Business Success Story : वडिलांनी सांगितलं IAS हो; लेकानं गर्ल्स हॉस्टेलसमोर टाकला चहाचा स्टॉल, आज जमतो 150 कोटींचा गल्ला

करिअरनामा ऑनलाईन । नवी दिल्लीतलं चाय सुट्टा बार हे दोन मित्रांनी (Business Success Story) सुरू केलेलं एक चहाचं साधं दुकान. मात्र आता त्याच्या अनेक शाखा विविध शहरांमध्ये सुरू झाल्या आहेत. अनुभव दुबे आणि आनंद नायक या इंदूरमध्ये राहणाऱ्या अवघ्या 22-23 वर्षांच्या दोन मित्रांनी ‘चाय सुट्टा बार’ सुरु केला. दोघांनी बी.कॉमचं शिक्षण घेतलं होतं. अनुभवचे वडील व्यावसायिक आहेत तरीही आपल्या मुलानं बिझनेसमन होऊ नये असं त्यांना वाटत होतं. त्यांनी मुलाला UPSCची तयारी करण्यासाठी दिल्लीला पाठवलं. त्याआधी सीएची परीक्षा देण्याचा अयशस्वी प्रयत्न अनुभवनं केला होता. मात्र दिल्लीमध्ये गेल्यावर अनुभवला स्वतःतल्या व्यावसायिक गुणांची जाणीव झाली व त्यानं शेवटी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.

Business Success Story Chai Sutta Bar

150 कोटींचा टर्न ओव्हर
IAS होण्याचं स्वप्न घेऊन आलेला तरुण एका आयडियाने थेट स्टार्टअपचा मालक झाला. आज या स्टार्टअपचा टर्न ओव्हर 150 कोटींच्या घरात आहे. पण त्यासाठी त्याला जी (Business Success Story) आयडिया सुचली त्यावर त्याने काम केले. लोकांनी नावं ठेवली, पण त्याच्या मनाने निश्चिय केला होता, त्यानुसार, त्याने मेहनत घेतली. आज या चहाच्या कट्यावर त्याला ज्यांनी नावं ठेवली, ते चहा पिऊन गप्पा मारत बसतात.

Business Success Story Chai Sutta Bar

‘चाय सुट्टा बार’
अनुभव दुबे दिल्लीत आला होता युपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी, पण त्याला एक कल्पना सुचली. मित्र आनंद नायक सोबत त्याने ‘चाय सुट्टा बार’ हा स्टार्टअप सुरु केला. त्याचे वडील (Business Success Story) एक व्यावसायिक होते. पण आपला मुलगा व्यावसायिक व्हावा, अशी त्यांची इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी अनुभवला युपीएससीच्या तयारीसाठी दिल्ली येथे पाठवले. अनुभवच्या डोक्यात मात्र काही तरी बिझनेस करण्याचा विचार होता. त्याला मित्र आनंद नायकची मदत मिळाली आणि चहाचा कट्टा सुरु झाला.

Business Success Story Chai Sutta Bar

अशी झाली व्यवसायाला सुरुवात (Business Success Story)
आनंद नायकच्या वडिलांचा कपड्यांचा व्यवसाय होता. पण तो बंद झाला होता. अनुभव कोणता तरी व्यवसाय करु इच्छित असल्याचे आनंदला माहिती होते. आनंदने त्यांचा कपड्याचा व्यवसाय बंद झाल्याची माहिती दिली. दोघांनी मिळून नवीन व्यवसाय सुरु करण्याचे ठरवले. अनुभवने आई-वडिलांना कसलीही माहिती न देता इंदुर गाठले. अनुभव आणि आनंद कडे 3 लाख रुपयांची बचत होती. अनुभवने चहाच्या स्टार्टअपची आयडिया दिली नी मग दोघांचा हा चहाचा कट्टा जोरदार रंगला. कमी गुंतवणुकीत त्यांना जोरदार परतावा मिळाला.

 

Business Success Story Chai Sutta Bar

गर्ल्स होस्टेलसमोर केली सुरुवात
त्यांनी इंदुरच्या भंवरकुआँमध्ये गर्ल्स होस्टेलसमोर त्यांच्या चाय सुट्टा बारची सुरुवात केली. त्यांचे चहाचे दुकान एका मोक्याच्या ठिकाणी होते. तरीही पहिल्या दिवशी त्यांना म्हणावा (Business Success Story) तितका प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर या दोघांचे मित्र मदतीला धावले. हळुहळू विद्यार्थी आणि इतर लोक चहा पिण्यासाठी गर्दी करु लागले.

Business Success Story Chai Sutta Bar

गर्दीसाठी अशी लढवली आयडिया
गर्ल्स होस्टेलसमोर चहाचे दुकान सुरु करुनही हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने हे दोघे मित्र पेचात पडले. दोघांनी त्यांच्या मित्रांच्या मदतीने गर्दी जमवली. या चहाच्या दुकानावर (Business Success Story) सकाळपासून संध्याकाळपर्यंत मित्रांची जोरदार बैठक बसली. गर्दी पाहून चहा पिणाऱ्यांची पावलं आपोआप या दुकानाकडे वळली. ही आयडिया एकदम जोरात चालली. त्यानंतर गर्दीच्या ठिकाणी त्यांच्या काही मित्रांनी चाय सुट्टा बारची तोंडी जाहिरात सुरु केली. ही कल्पना पण कामी आली. त्यांच्या स्टॉलवर आता चहा प्रेमींची अलोट गर्दी उसळू लागली.

 

Business Success Story Chai Sutta Bar

देश विदेशात आहेत फ्रँचाईजी (Business Success Story)
अनुभव आणि आनंदने 6 महिन्यातच 2 राज्यात चाय सुट्टा बारच्या 4 फ्रँचाईजी दिल्या. देशात सध्या त्यांच्या या स्टार्टअपचे 150 आउटलेट आहेत. केवळ देशातच नाही तर परदेशात पण त्यांनी फ्रँचाईजी दिल्या आहेत. चाय सुट्टा बारने दुबई, युके, कॅनाडा आणि ओमान या देशापर्यंत मजल मारली आहे. एका अंदाजानुसार या कंपनीची वार्षिक उलाढाल 100-150 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com