Teachers Exam : शिक्षणाचा दर्जा ढासळतोय? आता गरुजींना द्यावी लागणार परीक्षा, ‘ही’ ठरली तारीख

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षणाचा दर्जा ढासळत असल्याचा (Teachers Exam) आरोप होत असताना मराठवाड्याचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी काही दिवसांपूर्वी वेगवेगळ्या विषयांवर सर्वेक्षण केले. यानंतर शिक्षकांची परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये प्रशासनाकडून मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात शिक्षकांची परीक्षा घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. दि. 30 जुलै आणि 31 जुलै या दिवशी ही परीक्षा होणार आहे. थेट शिक्षकांची परीक्षा होत असल्याने याकडे पालकांसह विद्यार्थ्याांचे लक्ष लागले आहे.

सर्वेक्षणात या बाबी आल्या समोर (Teachers Exam)
शिक्षणाचा दर्जा ढासळत असल्याचा आरोप होत असताना, केंद्रेकर यांनी याची गंभीर दखल घेतली होती. त्यामुळे त्यांनी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात सुरुवातीला सर्वेक्षण केले. प्रत्यक्षात शाळेत जाऊन मुलांच्या गुणवत्तेची पाहणी करण्यात आली. या पाहणीत अनेक ठिकाणी खूपच वाईट परिस्थिती असल्याचे समोर आले होते. तर लातूर जिल्ह्यात जेव्हा सर्वेक्षण करण्यात आले त्यावेळी आठवीच्या 45 टक्के मुलांना भागाकार देखील करता येत नव्हता. विशेष म्हणजे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात वेगवेगळ्या विषयावर सर्वेक्षण करण्यात आले, सर्वच ठिकाणी अशीच परिस्थिती असल्याचे जाणवले असल्याचं देखील केंद्रकर म्हणाले होते. त्यामुळे थेट शिक्षकांचीच परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याने दि. 30 आणि 31 जुलै या दोन दिवशी ही परीक्षा होणार आहे.

अशी होणार परीक्षा
1. पहिली ते दहावीच्या शिक्षकांची परीक्षा घेतली जाणार आहे.
2. संस्था आणि त्यांच्या शिक्षकांची देखील परीक्षा घेतली जाणार आहे.
3. या परीक्षांचा स्तर कठीण असणार असून, सर्वच शाळेत अशा परीक्षा घेतल्या जाणार आहेत.
4. या परीक्षेत निगेटिव्ह मार्क (Teachers Exam) असणार आहे. तसेच प्रश्नांना उत्तरांचे पर्याय दिले जाणार आहेत.
5. विज्ञान, गणित आणि इंग्रजी या तीन विषयांच्या परीक्षा घेण्यावर अधिक भर असणार आहे.
6. परीक्षा देणे बंधनकारक नसून इच्छुक शिक्षकांना या परीक्षेत बसता येणार आहे.

असं असेल परीक्षेचे नियोजन (Teachers Exam)
1. मराठवाड्यातील शिक्षकांची परीक्षा 30 आणि 31 जुलैला पार पडणार आहे.
2. मराठवाड्यातील 18 हजार शिक्षकांनी परीक्षा देण्याची तयारी दर्शवली आहे.
3. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात (Teachers Exam) परीक्षा सेंटर असणार आहे.
4. पहिले ते दहावीच्या शिक्षकांची परीक्षा घेतली जाणार आहे.
5. जिल्हा परिषद आणि अनुदानित संस्थांच्या शिक्षकांची ही परीक्षा होणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com