01 पद
8. वैद्यकीय अधिकारी (GDMO उप-संवर्ग) – 234 पदे
9. जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर (होमिओपॅथी) – 05 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. वरिष्ठ फार्म मॅनेजर – M.Sc. in Horticulture or Agriculture with specialization in Horticulture from a recognized University or Institute. (UPSC Recruitment 2023)
2. केबिन सेफ्टी इन्स्पेक्टर – (i) Bachelor’s Degree from a recognised University or institute.
(ii) At least one year experience as Directorate General of Civil Aviation (DGCA) approved Safety and Emergency Procedure (SEP) Instructor
3. मुख्य ग्रंथपाल – (i) Degree from a recognized University.
(ii) Degree or equivalent diploma in Library Science from a recognized University or Institution.
4. शास्त्रज्ञ – ‘बी’ Masters Degree in Zoology from a recognized University.
5. स्पेशालिस्ट ग्रेड – II A recognized MBBS degree qualification is included in the First Schedule or Second Schedule or Part II of the Third Schedule (other than licentiate qualifications) to the Indian Medical Council Act, 1956, (102 of 1956).
6. सहाय्यक केमिस्ट – Masters’s Degree in Chemistry /Organic Chemistry/ Physical Chemistry/ Inorganic Chemistry/ Analytical Chemistry/ Agricultural Chemistry and Soil Science from a recognized University or Institute. (UPSC Recruitment 2023)
7. सहाय्यक कामगार आयुक्त – A Post Graduate Degree/Diploma from a recognized university in Social work or Labour welfare or Industrial Relations or Personnel Management or a Degree in Law from a recognized university
8. वैद्यकीय अधिकारी (GDMO उप-संवर्ग) – A recognized MBBS qualification is included in the First or Second Schedule (Other than licentiate qualifications) to the Indian Medical Council Act, 1956.
9. जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर (होमिओपॅथी) – (i) Degree in Homoeopathy of a recognized University or Statutory State Board/Council of equivalent recognized under the Homoeopathy Central Council Act, 1973 (59 of 1973).
(ii) Enrolment on the State Register or Central Register of Homoeopathy.

आवश्यक कागदपत्रे –
1. Matriculation/10th Standard or equivalent certificate indicating date of birth, or mark sheet
2. Degree/Diploma certificate as proof of educational qualification
3. Caste certificate (UPSC Recruitment 2023)
4. Certificate of Disability
5. Experience Certificate
असा करा अर्ज –
1. वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन सादर करायचा आहे.
2. इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
3. अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 जून 2023 आहे. (UPSC Recruitment 2023)

निवड प्रक्रिया –
1. या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. उमेदवारांनी सादर केलेल्या ऑनलाइन अर्जांमध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे मुलाखतीसाठी उमेदवारांना निवडले जाईल. (UPSC Recruitment 2023)
3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
काही महत्वाच्या तारखा –

काही महत्वाच्या लिंक्स – (UPSC Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – upsc.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Employment News : 71 हजार तरुणांना मिळणार सरकारी नोकरी; पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार जॉइनिंग लेटर

Employment News (3)

करिअरनामा ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवार दि. 16 मे रोजी (Employment News) विविध सरकारी विभागात सहभागी होणाऱ्या 71 हजार युवकांना नियुक्तीपत्र वितरित करणार आहेत. तसेच ते युवकांना व्हर्च्युअली संबोधित करतील. रोजगार मेळावा देशातील 45 ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या विविध विभागांसह राज्य सरकार आणि केंद्रात नवीन भरती केली जात आहे. देशभरातील ही भरती ग्रामीण पोस्टमन, इन्स्पेक्टर, टिकीट क्लर्क, ज्युनिअर क्लर्स आणि टायपीस्ट, ट्रॅक मेंटनर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, लोवर डिवीजन, लिपीक, अधिकारी, कर सहायक सारख्या विविध पदांसाठी ही भरती होत आहे.
तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करुन देणं हे पंतप्रधान मोदी यांनी उचललेलं मोठं पाऊल आहे. यामुळे देशातील युवकांचे सशक्तीकरण होण्यास मदत होणार आहे. नवीन (Employment News) भरतीमधून युवकांना स्वतःला प्रशिक्षित करण्याची संधी मिळेल. सर्व सरकारी विभागाच्या नवीन नियुक्त केलेल्यां उमेदवारांसाठी ऑनलाईन ओरिएंटेशन कोर्स उपलब्ध केला जाणार आहे.

