Home Blog Page 287

ICAI CA Results 2023 : CA परीक्षेच्या निकालाची तारीख जवळ आली!! असा पहा निकाल

ICAI CA Results 2023

करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट इंडिया (ICAI CA Results 2023) लवकरच CA इंटरमीडिएट आणि फायनल निकाल प्रसिद्ध करणार आहे. ICAI अधिकारी धीरज खंडेलवाल यांनी केलेल्या ट्विटनुसार, दोन्ही निकाल येत्या आठवड्यात जाहीर होणं अपेक्षित आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाईटवर हा निकाल चेक करता येणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी या वर्षी ICAI CA फायनल आणि इंटरमिजिएट परीक्षा दिली आहे ते विद्यार्थी निकाल जाहीर झाल्यानंतर  अधिकृत वेबसाईटवर त्यांचे निकाल पाहू शकतील. ICAI अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार दि. 5 किंवा 6 जुलै रोजी निकाल जाहीर होईल असा अंदाज आहे, परंतु संस्थेकडून अधिकृत घोषणा होण्याची प्रतीक्षा आहे.

निकाल पाहण्यासाठी ‘या’ स्टेप्स करा फॉलो – (ICAI CA Results 2023)
1. ICAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
2. सीए इंटरमीडिएट निकाल पर्यायावर क्लिक करा.
3. तुमचा ICAI नोंदणी क्रमांक/पिन आणि रोल नंबर वापरून लॉगिन करा.
4. कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि सबमिट बटण दाबा. (ICAI CA Results 2023)
5. सीए इंटरचा निकाल मे 2023 तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
6. उमेदवार त्यांचे गुण तपासू शकतात आणि जून सत्रासाठी सीए इंटरमिजिएट निकाल डाउनलोड करू शकतात.
7. भविष्यातील संदर्भासाठी CA इंटरमिजिएट 2023 च्या निकालाची प्रिंटआउट घ्या

ICAI CA इंटरमीडिएट परीक्षेची दोन (ICAI CA Results 2023) गटांमध्ये विभागणी करण्यात आली होती, गट 1 मे 3, 6, 8 आणि 10, 2023 रोजी आणि गट 2 मे 12, 14, 16 आणि 18, 2023 . CA अंतिम परीक्षा 2, 4, 7 आणि 9 मे 2023 रोजी गट 1 आणि 11, 13, 15 आणि 17 मे 2023 रोजी गट 2 आयोजित करण्यात आली होती. या दोन्ही निकाल लवकरच उपलब्ध होतील. 24, 26, 28 आणि 30 जून 2023 रोजी, ICAI ने CA फाउंडेशन जून 2023 ची परीक्षा घेतली. फाउंडेशन कोर्सचे निकाल योग्य वेळी जाहीर केले जातील.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IPRCL Recruitment 2023 : इंडियन पोर्ट रेल अँड रोपवे कॉर्पोरेशन अंतर्गत ‘या’ पदांवर भरती; 2,80,000 पगार

IPRCL Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन पोर्ट रेल अँड रोपवे कॉर्पोरेशन (IPRCL Recruitment 2023) लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मुख्य महाव्यवस्थापक, मुख्य महाव्यवस्थापक/ महाव्यवस्थापक, संयुक्त महाव्यवस्थापक/ उप महाव्यवस्थापक (लेखा व करांकन) , संयुक्त महाव्यवस्थापक/ उप महाव्यवस्थापक (मा.सं.) , संयुक्त महाव्यवस्थापक/ उप महाव्यवस्थापक/ वरिष्ठ व्यवस्थापक (प्रकल्प), महाव्यवस्थापक/ वरिष्ठ महाव्यवस्थापक/ व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक/ व्यवस्थापक (प्रकल्प), वरिष्ठ व्यवस्थापक/ व्यवस्थापक (विद्युत), वरिष्ठ व्यवस्थापक/ व्यवस्थापक (सिव्हिल), व्यवस्थापक (एस व टी), पदवीध / पदविकाधारक अभियंता शिकाऊ प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 21 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2023 आहे.

