Home Blog Page 192

Job Notification : खेलो इंडिया स्टेट सेंटर ऑफ एक्सलन्स अंतर्गत ‘या’ पदांवर भरती; ताबडतोब करा अर्ज

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । खेलो इंडिया स्टेट सेंटर ऑफ एक्सलन्स (Job Notification) अंतर्गत नोकरीची संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून उच्च कार्यप्रदर्शन व्यवस्थापक (HPM), मुख्य प्रशिक्षक (अॅथलेटिक्स), सामर्थ्य आणि कंडिशनिंग तज्ञ, पोषणतज्ञ, तरुण व्यावसायिक पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – खेलो इंडिया स्टेट सेंटर ऑफ एक्सलन्स
भरले जाणारे पद – उच्च कार्यप्रदर्शन व्यवस्थापक (HPM), मुख्य प्रशिक्षक (अॅथलेटिक्स), सामर्थ्य आणि कंडिशनिंग तज्ञ, पोषणतज्ञ, तरुण व्यावसायिक
पद संख्या – 05 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (Job Notification)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 डिसेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक-सह-सह-सचिव कार्यालय, नवीन क्रीडा संकुल, सिल्वासा – 396230 (दादरा आणि नगर हवेली)

भरतीचा तपशील –

पद पद संख्या 
उच्च कार्यप्रदर्शन व्यवस्थापक (HPM) 01
मुख्य प्रशिक्षक (अॅथलेटिक्स) 01
सामर्थ्य आणि कंडिशनिंग तज्ञ 01
पोषणतज्ञ 01
तरुण व्यावसायिक 01

मिळणारे वेतन –
पद  वेतन
उच्च कार्यप्रदर्शन व्यवस्थापक (HPM) Rs. I lakh
मुख्य प्रशिक्षक (अॅथलेटिक्स) Rs. I lakh
सामर्थ्य आणि कंडिशनिंग तज्ञ Rs. I lakh
पोषणतज्ञ Rs. 75,000/-
तरुण व्यावसायिक Rs. 40,000/-

 

असा करा अर्ज – (Job Notification)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचा आहे.
2. इतर माध्यमातून आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
3. अर्जा सोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडावी.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://dnh.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CIDCO Recruitment 2023 : सिडकोमध्ये ‘लेखा लिपिक’ पदावर भरती सुरु; मिळेल आकर्षक पगार

CIDCO Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । CIDCO अंतर्गत (CIDCO Recruitment 2023) लेखा लिपिक पदांच्या एकूण 23 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2024 आहे.

संस्था – CIDCO
भरले जाणारे पद – लेखा लिपिक
पद संख्या – 23 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 जानेवारी 2024
वय मर्यादा – 40 ते 47 वर्षे
मिळणारे वेतन – रु. 25,500 ते 81,100 दरमहा

परीक्षा फी – (CIDCO Recruitment 2023)
1. राखीव प्रवर्ग – रुपये 1062/-
2. खुला प्रवर्ग – रुपये 1180/
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
B.Com/ BBA/ BMS with Accountancy/ Financial Management/Cost Accounting/ Management Accounting/ Auditing
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी दिलेल्या (CIDCO Recruitment 2023) संबंधित लिंक वरुन अर्ज करावा.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://cidco.maharashtra.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : सरकारच्या शस्त्रे बनवण्याच्या कारखान्यात विविध पदांवर भरती; ग्रॅज्युएट करु शकतात अर्ज 

Job Alert (94)

करिअरनामा ऑनलाईन । ऑर्डनन्स फॅक्टरी, वरणगाव येथे विविध (Job Alert) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदाच्या एकूण 50 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – ऑर्डनन्स फॅक्टरी, वरणगाव
पद संख्या – 50 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 डिसेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जनरल मॅनेजर, ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव, तालुका- भुसावळ, जिल्हा-जळगाव [एमएस]-425308

भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. सामान्य प्रवाह पदवीधर (अभियांत्रिकी) – 40 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – Candidates should have successfully completed Graduation in respective stream from a Government recognized (Job Alert) university in the above mentioned Disciplines /Subject fields only. (Job Alert)
2. पदवीधर / तंत्रज्ञ (अभियांत्रिकी) – 10 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – Candidates should have successfully completed Graduation/Diploma in respective stream from a Government recognized university in the above mentioned Disciplines /Subject fields only