वर्षाअखेरीस होणार 10 लाख नोकरभरती (Employment News)
पंतप्रधान मोदी यांनी गेल्या वर्षी 22 ऑक्टोबरला रोजगार मेळाव्याला सुरुवात केली. विविध सरकारी एजन्सीसोबत एसएससी, युपीएससी, रेल्वे इत्यादीमध्ये भरती पूर्ण (Employment News) करण्यात येत आहे. 2023 पर्यंत सुमारे 10 लाख उमेदवारांची भरती केली जाईल. पंतप्रधान मोदी यांनी असे निर्देश दिले आहेत; की सरकार 2023 पर्यंत सुमारे 10 लाख जागांची भरती करेल.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Business Success Story : वडिलांनी सांगितलं IAS हो; लेकानं गर्ल्स हॉस्टेलसमोर टाकला चहाचा स्टॉल, आज जमतो 150 कोटींचा गल्ला

Business Success Story (1)

करिअरनामा ऑनलाईन । नवी दिल्लीतलं चाय सुट्टा बार हे दोन मित्रांनी (Business Success Story) सुरू केलेलं एक चहाचं साधं दुकान. मात्र आता त्याच्या अनेक शाखा विविध शहरांमध्ये सुरू झाल्या आहेत. अनुभव दुबे आणि आनंद नायक या इंदूरमध्ये राहणाऱ्या अवघ्या 22-23 वर्षांच्या दोन मित्रांनी ‘चाय सुट्टा बार’ सुरु केला. दोघांनी बी.कॉमचं शिक्षण घेतलं होतं. अनुभवचे वडील व्यावसायिक आहेत तरीही आपल्या मुलानं बिझनेसमन होऊ नये असं त्यांना वाटत होतं. त्यांनी मुलाला UPSCची तयारी करण्यासाठी दिल्लीला पाठवलं. त्याआधी सीएची परीक्षा देण्याचा अयशस्वी प्रयत्न अनुभवनं केला होता. मात्र दिल्लीमध्ये गेल्यावर अनुभवला स्वतःतल्या व्यावसायिक गुणांची जाणीव झाली व त्यानं शेवटी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.

Business Success Story Chai Sutta Bar

150 कोटींचा टर्न ओव्हर
IAS होण्याचं स्वप्न घेऊन आलेला तरुण एका आयडियाने थेट स्टार्टअपचा मालक झाला. आज या स्टार्टअपचा टर्न ओव्हर 150 कोटींच्या घरात आहे. पण त्यासाठी त्याला जी (Business Success Story) आयडिया सुचली त्यावर त्याने काम केले. लोकांनी नावं ठेवली, पण त्याच्या मनाने निश्चिय केला होता, त्यानुसार, त्याने मेहनत घेतली. आज या चहाच्या कट्यावर त्याला ज्यांनी नावं ठेवली, ते चहा पिऊन गप्पा मारत बसतात.

Business Success Story Chai Sutta Bar

‘चाय सुट्टा बार’
अनुभव दुबे दिल्लीत आला होता युपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी, पण त्याला एक कल्पना सुचली. मित्र आनंद नायक सोबत त्याने ‘चाय सुट्टा बार’ हा स्टार्टअप सुरु केला. त्याचे वडील (Business Success Story) एक व्यावसायिक होते. पण आपला मुलगा व्यावसायिक व्हावा, अशी त्यांची इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी अनुभवला युपीएससीच्या तयारीसाठी दिल्ली येथे पाठवले. अनुभवच्या डोक्यात मात्र काही तरी बिझनेस करण्याचा विचार होता. त्याला मित्र आनंद नायकची मदत मिळाली आणि चहाचा कट्टा सुरु झाला.