संस्था – इंडियन पोर्ट रेल अँड रोपवे कॉर्पोरेशन लिमिटेड
भरली जाणारी पदे – (IPRCL Recruitment 2023)
1. मुख्य महाव्यवस्थापक 01 पद
2. मुख्य महाव्यवस्थापक/ महाव्यवस्थापक 01 पद
3. संयुक्त महाव्यवस्थापक/ उप महाव्यवस्थापक (लेखा व करांकन) 01 पद
4. संयुक्त महाव्यवस्थापक/ उप महाव्यवस्थापक (मा.सं.) 01 पद
5. संयुक्त महाव्यवस्थापक/ उप महाव्यवस्थापक/ वरिष्ठ व्यवस्थापक (प्रकल्प) 01 पद
6. महाव्यवस्थापक/ वरिष्ठ महाव्यवस्थापक/ व्यवस्थापक 01 पद
7. वरिष्ठ व्यवस्थापक/ व्यवस्थापक (प्रकल्प) 02 पदे
8. वरिष्ठ व्यवस्थापक/ व्यवस्थापक (विद्युत) 01 पद
9. वरिष्ठ व्यवस्थापक/ व्यवस्थापक (सिव्हिल) 01 पद
10. व्यवस्थापक (एस व टी) 01 पद
11. पदवीधर/ पदविकाधारक अभियंता शिकाऊ प्रशिक्षणार्थी 10 पदे
पद संख्या – 21 पदे (IPRCL Recruitment 2023)

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन/ ऑनलाईन (नोंदणी)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जुलै 2023
वय मर्यादा – 57 वर्षे
अर्ज पाठविण्याचा पत्ता – इंडियन पोर्ट रेल एंड रोपवे कॉर्पोरेशन लिमिटेड, 4 था मजला, निर्माण भवन, एम. पी. रोड, माझगांव (पूर्व), मुंबई- 400010

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. मुख्य महाव्यवस्थापक Officers should have service experience prescribed below in Civil Engineering in the field of Railways subject to the following (Read PDF for complete details)
2. मुख्य महाव्यवस्थापक/ महाव्यवस्थापक Officers should have service experience prescribed below in Civil Engineering in the field of Railways subject to the following (Read PDF for complete details)
3. संयुक्त महाव्यवस्थापक/ उप महाव्यवस्थापक (लेखा व करांकन) Officers should have service experience prescribed below Accounts & Taxation subject to the following (Read PDF for complete details)
4. संयुक्त महाव्यवस्थापक/ उप महाव्यवस्थापक (मा.सं.) Officers should have service experience prescribed below in HR Department to the following (Read PDF for complete details)
5. संयुक्त महाव्यवस्थापक/ उप महाव्यवस्थापक/ वरिष्ठ व्यवस्थापक (प्रकल्प) Officers should have service experience prescribed below in Civil Engineering in the field of Railways subject to the following (Read PDF for complete details)
6. महाव्यवस्थापक/ वरिष्ठ महाव्यवस्थापक/ व्यवस्थापक Officers should have service experience prescribed below in Civil Engineering in the field of Railways subject to the following (Read PDF for complete details) (IPRCL Recruitment 2023)
7. वरिष्ठ व्यवस्थापक/ व्यवस्थापक (प्रकल्प) Full Time Degree in Civil Engineering
8. वरिष्ठ व्यवस्थापक/ व्यवस्थापक (विद्युत) Full Time Degree in Civil Engineering
9. वरिष्ठ व्यवस्थापक/ व्यवस्थापक (सिव्हिल) Full Time Degree in Electrical Engineering
10. व्यवस्थापक (एस व टी) Full Time Degree in Electronics & Communications Engineering OR Full Time Degree in Signaling & Tele Communications Engineering
11. पदवीधर/ पदविकाधारक अभियंता शिकाऊ प्रशिक्षणार्थी At least 60% in aggregate of all years & semesters in Degree/ Diploma in Engineering granted by a Statutory University in relevant Discipline.