भरतीची जाहिरात – (Job Alert)
Job Alert

मिळणारे वेतन – (Job Alert)
1. सामान्य प्रवाह पदवीधर (अभियांत्रिकी)- 9000/- रुपये दरमहा
2. पदवीधर / तंत्रज्ञ (अभियांत्रिकी)- 8000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – वरणगाव जि. जळगाव
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिकृत वेबसाईट – https://ddpdoo.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Mahavitaran Recruitment 2023 : 10 वी, 12 वी पास उमेदवारांसाठी महावितरणमध्ये नोकरी; कोणतीही फी न भरता करा अर्ज

Mahavitaran Recruitment 2023 (9)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण (Mahavitaran Recruitment 2023) कंपनी लि. अंतर्गत अमरावती येथे भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिकाऊ उमेदवार पदांच्या 69 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि. अंतर्गत अमरावती
भरले जाणारे पद – शिकाऊ उमेदवार (Mahavitaran Recruitment 2023)
1. इलेक्ट्रिशियन (Electrician) – 32 पदे
2. लाईनमन (Lineman) – 32 पदे
3. कोपा – 05 पदे
पद संख्या – 69 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 डिसेंबर 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Mahavitaran Recruitment 2023)
1. उमेदवार 10 वी/12 वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
2. उमेदवार इलेक्ट्रिकल आणि कोपा/पासा ट्रेडमध्ये उत्तीर्ण असावा.
वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्ष असावे.
परीक्षा फी – फी नाही
नोकरी करण्याचे ठिकाण – अमरावती

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
PDF
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UCO Bank Recruitment 2023 : युको बँकेत ‘या’ पदांवर भरती सुरु; 142 जागा रिक्त

UCO Bank Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । युको बँकेत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात (UCO Bank Recruitment 2023) निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून तुम्हाला बँकेत नोकरी करण्याची उत्तम संधी मिळणार आहे. या माध्यमातून स्पेशलिस्ट ऑफिसर, मॅनेजर-रिस्क मॅनेजमेंट पदाच्या एकूण 142 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2023 आहे.

बँक – युको बँक
पद संख्या – 142 पदे
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. स्पेशलिस्ट ऑफिसर – 127 पदे
B.E./B.Tech./B.Sc./M.Tech/M.E/ MBA/PGDM/PGDBM/MCA/LLB/CA/पदव्युत्तर पदवी; 01/02/03/04/05/06/08 वर्षे अनुभव
2. मॅनेजर-रिस्क मॅनेजमेंट-MMGS-II – 15 पदे
CA/CFA/MBA(फायनान्स)/PGDM

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 डिसेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – General Manager, UCO Bank, Head Office, 4th Floor, H. R. M Department, 10, BTM Sarani, Kolkata, West Bengal-700 001

वय मर्यादा – (UCO Bank Recruitment 2023)
1. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 नोव्हेंबर 2023 रोजी 21 ते 35 वर्षे
2. SC/ST: 05 वर्षे सूट
3. OBC: 03 वर्षे सूट
परीक्षा फी –
1. जनरल/ओबीसी/EWS – ₹800/-
2. [SC/ST/PWD – फी नाही (UCO Bank Recruitment 2023)
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
PDF 1
PDF 2
अधिकृत वेबसाईट – ucobank.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

PMC Recruitment 2023 : पुणे महानगरपालिकेची क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर पदावर भरती सुरु; उत्तम मिळेल पगार

PMC Recruitment 2023 (9)

करिअरनामा ऑनलाईन । पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त (PMC Recruitment 2023) पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर पदाच्या एकूण 16 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – पुणे महानगरपालिका
भरले जाणारे पद – क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर
पद संख्या – 16 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 डिसेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, ठाकरे चौक, मंगळवार पेठ, पुणे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (PMC Recruitment 2023)
1. उमेदवार B.Sc पदवीधर असावा.
2. इंग्रजीमध्ये 40 W.P.M पेक्षा कमी नसलेल्या गतीसाठी टायपिंगची सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाली असावी आणि मराठीत 30 W.P.M.
वय मर्यादा –
1. खुल्या प्रवर्गातील – ३८ वर्षे
2. मागासवर्गीय उमेदवारांसाठी – ४३ वर्षे
परीक्षा फी – फी नाही
मिळणारे वेतन – 21,840/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

आवश्यक कागदपत्रे –
1. फोटो ओळखपत्र – आधारकार्ड / पासपोर्ट / वाहन परवाना / पॅनकार्ड इ.
2. जन्म तारखेचा पुरावा – जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला / रहिवाशी दाखला इ.
3. शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र.
4. पदवी उत्तीर्ण मार्कशिट (PMC Recruitment 2023)
5. टायपिंग प्रमाणपत्र
6. एम.एस.सी.आय.टी. (MSCIT)
7. अनुभव प्रमाणपत्र.
8. जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र. (आवश्यक असल्यास)

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – 
PDF
अधिकृत वेबसाईट – https://pmc.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SSC HSC Exam : 10वी-12वीच्या खासगी विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

SSC HSC Exam (4)

करिअरनामा ऑनलाईन । परीक्षेचा फॉर्म नंबर 17 भरून दहावी-बारावीची (SSC HSC Exam) परीक्षा देणाऱ्या खासगी विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत अतिविलंब शुल्कासह अर्ज करण्यासाठी दि. 20 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

खासगी विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. ऑफलाईन पद्धतीने आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत; असं  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.

विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी 10वीसाठी http://form17.mh-ssc.ac.in आणि 12वीसाठी http://form17.mh-hsc.ac.in या संकेतस्थळाचा वापर करावा. अर्ज भरण्यासाठीच्या सूचना वेबसाईटवर मराठी आणि इंग्रजीमधून उपलब्ध आहेत. खासगी विद्यार्थ्यांना विलंब शुल्काने नाव (SSC HSC Exam) नोंदणी करण्यासाठी शेवटची तरीख 20 डिसेंबर 2023 असणार आहे. त्यानंतर मुदतवाढ दिली जाणार नाही, असे राज्य मंडळाचे प्रभारी सचिव माणिक बांगर यांनी प्रकटनाद्वारे जाहीर केले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Success Story : कहाणी त्या महिला अधिकाऱ्याची जिच्यासाठी आईने सोडली नोकरी; जागृती बनली IAS

UPSC Success Story of IAS Jagruti Awasthi

करिअरनामा ऑनलाईन । म्हणतात ना; आई आणि मुलीचे (UPSC Success Story) नाते मैत्रिणीसारखे असते; ते अगदी खरं आहे. या नात्यातील कथा खूप काही नैतिक मूल्ये शिकवून जातात. मुलांच्या यशात पालकांचा नेहमी मोठा वाटा असतो. आज आपण अशाच एका मायलेकीची कथा पाहणार आहोत. ही गोष्ट तुम्हाला त्याग आणि समर्पण शिकवेल.
लेकीसाठी सोडली नोकरी
जागृती अवस्थी आणि तिची आई मधुमालती अवस्थी  या मायलेकीचं नातं अनोखं आहे. मुलीच्या यशासाठी आईने नोकरीचा त्याग केला. IAS अधिकारी जागृती अवस्थीची प्रेरणा देणारी कहाणी आणि तिचा यशाचा मंत्र जाणून घेऊया…

इंजिनिअरिंग नंतर मिळाली सरकारी नोकरी
IAS जागृती अवस्थी ही मध्य प्रदेशातील फतेहपूर येथील मुळ रहिवासी आहे. 2020 मध्ये झालेल्या UPSC परिक्षेत तिने संपूर्ण देशात दूसरा  क्रमांक मिळवून इतिहास रचला आहे. ती IAS अधिकारी बनली आहे. जागृतीने भोपाळच्या मौलाना आझाद नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. यानंतर तिला भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेडमध्ये नोकरी देखील मिळाली.

आई-वडील दोघेही शिक्षक
जागृतीला पहिल्यापासून IAS व्हायचे होते. त्यामुळे काही काळानंतर तिने BHELची नोकरी सोडली आणि यूपीएससीची तयारी सुरू केली. जागृतीचे वडील डॉ. एस.सी.अवस्थी हे प्राध्यापक आहेत. आई मधुमालती अवस्थी याही शिक्षिका होत्या. पण आईने आपल्या मुलीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नोकरी सोडली आणि मुलीचे करिअर घडवण्यासाठी पाठबळ दिले. अभ्यासामध्ये व्यत्यय येवू नये यासाठी त्या घरी टीव्हीसुध्दा सुरु करत नव्हत्या.

दुसऱ्या प्रयत्नात संपूर्ण देशात मारली बाजी
जागृती अवस्थीने 2019 मध्ये पहिल्यांदा UPSC परीक्षा दिली होती. या परिक्षेत ती पूर्व परीक्षा पास करु शकली नाही. या अपयशाने ती खूप अस्वस्थ झाली होती. तिने विचार केला की दुसरी संधी का घेऊ नये? यानंतर जागृतीने 2020 मध्ये पुन्हा UPSCची परीक्षा दिली. निकाल आल्यावर तिचा विश्वास बसेना. तिने UPSC मध्ये देशात चक्क दूसरा क्रमांक पटकावला होता.

