Motivational Story : अ‍ॅसिड हल्ल्यातील जखमी मुलगी 10वीत टॉपर; ब्रेल लिपीत अभ्यास करुन मिळवले 95.2%

करिअरनामा ऑनलाईन । चंदीगडच्या एका अ‍ॅसिड हल्ला पीडीत (Motivational Story) मुलीने CBSE बोर्डाच्या 10वीच्या परीक्षेत शाळेतून प्रथम येण्याची कामगिरी केली आहे. अंध असूनही तिने हे यश मिळविल्याने तिचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.  CBSEचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. यात देशभरातील लाखो विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. CBSE परीक्षेत चंदीगडच्या एका अ‍ॅसिड हल्ला पिडीत मुलीने दहावीच्या परीक्षेत 95.2 टक्के मिळवित नवा इतिहास रचला आहे. तिची कहाणी अनेकांना प्रेरणा देणारी आहे.

Motivational Story of Kafee

ब्रेल लिपीतून केला अभ्यास
काही दिवसांपूर्वी CBSE परीक्षेचे 10वी आणि 12वीचे निकाल जाहीर झाले आहेत. यंदा 10 वी च्या परीक्षेत उत्तीर्णतेची टक्केवारी 95.2% आहे. CBSE 10वीच्या परीक्षेत चंदीगडच्या 15 वर्षीय काफी हीला 95.2% मार्क मिळाले आहेत. काफी अवघी तीन वर्षांची असताना तिच्यावर शेजाऱ्यांनी (Motivational Story) अ‍ॅसिड टाकले. त्यामुळे तिचा संपूर्ण चेहरा तर भाजलाच शिवाय तिची दृष्टी देखील गेली. त्यामुळे तिने ब्रेल लिपीतून 10वीचा अभ्यास केला. या समस्यांवर मात करत काफीचा लढा सुरुच होता.  अनेक अडचणींवर मात करत तिने अभ्यासाची जिद्द सोडली नाही. ब्रेल लिपीतून अभ्यास करत ती शाळेत टॉपर ठरली.

Motivational Story of Kafee

IAS होण्याची इच्छा
काफी हीने सांगितले की; “मी दर दिवशी पाच ते सहा तास अभ्यास करायचे. माझे आई-वडील आणि शिक्षकांनी मला खूपच सहकार्य केले. मला मोठेपणी IAS अधिकारी बनून देश आणि समाजाची सेवा करायची आहे.”
काफीचे वडील हरीयाणा सचिवालयात शिपायाची (Motivational Story) नोकरी करतात. आता ते आपल्या कुटुंबियासह शास्रीनगरात राहतात. तिचे वडील पवन म्हणतात की; “काफी जेव्हा तीन वर्षांची होती तेव्हा शेजारी राहणाऱ्या लोकांनी तिच्यावर अ‍ॅसिड हल्ला केला. त्यात काफी प्रचंड जखमी झाली. या हल्यात तिची दृष्टी गेल्याने तिच्या वडीलांनी अनेक डॉक्टरांकडे धाव घेतली पण काही उपयोग झाला नाही. काफिला तिची दृष्टी परत मिळाली नाही. तिची IAS अधिकारी होण्याची इच्छा   असल्याने आम्ही तिला पूर्ण सहकार्य करणार आहे.”
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com