मिळणारे वेतन – (IPRCL Recruitment 2023)
1. मुख्य महाव्यवस्थापक Rs. 1,00,000 – 2,80,000/-
2. मुख्य महाव्यवस्थापक/ महाव्यवस्थापक Rs. 1,00,000 – 2,60,000/-
3. संयुक्त महाव्यवस्थापक/ उप महाव्यवस्थापक (लेखा व करांकन) Rs. 80,000 – 2,00,000/-
4. संयुक्त महाव्यवस्थापक/ उप महाव्यवस्थापक (मा.सं.) Rs. 80,000 – 2,00,000/-
5. संयुक्त महाव्यवस्थापक/ उप महाव्यवस्थापक/ वरिष्ठ व्यवस्थापक (प्रकल्प) Rs. 80,000 – 2,20,000/-
6. महाव्यवस्थापक/ वरिष्ठ महाव्यवस्थापक/ व्यवस्थापक Rs. 70,000 – 2,00,000/-
7. वरिष्ठ व्यवस्थापक/ व्यवस्थापक (प्रकल्प) Rs. 60,000 – 1,80,000/-
8. वरिष्ठ व्यवस्थापक/ व्यवस्थापक (विद्युत) Rs. 60,000 – 1,80,000/-
9. वरिष्ठ व्यवस्थापक/ व्यवस्थापक (सिव्हिल) Rs. 60,000 – 1,80,000/-
10. व्यवस्थापक (एस व टी) Rs. 50,000 – 1,60,000/-
11. पदवीधर/ पदविकाधारक अभियंता शिकाऊ प्रशिक्षणार्थी Graduate – 10,000/- per month
12. Diploma – 8,000/- per month
असा करा अर्ज –
1. उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन नोंदणी पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. पदवीधर / पदवीकाधारक अभियंता शिकाऊ प्रशिक्षणार्थी पदांसाठी अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. इतर पदांसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. (IPRCL Recruitment 2023)
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरुन नोंदणी करावी तसेच, इतर पदांसाठी संबंधित पत्त्यावर अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – (पदवीधर/ पदविकाधारक अभियंता शिकाऊ प्रशिक्षणार्थी) – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.iprcl.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Jobs : शासनाच्या ‘या’ संस्थेत नवीन भरती; 35,000 पगार; पात्रता फक्त ग्रॅज्युएट

Government Jobs (48)

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर येथे (Government Jobs) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून यंग प्रोफेशनल-I, यंग प्रोफेशनल-II पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.  याभरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसाह खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 12 जुलै 2023 आहे.

संस्था – केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर
भरली जाणारी पदे – (Government Jobs)
1. यंग प्रोफेशनल-I
2. यंग प्रोफेशनल-II
पद संख्या – 02 पदे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 12 जुलै 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. यंग प्रोफेशनल-II
मान्यताप्राप्त विद्यापीठ/कॉलेजमधून B.Com/BBA/BBS (किमान 60% गुणांसह) आणि CA (इंटर) / ICWA (इंटर) / CS (इंटर) (संबंधित क्षेत्रातील किमान एक वर्षाच्या अनुभवासह). किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ/कॉलेजमधून B.Com/BBA/BBS (किमान 60% गुणांसह) आणि MBA (फायनान्स) किंवा मान्यताप्राप्त संस्थेतून समतुल्य (किमान 60% गुणांसह) (संबंधित क्षेत्रातील किमान एक वर्षाचा अनुभव) . D.Q.- IT अॅप्लिकेशन्सचे ज्ञान, व्हर्च्युअल मीटिंग प्लॅटफॉर्म आणि संगणक कौशल्ये (MS Word, Excel, PowerPoint, Tally, इ.)
2) यंग प्रोफेशनल-I (Government Jobs)
मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटी कॉलेजमधून B.Com/BBA/BBS (किमान 60% गुणांसह) (संबंधित क्षेत्रातील किमान एक वर्षाचा अनुभव). 02) D.Q.- आयटी ऍप्लिकेशन्सचे ज्ञान, व्हर्च्युअल मीटिंग प्लॅटफॉर्म आणि संगणक कौशल्ये (एमएस वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट, टॅली, इ.)