शॉर्टकटने यश मिळत नाही
जागृती अवस्थीला उत्तर प्रदेश केडर मिळाले आहे. जीवनात शॉर्टकटने यश मिळत नाही, असे जागृतीचे मत आहे. कोणत्याही परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी (UPSC Success Story) सातत्यपूर्ण तयारी खूप महत्त्वाची असते. यूपीएससीच्या तयारीबाबत, ती आधी संपूर्ण अभ्यासक्रम नीट वाचण्याचा सल्ला देते. यानंतर, त्यानुसार पुस्तके निवडण्याचेही सांगते.
जागृतीने UPSC देणाऱ्या उमेदवारांना दिवसातून 8 ते 10 तास अभ्यास करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी प्रत्येक दिवसाचे वेळापत्रक तयार करण्याचा सल्ला ती देते. तसेच जो विषय कमकुवत आहे त्यावर अधिक लक्ष केंद्रितकरण्यासाठी ती सांगते. जागृती सांगते की, सुरुवातीला ती आठ ते दहा तास अभ्यास करायची. नंतर तीने हा वेळ वाढवला आणि ती 10 ते 12 तास अभ्यास करु लागली. परीक्षेच्या दोन महिन्यांपूर्वी अभ्यासाची वेळ 12 ते 14 तासांपर्यंत वाढली होती. तिला परीक्षेच्या पहिल्या प्रयत्नात अपयश आले पण ती खचली नाही. तिने स्वतःमधील कमतरता ओळखल्या आणि त्या सुधारण्यावर भर दिला.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Exam Tips : नोकरी करताना अशी करा UPSC ची तयारी; IFS अधिकाऱ्याने दिल्या अभ्यासाच्या टिप्स

Exam Tips

करिअरनामा ऑनलाईन । अनेक तरुण तरुणी नोकरी (Exam Tips) करताना सरकारी भरती परीक्षेचा अभ्यास करत असतात.  पूर्णवेळ नोकरीबरोबरच लोकसेवा आयोग, राज्यसेवा आयोग किंवा इतर कोणत्याही सरकारी परीक्षेचा अभ्यास करणे हे तसे आव्हानात्मकच आहे. या आव्हानाला कसं सामोरं जायचं यासाठी भारतीय वन सेवा अधिकारी हिमांशू त्यागी यांनी काही अभ्यासाच्या टिप्स दिल्या आहेत. या टिप्स निश्चितच तुम्हाला उपयोगी पडतील. पाहूया…

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला स्पर्धात्मक परीक्षा म्हटले जाते. भारतात दरवर्षी लाखोंच्या संख्येने तरुण उमेदवार परीक्षेचा अर्ज भरतात. अभ्यासासाठी जीवतोड मेहनत घेतात. पण फार कमी लोकांना यामध्ये यश मिळते.  UPSC परीक्षा पास होण्यासाठी तीन टप्पे पार करावे लागतात. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तीन फेरीतून प्रत्येक उमेदवाराला जावे लागते. या परीक्षेसाठी काहीजण कोचिंग क्लासचा आधार घेतात तर काहीजण सेल्फ स्टडी करतात. अनेकजण घरापासून लांब राहून परीक्षेची तयारी करताना दिसतात. पण असेही काही उमेदवार आहेत जे नोकरी करत असताना ही परीक्षा देतात. त्यांच्यासाठी परीक्षेची तयारी करणे आव्हानात्मक असते. त्यामुळे नोकरीवर असणारे अनेकजण इच्छा असूनही या परीक्षेसाठी अर्जच करत नाहीत; तर काहीजण हे आव्हान धाडसाने स्वीकारतात.
पूर्णवेळ नोकरीबरोबरच लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास करणे म्हणजे तारेवरची कसरतच. या समस्येवर भारतीय वन सेवा अधिकारी हिमांशू त्यागी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना काही टिप्स दिल्या आहेत. यामध्ये त्यांनी सांगितले आहे….

