ICAI CA Results 2023 : CA परीक्षेच्या निकालाची तारीख जवळ आली!! असा पहा निकाल

करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट इंडिया (ICAI CA Results 2023) लवकरच CA इंटरमीडिएट आणि फायनल निकाल प्रसिद्ध करणार आहे. ICAI अधिकारी धीरज खंडेलवाल यांनी केलेल्या ट्विटनुसार, दोन्ही निकाल येत्या आठवड्यात जाहीर होणं अपेक्षित आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाईटवर हा निकाल चेक करता येणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी या वर्षी ICAI CA फायनल आणि इंटरमिजिएट परीक्षा दिली आहे ते विद्यार्थी निकाल जाहीर झाल्यानंतर  अधिकृत वेबसाईटवर त्यांचे निकाल पाहू शकतील. ICAI अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार दि. 5 किंवा 6 जुलै रोजी निकाल जाहीर होईल असा अंदाज आहे, परंतु संस्थेकडून अधिकृत घोषणा होण्याची प्रतीक्षा आहे.

निकाल पाहण्यासाठी ‘या’ स्टेप्स करा फॉलो – (ICAI CA Results 2023)
1. ICAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
2. सीए इंटरमीडिएट निकाल पर्यायावर क्लिक करा.
3. तुमचा ICAI नोंदणी क्रमांक/पिन आणि रोल नंबर वापरून लॉगिन करा.
4. कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि सबमिट बटण दाबा. (ICAI CA Results 2023)
5. सीए इंटरचा निकाल मे 2023 तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
6. उमेदवार त्यांचे गुण तपासू शकतात आणि जून सत्रासाठी सीए इंटरमिजिएट निकाल डाउनलोड करू शकतात.
7. भविष्यातील संदर्भासाठी CA इंटरमिजिएट 2023 च्या निकालाची प्रिंटआउट घ्या

ICAI CA इंटरमीडिएट परीक्षेची दोन (ICAI CA Results 2023) गटांमध्ये विभागणी करण्यात आली होती, गट 1 मे 3, 6, 8 आणि 10, 2023 रोजी आणि गट 2 मे 12, 14, 16 आणि 18, 2023 . CA अंतिम परीक्षा 2, 4, 7 आणि 9 मे 2023 रोजी गट 1 आणि 11, 13, 15 आणि 17 मे 2023 रोजी गट 2 आयोजित करण्यात आली होती. या दोन्ही निकाल लवकरच उपलब्ध होतील. 24, 26, 28 आणि 30 जून 2023 रोजी, ICAI ने CA फाउंडेशन जून 2023 ची परीक्षा घेतली. फाउंडेशन कोर्सचे निकाल योग्य वेळी जाहीर केले जातील.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com