वय मर्यादा –
12 जुलै 2023 रोजी 45 वर्षापर्यंत
[SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी – फी नाही
मिळणारे वेतन –
1. यंग प्रोफेशनल-II – 35,000/- रुपये दरमहा
2. यंग प्रोफेशनल-I- 25,000/- रुपये ते दरमहा (Government Jobs)
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण – ICAR – Institute of Central Cotton Research Centre, Near Hindustan LPG Depot, Panjari, Wardha Road, Nagpur.

काही महत्वाच्या लिंक्स – (Government Jobs)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.cicr.org.in

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career as a Chef : असं होता येईल 5 स्टार हॉटेलचे शेफ; पहा कोर्स, पगार याविषयी सर्व डिटेल्स

Career as a Chef

करिअरनामा ऑनलाईन । स्वयंपाकाची आवड असणाऱ्यांसाठी (Career as a Chef) हॉटेलमध्ये शेफ बनणं हा देखील करिअरचा उत्तम पर्याय ठरू शकतो. शेफ बनण्यासाठी क्रिएटिव्हिटी, इमॅजिनेशन, आणि बिझनेस स्किल यासोबत पाककलेची आवड असणे अत्यंत महत्वाचे असते. उत्तम शेफ बनण्यासाठी कॉलेज किंवा इन्स्टिटयूटमधून प्रशिक्षण घ्यावे लागते. यासाठी तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करु शकता.

अनेकांना विविध पदार्थ खायची आवड असते तर काहींना वेगवेगळे पदार्थ बनवून ते इतरांना खाऊ घालण्याची आवड असते. तुम्हालाही स्वयंपाकाची आवड असेल तर तुम्ही ती (Career as a Chef) आवड प्रोफेशनमध्येही बदलू शकता. शेफ (chef) बनून तुम्ही तुमची आवडही जोपासू शकता आणि चांगला पैसाही कमवू शकता.
केवळ पदार्थ बनवणे हे एवढेच शेफचे काम नाही तर मेनू तयार करणे, खाद्यपदार्थांची चाचणी करणे आणि किचन मॅनेजमेंट अशा अनेक जबाबदाऱ्या शेफला सांभाळाव्या लागतात. आपण पाहतोय की हॉटेल आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री वेगाने वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर (Career as a Chef) व्यावसायिक शेफ्सची मागणीही वाढत आहे. शेफला त्याच्या कामाचा उत्तम मोबदला मिळतो. कामाचा अनुभव आणि कौशल्य यावर पगार अवलंबून असतो.

5 स्टार हॉटेलमध्ये शेफ कसे तयार होतात, त्यांचा अभ्यासक्रम, पगार याविषयी सविस्तर माहिती पाहूया…
असे आहेत कोर्स – (Career as a Chef)
उत्तम शेफ बनण्यासाठीही प्रोफेशनल क्वॉलिफिकेशनची गरज असते. यासाठी तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटीमध्ये सर्टिफिकेट, डिप्लोमा, अंडरग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस करु शकता. तसेच यामध्ये बीएससी इन हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल मॅनेजमेंट, बीएस्सी इन केटरिंग सायन्स आणि हॉटेल मॅनेजमेंट, फूड प्रोडक्शन आणि पॅटिसरीमध्ये सर्टिफिकेट कोर्स, कलिनरी आर्ट्समध्ये डिप्लोमा , बीए इन कलरी आर्ट्स इत्यादी कोर्सेसचा समावेशही आहे. या सर्व कोर्सेसचा कालावधी सहा महिने ते तीन ते चार वर्ष इतका असतो.

