After 10th Courses : 10 वी नंतर काय? तगड्या पॅकेजसाठी करा हे ‘4’ शॉर्ट टर्म कोर्स

करिअरनामा ऑनलाईन । आजच्या काळात तरुणांसाठी करिअरचे (After 10th Courses) अनेक पर्याय खुले झाले आहेत. आज तुम्हाला हवं असेल तर तुमच्या आवडीनुसार आणि पात्रतेनुसार कोणताही शॉर्ट टर्म कोर्स करून 10 ते 25 हजार रुपयांची नोकरी तुम्ही सहज मिळवू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच काही ट्रेंडिंग शॉर्ट टर्म कोर्सेसबद्दल सांगणार आहोत, ज्यांची फी ही खूप कमी आहे. हे कोर्स करुन तुम्ही तुमच्या करिअरमध्ये नक्कीच यश मिळवू शकता.
1. डिप्लोमा इन स्टेनोग्राफी (After 10th Courses)
आजच्या काळातील सर्वात ट्रेंडिंग शॉर्ट टर्म कोर्स म्हणजे डिप्लोमा इन स्टेनोग्राफी. हा कोर्स ट्रेंडिंग असण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे या कोर्समध्ये तुम्हाला स्टेनोग्राफीसोबतच कॉम्प्युटर आणि टायपिंग शिकवलं जातं. स्टेनोग्राफी शिकून तुम्ही सरकारी नोकरी सहज मिळवू शकता. याशिवाय स्टेनोग्राफी शिकून तुम्ही कोणत्याही मल्टिनॅशनल कंपनीत (MNC) दरमहा सुरुवातीचे 25 ते 30 हजार रुपये सहज कमावू शकता.

2. डिप्लोमा इन आर्ट टीचर
भविष्यात शिक्षक व्हायचे असेल तर तुम्ही या क्षेत्रात करिअर करु शकता. मात्र कलाशिक्षक होण्यासाठी तुम्हाला कला आणि हस्तकलेची आवड असणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला डिप्लोमा इन आर्ट टीचरचा 4 महिन्यांचा शॉर्ट टर्म कोर्स करावा लागेल, त्यानंतर तुम्ही या क्षेत्रात (After 10th Courses) करिअर करू शकाल. वास्तविक या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना कसे शिकवायचे याचे प्रशिक्षण दिले जाते. 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम चांगला पर्याय आहे. खासगी संस्थांमध्येही या अभ्यासक्रमाची मागणी जास्त आहे. हा कोर्स करून तुम्ही महिन्याला 30 ते 35 हजार रुपये कमावू शकता.
3. डिप्लोमा इन मल्टिमीडिया
तिसऱ्या शॉर्ट टर्म कोर्सबद्दल सांगायचं तर आजच्या काळात प्रत्येक तिसरी व्यक्ती सोशल मीडियावर व्हिडिओ तयार करुन प्रसिध्दी मिळवत आहे. यासोबतच ते भरपूर पैसाही (After 10th Courses) कमवत आहेत. या व्हिडिओ निर्मात्यांना त्यांचे व्हिडिओ एडिट करण्यासाठी व्हिडिओ एडिटर, ॲनिमेटर आणि ग्राफिक डिझायनरची आवश्यकता असते. अशा तऱ्हेने 10वी आणि 12वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थीही या क्षेत्रात करिअर करु शकतात. त्यासाठी डिप्लोमा इन मल्टिमीडियाचा शॉर्ट टर्म कोर्स करून व्हिडिओ एडिटर,ॲनिमेटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणून करिअर सुरु करता येतं.

4. डिप्लोमा इन फाइन आर्ट्स
हे असे युग आहे जेव्हा कला आणि कलाकार या दोघांनाही जगभरात महत्व दिले जाते. जर तुम्हाला आर्ट अँड क्राफ्टची थोडीफार समज किंवा आवड असेल तर फाइन (After 10th Courses) आर्ट्स क्षेत्रात डिप्लोमा करून तुम्ही उत्तम करिअरच्या दिशेने वाटचाल करु शकता. 10 वीच्या आधारे 6 महिने ते 1 वर्षांपर्यंत डिप्लोमा केला जातो. हा कोर्स केल्यानंतर ग्राफिक डिझायनर, आर्ट टीचर, फ्लॅश ॲनिमेटर, आर्ट लायसन्स ऑफिसर या पदांवर नोकरी मिळू शकते आणि दरमहा 50 हजारांपेक्षा जास्त पगार मिळू शकतो.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com