Business Success Story Chai Sutta Bar

अशी झाली व्यवसायाला सुरुवात (Business Success Story)
आनंद नायकच्या वडिलांचा कपड्यांचा व्यवसाय होता. पण तो बंद झाला होता. अनुभव कोणता तरी व्यवसाय करु इच्छित असल्याचे आनंदला माहिती होते. आनंदने त्यांचा कपड्याचा व्यवसाय बंद झाल्याची माहिती दिली. दोघांनी मिळून नवीन व्यवसाय सुरु करण्याचे ठरवले. अनुभवने आई-वडिलांना कसलीही माहिती न देता इंदुर गाठले. अनुभव आणि आनंद कडे 3 लाख रुपयांची बचत होती. अनुभवने चहाच्या स्टार्टअपची आयडिया दिली नी मग दोघांचा हा चहाचा कट्टा जोरदार रंगला. कमी गुंतवणुकीत त्यांना जोरदार परतावा मिळाला.

 

Business Success Story Chai Sutta Bar

गर्ल्स होस्टेलसमोर केली सुरुवात
त्यांनी इंदुरच्या भंवरकुआँमध्ये गर्ल्स होस्टेलसमोर त्यांच्या चाय सुट्टा बारची सुरुवात केली. त्यांचे चहाचे दुकान एका मोक्याच्या ठिकाणी होते. तरीही पहिल्या दिवशी त्यांना म्हणावा (Business Success Story) तितका प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर या दोघांचे मित्र मदतीला धावले. हळुहळू विद्यार्थी आणि इतर लोक चहा पिण्यासाठी गर्दी करु लागले.

Business Success Story Chai Sutta Bar

गर्दीसाठी अशी लढवली आयडिया
गर्ल्स होस्टेलसमोर चहाचे दुकान सुरु करुनही हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने हे दोघे मित्र पेचात पडले. दोघांनी त्यांच्या मित्रांच्या मदतीने गर्दी जमवली. या चहाच्या दुकानावर (Business Success Story) सकाळपासून संध्याकाळपर्यंत मित्रांची जोरदार बैठक बसली. गर्दी पाहून चहा पिणाऱ्यांची पावलं आपोआप या दुकानाकडे वळली. ही आयडिया एकदम जोरात चालली. त्यानंतर गर्दीच्या ठिकाणी त्यांच्या काही मित्रांनी चाय सुट्टा बारची तोंडी जाहिरात सुरु केली. ही कल्पना पण कामी आली. त्यांच्या स्टॉलवर आता चहा प्रेमींची अलोट गर्दी उसळू लागली.

 

Business Success Story Chai Sutta Bar

देश विदेशात आहेत फ्रँचाईजी (Business Success Story)
अनुभव आणि आनंदने 6 महिन्यातच 2 राज्यात चाय सुट्टा बारच्या 4 फ्रँचाईजी दिल्या. देशात सध्या त्यांच्या या स्टार्टअपचे 150 आउटलेट आहेत. केवळ देशातच नाही तर परदेशात पण त्यांनी फ्रँचाईजी दिल्या आहेत. चाय सुट्टा बारने दुबई, युके, कॅनाडा आणि ओमान या देशापर्यंत मजल मारली आहे. एका अंदाजानुसार या कंपनीची वार्षिक उलाढाल 100-150 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

After 10th Courses : 10 वी नंतर काय? तगड्या पॅकेजसाठी करा हे ‘4’ शॉर्ट टर्म कोर्स

After 10th Courses

करिअरनामा ऑनलाईन । आजच्या काळात तरुणांसाठी करिअरचे (After 10th Courses) अनेक पर्याय खुले झाले आहेत. आज तुम्हाला हवं असेल तर तुमच्या आवडीनुसार आणि पात्रतेनुसार कोणताही शॉर्ट टर्म कोर्स करून 10 ते 25 हजार रुपयांची नोकरी तुम्ही सहज मिळवू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच काही ट्रेंडिंग शॉर्ट टर्म कोर्सेसबद्दल सांगणार आहोत, ज्यांची फी ही खूप कमी आहे. हे कोर्स करुन तुम्ही तुमच्या करिअरमध्ये नक्कीच यश मिळवू शकता.
1. डिप्लोमा इन स्टेनोग्राफी (After 10th Courses)
आजच्या काळातील सर्वात ट्रेंडिंग शॉर्ट टर्म कोर्स म्हणजे डिप्लोमा इन स्टेनोग्राफी. हा कोर्स ट्रेंडिंग असण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे या कोर्समध्ये तुम्हाला स्टेनोग्राफीसोबतच कॉम्प्युटर आणि टायपिंग शिकवलं जातं. स्टेनोग्राफी शिकून तुम्ही सरकारी नोकरी सहज मिळवू शकता. याशिवाय स्टेनोग्राफी शिकून तुम्ही कोणत्याही मल्टिनॅशनल कंपनीत (MNC) दरमहा सुरुवातीचे 25 ते 30 हजार रुपये सहज कमावू शकता.