हॉटेल मॅनेजमेंट कोर्ससाठी अग्रेसर विद्यापीठांची यादी
1) आय एच एम ( इन्स्टीट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट) (IHM), केटरिंग अँज न्यूट्रीशन पूसा, नवी दिल्ली
2) गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजी आणि अप्लाइड न्यूट्रिशन, देहरादून
3) GIHMCT, नागपूर (Career as a Chef)
4) डॉ. आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, चंदीगडच
5) इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, जयपूर.

असा मिळतो प्रवेश
सरकारी हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी दरवर्षी एनटीए (NTA) म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे प्रवेश परीक्षा घेतली जाते. ही संयुक्त प्रवेश परीक्षा असते. नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट एक्झाम (NCHM) असे या परीक्षेचे (Career as a Chef) नाव आहे. याद्वारे नॅशनल काऊन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी (NCHMCT) शी संलग्न महाविद्यालयांमध्ये B.Sc (हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल अॅडमिनिस्ट्रेशन) अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळतो. या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमामध्ये एकूण सहा सेमिस्टर असतात. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातर्फे या अभ्यासक्रमाची डिग्री मिळते.
इतका मिळतो पगार (Career as a Chef)
Glassdoor या अमेरिकन रिव्ह्यू वेबसाईटच्या अहवालानुसार, दिल्लीतील 5 स्टार हॉटेल्समध्ये शेफचा सरासरी पगार वर्षाला 40 लाख रुपयांपर्यंत असतो. मात्र हे सर्व शेफची क्षमता, त्याची कौशल्ये आणि त्याचा अनुभव किती आहे यावर अवलंबून असते. जेवढा अनुभव आणि कौशल्य जास्त तेवढाच पगारही जास्त मिळतो.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Central Bank Recruitment 2023 : ग्रॅज्युएट्ससाठी मोठी बातमी!! सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 1000 पदांवर मेगाभरती 

Central Bank Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत  विविध (Central Bank Recruitment 2023) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून व्यवस्थापक पदाच्या तब्बल 1000 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2023 आहे.

बँक – सेंट्रल बँक ऑफ इंडिया
भरले जाणारे पद – व्यवस्थापक स्केल II (मुख्य प्रवाहात)
पद संख्या – 1000 पदे
वय मर्यादा – 32 वर्षे (Central Bank Recruitment 2023)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जुलै 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – A Degree (Graduation) in any discipline from a University recognised by the Govt. of India.
मिळणारे वेतन – व्यवस्थापक स्केल II (मुख्य प्रवाहात) 48170-1740(1)-49910-1990(10)-69810
काही महत्वाच्या तारखा – (Central Bank Recruitment 2023)
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवरुन अर्ज करायचा आहे. (Central Bank Recruitment 2023)
3. उमेदवारांनी अधिक माहिती करिता www.centralbankofindia.co.in या वेबसाईट ला भेट द्यावी.
4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2023 आहे.

भरतीचा तपशील –

काही महत्वाच्या लिंक्स – (Central Bank Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.centralbankofindia.co.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Railway Recruitment 2023 : 10 वी पाससाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये बंपर भरती!! तब्बल 772 पदे रिक्त

Railway Recruitment 2023 (5)

करिअरनामा ऑनलाईन । दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर अंतर्गत (Railway Recruitment 2023) अप्रेंटिस पदाच्या तब्बल 772 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जुलै 2023 आहे.

