Career as a Chef : असं होता येईल 5 स्टार हॉटेलचे शेफ; पहा कोर्स, पगार याविषयी सर्व डिटेल्स

करिअरनामा ऑनलाईन । स्वयंपाकाची आवड असणाऱ्यांसाठी (Career as a Chef) हॉटेलमध्ये शेफ बनणं हा देखील करिअरचा उत्तम पर्याय ठरू शकतो. शेफ बनण्यासाठी क्रिएटिव्हिटी, इमॅजिनेशन, आणि बिझनेस स्किल यासोबत पाककलेची आवड असणे अत्यंत महत्वाचे असते. उत्तम शेफ बनण्यासाठी कॉलेज किंवा इन्स्टिटयूटमधून प्रशिक्षण घ्यावे लागते. यासाठी तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करु शकता.

अनेकांना विविध पदार्थ खायची आवड असते तर काहींना वेगवेगळे पदार्थ बनवून ते इतरांना खाऊ घालण्याची आवड असते. तुम्हालाही स्वयंपाकाची आवड असेल तर तुम्ही ती (Career as a Chef) आवड प्रोफेशनमध्येही बदलू शकता. शेफ (chef) बनून तुम्ही तुमची आवडही जोपासू शकता आणि चांगला पैसाही कमवू शकता.
केवळ पदार्थ बनवणे हे एवढेच शेफचे काम नाही तर मेनू तयार करणे, खाद्यपदार्थांची चाचणी करणे आणि किचन मॅनेजमेंट अशा अनेक जबाबदाऱ्या शेफला सांभाळाव्या लागतात. आपण पाहतोय की हॉटेल आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री वेगाने वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर (Career as a Chef) व्यावसायिक शेफ्सची मागणीही वाढत आहे. शेफला त्याच्या कामाचा उत्तम मोबदला मिळतो. कामाचा अनुभव आणि कौशल्य यावर पगार अवलंबून असतो.

5 स्टार हॉटेलमध्ये शेफ कसे तयार होतात, त्यांचा अभ्यासक्रम, पगार याविषयी सविस्तर माहिती पाहूया…
असे आहेत कोर्स – (Career as a Chef)
उत्तम शेफ बनण्यासाठीही प्रोफेशनल क्वॉलिफिकेशनची गरज असते. यासाठी तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटीमध्ये सर्टिफिकेट, डिप्लोमा, अंडरग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस करु शकता. तसेच यामध्ये बीएससी इन हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल मॅनेजमेंट, बीएस्सी इन केटरिंग सायन्स आणि हॉटेल मॅनेजमेंट, फूड प्रोडक्शन आणि पॅटिसरीमध्ये सर्टिफिकेट कोर्स, कलिनरी आर्ट्समध्ये डिप्लोमा , बीए इन कलरी आर्ट्स इत्यादी कोर्सेसचा समावेशही आहे. या सर्व कोर्सेसचा कालावधी सहा महिने ते तीन ते चार वर्ष इतका असतो.

हॉटेल मॅनेजमेंट कोर्ससाठी अग्रेसर विद्यापीठांची यादी
1) आय एच एम ( इन्स्टीट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट) (IHM), केटरिंग अँज न्यूट्रीशन पूसा, नवी दिल्ली
2) गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजी आणि अप्लाइड न्यूट्रिशन, देहरादून
3) GIHMCT, नागपूर (Career as a Chef)
4) डॉ. आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, चंदीगडच
5) इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, जयपूर.

असा मिळतो प्रवेश
सरकारी हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी दरवर्षी एनटीए (NTA) म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे प्रवेश परीक्षा घेतली जाते. ही संयुक्त प्रवेश परीक्षा असते. नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट एक्झाम (NCHM) असे या परीक्षेचे (Career as a Chef) नाव आहे. याद्वारे नॅशनल काऊन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी (NCHMCT) शी संलग्न महाविद्यालयांमध्ये B.Sc (हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल अॅडमिनिस्ट्रेशन) अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळतो. या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमामध्ये एकूण सहा सेमिस्टर असतात. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातर्फे या अभ्यासक्रमाची डिग्री मिळते.
इतका मिळतो पगार (Career as a Chef)
Glassdoor या अमेरिकन रिव्ह्यू वेबसाईटच्या अहवालानुसार, दिल्लीतील 5 स्टार हॉटेल्समध्ये शेफचा सरासरी पगार वर्षाला 40 लाख रुपयांपर्यंत असतो. मात्र हे सर्व शेफची क्षमता, त्याची कौशल्ये आणि त्याचा अनुभव किती आहे यावर अवलंबून असते. जेवढा अनुभव आणि कौशल्य जास्त तेवढाच पगारही जास्त मिळतो.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com