2. डिप्लोमा इन आर्ट टीचर
भविष्यात शिक्षक व्हायचे असेल तर तुम्ही या क्षेत्रात करिअर करु शकता. मात्र कलाशिक्षक होण्यासाठी तुम्हाला कला आणि हस्तकलेची आवड असणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला डिप्लोमा इन आर्ट टीचरचा 4 महिन्यांचा शॉर्ट टर्म कोर्स करावा लागेल, त्यानंतर तुम्ही या क्षेत्रात (After 10th Courses) करिअर करू शकाल. वास्तविक या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना कसे शिकवायचे याचे प्रशिक्षण दिले जाते. 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम चांगला पर्याय आहे. खासगी संस्थांमध्येही या अभ्यासक्रमाची मागणी जास्त आहे. हा कोर्स करून तुम्ही महिन्याला 30 ते 35 हजार रुपये कमावू शकता.
3. डिप्लोमा इन मल्टिमीडिया
तिसऱ्या शॉर्ट टर्म कोर्सबद्दल सांगायचं तर आजच्या काळात प्रत्येक तिसरी व्यक्ती सोशल मीडियावर व्हिडिओ तयार करुन प्रसिध्दी मिळवत आहे. यासोबतच ते भरपूर पैसाही (After 10th Courses) कमवत आहेत. या व्हिडिओ निर्मात्यांना त्यांचे व्हिडिओ एडिट करण्यासाठी व्हिडिओ एडिटर, ॲनिमेटर आणि ग्राफिक डिझायनरची आवश्यकता असते. अशा तऱ्हेने 10वी आणि 12वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थीही या क्षेत्रात करिअर करु शकतात. त्यासाठी डिप्लोमा इन मल्टिमीडियाचा शॉर्ट टर्म कोर्स करून व्हिडिओ एडिटर,ॲनिमेटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणून करिअर सुरु करता येतं.

4. डिप्लोमा इन फाइन आर्ट्स
हे असे युग आहे जेव्हा कला आणि कलाकार या दोघांनाही जगभरात महत्व दिले जाते. जर तुम्हाला आर्ट अँड क्राफ्टची थोडीफार समज किंवा आवड असेल तर फाइन (After 10th Courses) आर्ट्स क्षेत्रात डिप्लोमा करून तुम्ही उत्तम करिअरच्या दिशेने वाटचाल करु शकता. 10 वीच्या आधारे 6 महिने ते 1 वर्षांपर्यंत डिप्लोमा केला जातो. हा कोर्स केल्यानंतर ग्राफिक डिझायनर, आर्ट टीचर, फ्लॅश ॲनिमेटर, आर्ट लायसन्स ऑफिसर या पदांवर नोकरी मिळू शकते आणि दरमहा 50 हजारांपेक्षा जास्त पगार मिळू शकतो.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Motivational Story : अ‍ॅसिड हल्ल्यातील जखमी मुलगी 10वीत टॉपर; ब्रेल लिपीत अभ्यास करुन मिळवले 95.2%

Motivational Story of Kafee

करिअरनामा ऑनलाईन । चंदीगडच्या एका अ‍ॅसिड हल्ला पीडीत (Motivational Story) मुलीने CBSE बोर्डाच्या 10वीच्या परीक्षेत शाळेतून प्रथम येण्याची कामगिरी केली आहे. अंध असूनही तिने हे यश मिळविल्याने तिचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.  CBSEचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. यात देशभरातील लाखो विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. CBSE परीक्षेत चंदीगडच्या एका अ‍ॅसिड हल्ला पिडीत मुलीने दहावीच्या परीक्षेत 95.2 टक्के मिळवित नवा इतिहास रचला आहे. तिची कहाणी अनेकांना प्रेरणा देणारी आहे.