संस्था – दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर
भरले जाणारे पद – अप्रेंटिस
पद संख्या – 772 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 जुलै 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर
वय मर्यादा – 15 ते 24 वर्षे (Railway Recruitment 2023)

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. अप्रेंटिस – The candidate must have passed the 10th class examination or its equivalent (under the 10+2 examination system) with a minimum of 50% marks, in the aggregate, from a recognized Board and also possess National (Railway Recruitment 2023) Trade Certificate in the notified trade issued by the National Council for Vocational Training or Provisional Certificate issued by National Council for Vocational Training/State Council for Vocational Training. The candidate should possess the required qualification as of the date of opening of online notification i.e. 08.06.2023
असा करा अर्ज – (Railway Recruitment 2023)
1. या भरतीसाठी ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन सादर करायचे आहेत.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी.

भरतीचा तपशील –

काही महत्वाच्या लिंक्स – (Railway Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – secr.indianrailways.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com 

UGC Professors Recruitment : लवकरच होणार मोठी प्राध्यापक भरती!! UGC ने दिले भरतीचे निर्देश, राज्यात 60 टक्के पदे रिक्त

UGC Professors Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । विद्यापीठे आणि महाविद्यालयातील (UGC Professors Recruitment) प्राध्यापकांच्या रिक्त पदांबद्दल खुद्द विद्यापीठ अनुदान आयोगाने म्हणजेच UGC ने नाराजी व्यक्त केली आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्राध्यापकांची रिक्त पदे तातडीने भरा; असे निर्देश UGCने दिले आहेत. यासंबंधीचे पत्रही राज्यांना पाठविण्यात आले आहे.

12 वर्षांपासून रखडली भरती प्रक्रिया (UGC Professors Recruitment)
राज्यातील 60 टक्क्यांहून अधिक प्राध्यापकांची पदे रिक्त असून, तब्बल 12 वर्षांपासून भरती प्रक्रिया रखडली आहे. वेळोवेळी समाज घटकातील सर्वांनीच प्राध्यापक भरतीकडे लक्ष वेधले होते. मात्र राज्यस्तरावर कोणतीच हालचाल न झाल्याने, थेट UGCनेच पुढाकार घेत प्राध्यापक भरतीसाठी राज्यांवर दबाव आणला आहे. UGCचे अध्यक्ष प्रा. एम जगदीश कुमार यांनी यासंदर्भात अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव, शिक्षण सचिव आणि राज्यपालांचे सचिव यांना पत्र लिहलं आहे.
प्रा. जगदीश कुमार म्हणाले, “उच्च शैक्षणिक संस्थेमधील प्राध्यापकांच्या रिक्त पदांचा परिणाम थेट अध्यापनावर होतो. त्यामुळे तातडीने पात्र आणि सक्षम उमेदवारांची पदे (UGC Professors Recruitment) भरली जाणे आवश्यक आहे. राज्याच्या आखत्यारीत येणारे विद्यापीठ आणि महाविद्यालयातील प्राध्यापकांची पदे तातडीने भरावी यासाठी मी राज्य सरकारकडे आग्रह धरला आहे.”

अशी आहे प्राध्यापक भरतीची सद्यस्थिती (UGC Professors Recruitment)
1. राज्यातील सुमारे ६० टक्के प्राध्यापकांची पदे रिक्त
2. मागील बारा वर्षांपासून भरती प्रक्रिया रखडली
3. अत्यंत अल्प प्रमाणात निवडक ठिकाणी भरती
4. महाविद्यालयांवर CHB प्राध्यापकांचा भार
5. उच्च व तंत्र शिक्षण विभागाची कमालीची अनास्था
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com 

Microsoft free AI Course : Microsoftने लाँच केला AI कोर्स; अगदी फ्री!!

