Employment News : 71 हजार तरुणांना मिळणार सरकारी नोकरी; पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार जॉइनिंग लेटर

करिअरनामा ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवार दि. 16 मे रोजी (Employment News) विविध सरकारी विभागात सहभागी होणाऱ्या 71 हजार युवकांना नियुक्तीपत्र वितरित करणार आहेत. तसेच ते युवकांना व्हर्च्युअली संबोधित करतील. रोजगार मेळावा देशातील 45 ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या विविध विभागांसह राज्य सरकार आणि केंद्रात नवीन भरती केली जात आहे. देशभरातील ही भरती ग्रामीण पोस्टमन, इन्स्पेक्टर, टिकीट क्लर्क, ज्युनिअर क्लर्स आणि टायपीस्ट, ट्रॅक मेंटनर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, लोवर डिवीजन, लिपीक, अधिकारी, कर सहायक सारख्या विविध पदांसाठी ही भरती होत आहे.
तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करुन देणं हे पंतप्रधान मोदी यांनी उचललेलं मोठं पाऊल आहे. यामुळे देशातील युवकांचे सशक्तीकरण होण्यास मदत होणार आहे. नवीन (Employment News) भरतीमधून युवकांना स्वतःला प्रशिक्षित करण्याची संधी मिळेल. सर्व सरकारी विभागाच्या नवीन नियुक्त केलेल्यां उमेदवारांसाठी ऑनलाईन ओरिएंटेशन कोर्स उपलब्ध केला जाणार आहे.

वर्षाअखेरीस होणार 10 लाख नोकरभरती (Employment News)
पंतप्रधान मोदी यांनी गेल्या वर्षी 22 ऑक्टोबरला रोजगार मेळाव्याला सुरुवात केली. विविध सरकारी एजन्सीसोबत एसएससी, युपीएससी, रेल्वे इत्यादीमध्ये भरती पूर्ण (Employment News) करण्यात येत आहे. 2023 पर्यंत सुमारे 10 लाख उमेदवारांची भरती केली जाईल. पंतप्रधान मोदी यांनी असे निर्देश दिले आहेत; की सरकार 2023 पर्यंत सुमारे 10 लाख जागांची भरती करेल.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com