Motivational Story of Kafee

ब्रेल लिपीतून केला अभ्यास
काही दिवसांपूर्वी CBSE परीक्षेचे 10वी आणि 12वीचे निकाल जाहीर झाले आहेत. यंदा 10 वी च्या परीक्षेत उत्तीर्णतेची टक्केवारी 95.2% आहे. CBSE 10वीच्या परीक्षेत चंदीगडच्या 15 वर्षीय काफी हीला 95.2% मार्क मिळाले आहेत. काफी अवघी तीन वर्षांची असताना तिच्यावर शेजाऱ्यांनी (Motivational Story) अ‍ॅसिड टाकले. त्यामुळे तिचा संपूर्ण चेहरा तर भाजलाच शिवाय तिची दृष्टी देखील गेली. त्यामुळे तिने ब्रेल लिपीतून 10वीचा अभ्यास केला. या समस्यांवर मात करत काफीचा लढा सुरुच होता.  अनेक अडचणींवर मात करत तिने अभ्यासाची जिद्द सोडली नाही. ब्रेल लिपीतून अभ्यास करत ती शाळेत टॉपर ठरली.

Motivational Story of Kafee

IAS होण्याची इच्छा
काफी हीने सांगितले की; “मी दर दिवशी पाच ते सहा तास अभ्यास करायचे. माझे आई-वडील आणि शिक्षकांनी मला खूपच सहकार्य केले. मला मोठेपणी IAS अधिकारी बनून देश आणि समाजाची सेवा करायची आहे.”
काफीचे वडील हरीयाणा सचिवालयात शिपायाची (Motivational Story) नोकरी करतात. आता ते आपल्या कुटुंबियासह शास्रीनगरात राहतात. तिचे वडील पवन म्हणतात की; “काफी जेव्हा तीन वर्षांची होती तेव्हा शेजारी राहणाऱ्या लोकांनी तिच्यावर अ‍ॅसिड हल्ला केला. त्यात काफी प्रचंड जखमी झाली. या हल्यात तिची दृष्टी गेल्याने तिच्या वडीलांनी अनेक डॉक्टरांकडे धाव घेतली पण काही उपयोग झाला नाही. काफिला तिची दृष्टी परत मिळाली नाही. तिची IAS अधिकारी होण्याची इच्छा   असल्याने आम्ही तिला पूर्ण सहकार्य करणार आहे.”
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ICSE ISC Result 2023 : ICSE आणि ISC परीक्षेत मुलींचा डंका; महाराष्ट्राच्या मुली देशात अव्वल

ICSE ISC Result 2023

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय मंडळाच्या ICSE आणि ISC परीक्षांचा (ICSE ISC Result 2023) निकाल जाहीर झाला असून यंदाही मुलींनीच  बाजी मारली आहे. या दोन्ही बोर्डाच्या निकालात महाराष्ट्राच्या मुली देशात अव्वल आल्या आहेत.
कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (CICSE) या केंद्रीय मंडळाच्या ICSE 10वी आणि ISC 12वी परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. ICSE 10वी बोर्डाचा निकाल हा 98.94 टक्के लागला आहे. तर ISC 12 वी बोर्डाचा निकाल 96.93 टक्के लागला आहे. विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cisce.org आणि results.cisce.in वर त्यांचे निकाल पाहू शकतात.

महाराष्ट्रातील मुलींचा देशात डंका (ICSE ISC Result 2023)
ISCISC 12वी बोर्ड परीक्षेत देशातून 5 विद्यार्थी पहिल्या रँकवर आले आहेत. तर 10वी बोर्ड परीक्षेत 9 विद्यार्थी पहिल्या रँक वर आहेत. त्यामध्ये महाराष्ट्राच्या मुलींनी सरशी केली आहे. 10वी बोर्ड परीक्षेत महाराष्ट्रातून ठाण्याच्या सुलोचनादेवी सिंघानिया शाळेची इप्शिता भट्टाचार्य 10वी बोर्ड परीक्षेत देशात पहिली आली आहे. तर 12वी बोर्ड परीक्षेत महाराष्ट्रातून मुंबईच्या बॉम्बे स्कॉटिश शाळेची विद्यार्थिनी श्रेया (ICSE ISC Result 2023) उपाध्ये देशात पहिली आली आहे.
यावर्षी 10वीच्या परीक्षेत एकूण 98.94 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर 12वीच्या परीक्षेत एकूण 96.93 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.आयसीएसई (दहावी) बोर्डात 99.21% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर 98.71% मुलं उत्तीर्ण झाली आहेत. ISC 12वी बोर्डामध्ये देखील मुलींची सरशी झाली आहे. 12वीत 98.01टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर 95.96 टक्के मुलं उत्तीर्ण झाली आहेत.