Microsoft free AI Course

करिअरनामा ऑनलाईन । सध्या सगळीकडे आर्टिफिशिअल (Microsoft free AI Course) इंटिलिजेन्स म्हणजेच AIचा बोलबाला सुरु आहे.  तरुणांना AI मध्ये चांगलं भविष्य आहे असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. AI मध्ये करिअर करण्याचा तुम्ही विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. टेक जगतातील मायक्रोसॉफ्ट या मोठ्या कंपनीने एक मोफत जनरेटिव्ह AI कोर्स लाँच केला आहे. लिंक्ड इन या कंपनीसोबत करार करून हा कोर्स लाँच करण्यात आला आहे. हा एक प्रोफेशनल कोर्स असणार आहे, तसंच हा कोर्स केल्यानंतर विद्यार्थ्यांना सर्टिफिकेटही मिळणार आहे.

मायक्रोसॉफ्टच्या कॉर्पोरेट व्हाईस प्रेसिडेंट केट बेहंकेन यांनी लिंक्ड इनवर पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे. जनरेटिव्ह एआयबाबत हा पहिलाच (Microsoft free AI Course) ऑनलाईन लर्निंग कोर्स असणार आहे. 2025 सालापर्यंत या कोर्ससाठी कसलीही फी आकरण्यात येणार नाही.
असा होणार कोर्सचा फायदा (Microsoft free AI Course)
या कोर्समध्ये यूजर्सना AIसंबंधी महत्त्वाच्या गोष्टी समजावण्यात येतील. तसेच कोर्स संपल्यानंतर याचं एक सर्टिफिकेटही यूजर्सना मिळणार आहे. याचा फायदा यूजर्सना करिअरमध्ये मिळणार आहे. हा कोर्स सध्या इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com 

Teachers Exam : शिक्षणाचा दर्जा ढासळतोय? आता गरुजींना द्यावी लागणार परीक्षा, ‘ही’ ठरली तारीख

Teachers Exam

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षणाचा दर्जा ढासळत असल्याचा (Teachers Exam) आरोप होत असताना मराठवाड्याचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी काही दिवसांपूर्वी वेगवेगळ्या विषयांवर सर्वेक्षण केले. यानंतर शिक्षकांची परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये प्रशासनाकडून मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात शिक्षकांची परीक्षा घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. दि. 30 जुलै आणि 31 जुलै या दिवशी ही परीक्षा होणार आहे. थेट शिक्षकांची परीक्षा होत असल्याने याकडे पालकांसह विद्यार्थ्याांचे लक्ष लागले आहे.

सर्वेक्षणात या बाबी आल्या समोर (Teachers Exam)
शिक्षणाचा दर्जा ढासळत असल्याचा आरोप होत असताना, केंद्रेकर यांनी याची गंभीर दखल घेतली होती. त्यामुळे त्यांनी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात सुरुवातीला सर्वेक्षण केले. प्रत्यक्षात शाळेत जाऊन मुलांच्या गुणवत्तेची पाहणी करण्यात आली. या पाहणीत अनेक ठिकाणी खूपच वाईट परिस्थिती असल्याचे समोर आले होते. तर लातूर जिल्ह्यात जेव्हा सर्वेक्षण करण्यात आले त्यावेळी आठवीच्या 45 टक्के मुलांना भागाकार देखील करता येत नव्हता. विशेष म्हणजे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात वेगवेगळ्या विषयावर सर्वेक्षण करण्यात आले, सर्वच ठिकाणी अशीच परिस्थिती असल्याचे जाणवले असल्याचं देखील केंद्रकर म्हणाले होते. त्यामुळे थेट शिक्षकांचीच परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याने दि. 30 आणि 31 जुलै या दोन दिवशी ही परीक्षा होणार आहे.

अशी होणार परीक्षा
1. पहिली ते दहावीच्या शिक्षकांची परीक्षा घेतली जाणार आहे.
2. संस्था आणि त्यांच्या शिक्षकांची देखील परीक्षा घेतली जाणार आहे.
3. या परीक्षांचा स्तर कठीण असणार असून, सर्वच शाळेत अशा परीक्षा घेतल्या जाणार आहेत.
4. या परीक्षेत निगेटिव्ह मार्क (Teachers Exam) असणार आहे. तसेच प्रश्नांना उत्तरांचे पर्याय दिले जाणार आहेत.
5. विज्ञान, गणित आणि इंग्रजी या तीन विषयांच्या परीक्षा घेण्यावर अधिक भर असणार आहे.
6. परीक्षा देणे बंधनकारक नसून इच्छुक शिक्षकांना या परीक्षेत बसता येणार आहे.