1. दिवसभर तुम्ही नोकरीच्या ठिकाणी असता. त्यामुळे सकाळी 3.30 वाजता उठून किमान 4 तास अभ्यास करा.
2. काम संपल्यानंतर अर्धा तास वाचन करा.
3. तुम्ही प्रवास करत असाल तर त्या वेळेचा योग्य वापर करा आणि या काळात अभ्यास करा.
4. तुमच्या फोन आणि लॅपटॉपमध्ये अभ्यासाचे साहित्य ठेवा. जेणेकरून तुम्हाला ऑफिसमध्ये वेळ मिळेल तेव्हा अभ्यास करता येईल. (Exam Tips)
5. वीकेंडला दहा तास अभ्यास करा.
6. आव्हानात्मक वाटणाऱ्या परीक्षेबाबत आत्मविश्वास मिळवण्यासाठी हे वेळापत्रक एक ते दोन वर्षे सतत पाळा. हिमांशू त्यागी यांनी दिलेल्या सल्ल्यावर आता लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

हिमांशू त्यागीच्या टिप्सला नेटिझन्सकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. काही वापरकर्त्यांनी त्यांच्या टिप्सचे कौतुक केले आणि त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल त्यांचे आभार मानले. त्यांनी (Exam Tips) सांगितले की त्याच्या टिप्स व्यावहारिक आणि उपयुक्त आहेत.  तर काही वापरकर्त्यांनी त्याच्या टिपांवर टीका केली आणि त्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी सांगितले की त्याच्या टिप्स अवास्तव आणि अशक्य आहेत. त्यांनी त्याच्या सत्यतेवरही शंका घेतली आणि त्यांच्या ओळखीचा आणि पदाचा पुरावा मागितला आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Police Patil Bharti 2023 : दहा वर्षानंतर ‘या’ गावात होणार पोलीस पाटील भरती; 476 पदे भरली जाणार 

Police Patil Bharti 2023 (5)

करिअरनामा ऑनलाईन । गेल्या दहा वर्षांपासून विविध कारणांमुळे (Police Patil Bharti 2023) रखडलेल्या जिल्ह्यातील पोलीस पाटील भरती प्रक्रियेला वेग आला आहे. राज्य शासनाने पोलीस पाटील भरतीस परवानगी दिली आहे. त्यामुळे सहा तालुक्यांतील 476 रिक्त पदे भरली जाणार आहेत. अकोले, संगमनेर, नगर, नेवासे, पाथर्डी आणि शेवगाव या तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे.

विविध कारणांनी पोलिस पाटील भरती प्रक्रिया रखडली होती
कोपर्डी (ता. कर्जत) येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यानंतर सकल मराठा समाजाने राज्यभर भव्य मोर्चे काढले होते. कोपर्डी अत्याचार खटला जलदगती न्यायालयात चालवावा, मराठा समाजाला आरक्षण द्यावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या होत्या. या मोर्चाची दखल घेत राज्य शासनाने मराठा समाजाला आरक्षण दिले होते. या आरक्षणाला न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यामुळे पोलीस पाटील भरती प्रक्रियेमध्ये कोणत्या समाजाला आरक्षण द्यायचे, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिस पाटील पदाची भरती रखडली होती. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण रद्द केले. कोरोना संसर्ग आजाराची साथ २०१९ मध्ये आली. सर्वत्र लॉकडॉऊन करावे लागले. त्यानंतर पुन्हा दुसरी कोरोनाची साथ आली. या दोन्ही साथी नियंत्रणात आणण्यासाठी शासकीय पातळीवरील भरती, बदली प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. अशा विविध कारणांनी पोलिस पाटील भरती प्रक्रिया रखडली होती.
पोलीस आणि महसूल प्रशासनाचा समन्वय साधणारा पोलीस पाटील (Police Patil Bharti 2023)
पोलीस पाटील हे पद गावात प्रतिष्ठेचे पद म्हणून ओळखले जाते. पोलीस आणि महसूल प्रशासनासाठी महत्त्वाचा समन्वय असतो. गावातील अवैध धंद्यांची माहिती पोलिसांना देणे, गुन्ह्यांच्या तपासात मदत करणे, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात महत्त्वाची जबाबदारी असते. गावात साथीचे आजार आल्यास त्याची माहिती महसूल प्रशासनाला देणे आदी कर्तव्य त्यांचे असतात.
कधी आणि कोठे निघणार सोडत
संगमनेर उपविभागातील संगमनेर व अकोले तालुक्यांतील १५१ गावांतील पदांकरिता संगमनेर शहरातील यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती प्रशासकीय इमारत सभागृह, नवीन नगर रोड, संगमनेर या ठिकाणी सभेचे सकाळी ११ वाजता आयोजन केलेले आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी (Police Patil Bharti 2023) शैलेश हिंगे यांनी दिली. नगर व नेवासे तालुक्यांतील १२९ गावांतील पदांकरिता नियोजन भवन, जुने जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर या ठिकाणी दुपारी ३ वाजता सभेचे आयोजन केलेले आहे, तर पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील १९६ गावांतील पदांकरिता सकाळी ११ वाजता पाथर्डी तहसील कार्यालयात काढली जाणार असल्याची माहिती आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com