जर विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांबाबत काही आक्षेप असल्यास ते पुन्हा तपासणीसाठी अर्ज करु शकतात. ही सुविधा 21 मे पर्यंत उपलब्ध राहिल. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी (ICSE ISC Result 2023) बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. केंद्रीय मंडळाच्या ICSE 10वी आणि ISC 12वी च्या परीक्षा मार्च आणि फेब्रुवारी महिन्यांत घेण्यात आल्या होत्या.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MPSC Recruitment 2023 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची 82 जागांवर नवीन भरती; पहा कोणती पदे आहेत रिक्त

MPSC Recruitment 2023 (5)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध (MPSC Recruitment 2023) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, आयुष संचालनालयातील आयुष संचालक, गट-अ, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण व संबंधित, गट अ, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, समाज कल्याण अधिकारी, गट ब, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, गृह प्रमुख, गट ब, समाज कल्याण आयुक्तालय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील या पदांच्या एकूण 82 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जून 2023 आहे.
आयोग – महाराष्ट्र लोकसेवा आयोग
भरली जाणारी पदे – (MPSC Recruitment 2023)
1. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, आयुष संचालनालयातील आयुष संचालक, गट-अ – 1 पद
2. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण व संबंधित, गट अ, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग – 41 पदे
3. समाज कल्याण अधिकारी, गट ब, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग – 22 पदे
4. गृह प्रमुख, गट ब, समाज कल्याण आयुक्तालय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील – 18 पदे
पद संख्या – 82 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 जून 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, आयुष संचालनालयातील आयुष संचालक – गट-अ: महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स ऍक्ट, १९६१ मध्ये वेळोवेळी सुधारित केलेल्या वेळापत्रकाच्या भाग A, B किंवा C मध्ये नमूद केलेली पात्रता असावी आणि १० वर्षे अनुभव असावा. (MPSC Recruitment 2023)
2. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण व संबंधित, गट अ, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग – B.A/B.Sc/B.Com/LAW आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा/सामाजिक कार्य किंवा समाज कल्याण प्रशासनात पदवी असावी.
3. समाज कल्याण अधिकारी, गट ब, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग – समाज कल्याण विज्ञान किंवा सामाजिक कार्य पदवी असावी.
4. गृह प्रमुख, गट ब, समाज कल्याण आयुक्तालय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग – B.A/B.Sc/B.Com/LAW आणि शिक्षण पदवी आणि ०५ वर्षांचा अनुभव असावा.

अर्ज/ परीक्षा फी – (MPSC Recruitment 2023)
Open/OBC/EWS – पद १ & ४: ₹७१९. पद २ & ३: ₹३९४
SC/ST: पद १ & ४ – ₹४४९. पद २ & ३: ₹२९४
PWD/ Female – फि नाही.

असा करा अर्ज –
1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायावर क्लिक करा.
2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या. (MPSC Recruitment 2023)
3. किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाईट www.mpsc.gov.in ला भेट द्या.
4. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
5. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
6. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
काही महत्वाच्या लिंक्स – (MPSC Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.mpsc.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Railway Recruitment 2023 : खेळाडूंसाठी आनंदाची बातमी!! रेल्वेत ‘या’ पदांवर होणार नवीन उमेदवारांची निवड

Railway Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । रेल्वे भर्ती सेल, उत्तर रेल्वे अंतर्गत स्पोर्ट्स पर्सन (Railway Recruitment 2023) पदांच्या एकूण 21 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या मेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 जुन 2023 आहे.
संस्था – रेल्वे भर्ती सेल, उत्तर रेल्वे
भरले जाणारे पद – स्पोर्ट्स पर्सन
पद संख्या – 21 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन (Railway Recruitment 2023)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 जून 2023

वय मर्यादा – 18 ते 25 वर्षे
अर्ज फी –
1. SC/ST, महिला, अल्पसंख्याक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय उमेदवारांसाठी – Rs. 250/-
2. इतर उमेदवारांसाठी – Rs. 500/-
काही महत्वाच्या तारखा – (Railway Recruitment 2023)