असं असेल परीक्षेचे नियोजन (Teachers Exam)
1. मराठवाड्यातील शिक्षकांची परीक्षा 30 आणि 31 जुलैला पार पडणार आहे.
2. मराठवाड्यातील 18 हजार शिक्षकांनी परीक्षा देण्याची तयारी दर्शवली आहे.
3. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात (Teachers Exam) परीक्षा सेंटर असणार आहे.
4. पहिले ते दहावीच्या शिक्षकांची परीक्षा घेतली जाणार आहे.
5. जिल्हा परिषद आणि अनुदानित संस्थांच्या शिक्षकांची ही परीक्षा होणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com 

Ajit Pawar : राजकारणात धक्क्यावर धक्के देणारे अजित पवार नेमके कितवी शिकले? एकदा पहाच

Ajit Pawar (1)

करिअरनामा ऑनलाईन । राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ (Ajit Pawar) झाली असून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत अजित पवार यांनी तिसऱ्यांदा राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

राज्याचे माजी विरोधी पक्षनेते आणि नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार हे तात्काळ निर्णय घेणारे, स्पष्टवक्तेपणा असणारे नेते आहेत. ग्रामीण भागाची चांगली जाण असलेला तसेच तळागाळापर्यंत पोहोचलेला नेता म्हणून त्यांची ओळख आहे. देवळाली (अहमदनगर) येथे प्राथमिक शिक्षण घेतल्या नंतर (Ajit Pawar) त्यांनी मुंबईत पदवीचे शिक्षण पूर्ण केले. भल्या भल्या राजकारण्यांची शाळा घेणारे नेते म्हणून ओळखले जाणारे अजित पवार नेमके कितवी शिकले? हे आपण पाहणार आहोत.
अजित पवार यांचे पूर्ण नाव अजित अनंतराव पवार असं आहे. अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे 22 जुलै 1959 रोजी त्यांचा जन्म झाला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबतच राज्याच्या राजकारणातील एक महत्त्वाचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे.

अजित पवार यांचा शैक्षणिक प्रवास (Ajit Pawar)
1. अजित पवार यांचे 10 वी पर्यंतचे शिक्षण अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा या त्यांच्या आजोळच्या गावी झाले. (Ajit Pawar)
2. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी अजित पवार यांना मुंबईत यावे लागले.
3. मुंबईत त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
4. मुंबईत शिक्षण पूर्ण करून अजित पवार बारामतीला गेले.

अशी झाली सामाजिक व राजकीय कार्याला सुरुवात
अजित पवार यांच्या वडिलांचे आकस्मिक निधन झाल्याने त्यांना शिक्षण सोडुन पुन्हा बारामतीला जावे लागले. येथे आल्यावर त्यांनी कुटुंबाची जबाबदारी (Ajit Pawar) आपल्या खांद्यावर घेतली. बारामती येथे येऊन त्यांनी सहकारी संस्थांमधून सामाजिक व राजकीय कार्याला सुरुवात केली.
1882 मध्ये ते सर्वप्रथम सहकारी साखर कारखान्याच्या मंडळावर विजयी झाले. याचवेळी त्यांनी सक्रीय राजकारणात प्रवेश केला.
2010 ते 2014 या काळात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणुन देखील त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी (Ajit Pawar) उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार संभाळला. त्यांनंतर ते विरोधी पक्षनेते झाले आणि आता आज पुन्हा त्यांनी तिसऱ्यांदा राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com