Northern Railway Bharti 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – Graduate in any discipline from a recognized University. OR
Passed 12th (+2 stage) or its equivalent examination. Education Qualification must be from a recognized Institution.
निवड प्रक्रिया –
1. Screening & Scrutiny of application.
2. Documents Verification
3. Sports performance (Railway Recruitment 2023)
4. Medical Examination
भरतीचा तपशील –
Northern Railway Vacancy details 2023
काही महत्वाच्या लिंक्स – (Railway Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट I – nr.indianrailways.gov.in
अधिकृत वेबसाईट II – www.rrcnr.org
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Success Story : हा आहे खरा बिझनेसमन!! गाईच्या शेणापासून कोटींची कमाई; इंजिनिअरिंग सोडून असा बनला उद्योगपती

Success Story

करिअरनामा ऑनलाईन । नोकरी करणारा माणूस व्यवसाय (Success Story) करू शकत नाही; असं नाही. व्यवसाय करण्याची इच्छा आणि आवड असेल तर कोणताही व्यवसाय छोटा किंवा मोठा नसतो. एखादा छोटासा व्यवसाय करुनही मेहनतीच्या जोरावर मोठं साम्राज्य उभारता येतं. अनेक सुशिक्षित तरुण आता नोकरीच्या मागे न धावता व्यवसायात नशीब आजमावत आहेत. एका तरुणाची अशीच प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे. ज्याने नोकरी सोडल्यानंतर आपल्या मनाचं ऐकलं आणि आज तो एक मोठा व्यापारी बनला आहे.
नोकरीत मन रमत नव्हतं (Success Story)
26 वर्षीय तरुण जयगुरु आचार हिंडर हा एका खासगी कंपनीत सिव्हिल इंजिनियर होता. मात्र नंतर त्याने शेण आणि दुधाचा व्यवसाय सुरू केला. तरुणाने नोकरी सोडून या कामात स्वत:ला झोकून दिले. आज तो या व्यवसायातून भरपूर नफा कमावत आहे. जयगुरु आचार हिंडर हा दक्षिण कन्नड जिल्ह्यातील पुत्तूर तालुक्यातील मुंडुरू गावचा रहिवासी आहे. त्याने विवेकानंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड (Success Story) टेक्नोलॉजी, पुत्तूर येथून इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली. त्यानंतर 22,000 रुपये पगारावर खासगी कंपनीत कामाला सुरुवात केली. पण या कामात त्याचे मन रमत नव्हते. रोजच्या कामाचा त्याला कंटाळा येऊ लागला. नोकरीत रस नसल्याने त्याने 2019 मध्ये नोकरी सोडली.

असा सुरु झाला व्यवसाय
या तरुणाला शेतीची आवड होती. त्याने वडिलांसोबत शेतीची कामे करण्यास सुरुवात केली. त्याच्या घरी 10 गायी होत्या, ज्यांच्यासोबत तो वेळ घालवत असे. त्याने उत्पन्न वाढवण्याचे (Success Story) अनेक मार्ग शोधले. इंटरनेटवर अनेक व्हिडीओ पाहून हिंडरने पटियालाला जाण्याचा निर्णय घेतला. शेतीसोबतच दुग्धव्यवसाय सुरू केला आणि हळूहळू त्यांच्या डेअरीत 130 गायी वाढवल्या. त्यानंतर काही काळानंतर त्याने डेअरी वाढवण्यासाठी 10 एकर जमीनही विकत घेतली.

लाखोंमध्ये होतो नफा
यानंतर त्याच्या मनात एक कल्पना आली आणि त्याने एक मशीन विकत घेतली. हे यंत्र गायीचे शेण सुकवते. हिंडर आता दर महिन्याला 100 पोती शेण विकतो आणि त्यातून भरपूर (Success Story) कमाई करतो. यामध्ये गायींचे शेण, गोमूत्र आणि गायींना आंघोळ घातल्यावर मिळणारे सांडपाणी यांचा समावेश आहे. हिंडर दररोज 750 लीटर दूध आणि दरमहा 30-40 लीटर तूप विकतो. 10 एकरात पसरलेल्या त्याच्या फार्महाऊसमध्ये तो हा व्यवसाय करतो. यातून तो दरमहा 10 लाख रुपये कमावतो. आणि आता तो दुग्धजन्य पदार्थ बनवण्यासाठी युनिट स्थापन करण्याच्या तयारीत आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com